वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १०/१ पृ. ४-६
  • कृतज्ञ राहण्याची अधिक कारणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कृतज्ञ राहण्याची अधिक कारणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत्युपासून दोन वेळेस सुटका
  • देवाची नेत्रदिपक लढाऊ पद्धत
  • अल्पदायी कृतज्ञता
  • “तुम्ही कृतज्ञ असा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • कृतज्ञ का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • “कृतज्ञ असा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तांबडा समुद्र ओलांडणं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १०/१ पृ. ४-६

कृतज्ञ राहण्याची अधिक कारणे

प्राचीन इस्राएलांपाशी इतरांपेक्षा निर्माणकर्त्यास धन्यवाद देण्यासाठी अधिक कारणे होती. असे आम्ही का म्हणू शकतो?

इतर मानवांप्रमाणेच इस्राएलांना देखील, देवाने ज्या सुंदर व विलोभनीय गोष्टी निर्मिल्या त्याविषयी कृतज्ञ असण्याचे कारण होते. पण कृतज्ञ राहण्याजोगे आणखी एक कारण होते ते म्हणजे सर्वसमर्थ देवाने त्यांना त्याचे खास लोक म्हणून निवडले होते व त्यांची विशिष्ट काळजी वाहिली. (आमोस ३:१, २) त्यांनी कृतज्ञ असण्याच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कारणांचा विचार करा.

मृत्युपासून दोन वेळेस सुटका

इ.स.पू. १५१३ मधील निसान १४ च्या रात्री सर्व इस्राएल पालकांना केवढे कृतज्ञ असल्याचे वाटले असावे बरे! त्या महत्त्वपूर्ण रात्री देवाच्या दूताने “मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले” मारुन टाकले. पण तो, ज्या दरवाज्याच्या कपाळपट्टी व बाह्‍यांना वल्हांडणाच्या पशुचे रक्‍त लावलेले होते त्या इस्राएल घरांना ओलांडून गेला. रात्रीची शांती भंग पावली आणि “मिसर देशात मोठा हाहाःकार उडाला कारण ज्यात कोणी मेला नाही असे एकही घर राहिले नाही.” पण तेच, प्रत्येक इस्राएल घरी त्यांचे प्रथम जन्मलेले जिवंत व बरे होते.—निर्गम १२:१२, २१-२४, ३०.

यानंतर बराच काळ झाला नसेल तेव्हाही इस्राएलांच्या अंतःकरणात परत एकदा कृतज्ञता वाढली असावी जेव्हा त्यांनी यहोवाचा आश्‍चर्यकारक हस्तक्षेप डोळ्यांनी पाहिला. यावेळी तांबडा समुद्र किनारा व मिसरच्या फारोच्या सैन्याचा कटु पाठलाग यांच्या कोंडीत सापडल्याचे त्यांना आढळले होते. तेव्हा प्रथमतः त्यांनी, जो मेघस्तंभ त्यांच्यापुढे नेतृत्व करीत होता तो त्यांच्या पिछाडीस गेल्याचे पाहिले. यामुळे पाठलाग करणारे धिमे झाले. यानंतर मोशाने समुद्रावर हात उगारला व आश्‍चर्य हे की देवाने पूर्व देशाचा जोराचा वारा रात्रभर वाहू दिला आणि समुद्र मागे हटविला व त्याचे पात्र कोरड्या भूमीत परिवर्तित झालेले त्यांनी बघितले. अशाप्रकारे ईश्‍वरीरित्या पुरविण्यात आलेल्या सुटकेच्या मार्गातून नेटाने व शीघ्रतेने जाण्याची जरुरी होती.

पण आता लगेच आणखी एक आकस्मिक भय उभे ठाकले! मिसरी सैन्य समुद्राच्या पात्रात इस्राएलांना गाठण्याच्या आत्मविश्‍वासाने पुढे सरसावले. पण पहा! सर्व मिसरी भिंतीसमान दुतर्फा उभारलेल्या पाण्याच्या पात्रात मध्ये आले असता त्यांच्या रथाची चाके निखळत आहेत आणि लोकांत आरडाओरड सुरु झाल्याचे ऐकायला मिळाले. सर्व इस्राएली दुसऱ्‍या तीरावर सुरक्षित पोहोचल्यावर यहोवाने मोशेला पुन्हा त्याचा हात समुद्रावर उगारण्यास सांगितले, “आणि सकाळ होत असता समुद्र पुन्हा पूर्ववत्‌ स्थितीस येऊ लागला.” मग काय परिणाम दिसला? गर्विष्ठ फारोच्या कुशल लष्करी सैन्यातील एकही जण आणि स्वतः तो गर्विष्ठ सत्ताधीश देखील बचावू शकला नाही. (निर्गम १४:१९-२८; स्तोत्रसंहिता १३६:१५) तर मग, मुक्‍तता पावलेले इस्राएल लोक यहोवा देवास केवढे कृतज्ञ राहिले असतील याची तुम्ही कल्पना करु शकाल का?

देवाची नेत्रदिपक लढाऊ पद्धत

मिसरातून घडलेली सुटका आणि तांबड्या समुद्रातून पार होण्याचा अविस्मरणीय अनुभव याकरता इस्राएल कृतज्ञ होते तरी त्यांना वचनयुक्‍त देशात जाईपर्यंत बेजार करणाऱ्‍या अनुभवांचा सामना करावा लागला. परंतु ४० वर्षांच्या त्यांच्या अरण्यवासाच्या प्रयाणामधील प्रत्येक अनुभवात त्यांना यहोवास कृतज्ञ असण्याची अधिक कारणे दिली.

सरतेशेवटी इस्राएलांनी यार्देन नदी पार करुन देवाने दिलेल्या देशात वस्ती केली. त्यांनी येथे लगेचच यहोवाची नेत्रदिपक लढाऊ पद्धत पाहिली. कशी बरे? त्यांनी यरीहो हे पहिले कनानी शहर काबीज करुन त्याचा नाश केला आणि आश्‍चर्यकारक विजय संपादिला. (यहोशवा अध्याय ६) यरीहोभोवती कोश घेऊन प्रदक्षिणा घालणे हा देव-निदर्शित डाव केवढा अपूर्व होता बरे! त्यांनी तटाभोवती, प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सहा प्रदक्षिणा घातल्या. सातव्या दिवशी मात्र त्यांनी तटाभोवती सात प्रदक्षिणा घातल्या. याजकांनी त्यांची रणशिंगे फुंकली, इस्राएलांनी “भव्य रणघोषणां”नी आसमंत निनादविला तेव्हा “तट जागच्या जागी कोसळला”! (वचन २०) केवळ राहाबचे घर व घराखालील भिंतीचा भाग उरला. या अजिंक्य दिसणाऱ्‍या शहराचा तट यहोशवा व त्याच्या सैन्यापुढे एकही बाण न सोडता पडला! खात्रीने यरीहोतील तो अनुभव देवास कृतज्ञ असण्याचे उल्लेखनीय कारण होते.

आणखी एके प्रसंगी यहोवाच्या नेत्रदिपक लढाऊ पद्धतीचे उल्लेखनीय प्रदर्शन झाले. गिबोनी लोकांनी इस्राएलांबरोबर शांती करार केला होता तेव्हा पाच अमोरी राजांनी गिबोनी लोकांवर युद्ध पुकारले. यहोशवा त्यांच्या सहाय्यास धावला अशावेळी झालेल्या युद्धात यहोवाचा आश्‍चर्यावह हात पुन्हा एकवार दिसून आला. देवाने अमोऱ्‍यांना गोंधळात टाकले व “ते इस्राएलांपुढून पळून बेथ-होशनच्या उतरणीवर आल्यावर अजेकास जाऊन पोहंचेपर्यंत यहोवाने आकाशातून मोठाल्या गारा त्यांजवर पाडून त्यांस ठार केले.” इस्राएल लोकांनी तरवारीने मारले त्याहूनही अधिक लोक गारांनी मेले.—यहोशवा १०:१-११.

“इस्राएलांच्या डोळ्यादेखत” यहोशवा यहोवासोबत बोलला व म्हणालाः “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू आयलोनाच्या खोऱ्‍यावर स्थिर हो.” परिणाम काय दिसला? “त्यानुसार,” अहवाल म्हणतो, “सूर्य स्थिर झाला व चंद्र थांबला. त्या राष्ट्राने आपल्या वैऱ्‍यांचे पुरे उसने फेडीपर्यंत ते थांबले.”—यहोशवा १०:१२, १३.

केवढ्या ह्‌या आश्‍चर्यकारक घटना! तसेच कृतज्ञ राहण्याजोगे यहोवाच्या लोकांसाठी केवढी प्रबळ कारणे होती!

अल्पदायी कृतज्ञता

यहोवाने केलेल्या प्रत्येक हस्तक्षेपाच्या प्रदर्शनानंतर इस्राएल लोक कृतज्ञतेने भरुन जात. कदाचित प्रत्येक इस्राएली माणसाने आपल्या मनात हेच म्हटले असावे की, मी या गोष्टी कधीही विसरणार नाही. तरीपण ही कृतज्ञता, विश्‍वास बसणार नाही इतक्या अल्पकाळ टिकली. वेळोवेळी इस्राएलांनी कृतघ्नतेच्या प्रवृत्तीचे प्रदर्शन केले. यामुळेच, देवाने “त्यांस परराष्ट्रीयांच्या हाती दिले; त्यांच्या द्वेष्ट्यांनी त्यांजवर राज्य केले.”—स्तोत्रसंहिता १०६:४१.

पण, जेव्हा इस्राएल घोर विपत्तीत आले, त्यांच्या चुकीच्या व कृतघ्न मार्गापासून अनुताप पावले व देवाकडे मदतीस धावले तेव्हा यहोवाने त्याच्या उदारतेने क्षमा करण्याच्या आत्म्याचे प्रदर्शन केले. “त्यांची आरोळी ऐकून यहोवाने त्यांच्या संकटाकडे दृष्टी पुरविली, त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करुन आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली.” (स्तोत्रसंहिता १०६:४४, ४५) वेळोवेळी त्यांच्या क्षमाशील देवाने त्यांना त्यांच्या त्रासातून मुक्‍त केले व पुन्हा त्यांना आपल्या कृपादृष्टीत घेतले.

देवाची सहनशीलता व त्याने वारंवार संदेष्टे पाठवून त्यांना आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणण्याचे सांगितले तरीही इस्राएलांनी कोडगेपणा दाखविला. सरतेशेवटी त्याच्या सहनशीलतेची मर्यादा संपली आणि त्याने इ.स.पू. ६०७ मध्ये यहुदास बाबेलकरवी पादाक्रांत करण्याची मुभा दिली. नबुखद्‌नेस्सर राजाच्या सैन्याच्या तडाख्यातून जे वाचले अशा सर्वांना बाबेलमध्ये बंदिवान करुन नेले गेले.

देवास वारंवार दाखविलेली कृतघ्नता आणि बेईमानी यामुळे किती मोठा अनर्थ घडला! आणि हे कृतज्ञता दाखविण्याची मुबलक कारणे होती तरीसुद्धा घडले.

आजच्या काळी, यहोवाने ख्रिस्तीजनांच्या बाबतीत जे काही केले तसेच त्याने सबंध मानवजातीप्रीत्यर्थ जो चांगुलपणा प्रदर्शित केलेला आहे त्याच्या अनुषंगाने ते कृतज्ञता न दाखविण्याच्या चुकीस कसे टाळू शकतात? याचे उत्तर आपल्याला “तुम्ही कृतज्ञ असा” या लेखात मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा