सर्पाचे संतान—कसे उघडकीस आणण्यात आले?
“तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन.”—उत्पत्ति ३:१५.
१. (अ) यहोवा आनंदी देव का आहे? (ब) त्याच्या आनंदात आपल्यालाही सामील होता यावे म्हणून त्याने काय केले आहे?
यहोवा आनंदी देव आहे व याकरता उचित कारण आहे. चांगल्या गोष्टींचा तो सर्वात महान व प्रमुख दाता आहे, व त्याच्या उद्देशांची पूर्ती होण्याच्या मार्गात काहीच येऊ शकत नाही. (यशया ५५:१०, ११; १ तीमथ्य १:११; याकोब १:१७) त्याच्या सेवकांनी आपल्या आनंदात सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा आहे आणि याकरता तो योग्य कारणे देतो. यास्तव, मानव इतिहासातील सर्वात भयाण क्षणी—एदेनमधील बंडाळीच्या वेळी—त्याने आपल्याला भवितव्याकडे उमेदीने पाहण्याचा एक आधार दिला.—रोमकर ८:१९-२१.
२. एदेनमधील बंडखोरांवर न्याय घोषित करताना, आदाम व हव्वेच्या संतानाकरता यहोवाने उमेदीचा आधार कसा पुरवला?
२ यहोवाच्या एका आत्मिक पुत्राने, देवाचा विरोध तसेच त्याची निंदा करून स्वतःला नुकतेच दियाबल सैतान बनवले होते. पहिल्या मानवांनी, प्रथम हव्वेने व त्यानंतर आदामाने त्याच्या प्रभावात येऊन स्पष्टरित्या सांगितलेल्या यहोवाच्या नियमाचा भंग केला होता. त्यांना योग्यपणे मृत्यूची शिक्षा ठोठावण्यात आली. (उत्पत्ति ३:१-२४) तरीही, या बंडखोरांना न्याय सुनावताना यहोवाने आदाम व हव्वेच्या संतानाकरता उमेदीचा एक आधार पुरवला. कशा तऱ्हेने? उत्पत्ति ३:१५ येथे नमूद केल्यानुसार यहोवा म्हणाला: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” ती भविष्यवाणी, सबंध बायबलची तसेच जगाची आणि यहोवाच्या सेवकांना समाविष्ट करणाऱ्या गत व सद्य घटनांची समज मिळवण्याचे सूत्र आहे.
त्या भविष्यवाणीचा अर्थ
३. उत्पत्ति ३:१५ मध्ये उल्लेख केल्यानुसार, (अ) सर्प, (ब) “स्त्री,” (क) सर्पाची “संतति,” (ड) स्त्रीची “संतति” यांची ओळख पटवा.
३ तिचे महत्त्व जाणण्याकरता त्याच भविष्यवाणीतील विविध घटकांचा विचार करा. उत्पत्ति ३:१५ येथे संबोधलेली व्यक्ती सर्प—भित्रा साप नव्हे तर त्याचा उपयोग करणारी व्यक्ती आहे. (प्रकटीकरण १२:९) ती “स्त्री” हव्वा नसून यहोवाची स्वर्गीय संघटना, म्हणजे आत्म्याने अभिषिक्त असलेल्या त्याच्या पृथ्वीवरील सेवकांची माता आहे. (गलतीकर ४:२६) सर्पाची “संतति” ही सैतानाची संतती आहे, म्हणजेच, त्याचे संतान—ते दुरात्मे आणि सैतानाची प्रवृत्ती प्रदर्शित करणारे व स्त्रीच्या ‘संततीप्रती’ वैर प्रदर्शित करणारे मानव तसेच मानवी संघटना आहेत. (योहान १५:१९; १७:१५) स्त्रीची “संतति” प्रामुख्यत्वे येशू ख्रिस्त आहे ज्याचा सा. यु. २९ मध्ये पवित्र आत्म्याने अभिषेक झाला होता. ‘पाण्यापासून व आत्म्यापासून नव्याने जन्मलेले’ आणि ख्रिस्तासोबत स्वर्गीय राज्याचे वारस असलेले १,४४,००० जण त्या वचनदत्त संततीचा दुय्यम भाग आहेत. सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून यांची गणना स्त्रीच्या संततीमध्ये करण्यात येऊ लागली.—योहान ३:३, ५; गलतीकर ३:१६, २९.
४. पृथ्वीचे परादीस बनेल व त्यामध्ये पाप व मृत्यूपासून मुक्त झालेले लोक असतील याजशी उत्पत्ति ३:१५ कसे संबंधित आहे?
४ ज्या व्यक्तीच्या फसवणुकीमुळे मानवजातीला परादीस मुकावे लागले त्या व्यक्तीने एदेनमधील वास्तविक सर्पाचा मुखपत्र म्हणून उपयोग केला होता. उत्पत्ति ३:१५ ने, त्या सर्पाचा कावेबाजपणे उपयोग केलेल्या व्यक्तीला चिरडून टाकले जाईल त्या काळाकडे अंगुली दर्शवली. मग, पाप व मृत्यूपासून मुक्त होऊन देवाच्या मानवी सेवकांना पुन्हा परादीसमध्ये वास करण्यास मार्ग मोकळा होईल. तो किती आनंदमय समय असेल!—प्रकटीकरण २०:१-३; २१:१-५.
५. दियाबलाच्या आत्मिक संतानाच्या प्रवृत्ती कोणत्या आहेत?
५ एदेनमधील बंडाळीनंतर, दियाबल सैतानासारख्या प्रवृत्ती—बंडाळी, लबाडी, निंदा करणे व खून करणे तसेच यहोवाच्या इच्छेप्रती व त्याची उपासना करणाऱ्यांप्रती विरोध अशा प्रवृत्ती दर्शवणाऱ्या व्यक्ती आणि संघटना वर येऊ लागल्या. त्या प्रवृत्तींनी संततीची, दियाबलाच्या आत्मिक मुलांची ओळख पटवून दिली. यांपैकी काईन एक होता; यहोवाने काईनाऐवजी हाबेलाच्या उपासनेला स्वीकृती दर्शवली तेव्हा त्याने हाबेलाचा खून केला. (१ योहान ३:१०-१२) निम्रोद देखील त्यांपैकीचा होता ज्याचे नावच त्याची ओळख बंडखोर म्हणून करते व जो यहोवाच्या विरोधात बलवान पारधी व शासक बनला. (उत्पत्ति १०:९) याशिवाय, खोटेपणावर स्थापलेले सरकारप्रणीत धर्म असलेली एकामागून एक प्राचीन राज्ये देखील बॅबिलोनसह यात होती व त्यांनी यहोवाच्या उपासकांवर क्रूरतेने जुलूम केला.—यिर्मया ५०:२९.
‘तू व स्त्री यांमध्ये वैर’
६. सैतानाने यहोवाच्या स्त्रीप्रती कोणत्या प्रकारे वैर दाखवले आहे?
६ या सबंध काळादरम्यान, सर्प व यहोवाची स्त्री, दियाबल सैतान व निष्ठावान आत्मिक प्राण्यांनी बनलेल्या यहोवाच्या स्वर्गीय संघटनेत वैर होते. सैतानाने यहोवाची निंदा केली व देवदूतांना त्यांचे योग्य वस्तीस्थान त्यागण्यास प्रवृत्त करून यहोवाच्या स्वर्गीय संघटनेचा भंग करू पाहिला; यावरून त्याचे वैर प्रकट झाले. (नीतिसूत्रे २७:११; यहूदा ६) सैतानाने आपल्या दुरात्म्यांचा उपयोग, यहोवाकडून पाठवलेल्या देवदूतीय संदेशवाहकांच्या आड येण्याचा प्रयत्न करण्यास केला तेव्हा हे प्रकट झाले. (दानीएल १०:१३, १४, २०, २१) या २० व्या शतकात सैतानाने मशीही राज्याच्या जन्माच्या वेळीच त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे उल्लेखनीयरित्या स्पष्ट झाले.—प्रकटीकरण १२:१-४.
७. यहोवाच्या निष्ठावान देवदूतांना लाक्षणिक सर्पाप्रती शत्रुत्व का वाटले, तरीही त्यांनी कोणता आत्मसंयम दाखवला आहे?
७ यहोवाची स्त्री, म्हणजेच निष्ठावान देवदूतांचा वर्ग यांचे वैर देखील लाक्षणिक सर्पाशी होते. सैतानाने देवाच्या नावाची निंदा केली होती; त्याने देवाच्या प्रत्येक बुद्धिमान प्राण्याच्या, देवदूतांच्याही निष्ठेबद्दल शंका निर्माण केली, व देवाप्रती असलेल्या निष्ठेचा भंग करण्याचा तो सक्रिय प्रयत्न करत होता. (प्रकटीकरण १२:४अ) ज्याने स्वतःला दियाबल व सैतान बनविले त्याच्याविषयी निष्ठावान देवदूत, करूब व सराफ यांना निश्चितच तिटकारा वाटला असावा. तरीही, यहोवाने त्याच्या स्वतःच्या समयी व मार्गाने सर्व बाबी हाताळाव्यात म्हणून ते त्याच्यावर विसंबून राहिले आहेत.—पडताळा यहूदा ९.
देवाच्या स्त्रीच्या संततीप्रती शत्रुत्व
८. सैतान कोणाच्या मागावर होता?
८ या दरम्यान, सैतान पूर्वभाकीत स्त्रीच्या संततीच्या मागावर होता व यहोवाने सांगतिल्यानुसार ती संतती सर्पाचे डोके कुचलणार होती. स्वर्गातील देवदूताने, बेथलेहेममध्ये जन्मलेला येशू “तारणारा . . . ख्रिस्त प्रभु आहे” असे घोषित केले तेव्हा, तो स्त्रीची पूर्वभाकीत संतती बनेल याची ठाम खात्री मिळाली.—लूक २:१०, ११.
९. येशूच्या जन्मानंतर, सैतानाने द्वेषयुक्त वैर कसे प्रदर्शित केले?
९ सैतानाचे द्वेषयुक्त वैर लवकरच दिसून आले; त्याने मूर्तिपूजक फल-ज्योतिषींना एका विशिष्ट कामगिरीवर जाण्यास भुलविले ज्यामुळे ते प्रथम जेरूसलेम येथे राजा हेरोदकडे व त्यानंतर बेथलेहेम येथील घरात गेले जेथे त्यांना लहान बालक येशू व त्याची आई, मरिया आढळली. त्यानंतर लगेचच, बेथलेहेम येथील व आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाच्या सर्व लहान बाळकांना जिवे मारण्याचा आदेश राजा हेरोदाने दिला. असे करण्याद्वारे, हेरोदाने संततीबद्दल सैतानी द्वेष प्रगट केला. हेरोद, मशीहा होणाऱ्या बाळकाची कत्तल करण्याचा प्रयत्न करत होता याची त्याला चांगली जाणीव होती हे स्पष्ट आहे. (मत्तय २:१-६, १६) हेरोद राजा दुष्ट, कावेबाज व खूनी होता यास इतिहास पुष्टी देतो—तो खरोखरच सर्पाच्या संततीपैकी एक होता.
१०. (अ) येशूच्या बाप्तिस्म्यानंतर, वचनयुक्त संततीविषयी यहोवाचा उद्देश फोल ठरवण्यास सैतानाने व्यक्तिगतरित्या कसा प्रयत्न केला? (ब) आपले हेतू साध्य करण्याकरता सैतानाने यहुदी धार्मिक नेत्यांचा उपयोग कसा केला?
१० येशूचा सा. यु. २९ मध्ये पवित्र आत्म्याने अभिषेक झाला व यहोवाने स्वर्गातून येशू आपला पुत्र असल्याचे कबूल केल्यावर सैतानाने येशूला वारंवार मोहाला बळी पाडण्याचा प्रयत्न केला व अशाप्रकारे आपल्या पुत्राविषयी यहोवाचा उद्देश फोल ठरवण्याचा प्रयत्न केला. (मत्तय ४:१-१०) त्यात अपयशी ठरल्याने, आपले हेतू साध्य करण्यासाठी त्याने पुढे मानवी प्रतिनिधींचा उपयोग केला. येशूवर लांछन आणू पाहणाऱ्या त्या लोकांमध्ये ढोंगी धार्मिक पुढाऱ्यांचाही उपयोग करण्यात आला होता. त्यांनी, खुद्द सैतानाने उपयोगात आणलेल्या साधनांचा म्हणजेच लबाडी व निंदा यांचा उपयोग केला. येशूने एका पक्षघाती मनुष्याला, “धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,” असे म्हटले तेव्हा तो मनुष्य प्रत्यक्षात बरा झाला की नाही हे पाहण्याआधीच येशू दुर्भाषण करतो असा शास्त्र्यांनी निर्णय देऊन टाकला. (मत्तय ९:२-७) येशूने शब्बाथाच्या दिवशी लोकांना बरे केले तेव्हा, शब्बाथाच्या नियमाचे उल्लंघन करणारा म्हणून परूश्यांनी त्याचा धिक्कार केला आणि त्याला जिवे मारण्याची मसलत केली. (मत्तय १२:९-१४; योहान ५:१-१८) येशूने भुते काढली तेव्हा तो “भुतांचा अधिपति जो बाल्जबूल” याच्याशी संबंधित होता असा आरोप त्याच्यावर परूश्यांनी केला. (मत्तय १२:२२-२४) लाजरला मृतातून उठवल्यावर, पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला परंतु पुन्हा एकदा मुख्य याजक व परूश्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट रचला.—योहान ११:४७-५३.
११. येशूच्या मृत्यूच्या तीन दिवसांआधी, त्याने सर्पाच्या संततीचा भाग म्हणून कोणाची ओळख करून दिली आणि का?
११ निसान ११, सा. यु. ३३ रोजी, येशूला, ते कोणता कट रचत होते याची चांगली जाणीव असतानाही तो जेरूसलेम येथील मंदिराच्या आवारात सरळ गेला व तेथे त्याने जाहीररित्या त्यांच्यावर न्याय घोषित केला. शास्त्र्यांनी व परूश्यांनी गट या नात्याने ते कोणत्या प्रकारचे लोक होते हे सतत प्रदर्शित केले होते; म्हणून येशू म्हणाला: “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करिता; तुम्ही स्वतःहि आत जात नाही व आत जाणाऱ्यांनाहि आत जाऊ देत नाही.” “अहो सापांनो, सापांच्या पिलानो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?,” असे म्हणून ते सर्पाच्या संततीचे भाग होते हे येशूने यथायोग्यपणे घोषित केले. (मत्तय २३:१३, ३३) त्याचे बोल उत्पत्ति ३:१५ मधील भविष्यवाणीची आठवण करून देतात.
१२, १३. (अ) मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी त्यांचा आत्मिक पिता कोण होता याची आणखी पुष्टी कशी दिली? (ब) त्यांच्यात कोण सामील झाले? (क) उत्पत्ति ३:१५ च्या पूर्णतेत, स्त्रीच्या संततीची टाच कशी फोडण्यात आली?
१२ येशूचे शब्द ऐकल्यावर पश्चात्तापदग्ध होऊन त्यांनी देवाकडे दयेची याचना केली का? आपल्या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप केला का? नाही! मार्क १४:१ दाखवते, की दुसऱ्या दिवशीच मुख्य याजकाच्या अंगणातील सभेत, “[येशूला] कपटाने कसे धरावे व जिवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते.” येशूने आधी ज्याचे वर्णन मनुष्यघातक असे केले होते त्या सैतानाचा खुनी आत्मा ते प्रदर्शित करीत राहिले. (योहान ८:४४) लवकरच यहूदा इस्कर्योत त्यांच्यात सामील झाला ज्यास सैतानाने धर्मत्यागी होण्यास प्रवृत्त केले. यहूदाने देवाच्या स्त्रीच्या निर्दोष संततीला त्यागले व तो सर्पाच्या संततीला सामील झाला.
१३ निसान १४ च्या पहाटे, यहुदी धर्मसभेच्या सदस्यांनी येशूला रोमन सुभेदारापुढे कैद करून नेले. येथे, त्याला खिळण्यात यावे असा गजर करण्यात मुख्य याजकांनी पुढाकार घेतला. पिलाताने, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” असे विचारले तेव्हा मुख्य याजकांनीच उत्तर दिले, “कैसरावाचून कोणी आम्हाला राजा नाही.” (योहान १९:६, १५) ते सर्पाच्या संततीचे भाग होते हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यहालचालीद्वारे सिद्ध केले. परंतु ते निश्चितच एकटे नव्हते. मत्तय २७:२४, २५ मधील प्रेरित अहवाल असे वृत्त देतो: ‘पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुतले.’ त्यावर सर्व लोक म्हणाले: “त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो.” अशाप्रकारे, त्या पिढीच्या अनेक यहुद्यांनी स्वतःला सर्पाच्या संततीचे भाग असल्याचे दाखवून दिले. तो दिवस मावळण्याआधीच, येशू मरण पावला. सैतानाने दृश्य संततीचा उपयोग करून देवाच्या स्त्रीच्या संततीची टाच फोडली होती.
१४. स्त्रीच्या संततीची टाच फोडणे सैतानाकरता विजय का नव्हता?
१४ सैतान जिंकला होता का? मुळीच नाही! येशू ख्रिस्ताने जगावर विजय मिळवून त्याच्या शासकावर मात केली होती. (योहान १४:३०, ३१; १६:३३) मृत्यूपर्यंत त्याने यहोवाप्रती आपली सचोटी राखली होती. परिपूर्ण मनुष्य या नात्याने त्याच्या मृत्यूमुळे आदामाकरवी गमावलेले जीवनाचे हक्क खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली खंडणीची किंमत पुरविण्यात आली. यास्तव, त्याने त्या तरतुदीवर विश्वास ठेवणाऱ्यांना व देवाच्या आज्ञा पाळणाऱ्यांना अनंतकालाच्या जीवनाचा मार्ग मोकळा केला. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) यहोवाने येशूला मृतातून उठवून स्वर्गातील अमर जीवन बहाल केले. यहोवाच्या उचित समयी, येशू सैतानाचे अस्तित्व मिटवून टाकील. उत्पत्ति २२:१६-१८ येथे, त्या निष्ठावान संततीकरवी स्वतःला आशीर्वादित करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या पृथ्वीवरील सर्व कुटुंबांवर यहोवा कृपादृष्टी दाखवील असे भाकीत केले आहे.
१५. (अ) येशूच्या मृत्यूनंतर, त्याच्या प्रेषितांनी सर्पाच्या संततीची उघडीक करणे कसे चालू ठेवले? (ब) आजवर सर्पाच्या संततीने आणखी कोणते शत्रुत्व प्रकट केले आहे?
१५ येशूच्या मरणानंतर, आत्म्याने अभिषिक्त असलेल्या ख्रिश्चनांनी आपल्या प्रभुसारखेच सर्पाच्या संततीला उघडकीस आणण्याचे चालू ठेवले. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन, प्रेषित पौलाने, “सैतानाच्या कृतीप्रमाणे” अस्तित्वात येणाऱ्या ‘अनीतिमान पुरुषाबद्दल’ इशारा दिला. (२ थेस्सलनीकाकर २:३-१०) हा संयुक्त “पुरुष” ख्रिस्ती धर्मजगताचा पाळकवर्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. यावर, सर्पाच्या संततीने येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना उग्रपणे छळले. प्रकटीकरण १२:१७ येथे नमूद केलेल्या भविष्यवाणीत, सैतान देवाच्या स्त्रीच्या संततीच्या शेष भागासोबत आजवर लढाई करत राहील असे प्रेषित योहानाने भाकीत केले. अगदी हेच घडले आहे. अनेक देशांमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांनी देवाच्या राज्याबद्दल व त्याच्या नीतिमान मार्गांबद्दल खंबीर भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर बंदी आणण्यात आली, टोळ्यांकडून हल्ला करण्यात आला, त्यांना तुरुंगात किंवा छळछावण्यांमध्ये टाकण्यात आले.
सर्पाच्या संततीची आधुनिक दिवसातील उघडीक
१६. आधुनिक काळात, सर्पाच्या संततीचे भाग म्हणून कोणाची उघडीक करण्यात आली आहे, आणि कशी?
१६ येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून, खरे ख्रिस्ती सर्पाची व त्याच्या संततीची निडरतेने उघडीक करण्यात ढिले पडलेले नाहीत. सन १९१७ मध्ये, त्यावेळी बायबल विद्यार्थी या नावाने ज्ञात असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांनी संपलेले गूज (इंग्रजी) हे पुस्तक प्रकाशित केले ज्यामध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाचा ढोंगीपणा उघडकीस आणला. यानंतर १९२४ मध्ये धर्मोपदेशकांवर आरोप (इंग्रजी) असे शीर्षक असलेला छापील ठराव प्रस्तुत झाला. त्याच्या पाच करोड प्रती आंतरराष्ट्रीय प्रमाणावर वितरित करण्यात आल्या. सन १९३७ मध्ये, वॉच टावर संस्थेचे त्यावेळचे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी “उघडकीस आणलेले” व “धर्म व ख्रिस्ती विश्वास” या शीर्षकांच्या भाषणांमध्ये सैतानाच्या संततीची जोरदार उघडीक केली. त्या नंतरच्या वर्षी, विविध राष्ट्रांमध्ये ५० अधिवेशनांतील प्रेक्षक ऐकत असताना, त्यांनी इंग्लंडमधील लंडन येथून बिनतारी संदेशवहनाद्वारे “वास्तविकतांना तोंड द्या” हे भाषण दिले. एका महिन्यानंतर, संयुक्त संस्थानांतील एका विस्तारित रेडिओ जाळ्याद्वारे “फॅसिस्ट प्रणाली की स्वातंत्र्य” हे भाषण ऐकवण्यात आले. यांसोबत, शत्रू (इंग्रजी) व धर्म (इंग्रजी) अशा पुस्तकांमध्ये तसेच उघडकीस आणलेले (इंग्रजी) या पुस्तिकेतही जोरदार उघडीक करण्यात आली होती. सन १९२० च्या दशकापासून जे काही प्रकाशित करण्यात आले त्याच्या सुसंगतेत, आता ६५ भाषांमध्ये छापलेले प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे!a हे पुस्तक भ्रष्ट राजनैतिक शासकांची व लोभी, अप्रामाणिक वाणिज्य व्यापाऱ्यांची ओळख सर्पाच्या दृश्य संततीचे सर्वात प्रमुख सदस्य अशी करते. राजनैतिक पुढारी आपल्या प्रजेची दिशाभूल करण्यासाठी खोटेपणाचा आश्रय घेण्याची, रक्ताच्या पावित्र्याला काहीच महत्त्व न देण्याची व यहोवाच्या सेवकांची पिळवणूक करण्याची (व अशा तऱ्हेने ते देवाच्या स्त्रीच्या संततीप्रती द्वेष व्यक्त करतात) सवय लावून घेतात, तेव्हा ते निश्चितच स्वतःला सर्पाच्या संततीचा भाग म्हणून दाखवून देतात. हेच वाणिज्य व्यापाऱ्यांविषयी देखील खरे आहे ज्यांच्या विवेकाला काहीच रुखरुख न लागता ते आर्थिक लाभ मिळवण्याकरता खोटे बोलतात व ज्यामुळे रोग संभावतात अशी उत्पादने बनवतात अथवा विकतात.
१७. जगाच्या व्यवस्थेतून बाहेर येऊ शकतील अशा विख्यात व्यक्तींना अद्यापही कोणती संधी आहे?
१७ जगिक धर्म, राजकारण अथवा वाणिज्य यांनी डागलेल्या प्रत्येक व्यक्तीला सर्पाच्या संततीचा भाग म्हणून अखेरीस गणले जाणार नाही. यातील काही स्त्री व पुरुष यहोवाच्या साक्षीदारांची वाहवा करतात. त्यांची मदत करण्यास ते त्यांच्या चलतीचा उपयोग करतात व योग्य वेळी खऱ्या उपासनेचा स्वीकार देखील करतात. (पडताळा प्रेषितांची कृत्ये १३:७, १२; १७:३२-३४.) अशा सर्वांना ही विनंती केली गेली आहे: “राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची [यहोवा, NW] सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.” (स्तोत्र २:१०-१२) अर्थात, ज्या सर्वांना यहोवाची कृपादृष्टी हवी आहे त्यांनी आता, म्हणजेच स्वर्गीय न्यायाधीशाने संधीचे द्वार बंद करण्याआधीच कृती करणे महत्त्वाचे आहे!
१८. स्त्रीच्या संततीचा भाग नसले, तरी कोण यहोवाचे उपासक आहेत?
१८ जे स्वर्गीय राज्यात समाविष्ट आहेत तेच मात्र स्त्रीच्या संततीचा भाग आहेत. यांची संख्या अल्प आहे. (प्रकटीकरण ७:४, ९) तरीही, इतरांचा एक मोठा लोकसमुदाय आहे, होय असे लाखो लोक जे यहोवाचे उपासक या नात्याने परादीस पृथ्वीवरील अनंतकाळच्या जीवनाची वाट पाहतात. आपले शब्द तसेच कृती यांद्वारे ते यहोवाच्या अभिषिक्त जणांना म्हणतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जखऱ्या ८:२३.
१९. (अ) सर्व लोकांनी कोणती निवड केली पाहिजे? (ब) अजूनही संधी असताना सुज्ञतेने कार्य करण्याची कळकळीची विनंती विशेषतः कोणाला केली जात आहे?
१९ सर्व मानवजातीने निवड करण्याची आताच वेळ आहे. यहोवाची उपासना करून त्याच्या सार्वभौमत्वाला ते उंचावतील, की सैतानाला आवडणाऱ्या गोष्टी करून त्याला आपला शासक होण्यास अनुमती देतील? राज्याचे वारसदार म्हणजेच स्त्रीच्या संततीमधील शेष जणांसोबत, सर्व राष्ट्रांतील सुमारे ५० लाख लोक यहोवाच्या बाजूला झाले आहेत. इतर ऐंशी लाख लोकांनी त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यास किंवा त्यांच्या सभांना उपस्थित राहण्यास आस्था दाखवली आहे. यहोवाचे साक्षीदार या सर्वांना म्हणतात: संधीचे द्वार अजूनही उघडे आहे. असंदिग्धपणे यहोवाच्या बाजूने तुमची भूमिका घ्या. ख्रिस्त येशूला वचनदत्त संतती म्हणून स्वीकारा. यहोवाच्या दृश्य संघटनेसोबत आनंदाने सहवास राखा. राजा, ख्रिस्त येशू याच्या सत्तेद्वारे तो जे काही आशीर्वाद पुरवणार आहे त्यात तुम्हा सर्वांचा सहभाग असो.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
तुम्हाला आठवते का?
▫ उत्पत्ति ३:१५ येथे उल्लेखिलेला सर्प कोण आहे? तसेच स्त्री कोण आहे?
▫ सर्पाच्या संततीच्या कोणत्या प्रवृत्ती आहेत?
▫ येशूने सर्पाच्या संततीची उघडीक कशी केली?
▫ आधुनिक काळात सर्पाच्या संततीचा भाग म्हणून कोणाची उघडीक करण्यात आली आहे?
▫ सर्पाच्या संततीसोबत गणले न जाण्याकरता कोणती तातडीची कार्यहालचाल करणे आवश्यक आहे?
[१० पानांवरील चित्रं]
येशूने ढोंगी धार्मिक पुढाऱ्यांची, सर्पाच्या संततीचा भाग म्हणून उघडीक केली