कृतज्ञ का असावे?
यामासिकाच्या मुखपृष्ठाकडे पहा. हे आम्हास सर्वत्र असणारी ओंगळता व कुरुपता याची भरपाई करणाऱ्या पुष्कळ सुंदर गोष्टी आहेत याची आठवण देते.
तुम्ही सुंदर गोष्टींची आवड बाळगता का? वादळाच्या अंधारानंतर, नाजूक रंगाचे मिश्रण असणाऱ्या प्रसन्न मेघधनुष्याची छटा न्याहाळा. पाण्याच्या धबधब्याचे चित्र मनासमोर उभे करा. तसेच प्राणी आपल्या पिलांसोबत बागडत असल्याचे चित्र देखील सामोरे आणा. फुलांनी सजलेली बाग किंवा गव्हाचे भरघोस पीक याचे चित्र रेखाटा. होय, ही दृश्ये लोकांना सर्वसामान्य आहेत. पण यांचा तुम्हावर कसा परिणाम होतो?
सहजपणे गृहीत धरणे
बहुधा, वारंवार ज्या गोष्टींचा अनुभव येतो त्या सर्वसाधारण बनतात आणि मग त्या सहज गृहीत धरल्या जातात. अशी ही वृत्ती आजच्या शीघ्रगतीने चाललेल्या या २० व्या शतकात अधिक दिसून येते. पण याविषयी मनन करण्यास वेळ देणे किंवा त्याची जाण राखणे आणि कृतज्ञ असणे या गोष्टी मानवजातीच्या नेहमीच न्यूनता राहिल्या आहेत.
उलटपक्षी, स्तोत्रकर्त्या दावीदाने प्रेरणेद्वारा गीताद्वारे कृतज्ञता नेहमी व्यक्त केली. खाली नमूद असणारे दावीदाचे देवाला उद्देशून म्हटलेले बोल कृतज्ञता प्रदर्शित करण्याचा उत्कृष्ठ नमुना आहेतः
“आकाश जे तुझे अंगुलिकार्य व त्यात तू बनविलेले चंद्र व तारे यांजकडे पहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याची काळजी करावी? तू त्याला आपल्या हातच्या कृत्यावरचे प्रभूत्व दिले आहे; तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहेः शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही सारी तसेच वनपशु; आकाशातील पाखरे; समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे यहोवा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे!”—स्तोत्रसंहिता ८:३, ४, ६-९.
कृतज्ञता मानसिक दुःखास दूर करु शकते
स्तोत्रकर्त्याने सुंदर गोष्टीविषयी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे त्याला असंतुष्ट दृश्य वा कठीण परिस्थितीमुळे ओढवलेले दुःख दूर करण्यास मदत मिळाली. तुम्हासही हाच अनुभव येऊ शकतो. कसा? आम्हासभोवताली असणाऱ्या पुष्कळ हर्षभरीत गोष्टीची रसिकता पूर्णपणे जाणण्याचा प्रयत्न करण्यामुळे. यामुळे तुम्ही तुमचा व तुम्हासभोवताली असणाऱ्यांचा आनंदीपणा वाढवू शकता.
मग, दररोजच्या सुंदर दृश्यांनी आणि आश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास आमच्या परोपकारी निर्मात्यास अंतःकरणापासूनची कृतज्ञता देण्यास का चेतवू नये? अद्याप कृतज्ञ असण्याजोगी आणखी काही कारणे आहेत; त्यांचा जरा विचार करा.