वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ११/१ पृ. २१-२५
  • सर्पाचे खरे स्वरुप उघड करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्पाचे खरे स्वरुप उघड करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्वर्गात घडलेल्या बंडखोरीचा आणखी पुरावा
  • सैतानाला मर्यादित रुपाने उघड केले
  • कोडे उलगडण्याची चावी
  • पवित्र गूजावरील पडदा दूर झाला
  • येशू त्या शत्रूला उघड करतो
  • सर्पाचे संतान—कसे उघडकीस आणण्यात आले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • सावध राहा—सैतान तुमच्यावर टपून आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • तुमच्या शत्रूला ओळखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • सैतानाच्या डावपेचापुढे टिकाव धरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ११/१ पृ. २१-२५

सर्पाचे खरे स्वरुप उघड करणे

“एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र यहोवापुढे येऊन उभे राहिले, व त्यांच्यामध्ये सैतानही आला.”—ईयोब १:६.

१. (अ) सैतान या नावाचा मूळारंभ आणि अर्थ काय आहे? (ब) शास्त्रवचनात “सैतान” हा शब्द किती वेळा आढळतो, व यामुळे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

सैतान या नावाचा मूळारंभ काय आहे? त्याचा काय अर्थ होतो? पवित्र शास्त्र रचनेला अनुसरुन हा शब्द तीन इब्री अक्षरांकडून बनला आहे; ती अक्षरे ש (सीन), ט (तेहत), आणि נ (नून) ही आहेत. यांच्यामध्ये स्वर मिळवल्यास त्यापासून “सैतान” हा शब्द तयार होतो. एडवर्ड लँग्टन या प्रामाण्यांच्या मते हा शब्द “अशा मूळाकडून आहे ज्याचा अर्थ आहे, ‘विरोध करणे,’ किंवा ‘शत्रू असणे किंवा तशी हालचाल करणे.’” (पडताळा १ पेत्र ५:८.) पवित्र शास्त्रात “सैतान” हे नाम ५० पेक्षा अधिक वेळा आढळते तरी ते इब्री शास्त्रवचनांत केवळ १८ वेळेला आणि तेही १ ले इतिहास, ईयोब आणि जखर्या या पुस्तकात का दिसते. यामुळे प्रश्‍न हा येतो की, मानवाला सैतानाच्या बंडखोरीचा व त्याच्या कारवायांचा शोध केव्हा लागला? इब्री शास्त्रवचनात सैतानाला प्रथमतःच केव्हा स्पष्टरित्या सामोरे आणण्यात आले?

२. आदाम व हव्वेच्या बंडखोरीनंतर कोणत्या प्रश्‍नाचे लगेच उत्तर देण्यात आले नाही?

२ पवित्र शास्त्र अगदी साधेपणात पण गहन संज्ञांनी, या पृथ्वीवर मध्यपूर्वेत नंदनवनमय उद्यानात पाप व बंडखोरी कशी उद्‌भवली ते सांगते. (पहा उत्पत्ती, अध्याय २ व ३.) येथे आदाम व हव्वेला आज्ञाभंग करण्यास चालना देणाऱ्‍याची ओळख एका सर्पाकरवी देण्यात आलेली असली तरी या सर्पाच्या वाणीमागे खरी शक्‍ती व बुद्धीमत्ता ही कोणाची होती ते तेथे लगेच सांगण्यात आले नाही. तरीपण एदेनात ज्या गोष्टी घडल्या गेल्या व ज्यामुळे आपल्याला नंदनवनमय उद्यानातून बाहेर जावे लागले त्या घटनांच्याविषयी आदामाने बऱ्‍याच काळ चिंतन केले असावे हे नक्की!—उत्पत्ती ३:१७, १८, २३; ५:५.

३. आदाम जरी भुलवला गेला नाही तरी पापात कसा पडला, आणि याचा मानवजातीवर कसा परिणाम घडला?

३ प्राण्यांना मानवी बुद्धीचातुर्यानुरुप संभाषण करता येत नाही हे आदामाला ठाऊक होते. त्याला याची चांगली जाणीव होती की हव्वेवर मोहपाश येण्याआधी देवाने कोणत्याही प्राण्याच्या द्वारे त्याच्याशी संभाषण केले नव्हते. तर मग, देवाच्या आज्ञेचा भंग करावा हे त्याच्या बायकोला कोणी सांगितले? पौल म्हणतो की, हव्वा ही पूर्णपणे भुलविली गेली तरी आदाम भुलविला गेला नाही. (उत्पत्ती ३:११-१३, १७; १ तीमथ्य २:१४) आदामाला कदाचित वाटले की, कोणी तरी अदृश्‍य प्राण्याने देवास आज्ञाधारक असण्यापेक्षा दुसरा पर्याय सुचविला असावा. तथापि, सर्पाशी त्याची गाठ पडली नाही तरीही त्याने आज्ञाभंग करण्यात आपल्या बायकोला साथ देण्याचे पत्करले. आदामाने अशा पद्धतीने स्वेच्छेने आज्ञाभंग केल्यामुळे आपला परिपूर्ण असण्याचा साचा बिघडविला, पापाच्या न्यूनतेला सामोरे आणले आणि भाकित करण्यात आलेल्या मरणदंडाच्या शिक्षेला आपलेसे केले. अशाप्रकारे सर्पाचे माध्यम वापरुन सैतान आरंभापासूनचा मनुष्यघातक बनला.—योहान ८:४४; रोमकर ५:१२, १४.

४, ५. (अ) सर्पाविरुद्ध कोणता भविष्यवादित न्यायदंड उच्चारण्यात आला? (ब) या भविष्यवादात कोणकोणती कोडी संलग्न आहेत?

४ एदेनात घडलेल्या बंडखोरीचा परिणाम देवाकडून भविष्यवादित दंडाज्ञा देण्यात झाला. या न्यायदंडात एक “पवित्र गूज” समाविष्ठ होते ज्याचा पूर्ण उलगडा होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावघी लागणार होता. देवाने सर्पास म्हटलेः “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील.”—इफिसकर ५:३२; उत्पत्ती ३:१५.

५ या महत्वपूर्ण भविष्यवादात कित्येक कोडी समाविष्ठ आहेत. येथे ज्या “स्त्री”चा उल्लेख आहे ती कोण आहे? तसेच ‘स्त्रीचे संतान’ आणि ‘सर्पाचे संतान’ याकडून कोणता अर्थबोध होतो? शिवाय ज्याच्या संतानाचे वैर स्त्रीच्या संतानासोबत असणार होते तो सर्प खरोखरी कोण होता? याविषयी आम्ही लवकरच चर्चा करणार आहोत व ती हे दाखवील की यहोवाने आपल्या नियुक्‍त समयी या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे ठरविले होते.—पडताळा दानीएल १२:४ आणि कलस्सैकर १:२५, २६.

स्वर्गात घडलेल्या बंडखोरीचा आणखी पुरावा

६. स्वर्गात बंडखोरी घडली आहे याचा पुरावा जलप्रलयाआधीच कसा दिसून आला?

६ पवित्र शास्त्र इतिहास घडू लागला तेव्हा मानवापेक्षा श्रेष्ठ अशा स्थरावर बंडखोरी घडल्याचे, मानवाचे पापात पतन झाल्याच्या सुमारे १,५०० वर्षांनंतर, जलप्रलयाच्या आधीच प्रगट झाले. पवित्र शास्त्राचा अहवाल आम्हास कळवितोः “मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.” या अस्वाभाविक समागमातून जे संकरित संतान उदयास आले त्यांना “नेफिलिम,” “महाकाय,” “प्राचीन काळचे महावीर” असे ओळखण्यात येऊ लागले. (उत्पत्ती ६:१-४; “देवपुत्रां”च्या ओळखीविषयी ईयोब १:६ पडताळा.) या घटनेविषयी सुमारे २,४०० वर्षांनंतर यहुदा याने भाष्य केले. तो म्हणालाः “ज्या देवदूतांनी . . . आपले वसतिस्थान सोडले, त्यास त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले.”—यहुदा ६; २ पेत्र २:४, ५.

७. मानवाचा दुष्टपणा होता तरी पवित्र शास्त्रातील कित्येक ऐतिहासिक पुस्तकात आपल्याला कोणती गोष्ट वगळल्याची दिसते?

७ जलप्रलयाआधीच्या या काळात “पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे आणि त्यांच्या अंतःकरणात येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट” होत्या. तथापि ही देवदूतांची बंडखोरी तसेच मानवाची दुष्टता याच्या पाठीमागे सैतानाचे प्रभावशाली वर्चस्व होते असे उत्पत्ती या प्रेरित पुस्तकात खासपणे सांगण्यात आले नाही. (उत्पत्ती ६:५) सैतान “पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरुन” येत होता हे त्याने कबूल केले होते तरी खरे पाहता, शास्ते, शमुवेल आणि राजे या प्रेरित पवित्र शास्त्र पुस्तकातील यहुदा व इस्राएलाचा इतिहास आणि त्यांचे मूर्तिपूजा व खोट्या भक्‍तीमध्ये गुरफटणे या सर्व घटनांच्या मागील अदृश्‍य शक्‍ती, शैतान होता असा त्याचा उल्लेख तेथे करण्यात आलेला नाही.—ईयोब १:७; २:२.

८. आपल्यावर ओढवलेला त्रास सैतानापासून आहे हे आरंभाला ईयोबाला समजले का? हे आम्हाला कसे कळते?

८ याचप्रमाणे आपण ईयोब व त्याच्या त्रासाविषयीचा अभूतपूर्व अहवाल वाचतो तेव्हा ईयोबाने आपल्यावरील त्रास सैतानाकडून आहे असे कधीच म्हटल्याचे आढळत नाही. स्वतःच्या वागणूकीमुळे जो वादविषय उद्‌भवला गेला त्याची त्याला कल्पना नसावी हे स्पष्ट दिसते. (ईयोब १:६-१२) यहोवापुढे ईयोबाच्या सचोटीबद्दल आव्हान देऊन सैतानाने हा त्रास त्याच्यावर आणला होता याची त्याला जाणीव झाली नाही. या कारणास्तव जेव्हा ईयोबाच्या बायकोने त्याला खडसावून म्हटलेः “तुम्ही अजूनही सत्व धरुन राहिला आहात का? देवाचे नाव सोडून द्या आणि मरुन जा!” त्यावेळी त्याने सहजपणे म्हटलेः “देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” आपल्या छळाचा खरा उगम कोणता आहे हे न जाणता त्याला वाटले की, तो देवापासून आहे म्हणून तो स्विकारला पाहिजे असा त्याने ग्रह धरला. अशाप्रकारे, ईयोबावर गुदरलेली परिक्षा मोठी खडतर होती.—ईयोब १:२१; २:९, १०.

९. मोशेसंबंधाने कोणता व्यवहार्य प्रश्‍न विचारला जाऊ शकतो?

९ आता एक प्रश्‍न येतो. आम्हाला माहीत आहे की, ईयोबाचे पुस्तक मोशाने लिहिले व त्यात त्यानेच सैतान हा पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरुन होता हे लिहिले. तर मग, त्याने जी पहिली पाच पुस्तके लिहिली, त्यात सैतानाचा तो नावाने का उल्लेख करीत नाही? हो, सैतानाचा इब्री शास्त्रवचनात इतका तुरळक उल्लेख का येतो?a

सैतानाला मर्यादित रुपाने उघड केले

१०. सैतानाला इब्री शास्त्रवचनात मर्यादित रुपाने केवढे उघड करण्यात आले आहे?

१० इब्री शास्त्रवचनात दुरात्म-प्रेरित हालचालींचा धिक्कार करण्यात आलेला असला तरी आपला शत्रू सैतान याला येथे मर्यादित रुपात उघड करावे हे यहोवाने आपल्या सूज्ञानानुरुप ठरविले ते योग्य कारणासाठीच असावे. (लेवीय १७:७; अनुवाद १८:१०-१३; ३२:१६, १७; २ इतिहास ११:१५) तद्वत, इब्री लेखकांना सैतानाविषयी व त्याच्या स्वर्गातील बंडखोरीविषयी काही ज्ञान असले तरी यांना केवळ देवाचे लोक व त्यांच्या सभोवताली असणाऱ्‍या राष्ट्रांची पापकर्मे लिहिण्यासाठी व ती उघड करण्यासाठी तसेच त्यांच्या दुष्टतेविषयी कडक इशारा देण्यासाठी प्रेरित करण्यात आले होते. (निर्गम २०:१-१७; अनुवाद १८:९-१३) सैतानाच्या नावाचा क्वचितच उल्लेख करण्यात आला.

११, १२. सैतान व त्याच्या प्रभावाविषयी इब्री पवित्र शास्त्र लेखक अजाण नव्हते ते आपल्याला कसे कळते?

११ एदेनात घडलेल्या घटना, “देवपुत्रां”चे पतन आणि ईयोबाच्या पुस्तकातील अहवाल लक्षात घेता प्रेरित इब्री शास्त्र लेखकांना सैतानाच्या दुष्ट, अतिमानवी प्रभावाविषयीची जाणीव नव्हती असे नाही. इ.स.पूर्वीच्या सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात जखर्या संदेष्ट्याला प्रमुख याजक यहोशवा याचा दृष्टांत घडला ज्यात त्याने “विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे” असे पाहिले. यानंतर यहोवाच्या दिव्यदूताने सैतानाला असे म्हटल्याचे त्याने पाहिलेः “अरे सैताना, यहोवा तुला धमकी देवो.” (जखर्या ३:१, २) तसेच इ.स.पूर्वीच्या पाचव्या शतकात इस्राएल व यहुदाच्या इतिहासाचे लिखाण करणाऱ्‍या एज्रा या शास्त्र्याने कळविले की, “सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करावयास दाविदाला प्रवृत्त केले.”—१ इतिहास २१:१.

१२ अशाप्रकारे, जखर्याच्या काळापर्यंत पवित्र आत्मा, शास्त्रवचनामध्ये सैतानाची भूमिका अधिकाधिक स्पष्ट करीत गेला. तरीपण या दुष्ट प्राण्याचे सबंध स्वरुप देवाच्या वचनात स्पष्ट होण्यासाठी आणखी पाच शतके जाणार होती. सैतानाला पूर्ण रुपाने उघड करण्यासाठी लागलेल्या या वेळेविषयीच्या कारणाविषयी पवित्र शास्त्राधारित असे कोणते अनुमान आपण काढू शकतो?

कोडे उलगडण्याची चावी

१३-१५. (अ) इब्री शास्त्रवचनात सैतानाला इतक्या कमी प्रमाणात का उघड करण्यात आले ते कोणत्या मूलभूत सत्याच्या किल्लीद्वारे समजू शकते? (ब) येशूच्या येण्यामुळे सैतानाला उघड्यावर कसे आणले गेले?

१३ देवाच्या वचनावर विश्‍वास राखणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना या तसेच आधी विचारलेल्या प्रश्‍नांविषयीची उत्तरे सापडविण्याची किल्ली कोणी उच्च टिकाकारांनी लिहिलेल्या मार्गदर्शिकेत आढळणार नाही; तसे झाल्यास पवित्र शास्त्र हे एक निव्वळ अप्रतिम साहित्य असून ते मानवी बुद्धीमत्तेचे उत्पादन आहे असा त्याचा अर्थ होईल. नाही, तसे नाही. उलटपक्षी ही किल्ली पवित्र शास्त्रातच, दोन मूलभूत सत्यांमध्ये दिसते. पहिले सत्य शलमोन राजाने लिहिल्याप्रमाणेः “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासारखा आहे.” (नीतीसूत्रे ४:१८; पडताळा दानीएल १२:४; २ पेत्र १:१९-२१.) सत्य हे देवाच्या वचनात देवाच्या नियुक्‍त वेळी, त्याच्या सेवकांच्या आकलनशक्‍तीला ग्रहण करणारी सुयोग्य स्थिती व गरज उद्‌भवते त्यानुरुप हळूवारपणे प्रकटविले जाते.—योहान १६:१२, १३; पडताळा ६:४८-६९.

१४ दुसरे मूलभूत सत्य हे, पौलाने तीमथ्य या ख्रिस्ती शिष्याला जे लिहिले त्या मध्ये दिसते. तो म्हणालाः “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, . . . ह्‍याकरता उपयोगी आहे; ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सिद्ध व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) देवाचा पुत्र येशू हा सैतानास उघड करणार होता, हे शास्त्रवचनात नमूद होणार होते व याकरवीच ख्रिस्ती मंडळीला यहोवाच्या सार्वभौमतेखातर सैतानाविरुद्ध दृढ उभे राहण्यास सिद्ध केले जाणार होते.—योहान १२:२८-३१; १४:३०.

१५ या आधारावरच उत्पत्ती ३:१५ ची कोडी हळूवारपणे सुटली गेली. देवाचा पवित्र आत्मा किंवा त्याच्या कार्यकारी शक्‍तीच्या मार्गदर्शनाकरवी इब्री शास्त्रवचनांनी येणाऱ्‍या मशीहा किंवा संतानाविषयी प्रकाशाची छटा पुरविली. (यशया ९:६, ७; ५३:१-१२) याच्याच अनुषंगाने, दियाबल सैतान देवाचा प्रतिस्पर्धी आणि मानवजातीचा शत्रू या नात्याने करीत असलेल्या भूमिकेविषयी लहानशी प्रकाशकिरणे झळकविली गेली. तथापि, येशूच्या येण्यामुळे सैतानाला पूर्णपणे उघड करण्यात आले. त्याने वचनयुक्‍त संतान येशू ख्रिस्त याविषयी जी जोरदार हालचाल केली त्यामुळे तो पूर्णपणे उघड झाला. त्या ख्रिस्ती युगाच्या पहिल्या शतकात जसजशा घटना घडत गेल्या त्याकरवी “स्त्री” म्हणजे यहोवाची स्वर्गीय आत्मिक संघटना आणि संतान येशू ख्रिस्त यांच्या भूमिका ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात स्पष्ट करण्यात आल्या. याच वेळेला, “जुनाट साप” सैतान याची भूमिका पूर्णपणे उघड केली गेली.—प्रकटीकरण १२:१-९; मत्तय ४:१-११; गलतीकर ३:१६; ४:२६.

पवित्र गूजावरील पडदा दूर झाला

१६, १७. “ख्रिस्ताविषयीचे पवित्र गूज” यात कशाकशाचा समावेश आहे?

१६ प्रेषित पौलाने “ख्रिस्ताविषयीच्या पवित्र गूजा”विषयी सविस्तरपणे लिहिले. (इफिसकर ३:२-४; रोमकर ११:२५; १६:२५) या पवित्र गूजाचा खऱ्‍या “संताना”सोबत संबंध होता, जे दियाबल सैतान या जुनाट सापाचे डोके ओघाओघाने फोडणार होते. (प्रकटीकरण २०:१-३, १०) या गूजात आणखी हे समाविष्ट होते की, येशू हा त्या “संताना”मधील पहिला व मूळचा सदस्य असणार आणि त्याला प्रथम यहुद्यांमधून व नंतर शमरोन मग विदेश्‍यांतून “सहवारीस” येऊन मिळणार तेव्हा त्या “संताना”ची संख्या पूर्ण होणार होती.—रोमकर ८:१७; गलतीकर ३:१६, १९, २६-२९; प्रकटीकरण ७:४; १४:१.

१७ पौल स्पष्टता करतोः “ते रहस्य [गूज] जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रगट करुन दाखविलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानास कळविण्यात आले नव्हते.” तर मग, हे रहस्य किंवा गूज काय होते? “ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधु, आमच्याबरोबर एक शरीर व आमच्याबरोबर अभिवचनांचे वाटेकरी आहेत.”—इफिसकर ३:५, ६; कलस्सैकर १:२५-२७.

१८. (अ) “पवित्र गूज” याचा अर्थ प्रकट करण्यास वेळेची जरुरी होती हे पौल कसे दाखवून देतो? (ब) या प्रकटीकरणाचा परिणाम “जुनाट साप” याच्या समजणूकीवर कसा परिणाम करणार होता?

१८ पौलाला याविषयीची इतकी कृतज्ञता वाटली की सर्व लोकातून त्याला “ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी; आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय आहे ते सर्वांना प्रकाशित करुन दाखवावे” यासाठी निवडले गेले. तो कलस्सैकरांना असेच काही म्हणतोः “जे रहस्य [पवित्र गूज] युगानुयुग पिढ्यान्‌पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता तो त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे.” तद्वत, “संतान”विषयीचे गूज सरतेशवटी प्रकट झाले म्हणजे मोठा शत्रू, “जुनाट साप” यालाही ओघाओघाने पूर्णतयः उघड केले जाणार. यहोवाने सैतानासंबंधीचा विषय मशीहा येईपर्यंत प्रधान स्थानी आणला नाही हे स्पष्ट दिसते; आणि ख्रिस्त येशू या संतानाशिवाय सैतानाला कोण बरे अधिक चांगल्या प्रकाराने उघड करुन दाखवू शकेल?—इफिसकर ३:८, ९; कलस्सैकर १:२६.

येशू त्या शत्रूला उघड करतो

१९. येशूने शत्रूला कसे उघड करुन दाखविले?

१९ येशूने आपल्या उपाध्यपणाच्या आरंभालाच परिक्षकाला या शब्दांनी धुडकावून लावलेः “अरे सैताना, चालता हो; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘यहोवा तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.’” (मत्तय ४:३, १०) दुसऱ्‍या प्रसंगी, येशूने घातकी वृत्ती बाळगणाऱ्‍या निंदेखोर धार्मिक शत्रूंना, त्यांना चालना देणारा कोण होता ते दाखवून उघड केले व याद्वारे एदेनात सर्पाच्या मागे याचीच शक्‍ती होती हे त्याने प्रकटविले. तो म्हणालाः “तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.”—योहान ८:४४.

२०. सैतानाला उघड करुन दाखवण्यामध्ये येशूला कोणता आधार होता?

२० येशू सैतानाचा इतक्या आत्मविश्‍वासाने धिक्कार का करु शकला? तो सैतानाला इतक्या चांगल्या प्रकारे का ओळखू शकला? याचे कारण, सैतान जेव्हा स्वर्गात होता त्याचवेळी येशूही तेथे होता! सार्वभौम प्रभु यहोवाच्या विरुद्ध याने गर्वाने बंडाळी करण्याआधी येशू त्याला ओळखत होता; त्यावेळी येशूला शब्द हे नाव होते. (योहान १:१-३; कलस्सैकर १:१५, १६) या दियाबलाने एदेनात सर्पाकरवी जी कुयुक्‍ती योजली ती येशूने पाहिली होती. तसेच, भावाचा वध करणाऱ्‍या काईनावर त्याने आपले कावेबाज वर्चस्व कसे जमवले होते तेही येशूने बघितले होते. (उत्पत्ती ४:३-८; १ योहान ३:१२) नंतर, यहोवाच्या स्वर्गीय दरबारात “देवपुत्र . . . येऊन उभे राहिले, व सैतानही त्यांच्यामध्ये आला” तेव्हा येशू तेथे हजर होता. (ईयोब १:६; २:१) होय, येशूला दियाबलाची इत्यंभूत माहिती होती आणि म्हणूनच त्याला त्याचे खरे स्वरुप, म्हणजे सैतान हा लबाड, घातकी, निंदा करणारा आणि देवाचा शत्रू आहे हे उघड करुन दाखवता आले.—नीतीसूत्रे ८:२२-३१; योहान ८:५८.

२१. आता कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे अद्याप बाकी आहेत?

२१ एवढा हा प्रबळ शत्रू मानवजात व त्याच्या इतिहासावर आपले वर्चस्व राखून आहे तर मग आता हे प्रश्‍न येतातः ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात सैतानाला आणखी केवढे उघड करुन दाखवण्यात आले आहे? सैतानाच्या युक्‍तीबाज योजना धुडकावून लावून आम्ही आपली खिस्ती सचोटी कशी राखू शकतो?—इफिसकर ६:११.

[तळटीपा]

a  द डेविल—पर्सेप्शन्स ऑफ इविल फ्रॉम अँटीक्विटी टू प्रिमिटिव्ह ख्रिश्‍चॅनिटी या पुस्तकात प्राध्यापक रसेल म्हणतातः “जुन्या करारात दियाबलाविषयी पूर्णतेचे प्रकटन नाही हा आधुनिक यहुदी व ख्रिस्ती वेदांतामध्ये त्याचे अस्तित्व अमान्य करण्याचा आधार ठरत नाही. एखादा शब्द वा विचार याची सत्यता आरंभीच आढळून आली पाहिजे ही विचारधारा चुकीचा युक्‍तीवाद ठरेल. वस्तुतः ऐतिहासिक सत्य हे कालाच्या वाढीनुसार कळू लागते.”—पृष्ठ १७४.

तुम्हाला आठवते का?

◻ उत्पत्ती ३:१५ च्या अनुषंगाने कोणती कोडी उलगडण्यास हवी?

◻ स्वर्गात बंडखोरी झाल्याचा पुरावा इब्री शास्त्रवचनात कोठे आढळतो?

◻ सैतानाचा इब्री शास्त्रवचनामध्ये इतका अल्प उल्लेख का आढळतो ते समजण्यासाठी कोणती दोन सत्ये मदत देतात?

◻ सैतान व त्याच्या भूमिकेस प्रकटविण्यामध्ये ‘ख्रिस्ताविषयीच्या पवित्र गूजाचा’ काय संबंध आहे?

[२२ पानांवरील चित्रं]

जलप्रलयापूर्वीच्या जगतात सैतानाचे मानवजातीतील वर्चस्व स्पष्ट दिसत होते

[२३ पानांवरील चित्रं]

ईयोबाच्या सचोटीविषयी देवाला आव्हान करणारा सैतान, एक खरी व्यक्‍ती होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा