वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ५/१ पृ. २६-२७
  • मुलांना मुले होतात तेव्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुलांना मुले होतात तेव्हा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्तरासाठी शोध
  • गर्भपात—कोणत्या किमतीला?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-४ (gbr8-4)
  • विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • गर्भपात—द्विधा जग
    सावध राहा! माहितीपत्रक ८-४ (gbr8-4)
  • गर्भपाताचा पेचप्रसंग—६ कोटी खून हा याचा उपाय आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ५/१ पृ. २६-२७

मुलांना मुले होतात तेव्हा

“तीकेवढी छान परिकथा वाटत होती,” असे एका तरुणीने मोठ्या दुःखदपणे आठविले. तिला आपण शारोन असे म्हणू. ती पुढे म्हणालीः “माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे, आणि माझी ही प्रेयसी गरोदर राहिलीच तर तो कधीही सोडणार नाही असे तो मला नेहमी म्हणत होता.”

एके दिवशी शारोनला वाटले की, तिला अपेंडीक्स सूज आहे व त्याच्या तपासणीसाठी ती डॉक्टरांकडे गेली, पण तिला त्यांच्याकडून कळाले की, ती तीन महिन्यांची गरोदर आहे! “मी माझ्या प्रियकराकडे ताबडतोब धावले,” असे ती आठवून सांगते. त्याची प्रतिक्रिया? “तुला गर्भपात करवून घेतला पाहिजे! जा, त्यापासून सुटका करुन घे!” ती सुंदर परिकथा आता भयानक स्वप्न बनले होते.

एकट्या अमेरिकेत जवळजवळ एक दशलक्ष नवयौवनातील मुली दरवर्षी गरोदर राहतात. औद्योगिक देशात अमेरिका नवयौवन गर्भारपणातील प्रमाणामध्ये वरच्या क्रमांकावर आहे. तथापि, ३७ देशांचा अभ्यास केलेल्या द ॲलन गूटमाचर या संस्थेने व्यक्‍त केले की, अविवाहित नवयौवनांची गरोदर राहण्याची समस्या विश्‍वव्यापी बनत चालली आहे.

ॲडोलेसेन्स या नियतकालिकात ब्लॅक आणि डिब्लासि या संशोधकांनी लिहिलेः “गरोदर राहिलेल्या शालेयवयीन मुली सर्व प्रकारच्या आर्थिक गटातून व सार्वजनिक आणि खाजगी शाळातून येतात. सर्व वंश, सर्व विश्‍वास व देशातील सर्व भागातून म्हणजे नगरी व उपनगरी भागांचे प्रतिनिधित्व करतात.” गरीब व अल्पसंख्याक कुटुंबातील मुलीत प्रसविण्याचे प्रमाण उच्चतम का आहे याची कारणमीमांसा देताना जर्नल ऑफ मॅरेज ॲण्ड द फॅमिली म्हणतेः “श्‍वेतवर्णीय व उच्च आर्थिक स्थैर्य असणाऱ्‍या मुली बहुदा अधिक गर्भपात करवून घेतात.”

अमेरिकेत सर्व कायदेशीर गर्भपातातील तिसरा भाग २० वर्षे वयाखालील स्त्रिया आहेत. नैतिक गोष्ट बाजूला ठेवली तरी गर्भपात करुन घेण्याचा निर्णय बहुदा एखाद्यास जीवन कंठणे कठीण असल्याचे शाबीत करतो. नवयौवनात असताना गर्भपात करवून घेतलेली एक स्त्री आठवितेः “माझे माना. मी खून करण्यास कारण झाले, खूनाचा बळी ठरलेल्यास, मला त्याच्याविषयी किती दुःख वाटते याची जाणीव कधीही होऊ शकणार नाही याच्या यातना मला सारख्या सतावत आहेत.”

उत्तरासाठी शोध

सामाजिक कलंक, अस्थिर विवाह, दारिद्र्‌य हे नवयौवनात गरोदरपणा लाभल्यानंतरचे मिळणारे परिणाम आहेत. ही गोष्ट शिक्षक, डॉक्टर, राजकारणी व पालकांच्या मुख्य चिंतेची बाब बनली आहे यात नवल नाही. काहीजण लैंगिक शिक्षण कार्यक्रम असावा इतकेच काय पण कुटुंब नियोजन साधने व गर्भपात सेवा युवकांना अगदी सुलभमार्गी द्यावी अशी शिफारस करतात.

तरीसुद्धा, युवकांच्या भावनात्मक गरजा लैंगिक शिक्षण भागवू शकत नाही. काही मुली, उदाहरणार्थ, खरेच गरोदर होण्याची इच्छा करतात! जसे, एक मुलगी याविषयी असे म्हणतेः “माझ्या पालकांचे लक्ष वेधण्यासाठी मी समस्येत पडण्याचा प्रयत्न केला. माझा कोणी चिमुकला माझाच असावा, तो माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही व तोच माझ्या जगण्याचा आधार राहील असे मला सारखे वाटत असे.”

यापेक्षा अधिक म्हणजे, लैंगिक शिक्षण कार्यक्रम युवकांना नैतिक मार्गदर्शन देत नाही. स्वीडन व नेदरलँडसारखे देश, जेथे हा कार्यक्रम सर्वसामान्यपणे रावबला जातो, तेथे थोड्या नवयौवना गरोदर राहात असल्या तरी लैंगिक स्वैराचार मात्र फोफावत आहे. तर मग, गरोदरपणासोबत अधिक लैंगिक स्वैराचार भावनिक, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांना धोक्यात घालतो असे असू शकेल का? तसे आहे तर कुटुंब नियोजनांची साधने नव्हे तर शुद्धाचरणास अधिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे याचे हे योग्य कारण नव्हे का? याचे उत्तर मिळविण्यासाठी आपण अस्तित्वात असणाऱ्‍या सर्वात पुरातन पुस्तक—पवित्र शास्त्र—या विषयावर काय भाष्य करते ते पाहू या.

[२६ पानांवरील चित्रं]

“गरोदर राहिलेल्या शालेयवयीन मुली सर्व प्रकारच्या आर्थिक गटातून व सार्वजनिक आणि खाजगी शाळातून येतात. सर्व वंश, सर्व विश्‍वास व देशातील सर्व भागातून म्हणजे नगरी व उपनगरी भागांचे प्रतिनिधित्व करतात.”—ॲडोलेसेन्स नियतकालिक.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा