वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ५/१ पृ. २७-३०
  • पवित्र शास्त्र आणि नवयौवन नैतिकता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पवित्र शास्त्र आणि नवयौवन नैतिकता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • युवकांना नैतिक मार्गदर्शन देणे
  • यहोवाचे भय बाळगण्यास युवकांना मदत करणे
  • लैंगिकता व विवाहाबद्दल समतोल दृष्टीकोण
  • युवकांना “तारणासाठी सूज्ञ” बनविणे
  • विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • पालकहो—आपल्या मुलांना सांभाळा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • अनैतिक जगातही निष्कलंक राहणे शक्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • विवाहाआधी लैंगिक समागम—का नको?
    सावध राहा! माहितीपत्रक ६-३ (gbr6-3)
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ५/१ पृ. २७-३०

पवित्र शास्त्र आणि नवयौवन नैतिकता

“चित्रपट, संगीत, रेडिओ व दूरदर्शन याकरवी लैंगिकता प्रणयी, उत्तेजक आणि गुदगुल्या देणारी आहे असा अप्रत्यक्ष संदेश मिळतो. असा हा संदेश नवयौवनांना अगदी सहजरित्या संसर्गित करतो. . . . तरीही हा संदेश मिळाल्यावर खासपणे चांगल्या मुलींनी तो फेटाळून लावला पाहिजे.”—द ॲलन गुटमॅचर इन्स्टिट्युट.

आजचे युवक नैतिक संदिग्धतेच्या युगात वाढत आहेत. तरीही, पवित्र शास्त्र, लैंगिक नैतिकतेविषयीचे संदिग्ध नसणारे स्पष्ट मार्गदर्शन देते. लैंगिक शिक्षण कार्यक्रम गरोदर राहणे टाळण्यावर केंद्रिभूत आहे तरी पवित्र शास्त्र दाखविते की, विवाहाआधीचा लिंगाचारच प्रामुख्यत्वे टाळला पाहिजे. ते म्हणतेः “तुम्ही याविषयी अगदी खात्रीदायक असावे की, जो कोणी जारकर्मी [ज्यात विवाहाआधीचा लिंगाचार समाविष्ट आहे], किंवा अशुद्ध कृती करणारा अगर स्वैराचार करणारा . . . यांना देवाच्या राज्याचा वारसा मिळणार नाही.” (इफिसकर ५:५, द जरुसलेम बायबल) तद्वत, लैंगिक नातेसंबंध हे विवाहितांसाठी राखीव आहेत हे स्पष्ट आहे.

नवयौवनात असलेल्या तरुणींच्या गरोदरपणाविषयक समस्यांचे उत्तर गर्भप्रतिबंधक साधनांचा उपयोग शिकविणे यात नाही, तर त्यांना नैतिक व आध्यात्मिक मार्गदर्शन देणे यात आहे. हे मार्गदर्शन देण्याची जबाबदारी कोणाची, त्याची स्पष्टता करताना पवित्र शास्त्र सांगतेः “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका तर यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.

एका पाहणीत युवकांना विचारले होते की, “लैंगिक माहिती देण्यात असमाधानकारक ते उच्च समाधान पातळीपर्यंत असा त्यांच्या पालकातील क्रमांक कोणता ते सांगावा.” वयात येत असलेल्या युवकांनी आपल्या मातांना समाधानकारक पातळीचा खालचा क्रमांक दिला, पण बापाविषयक तर त्यांनी फारच असाधानकारक असणारा क्रमांक दिला.” तर मग, पालकांनी त्यांच्या मुलांना लैंगिक विषयाचे शिक्षण देण्याची अपेक्षा धरणे वास्तविक आहे का?

युवकांना नैतिक मार्गदर्शन देणे

नीतीसूत्रे ४:१-४ मध्ये राजा शलमोन युवकांना आर्जवितोः “मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका. . . . मी आपल्या बापाचा खरा पुत्र असल्याचे शाबीत केले. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. तो मला शिकवी व म्हणे, ‘माझी वचने तुझ्या चित्ती राहोत.’” हे उघडच आहे की, शलमोनास त्याच्या बापासोबत नाजूक गोष्टींची चर्चा करणे शक्य झाले. शलमोन स्वतःच फार मोकळेपणाने लैंगिक अनीतीची चर्चा करीत गेला.—नीतीसूत्रे ५:१-१९.

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पुष्कळ कुटुंबे त्याच्या मुलांसोबत याचप्रकारचा मोकळा संवाद ठेवतात व त्यात त्यांना यशही मिळाले आहे. मुलांना लैंगिक संबंधाविषयी केवळ “नाही!” इतकेच सांगण्यापेक्षा अधिक काही करतात. पवित्र शास्त्र त्यांना, मुलांना लैंगिक भ्रष्टाचार टाळण्यास योग्य कारणे देते. शलमोनाच्या शब्दाचा पुन्हा विचार करा. नीतीसूत्रे ५:३, ४ मध्ये तो तरुणांना वेश्‍येसोबत लैंगिक वर्तन टाळण्याचे उत्तेजन देतो. “परस्त्री [वेश्‍या] च्या ओठातून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते.” होय, अनीतीचा देखावा फारच मोहक दिसतो. पण शलमोन इशारा देतोः “तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तरवारीसारखी तीक्ष्ण होते.”

शलमोनाप्रमाणे पालक त्यांच्या मुलांसोबत लैंगिक संबंधाच्या अनिष्ट परिणामाचा विचारविनिमय करु शकतात. एक संत्रस्त विवेक, अनैच्छिक गरोदरपणा, लैंगिक स्वैराचारामुळे पसरणारे आजार—एड्‌स—हे मोहक वाटणाऱ्‍या काही क्षणिक सुखाचे कटु परिणाम आहेत. शलमोन पुढे युवकांना बोध करतोः “तुझी अब्रू दुसऱ्‍याच्या हाती देऊ नको.” (नीतीसूत्रे ५:९) कोणा युवकाने किंवा युवतीने, विवाह करण्याच्या बाबतीत ज्याला स्वारस्य नाही अशा कोणाला सुपुर्द करणे हे त्याच्याजवळ स्वाभिमानाचा अभाव आहे हेच दर्शवीत नाही का? आपल्या किंवा कोणाच्या स्वार्थी वासनांची पूर्ति करण्यासाठी स्वतःला देऊ करणे हे अपमानकारकतेचे नव्हे का? या वस्तुस्थितीची आवड निर्मिण्यात पालक मुलांची मदत करु शकतात.

अनैतिक व्यक्‍तिशी व्यवहार राखण्याच्या बाबतीत शलमोनाने हा सल्ला दिलाः “तिच्याकडची वाट सोडून दे. तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको.” (नीतीसूत्रे ५:८) याचप्रमाणे पालक युवकांना हातमिळवणी करावयास लावणाऱ्‍या परिस्थितीला टाळण्यात उपयुक्‍त ठरणारा व्यावहारिक सल्ला देऊ शकतात. तत्त्वहीन माणसासोबत भेटीगाठी घेऊ नयेत असा आर्जव ते मुलांना करु शकतात. मुले प्रणयाराधनेच्या काळासाठी पात्र होतात तेव्हा त्यांना पापी वर्तणूक टाळण्यास व्यवहारी पावले उचलण्यास उत्तेजन दिले जाऊ शकते. उदाहरणार्थ, भेटीगाठी घेणाऱ्‍या जोडीने नेहमी त्यांच्यासोबत कोणीतरी असण्याची योजना करावी. ही जुनी पद्धत वाटते का? कदाचित वाटेल सुद्धा. परंतु, “परिणामी तुझा देह व तुझी शक्‍ति क्षीण झाल्यावर तू शोक करावा व तुला म्हणावे लागेल की . . . ‘मी शिस्तीचा धिक्कार केला, मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही.’” असे म्हणण्याऐवजी योग्य व समंजसपणे दक्षता घेणे चांगले आहे.—नीतीसूत्रे ५:११-१३.

यहोवाचे भय बाळगण्यास युवकांना मदत करणे

एका अंदाजानुसार एकट्या अमेरिकेत १२ दशलक्ष युवक लैंगिकतेचे हव्यासी आहेत. एड्‌सच्या साथीने देखील या अनैतिक भरतीस बांध घातला नाही. तथापि, यहोवाचे साक्षीदार त्यांच्या मुलांवर एड्‌स किंवा गरोदरपणाचे भय यापेक्षा वेगळेच काहीतरी कोरण्याचा प्रयत्न करतातः यहोवा देवाविषयीचे सुदृढ भय. शलमोन तरुणांना नीतीसूत्रे ५:२१ मध्ये आठवण देतो की, “मनुष्याचे मार्ग यहोवाच्या दृष्टीसमोर आहेत व तो त्यांच्या सर्व वाटा नीट करतो.” चार मुलांचे वडील असणारे जॉन हे यहोवाचे साक्षीदार असा सल्ला देतातः ‘मुलांनी यहोवाचे प्रेमळ भय बाळगणे हे मदतकारक ठरते. आमच्या स्वार्थी कृत्याने यहोवास दुःख होऊ शकते हे मुलांना सांगण्यात कचरु नका.’

अर्थात, देवाचे भय हे अनैतिकतेवरील प्रभावी औषध आहे. देव तरुण व्यक्‍तीस अगदीच वास्तविक असा वाटायला हवा. (पडताळा इब्रीयांस ११:२७.) पालक त्यांच्या मुलांना देवासोबतचे त्यांचे अस्सल नातेसंबंध, पवित्र शास्त्राचा नियमित अभ्यास, दररोजची प्रार्थना व जीवनातील खरा अनुभव याकरवी वाढविण्यास सहाय्य करु शकतात. देव त्याची काळजी घेतो हे युवक समजतो तेव्हा तो त्यास दुःखी बनवील अशी वर्तणूक टाळण्यास स्फूर्तीने पाऊल उचलील.—१ पेत्र ५:७.

युवकाचे देवासोबतचे नातेसंबंध हे त्याला इतर पुष्कळ युवकांच्या विशिष्ट गरजा ज्या बहुधा अपुऱ्‍या राहतात त्या पुऱ्‍या होण्यास मदत करु शकतात हे चित्तवेधक आहे. उदाहरणार्थ, विशेषज्ञ दावा करतात की, स्वैराचार हा युवकांचा सामान्य मार्ग आहे जो त्याला शक्‍तिहीनतेची भावना देण्यात किंवा स्वाभिमानाची कमतरता याकडे निरवितो. अशाप्रकारच्या भावना, ज्याचे यहोवासोबत स्नेहसंबंध आहे त्याला ग्रासीत नाहीत! अशाप्रकारचा युवक म्हणू शकतोः “देव माझा सहाय्यकर्ता आहे; माझ्या जिवाला आधार देणाऱ्‍यात यहोवा आहे.”—स्तोत्रसंहिता ५४:४.

लैंगिकता व विवाहाबद्दल समतोल दृष्टीकोण

अर्थात, पालक त्यांच्या मुलांमध्ये लैंगिक संबंधाबद्दल नकारार्थी किंवा फाजील नम्रपणा जोपासण्याची इच्छा करीत नाहीत. पवित्र शास्त्र व्यभिचारास धिक्कारतानाच ते हे दाखविते की, लैंगिक सलोखा वैवाहिक चाकोरीतच फार सुंदर असू शकतो. काव्यमय शैलीच्या उपयोगाने शलमोनाने पुष्टी जोडलीः “तुझा झरा आशीर्वादित शाबीत होवो, तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. . . . तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहीत होवो.”—नीतीसूत्रे ५:१८, १९.

वैवाहिक नातेसंबंधाचा हा उत्तुंग दृष्टीकोण विचारात घेता, पालकांना संबंधीत गोष्टींची चर्चा करण्यात कचरल्यासारखे होण्यास कोणतेच कारण नाही. जॉन (अगोदर उल्लेखिलेले गृहस्थ) म्हणतातः “आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे बोलतो, यामुळे लैंगिकता हा रहस्यमय विषय नाही. आम्ही यावर जोर देतो की, पती व पत्नी यांच्याकरवी योग्य समयी उपभोगण्यासाठी ते निर्माणकर्त्या यहोवाकडील दान आहे.” आणखीन, दोन नवयौवनातील मुलांचे वडील म्हणतातः “त्यांच्या लहानपणापासूनच आम्ही त्यांच्यासोबत लैंगिक गोष्टींची मनमोकळपणाने चर्चा केली. आम्ही त्यांना प्रेम व लिंग याबाबतचा आदरणीय व उच्च दृष्टीकोन शिकविण्याचा प्रयत्न केला. आम्ही संवाद चालूच ठेवीत असू.” त्यामुळेच त्यांची मुले शुद्ध राहिली.

युवकांना “तारणासाठी सूज्ञ” बनविणे

“दुष्ट व भोंदू माणसे दुष्टपणात अधिक सरसावतील,” असे पौलाने भाकित केले. (२ तीमथ्य ३:१३) नैतिक पातळी अशारितीने ढासळेल. नवयौवनांचा स्वैराचार व गर्भवती राहणे समाजाला ग्रासीतच राहील.

देवप्रणित पालक त्यांच्या मुलांना “तारणासाठी सूज्ञ” बनविण्यास पवित्र शास्त्राकडे वळतील. (२ तीमथ्य ३:१५) तुम्हा स्वतःस पवित्र शास्त्र शिक्षणाची गरज जाणवते तर या मासिकाच्या प्रकाशकांना लिहून यहोवाच्या साक्षीदारांसोबत संपर्क साधण्यात मनमोकळे वाटू द्या. अशाप्रकारचे शिक्षण तुम्हासाठी मोफत प्राप्त करवून देण्याची योजना आखण्यात ते आनंद मानतील. यहोवाचे साक्षीदार तुम्हास युवर युथ गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इटa अशा प्रकारची प्रकाशनेही पुरवितील. यामध्ये अशी माहिती आहे जिने हजारो युवकांना जगाच्या अनैतिक पाशातून सुटण्यास मदत केली.

मग, ज्या मुलींनी अनौरस गर्भारपणाच्या शोकांतिकेचा अनुभव घेतला आहे त्यांच्याबाबत काय? अशी परिस्थिति आशाहीनतेपासून दूर आहे. देव, ज्यांना त्यांच्या वागणूकीबद्दल खरोखरच पस्तावा होतो त्यांना “भरपूर क्षमा करतो.” (यशया ५५:७) एक पालक असणे हे काही सोपे नाही, परंतु पवित्र शास्त्र तत्त्वांच्या लागू करण्याने एखादा यश मिळवू शकतो. एक तरुण स्त्री, जिला ख्रिस्ती होण्यापूर्वी विवाहित नसता, तीन मुले झाली, तिने तेच केले. तिने देववचनाचा अंमल तिच्या कुटुंबात करण्याचा प्रयत्न केला. यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीसोबत जवळचे संबंध राखल्याने तिला बरेच सांत्वन व आधार प्राप्त झाला. ती म्हणतेः “भरपूर क्षमाशील असणाऱ्‍या देवाची सेवा करणे व अतिशय समजूतदार भाऊ व बहिणी असणे निश्‍चितपणे विलोभनीय आहे. माझ्या जीवनात प्रथमच मला आध्यात्मिक व शारिरीकरित्या शुद्ध असल्याचे वाटले.”

अर्थात, विवाहापूर्वीच्या लैंगिक स्वैराचाराची समस्या प्रथमदर्शनीच टाळणे हे उत्तम ठरेल. हजारो युवक पवित्र शास्त्राचा अक्षय उपदेश अनुसरल्यामुळे तेच करीत आहेत हे मोठे आनंदाचे आहे.

[तळटीपा]

a  वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले.

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाचे साक्षीदार त्यांच्या मुलांमध्ये एड्‌स किंवा गर्भधारणा यांच्या भयापेक्षा अधिक प्रभावी असे काहीतरी कोरण्याचा प्रयत्न करतातः यहोवा देवाविषयीचे अस्सल भय.

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

काही अंदाजानुसार एकट्या अमेरिकेत १२ दशलक्षाहून अधिक युवक लिंगाचारात क्रियाशील आहेत

[२८ पानांवरील चित्रं]

लैंगिक विषय येतो तेव्हा पालक आपल्या मुलांसोबतचे संभाषण सुरु ठेवू शकतात

[३० पानांवरील चित्रं]

ख्रिस्ती युवक देवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधास लयास नेणाऱ्‍या वर्तणूकीस टाळतील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा