“इश्वरी न्याय” प्रांतिय अधिवेशन
न्यायाच्या अभावामुळे जगभरात केवढा अधिक त्रास आहे बरे! कांही राजकीय अधीपतीच्या अधिकाराच्या गैरवापराचा परिणाम अन्यायी त्रासामध्ये झाला. अधाशी व्यापारी आस्थेने लोकांना हैराण केले आहे ज्याचा परिणाम कठीण परिस्थीतीत दिसतो. यात अधिक सध्या धार्मिक नेत्यांचा जुलुम आहे जे येशूच्या दिवसातील नेत्यांचे प्रतिरूप आहेत ज्यांना तो म्हणाला होता: “जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटहि लावीत नाहीत.” (मत्तय २३:४) कौटुंबिक वर्तुळातही अधिकाराचा गैरवापर परिणामतः अन्याय आहे.
इतिहास याची साक्ष देतो की अपूर्ण मानवाकडे, ते केवढे ही प्रामाणिक मताचे असतील तरी, त्यांच्याकडे अशा प्रकरणाचे उपाय म्हणून पहाणे व्यर्थ आहे. परंतु स्वर्गात सर्वोच्च असा न्यायाधीश यहोवा आहे. तो न्यायी देव आहे. उचितपणे मोशेने गाईले: “तो दुर्ग आहे, त्याची कृति परिपूर्ण आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्याठायी अनीति नाही, तो न्यायी व सरळ आहे.”—अनुवाद ३२:४.
यहोवाने या जगाचा सर्व अन्याय दीर्घ मुदतीसाठी सहन केला आहे पण तो ते सर्वकाळ चालू देणार नाही. यावर कृति करण्याची त्याची नियुक्त वेळ आली आहे व तेव्हा यशया १४:४–७ मध्ये सापडणारा भविष्यवाद पूर्ण होईल जो अभिवचन देतो की सर्व जाचजुलूम निघून जाईल व “सर्व पृथ्वी विश्राम पावेल.”
या भविष्यवादावरील त्यांच्या भक्कम विश्वासामुळे च यहोवाचे साक्षीदार सर्वत्र व दूरवर घोषणा करण्यात आनंद मानतात की यहोवा लवकरच आपली संपूर्ण राज्य सत्ता स्थापून सर्व जाचजुलूम, अनितिमान, व अन्याय यांचा बिमोड करील. त्यानंतर कोणीही कोणास दुखापत व हानि करणार नाही कारण ‘संपूर्ण पृथ्वी सागर जलपूर्ण आहे तशी यहोवाच्या ज्ञानाने भरून जाईल.’—यशया ११:९.
आमचा यहोवाच्या नीतिमान न्यायावरील विश्वास दृढ करण्यासाठी १९८८च्या प्रांतिय अधिवेशनाचे शिर्षक “इश्वरी न्याय” असेल. या शिर्षकावरील जोर केवळ आम्हास आमची इश्वरी न्यायावरील आशा घोषित करण्यासच नव्हे तर आमच्या सर्व मार्गाक्रमणात इश्वरी न्यायानुसार चालण्यास आम्हास उत्तेजन देईल.
यहोवाचे सेवक यानाते आम्हा सर्वांना माहीत आहे की आमच्या प्रथम पालकांनी पाप केल्यामुळे आमचा कल स्वार्थाकडे व अन्यायाकडे झुकलेला आहे. यास्तव इश्वरी न्यायास उंचावण्याच्या गरजेवर जोर देणारी पवित्र शास्त्राधारीत भाषणे, प्रात्यक्षिके, मुलाखती व नाटके याकरवी अशी सुंदर माहिती प्राप्त करण्यात आम्ही कृपादायी असू. हे मीखा ६:८ मधील आशेनुसार ‘न्यायाने वागणे आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे’ या सोबत स्वतःला ठेवण्यासारखे आहे. हे ऐक्य, समाधान, व हर्ष यासाठी सिद्ध करते, तसेच ते सर्व पृथ्वीभर सुवार्तेचा प्रचार करण्यासही मदत करते.
या अधिवेशनांचे उल्लेखनीय वैशिष्ट्य हे असणार की विशिष्ट देशातील पुष्कळ शहरे यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळ सदस्यासोबत खास भाषणांच्या साठी जोडली जातील. तसेच जगभरातील मिशनऱ्यांसाठी प्रवास खर्च पुरविला जाईल; हे त्यांना त्यांच्या कुटुंबाना पुन्हा एकवार भेट देण्यास समर्थ करील.
यहोवाने इच्छिले तर हे “इश्वरी न्याय” प्रांतिय अधिवेशन गुरुवार दुपारी १.३० वाजता सुरु होईल व रविवार दुपारी ४.०० वाजता संपेल. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व प्रत्येक दिवसाचे शेवटचे गीत व प्रार्थना होईपर्यंत तेथे असण्यासाठी आपण व्यवस्थित योजना आखू या. चांगल्या आध्यात्मिक क्षुधे सोबत व टिपणे घेण्यास सिद्ध होऊन या. यहोवाने आम्हासाठी चांगल्या गोष्टींची “मेजवानी” राखून ठेवली आहे जी आम्हास पुढे असणाऱ्या कार्यासाठी दृढ करणारी चेतना देईल. याविषयी खात्रीदायक असा.—यशया २५:६; गीतरत्न २:४.
होय, प्रत्येक जण “इश्वरी न्याय” या प्रांतिय अधिवेशनापासून शक्य ते महान आध्यात्मिक आशीर्वाद घेण्याच्या निश्चयाने येवो.
भारतात सप्टेंबर १९८८ ते जानेवारी १९८९ पर्यंत भरविल्या जाणाऱ्या “इश्वरी न्याय” प्रांतिय अधिवेशनाच्या जागा व तारखांच्या बाबीत या मासिकाच्या प्रकाशकांना कृपया लिहावे.