बुरुंडी देशातील छळ—धार्मिक स्वातंत्र्याच्या अभिवचनाचा विश्वासघात!
कित्येक पश्चिमी देशात धार्मिक स्वातंत्र्याला सहजसोपे समजले जाते. पण, बुरुंडी या अफ्रिकी देशात होणारा धार्मिक छळ हे स्वातंत्र्य केवढे क्षणभंगुर ठरु शकते याचे विदारण करते. लोकांच्या कोणत्याही गटाच्या मूलभूत मानवी हक्काची पायमल्ली होते तेव्हा कोणाचेही हक्क अबाधित राहात नाहीत. आम्ही आमच्या वाचकांना हे आर्जवितो की त्यांनी बुरुंडी येथे काय चालले आहे त्याकडे लक्ष द्यावे.
बुरुंडी या आफ्रिकी देशावर काळ्या युगाची छाया पडली आहे असे फेब्रुवारी १६, १९८९ या दिवसाने पाहिले. या दिवशी बुरुंडी प्रजासत्ताक देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांची सभा घेतली. ही सभा संपताक्षणीच यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध धार्मिक छळाची भयंकर लाट उसळली गेली. बेकायदेशीर धरपकडी, मारहाण, जाच आणि उपासमार यांचे पुरुष, स्त्रिया व मुले भक्ष्य बनले.
अशा प्रकारचे अघोर कृत्य सध्याच्या युगात घडते आहे ही मोठी लांच्छनास्पद गोष्ट आहे. तरीपण बुरुंडी येथे ख्रिस्तीजनांचा होत असलेला छळ हा विशेषेरित्या तिटकारा येण्याजोगा आहे. ते का? कारण त्यात धार्मिक स्वातंत्र्याच्या अभिवचनाचा विश्वासघात केला गेला आहे.
सरकारी विश्वासघात
बुरुंडी हे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे असणारे दुरवरील आफ्रिकी राष्ट्र आहे तरीपण या पहाडी प्रदेशात थंड, सुखद हवामानाचा स्वाद मिळतो. (नकाशा पहा.) बुरुंडीचे अस्तित्व जगातील लोकांना ऑगस्ट १९८८ पर्यंत ठाऊक नव्हते, जेव्हा त्याने जागतिक बातम्यात अग्रस्थान मिळविले. यावेळी टुटसी आणि हुटु या त्याच्या दोन प्रमुख जमातीत मोठा रक्तपाती झगडा झाला. यामुळे पुष्कळांच्या मनावर बुरुंडीविषयक नकारात्मक छाप पडली गेली हे निःसंशये खरे आहे.
तरीसुद्धा या प्रगतिशील देशाच्या बाबतीत पुष्कळसे चांगले म्हटले जाऊ शकते. येथील लोक उद्योगी व कष्टाळू आहेत. द न्यूयॉर्क टाइम्स मॅगजीन मधील एक लेख सांगतो की, “बुरुंडी जरी गरीब असला तरीही पाहुण्यांना तो विविध मार्गाने मोठा उद्योगी वाटतो. जागतिक बँकेचे स्थायी प्रतिनिधी मॉरीस जेरवीझ या देशाला ‘मोठी कामे करणारा देश’ असे म्हणतात.”
तथापि, बुरुंडीमधील धार्मिक स्थिती मात्र या सरळ दृष्टीकोणाला शह देते. साधारण ८० टक्के लोक ख्रिस्ती म्हणवितात, यांचेपैकी अधिक रोमन कॅथोलिक आहेत. तरीपण राजकीय वातावरणाने धार्मिक सहिष्णुतेला अहितकारक नमुना दिला. ऑक्टोबर १६, १९८५ रोजी द ख्रिश्चन सेंचुरी ने कळविलेः “चर्चचे अस्तित्व डावलून लावण्याच्या अनुषंगाने गेल्या वर्षभरात बुरुंडी सरकारने अनेक कारवाया आचरल्या . . . जाहीर व खासगी उपासना व प्रार्थना यांच्यावर मोठ्या प्रमाणात पडदा पाडण्यात आला. काही पंथीयांची सर्व चर्चेस . . . बंद करण्यात आली आणि त्यांचे कार्यवहन थांबविण्यात आले; . . . डझनावारी ख्रिश्चनांना तुरुंगात टाकण्यात आले, काहींना तर छळण्यात आले . . . हे सर्व, धार्मिक प्रथा पाळण्याच्या हक्काचा अवलंब केला म्हणून घडले.”
पण सप्टेंबर १९८७ मध्ये बुरुंडी देशात पेईर बुयोया यांच्या अध्यक्षतेखाली एक नवे सरकार उदयास आले तेव्हा आशा बळावल्या गेल्या. या नव्या अध्यक्षांनी जनतेला धार्मिक स्वातंत्र्याचे अभिवचन दिले व त्यानुसार लगेचच पावले उचलली. यु. एस. डिपार्टमेंट ऑफ स्टेटचा एक अहवाल म्हणतोः “आपल्या कारभाराच्या पहिल्या वर्षी अध्यक्ष बुयोया यांनी संघटित धर्माविषयी बुरुंडीच्या तत्त्वप्रणालीत आमुलाग्र बदल केले व [मागील] सरकारने जी धार्मिक बंधने घातली होती ती मोकळी केली. बुयोया यांनी सर्व धर्मकैद्यांना मुक्त केले; बंद पडलेली सर्व चर्चेस खुली केली; बळकावून घेण्यात आलेल्या सर्व चर्च मिळकती परत केल्या.” या धडाडीच्या कृतींनी अध्यक्ष बुयोया यांचे जगात सर्वत्र कौतुक झाले.
असे आहे तर मग, यहोवाच्या साक्षीदारांना अलिकडेच वेगळे करुन त्यांच्यावर धार्मिक विरोध का आणला गेला बरे?
यहोवाचे साक्षीदार—मान्यतेसाठी लढा
गेल्या दशकात, कॅथोलिक चर्चने “प्रबळ आर्थिक व राजकीय अस्तित्वाच्या विषयाने उत्क्रांती केली” असे द न्यूयॉर्क टाईम्स कळविते. देशात वसाहतीचा काळ होता त्यावेळी चर्चला “सबंध देशावर अधिपत्य गाजविण्याची मुभा मिळाली,” कारण “त्याने आरोग्य व शिक्षण प्रदान करण्याच्या बाबतीत प्रमुख भूमिका पार पाडली होती.” या कारणास्तव सरकारला संघटित धर्माची भीती वाटली असावी हे निःसंशय खरे आहे.
तथापि, यहोवाच्या साक्षीदारांनी बुरुंडीमध्ये १९६३ मध्ये जाहीर सुवार्तिक कार्य आरंभिले तेव्हा त्यांनी प्रांताच्या कसल्याही कारभारात स्वतःस गुंतविले नाही. उलट, ते “राज्याची ही सुवार्ता” याच्या प्रचाराच्या कामात लागून राहिले. (मत्तय २४:१४) पवित्र शास्त्र, खरे ख्रिस्ती या “जगाचे भाग नाहीत” असे म्हणत असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतःची राजकीयदृष्ट्या तटस्थतेची भूमिका घेतली, साक्षीदार अशीच भूमिका जगात सर्वत्र घेत आहेत.—योहान १७:१६.
साक्षीदारांनी राजकीय पक्षात सामील होण्याचे तसेच राजकीय पक्षाच्या घोषणा वदविण्याचे विवेकपूर्णरितीने टाळले. सरकारांनी या तटस्थ भूमिकेचा वेगळा अर्थ केला; त्यांना तो राष्ट्रदोहीपणा तसेच उलथापालथ घडवून आणण्याचा प्रकार वाटला. पण वस्तुतः तो तसा नाही. यहोवाचे साक्षीदार जगात सर्वत्र उदाहरणशील, कायद्याचे पालन करणारे नागरिक याअर्थी नावाजलेले आहेत. प्रापंचिक सरकारच्या “अधीन असा” ही पवित्र शास्त्रातील आज्ञा ते गंभीरपणे मानतात. (रोमकर १३:१) ते जरी ध्वज या राष्ट्रीय द्योतकास वंदन करीत नाहीत वा भक्ती देत नाहीत तरीही या द्योतकांचा अनादर करीत नाही.—निर्गम २०:४, ५.
यहोवाच्या साक्षीदारांनी १९७५ मध्ये आपल्या कार्याला मान्यता लाभावी म्हणून विनंति केली. पण १९७६ मध्ये लष्कराने सरकार खाली आणले आणि जीन-बाप्तिस्ते बॅगाझा यांना सत्तेवर आणले. यांनीही भक्ती स्वातंत्र्याचे अभिवचन दिले. तरीही मार्च १९७७ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांवर शासकीय बंदी आली! यहोवाच्या साक्षीदारांनी जगात सर्वत्र प्रयत्न केले आणि बॅगाझा सरकारला वस्तुस्थिती स्पष्ट केली, पण पत्रे, फ्रान्स व बेल्जियममधील बुरुंडीच्या राजदूतांना दिलेल्या भेटी आणि बुरुंडीच्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या सभा यातून काही निष्पत्ती झाली नाही. १९८७ मध्ये बुरुंडी येथे सुमारे ८० साक्षीदारांना, पुरुष व स्त्रियांना काही महिन्यांसाठी कैदेत टाकण्यात आले. येथे एक साक्षीदार मरण पावला.
परत १९८७ मध्ये जी क्रांती झाली त्यामध्ये मेजर पेईर बुयोया यांना सत्तेवर आणले. यांनी दाखवलेल्या धार्मिक सहिष्णुतेमुळे कॅथोलिक व प्रॉटेस्टंट लोकांना लाभ घडला पण साक्षीदारांना लाभ मिळाला नाही.
धार्मिक छळाची उसळी
अध्यक्ष बुयोया यांच्या प्रांताच्या अधिकाऱ्यांसोबत फेब्रुवारी १६, १९८९ रोजी झालेल्या सभेनंतर रेडिओवर हे वृत्त कळविण्यात आले की, यहोवाच्या साक्षीदारांचा विस्तार ही बुरुंडीपुढे उभी असलेली एक मोठी समस्या होय. याच्या अनुषंगाने कार्य करीत आहोत असे भासवून प्रांताच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी छळाची लाट सुरु केली. हाती आलेल्या वृत्तातील माहिती स्थूल असली तरीही पुढे देण्यात आलेले अहवाल तेथे काय चालले आहे याची आपल्याला कल्पना देऊ शकेलः
गिटेगा प्रांतः यहोवाच्या साक्षीदारांची धरपकड करण्यासाठी राज्यपाल येस मिनानी यांनी पोलीस व लोकांनी संघटित व्हावे असे फर्मान काढले. मार्च २२, १९८९ च्या सायंकाळी सुरक्षा पोलीस प्रतिनिधींनी निबातम्बी एडमंड या खास पायनियर सुवार्तिकाच्या घरी धाड घातली आणि त्याला अटक केली. त्याला धरुन ठेवल्यानंतर त्याचा आहार वर्ज्य केला गेला. कित्येकदा तर त्याला उपासमारीमुळे भोवळ आली. त्याला बऱ्याच यातना दिल्या गेल्या आणि त्याच्याकडून हे वदविण्याचा प्रयत्न झाला की यहोवाचे साक्षीदार मानवी रक्त प्राशन करतात—किती मोठी लबाडी!
एडमंडच्या धरपकडीनंतर निकाराहेरा आरोन व निमपीरानगेझा प्राईम या यहोवाच्या साक्षीदारांना पकडण्यात आले व त्यांना गिटेगाच्या तुरुंगात पाठविण्यात आले. यांनाही अशाच भयंकर यातना दिल्या गेल्या.
निजिम्बेरे चारलोट या विभागीय देखरेख्यांच्या पत्नीला—हे देखरेखे आपल्या पत्नीसोबत कित्येक मडळ्यांना भेटी देत असतात—आपल्या ख्रिस्ती बांधवांची स्थिती कळाली व त्या तुरुंगात त्याच्यासाठी आहार घेऊन गेल्या पण यांनाही मार्च १६, १९८९ रोजी अटक करण्यात आली आणि यांच्या पतीला धरण्याचा प्रयत्न सफल व्हावा याकरता यांना अधिकाऱ्यांनी ओलीस ठेवले.
मुरामुया प्रांतः राज्यपाल अन्तोन बाझा यांनी त्यांना माहीत असलेल्या साक्षीदारांना चौकशीला येण्याची नोटीस पाठविली. मार्च ४ रोजी एक गट त्यांना भेटला. यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आदराने दिली पण राजकीय पक्ष घोषणा देण्याचे त्यांनी नाकारले.
याच्या प्रत्त्युतरात राज्यपालांनी स्थानिक लोकांना यहोवाच्या साक्षीदारांवर हल्ला करण्याचे सांगितले. मार्च १६ रोजी पोलीसांना, त्यांना ठाऊक असणाऱ्या साक्षीदारांच्या घरी धाड घालून पक्ष घोषणा देत नाहीत म्हणून पुरुष, स्त्रियांना मारहाण केली. साक्षीदाराच्या मालकीचे एक दुकान जबरदस्तीने बंद पाडण्यात आले—यामुळे त्या कुटुंबाच्या चरितार्थाची मोठी कुचंबणा झाली.
मार्च १७ रोजी चार स्त्रियांना, त्या आपला विश्वास त्यागण्यास तयार नाहीत म्हणून मारहाण करण्यात आली. त्यांना हवाबंद कोठडीत डांबण्यात आले. यात एक स्त्री २० दिवसाच्या अर्भकाची माता होती.
मार्च २० रोजी एक जमाव काठ्या व दिवे घेऊन साक्षीदार स्त्रियांच्या घरी आला व त्याने या स्त्रियांना बदडण्यास सुरुवात केली आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिले. ज्यावर हल्ला झाला त्यात ७५ वर्षे वयाची एक वृद्धा होती, जी यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत होती आणि आणखी काही १४ वर्षे वयाखालील युवती होत्या!
पेईर किबिना-कानवा या नाबीहंगा प्राथमिक शाळेच्या संचालकांनी साक्षीदार शाळकरी मुलांना राष्ट्राच्या ध्वजाला वंदन करण्याची जबरदस्ती केली. पण जेव्हा हे साध्य झाले नाही तेव्हा त्यांनी मुलांना शाळेतून काढून टाकले. या गावातील बावीस साक्षीदारांना पळ काढण्यास लावले. त्यांचे होते ते सर्व टाकून त्यांना पळावयाला लावले गेले. ज्यांची धरपकड झाली त्यात डेसिंगा लिओनिडास, कानियाम्बो लिआनार्ड, नाहोरवामामिये अबेद्नेगो, बँकानगुमुरिंडी पी., काशी ग्रेगोरी, आणि मोनिहानकुयु थाडी हे आहेत.
बुजुमबुरा प्रांतः मुहुता या वसाहतीतील प्रशासक नाहिमना मॅकाईर यांनी कावूनझो विन्सेंट, डाबाझानिये सिल्वेस्टर आणि डिझवे-झानिये या साक्षीदारांना चौकशीकरता बोलावले. तेथे त्यांनी साक्षीदारांवर ऑगस्ट १९८८ च्या जमातीच्या चकमकीत भाग घेतल्याचा आरोप केला. यहोवाचे साक्षीदार त्यात सहभागी झाले नव्हते हे स्पष्ट आहे तरी यांना मारहाण व धरपकड झाली.
बुबान्झा प्रांतः पवित्र शास्त्रावर आधारलेले साहित्य आपणापाशी बाळगले या साध्या कारणामुळे दोन साक्षीदारांना अटक करण्यात आली. यांनी पक्ष वंदना करण्याचे नाकारले तेव्हा राज्यपाल किंबुसा बाल्थझार यांनी त्यांना लष्करी तळाकडे पाठवले. येथे त्यांची बोटे चिरडून त्यांचा छळ करण्यात आला.
तुम्ही काय करु शकाल
यापैकीचा बराच छळ अंतर्गत भागात झालेला आहे आणि बाहेरच्या लोकांना याची कल्पना येत नाही. तरीपण या लेखाच्या १ कोटी ३० लाख प्रती १०६ भाषेत जगात सर्वत्र वितरीत होतील. बुरुंडीने चालवलेला छळ गुप्त राहणार नाही. मानवी हक्काची इतक्या मोठ्या प्रमाणात पायमल्ली होत आहे हे वाचून स्वातंत्र्यप्रेमी लोकांना मोठा धक्का बसेल. या मानवी हक्कासाठीच हजारो आफ्रिकन लोकांनी लढा दिला होता.
बुरुंडीने धार्मिक स्वातंत्र्य टिकविण्याचे आपले अभिवचन पाळण्यात अपयश दर्शविल्यामुळे स्वतःवर मोठी जोखीम ओढावून घेतली आहे. एक विकसित व कष्टाळू राष्ट्र अशी जी ख्याति त्याने संपादण्याचा यत्न केला आहे त्यावर याचा घातक परिणाम घडण्याची शक्यता आहे. धार्मिक छळ करणारे धर्मवेडे राष्ट्र अशी जोखीम पत्करण्याची बुरुंडीची इच्छा आहे का? आम्हाला तसे वाटत नाही. आम्हाला असे वाटते की साक्षीदारांविषयी अध्यक्ष बुयोया यांची चुकीने दिशाभूल करण्यात आलेली आहे, कदाचित ती त्यांच्या सल्लागारामार्फत झाली असावी.
यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध लादण्यात आलेले आरोप मूर्ख स्वरुपाच्या लबाड्या आहेत, ज्या अयोग्य प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी केल्या गेल्या आहेत. बुरुंडीचे सरकार काय किंवा इतर राष्ट्रातील सरकार यांच्या सुरक्षेला यहोवाचे साक्षीदार दहशत नाहीत. ते तर शांतीप्रिय आणि आज्ञाधारक, राष्ट्रप्रतिकास योग्य आदर दाखविणारे लोक आहेत. जी अफवा त्यांच्याविषयी उठवण्यात आली आहे की, ते रक्तप्राशक आहेत ती खोटी आहे. ते तर रक्ताचे कोणत्याही स्वरुपात संक्रमण—जरी जीवन पणाला लागले तरी—स्विकारीत नाहीत.—प्रे. कृत्ये १५:२८, २९.
यास्तव जगभरातील सर्व खरे ख्रिस्तीजन बुरुंडी येथील आपल्या बांधवांप्रीत्यर्थ ऐक्याने प्रार्थना करतील. (१ तीमथ्य २:१, २) वाचकांना अध्यक्ष पेईर बुयोया यांना थेट पत्र पाठवून यहोवाच्या साक्षीदारांवर होत असलेला छळ थांबवून साक्षीदारांना प्रस्थापित धर्म या नात्याने शासकीय मान्यता द्यावी हे अपील करावेसे वाटेल. जगाच्या नजरेतून निसटायचे आहेत तर बुरुंडीने या कारणमीमांसेवर यथार्थ प्रतिक्रिया दाखविणे योग्यच आहे.
His Excellency Major Pierre Buyoya
President of the Republic of Burundi
Bujumbura
REPUBLIC OF BURUNDI
[८ पानावरील नकाशा]
[For fully formatted text, see publication]
बुरुंडी
झाईर
टान्झानिया
रवांडा
टांगानियाका सरोवर