खोट्या धर्मास वाढविणारा या अर्थी ख्रिस्ती धर्मराज्यास उघड करण्यात आले
“आपला देव यहोवा याचा शब्द ऐकत नाही व शिस्त लावून घेत नाही ते हेच राष्ट्र आहे.”—यिर्मया ७:२८.
१, २. यिर्मयाने त्याच्या देवप्रणीत नियुक्तिबद्दल कशी प्रतिक्रिया व्यक्ति केली?
“खऱ्या आत्मविश्वासाचा अग्नि त्यात जळत होता, सत्य बोलण्याची भावना त्याला सतत रेटत होती, त्याला चीड वाटत होती पण त्याने आपल्या शक्तीला आवर घातला.” या शब्दात दोन इब्री प्रामाण्यांनी यिर्मयाच्या भूमिकेचे वर्णन केले. देवाकडून त्याला लाभलेली नेमणूक भव्य होती तरी आपल्याला इस्राएल राष्ट्राच्या बाबतीत असणारी जबाबदारी पूर्ण करायची आहे हे त्याला ठाऊक होते. ही गोष्ट त्याने स्वतः याप्रकारे बोलून दाखवली: “दिवसभर यहोवाचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे. मी म्हणालो: ‘मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.’” होय, दबाव व छळ त्याच्यासाठी अत्यंत पराकाष्ठेचा झाला होता. पण मग त्याने हार मानली का?—यिर्मया २०:८, ९अ.
२ यिर्मयाने पुढे म्हटले: “तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नि जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले. मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्मया २०:९ब) यहुदाला देवाचा न्यायदंड घोषित करण्याची आपली नेमूणक यिर्मयाने बाजूला टाकली नाही.—यिर्मया ६:१०, ११.
आधुनिक काळातील यिर्मया
३. येशू व त्याच्या शिष्यांनी त्यांच्या नेमणूकीबद्दल कशी मनोवृत्ती दाखवली?
३ यिर्मयाप्रमाणेच ख्रिस्त येशू व आरंभीच्या ख्रिस्ती शिष्यांनी देवाच्या राज्याविषयीचा अप्रिय संदेश यहुद्यांना व राष्ट्रांना निर्भिडपणे घोषित केला. पेत्र व इतर प्रेषितांना पूर्वी प्रचार कार्यामुळे तुरूंगवास सहन करावा लागला होता तरी त्यांना त्यांच्या धर्मनिंदकास मोठ्या धैर्याने उत्तर दिले: “आम्ही माणसांपेक्षा देवास आपला शासक मानून त्याची आज्ञा मानली पाहिजे.” त्यांच्या या निर्भिडपणामुळे धर्माधिकाऱ्यांच्या आज्ञेवरून त्यांना फटके मारण्यात आले. अशावेळी प्रेषितांची प्रतिक्रिया कोणती होती? “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.”—प्रे. कृत्ये ५:२९, ४०–४२; मत्तय २३:१३–३३.
४. यिर्मयाचे उदाहरण २०व्या शतकात कोणी अनुसरले, हे त्यांनी कसे केले?
४ अशाप्रकारे आरंभीच्या अभिषिक्त ख्रिश्चनांनी यिर्मयासारखी हालचाल अनुसरली. त्यांना विलक्षण घटना व हट्टी धर्मविरोध्यांचा सामना करावा लागला तरीसुद्धा देवाचा न्यायदंड त्यांनी घोषित केला. त्यांच्या या उदाहरणाचे आज २०व्या शतकात कोणी अनुकरण केले आहे? या सद्य व्यवस्थीकरणाच्या आणि विशेषेरित्या यरूशलेमाचा प्रतिनमुना ख्रिस्ती धर्मराज्य याजविषयीचा देवाकडील न्यायदंड जाहीरपणे व घरोघरी कोणी गाजविला? ६८ वर्षांपेक्षा अधिक साचत असलेला ऐतिहासिक पुरावा हे सुव्यक्त करतो की आधुनिक काळचा यिर्मया वर्ग हा छोटा पण धैर्यवान असा यहोवाच्या अभिषिक्त साक्षीदारांचा गट आहे. यांना १९३५ पासून सतत वाढत असलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ स्वच्छापूर्ण लाखो साथीदारांची भर व सहकार्य मिळत राहिले आहे. यांना देखील यहोवाचे साक्षीदार असेच ओळखतात. त्यांनी एकमुखाने व एकसुराने खोटा धर्म हा पाश व धाकदपटशाही करणारा आहे असे बोलून दाखविण्यात यिर्मयाची भूमिका बजावली आहे.—प्रकटीकरण ७:९, १०; १४:१–५.
ख्रिस्ती धर्मराज्य—यरूशलेमाचा आधुनिक प्रतिनमुना का?
५. ख्रिस्ती धर्मराज्य कोणकोणत्या बाबतीत प्राचीन यरूशलेमाच्या सदृश्य आहे?
५ ‘पण,’ एखादा विचारील, ‘प्राचीन यरूशलेम व ख्रिस्ती धर्मराज्य यात आम्हाला समांतरता कोठे दिसते?’ सध्याच्या अहंकारी ख्रिस्ती धर्मराज्यात त्याजसारखीच जी प्रवृत्ती व परिस्थिती दिसते त्यामुळे. त्यांना रोम, यरूशलेम, कॅन्टरबरी, फातिमा, ग्वाडेलोप आणि झरगोझा यासारख्या “पवित्र शहरे” व “पवित्र अवशेषांबद्दल” मोठा आत्मविश्वास वाटतो. आपली कॅथीड्रेल्स, बॅसिलिका, मंदिरे व चर्च यांना ते मोठ्या प्रेमाने पाहतात आणि आपल्या प्राचीन कलाकृति व इमारती या जणू त्यांना देवासोबत खास भूमिका देऊन आहेत असे वाटून त्यांना त्यांचा मोठा अभिमान वाटतो. त्यांच्या धार्मिक इमारती “देवाच्या गौरवाप्रीत्यर्थ” बांधल्या आहेत असेही ते सांगतात. तरीपण, यापैकीच्या किती इमारती खरेपणात यहोवा देवाचे नाव आपल्यावर लावून आहेत? उलटपक्षी, त्या इमारतीचे शिल्पकार, तिला सजविणारे कलाकार व मूर्तिकार, ज्यांनी तिच्या खर्चाची काळजी घेतली ते धनिक आश्रयदाते किंवा त्या इमारती ज्या “संताना” समर्पित केल्या जातात त्याकडेच बहुधा लक्ष वेधविले जाते. यहुदाने आपल्या पवित्र मंदिराविषयी जसा आत्मविश्वास बाळगला होता त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मराज्याने आपल्या कलाकृति व सांप्रदाय याविषयी राखलेला आत्मविश्वास सुद्धा भ्रममूलक आहे.—यिर्मया ७:४.
६. येशूने यहुदी पुढाऱ्यांविषयी दाखविलेला निषेध ख्रिस्ती धर्मराज्याच्या धर्मगुरुंना कसा लागू होतो?
६ यिर्मयाने यहुदी याजक व संदेष्टे याविषयीचा जो निषेध व्यक्त केला होता तो पाहू जाता आजच्या ख्रिस्ती धर्मराज्यातील धार्मिक पुढाऱ्यांबद्दल काय म्हणता येईल? यिर्मयासारखीच निर्भिडता राखून येशूने यहुदी याजकांविषयी जे वर्णन दिले होते तेच आजातागायत ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मपुढाऱ्यांना लागू होत आहे की, “ते प्रवचने देतात खरे पण तसे आचरण करीत नाहीत. . . . जेवणावळीतील मानसन्मान, सभास्थानातील समोरची आसने . . . यासारख्या सर्व गोष्टी, लोकांचे लक्ष आकर्षून घ्यावे म्हणून करतात.” (मत्तय २३:३–७, द जरूसलेम बायबल) मशहुर धर्म पुढाऱ्यांना तसेच प्रवचनकर्त्यांना राजकीय व राष्ट्रीय सभांना तसेच मेळाव्यांना समक्ष उपस्थित राहून आशीर्वाद देताना आणि राजकारणी मुत्सद्यांसोबत सहभागीने ठळक प्रकाशात राहिलेले आपण कितीदा पाहत असतो बरे!
७. (अ) काही प्रवचनकार बहुसंख्याकांना कसे फसवीत आहेत? (ब) कोणते आव्हान पाळकांनी टाळले आहे?
७ सध्याच्या दुरदर्शनच्या युगात या माध्यमाचा वापर आपल्या ढंगदार युक्त्या व मानसिक करामतींसाठी करून बहुतेकांची फसवणूक करणारे व त्यांच्या खिशाला चाट देणारे काही दुरदर्शन प्रवचनकर्तेही आहेत. तर आता, २,६०० वर्षांनंतर सुद्धा यिर्मयाचा उघड दोषारोप केवढ्या योग्यपणे लागू होतो की, “लहानथोर सर्व स्वहिताला हापापले आहे, संदेष्ट्यांपासून याजकापर्यंत सगळे कपटांचा व्यवहार करीत आहेत.” याच वेळी यापैकी कोणालाही खऱ्या ख्रिस्ती उपाध्यपणाचे आव्हान, लोकाच्या समक्ष, घरोघरी जाऊन पुरे करण्याचे धाडस होत नाही. केवळ यहोवाच्या साक्षीदारांनीच—अभिषिक्त यिमर्या वर्ग आणि “मोठा लोकसमुदाय”—ही जबाबदारी आनंदाने स्वतःवर घेतली आहे.—यिर्मया ६:१३; प्रे. कृत्ये २०:२०, २१.
ख्रिस्ती धर्मराज्याचे तारण झाले का?
८. आपण हर्मगिदोनाच्या पलीकडे गेलो आहोत हे ख्रिस्ती धर्मराज्याला का वाटते?
८ हेच दुरदर्शन प्रवचनकार “नव्याने जन्मलो आहोत” व “एकदा तारण मिळाले म्हणजे कायमचे मिळाले” अशा तारतम्यहीन ब्रीदांचा व वेदांतीय शिक्षणाचा वापर करून लोकांना निर्भयतेच्या खोट्या विचारात झुलवीत आहेत. ख्रिस्ती धर्मपंथातील जवळजवळ प्रत्येक पंथातील लाखो लोकांना “नव्याने जन्मला आहात” व “तारण झाले आहे” असा विश्वास ठेवण्यास प्रवृत्त केले गेले आहे. निर्लज्ज राजकारणीसुद्धा अगदी मोकळेपणाने असा दावा करतात. होय, त्यांचे आवडते पाळक त्यांना म्हणतात की त्यांनी देवासोबत, त्यांचे “तारण’ झाले आहे म्हणून शांतीसख्य मिळविले आहे, प्रत्यक्षात जरी ते धार्मिक, राजकीय, व राष्ट्रीय स्वरूपात विभाजित असले तरी! हा उपदेश ऐकायला लोकांना फारच आवडतो, असेच यिर्मयाच्या काळतील लोकांना सुद्धा आवडत होते! (यिर्मया ५:३१; १४:१४) आता या लोकांना वाटते की आपण तर देवाच्या हर्मगिदोनातील न्यायदंडातून पार गेलेलो आहोत.—यिर्मया ६:१४; २३:१७; १ करिंथकर १:१०; प्रकटीकरण १६:१४, १६.
९. (अ) “नव्याने जन्मणे” कोणास खरेपणाने लागू होते? (ब) पवित्र शास्त्र जीवाबद्दल काय म्हणते? (दोन्ही प्रश्नांच्या उत्तराच्या बाबतीत रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्समधून आणखी माहिती द्या.)
९ तथापि, देवाचे वचन व ख्रिस्ताच्या शिकवणींचा मननयुक्त अभ्यास दाखवितो की, नव्याने जन्मणे, “पाण्याने व आत्म्याने जन्मणे,” व त्याकरवी ख्रिस्तासोबत स्वर्गीय शासनामध्ये सहभागी होण्याचा खास हक्क केवळ थोड्या लोकांनाच आहे. (योहान ३:३–५; रोमकर ८:१६, १७; प्रकटीकरण १४:१–३) खऱ्या ख्रिस्तीजनांचा आजचा “मोठा लोकसमुदाय” याला नव्याने जन्मण्याची गरज नाही कारण त्यांची आशा स्वर्गीय नव्हे तर पृथ्वीरील सार्वकालिक जीवनाची आहे. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) याशिवाय ख्रिस्ती धर्मराज्यातील शिकवण की, माणसाला एक अमर जीव असून त्याचे तारण झाले पाहिजे ही खोट्या प्रतिपादनावर आधारलेली आहे. अशा या तत्वास पवित्र शास्त्रात कोठेच आधार मिळत नाही. ही शिकवण खरी पाहता प्राचीन ग्रीक तत्वज्ञानावरून उचलण्यात आली आहे.a
त्याचे वचन वा नाव याबद्दलची तमा न बाळगणारा
१०. पुष्कळ धार्मिक पुढाऱ्यांचा पवित्र शास्त्राविषयी कोणता दृष्टीकोण आहे?
१० प्राचीन यरूशलेम व आजचे ख्रिस्ती धर्मराज्य यात आणखी काही सदृश्यता आहेत. यिर्मयाने म्हटले: “पाहा, यहोवाचे वचन त्यांस निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांस काही संतोष वाटत नाही.” (यिर्मया ६:१०) यहोवाच्या वचनाचा संदर्भ घेण्याऐवजी पाळकांना तत्ववेत्ते आणि शास्त्रज्ञांना उद्धृत करणे आवडते. कित्येकांना तर पवित्र शास्त्राविषयी मोठी लाज वाटते, आपल्या “उच्चतम टीकास्त्रा” करवी ते त्याची थट्टा करतात. ते म्हणतात की त्यातील माहिती गूढ असून दंतकथेच्या रूपात आहे. (यिर्मया ७:२८) त्याच्या संपादकाच्या नावाविषयी पाहता त्यांना त्याचा तिरस्कार वाटतो. अशी ही धारणा करून घेण्यासंबंधाने आमच्याजवळ कोणता पुरावा आहे?
११. देवाच्या नावाच्या वापराबाबत यिर्मया व ख्रिस्ती धर्मराज्य यात कोणता फरक आढळतो?
११ वस्तुतः इब्री शास्त्रवचनामध्ये साधारणतः ७,००० वेळा (יהוה) ही इब्री आद्याक्षरे आढळत असली तरी कित्येक इंग्रजी पवित्र शास्त्रात “यहोवा” किंवा “याव्हे” या नावाऐवजी “प्रभु” ही संज्ञा सर्वत्र टाकण्यात आली आहे. उदाहरणार्थ, आफ्रिकान्स भाषेतील सध्याच्या पवित्र शास्त्र आवृत्तीत तर हे नाव संपूर्णपणे गाळून टाकण्यात आले आहे. फ्रान्सको-सोल यांच्या स्पॅनिश भाषेतील मूळच्या आवृत्तीत ते नाव वापरले होते. पण पुनरावृत्तीमध्ये हे इश्वरी नाम नाहीसे झाले व त्याऐवजी सेनर (प्रभु) ही संज्ञा दिसू लागली. (मराठी भाषेत पंडिता रमाबाई आवृत्तीत “यहोवा” हे नाव आढळते, पण इतर शास्त्र आवृत्त्यात या नावाऐवजी “परमेश्वर” ही संज्ञा आढळते.) ख्रिस्ती धर्मराज्याच्या भाषांतरात देवाचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नसले तरी पाळकांच्या मुखी त्याचा क्वचितच उच्चार आढळतो. पण यिर्मयाने तर प्रत्यक्षात देवाच्या विशिष्ट नावाचा आपल्या भविष्यावादित संदेशात ७२६ वेळा उच्चार केला!b
“आकाशराणी” व मूर्तिपूजा
१२-१४. (अ) यहुदी कुटुंबे कोणत्या कार्यात आवेशपूर्ण रितीने गढले होते? (ब) त्यांच्या भक्तीविषयी यहोवाने कोणता दृष्टीकोण धरला?
१२ यरूशलेमास यिर्मयाने दिलेल्या संदेशाचे परिक्षण करताना आम्हाला आणखी एक समांतरता आढळते. यहोवाने त्याच्या संदेष्ट्याला आपल्या लोकांप्रीत्यर्थ याचना करू नये असे म्हटले त्यावेळी त्याचे कारणही त्याला स्पष्ट केले. “यहुदाच्या नगरात, यरूशलेमेच्या रस्त्यात ते काय करीत आहेत ते तू पाहतोस ना? मुलबाळे काटक्या जमा करतात, वडील माणसे अग्नि पेटवतात आणि . . . स्त्रिया कणीक तिबंतात.” ते सबंध कुटुंब कोणत्या कार्यामध्ये इतक्या आवेशाने भाग घेत होते बरे? “‘आकाशराणी’ प्रीत्यर्थ पोळ्या कराव्या” या कार्यास्तव!—यिर्मया ७:१६–१८; ४४:१५, १९.
१३ एक यहुदी विवेचन म्हणते: ‘‘आकाशराणी”ची प्रथा मोठ्या उत्साहाने व उघडपणे आचरली जात होती.” यहुदाचे राष्ट्र, विश्वास बसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मूर्तिपूजा आचरीत होते. ते बाबेलोनी तारांगणाच्या त्र्येकातील इश्थार ही तिसरी देवी, जिला बाबेलोनी समृद्ध देवता मानीत त्या विदेशी देवीची उपासना करीत. कदाचित, या “राणी”चा संबंध कनान्यांची देवता अष्टरोथ हिच्यासोबत देखील असावा.—१ राजे ११:५, ३३.
१४ या देवीच्या उपासनेसोबत ते आणखी इतर प्रकारातील मूर्तिपूजेत समाविष्ट होते. यासाठी यहोवाने त्यांचा निषेध दर्शवून म्हटले: “त्यांनी आपल्या मूर्तीनी व परक्या खोट्या दैवतांनी मला का चिडविले आहे?” हा आरोप आणखी पुढे सांगण्यात आला: “त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत. तर ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालले, त्यांच्या पूर्वजांनी त्यांस शिकविल्याप्रमाणे ते बालमूर्तीच्या मागे लागले.” (यिर्मया ८:१९; ९:१३, १४) ख्रिस्ती धर्मराज्यसुद्धा अशाच काही सापळ्यात अडकला का?
१५. (अ) मूर्तिपूजेच्या बाबतीत आज आम्हाला ख्रिस्तीधर्मराज्यात कोणती परिस्थिती आढळते? काही स्थानिक उदाहरणे सांगा. (ब) मरीयेविषयी खरे ख्रिस्ती कोणती भूमिका घेऊन आहेत? (पहा रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स पृष्ठे २५४–६१)
१५ तुम्ही कोणा कॅथोलिक, प्रॉटेस्टंट किंवा कर्मठ पंथाच्या चर्चेसना भेटी देऊन बघा, तुम्हाला निदान क्रुसाच्या मूर्त्या दिसतील. पण कॅथोलिक आणि कर्मठ पंथीय साम्राज्यात “सदा–कुमारी पवित्र मरिया, खऱ्या देवाची आई”c हिच्या विविध दृश्याच्या व विविध प्रकारातील मूर्त्या आढळतील. तिच्यावर अनेक विभूषित पदव्या आहेत ज्यात “आकाशाची राणी,” “विश्वाची राणी”d अशाही पदव्यांचा समावेश आहे. तथापि, यिर्मया वर्गाने, उलटपक्षी, मरीया ही येशूची आई आणि अभिषिक्त अशी विश्वासू असे मानले आहे तरी त्यांनी ही प्रेषितीय सूचना कटाक्षाने पाळली आहे की, “तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा.”—१ योहान ५:२१; यिर्मया १०:१४.
एकाच सेनाधीश प्रभु यहोवा ऐवजी त्र्येक
१६. कोणत्या शिक्षणामुळे मरीयेची पूजा करण्याच्या प्रकाराला वाव मिळाला, आणि कसा?
१६ ‘पण,’ तुम्ही विचाराल, ‘मरीयेची ही भक्ती व तिचा गौरव कसा सुरु झाला?’ आरंभीच्या धर्मत्यागी चर्चने मूर्तिपूजक उपासनेला शोषून घेण्याचे जे पाऊल उचलले ते त्याचे कारण होते. मूर्तिपूजक जगतात तीन मिळून एका देवाची विचारधारा अगदी प्रख्यात होती. तीन देवड्यांचा गट असणारी मंदिरे प्राचीन रोम्यांमध्ये होती. त्या देवड्या “विश्वास व उपासनेच्या बाबतीत त्र्येक दैवतांस समर्पित होत्या. राजधानीत ज्यूपितर, ऑप्टीमस मक्सीमस यांच्या मंदिरात ज्यूपितर–ज्यूनो–मिनर्व्हा यांचे त्र्येक आढळत होते.”e
१७, १८. (अ) त्रेकत्व शिक्षणाची वृद्धी व्हावी याकरता कशाला दाबून टाकण्यात आले? (ब) रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्समधून अधिक माहिती स्पष्ट करा.
१७ “अत्यंत पवित्र त्रेकत्व” हे तत्व तिसऱ्या व चवथ्या शतकाच्या दरम्यान शिरकाव करू पाहात होते, त्याला वाढीस लावण्यासाठी कॅथोलिक चर्चला इब्री विचारप्रणालीला दाबून टाकण्याची गरज पडली. ती इब्री विचारप्रणाली यिर्मयाच्या शब्दात अगदी स्पष्ट रूपाने अशी दिसत होती: “हे यहोवा, तुजसारखा कोणीच नाही, तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे. यहोवा सत्य देव आहे. तो जिवंत देव, सनातन राजा आहे.” याच विचारधारेस येशूनेही, त्याने मोशाचे शब्द उद्धृत करताना संमती दिली होती: “हे इस्राएला ऐक, आपला देव यहोवा हा अनन्य यहोवा आहे.”—यिर्मया १०:६, १०; मार्क १२:२९; अनुवाद ६:४.
१८ “याव्हे” किंवा “यहोवा” या नामाचा उच्चार करता कामा नये या यहुदी अंधश्रद्धेने प्रलोभित होऊन धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मराज्याने देवाच्या नावाचा वापर टाकूनच दिला. यामुळे जी वेदांतीय पोकळी निर्माण झाली ती “पवित्र त्रेकत्व” याने भरून काढली.f
१९. (अ) त्रेकत्वाचा स्विकार केल्यामुळे ख्रिस्तीधर्मराज्यात कोणता परिणाम घडला गेला? (ब) त्रेकत्व विवादास टेकू मिळावा यासाठी कोणती लबाडी घुसवण्याचा प्रयत्न झाला?
१९ अशा प्रकारे ख्रिस्ती धर्मराज्याने ‘अन्य देवाच्या मागे जाण्याचे’ त्रेक देवाची भक्ति करण्याचे निवडून घेतले. अशी ही भक्तिपद्धत यहुदी, ख्रिस्त व खऱ्या ख्रिश्चनांना अगदीच अपरिचित होती. तीन–मिळून–एक या गूढ तत्वाला टेकू देण्यासाठी ख्रिस्ती धर्मराज्याच्या अनुवादकांनी त्यांच्या किंग जेम्स आवृत्तीत फसवेगिरीचा प्रयत्न देखील केला.g त्रेकत्व तत्वाचा तर्कशुद्ध परिणाम असा झाला की ख्रिस्ती धर्मराज्याचा मोठा विभाग त्याच्या “आकाशराणी”ची भक्ती व पूजा करण्यात अडकून पडला.—यिर्मया ७:१७, १८.
पाळक छळास उद्युक्त करतात
२०, २१. ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मगुरुंनी कोणता मार्ग अनुसरला आणि आता कोणते प्रश्न योग्य आहेत?
२० वर नमूद असणाऱ्या गोष्टीचा विचार करता ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मपुढाऱ्यांना यिर्मयाचा हा प्रश्न साजेसा आहे: “‘आम्ही सूज्ञ आहोत, यहोवाचे धर्मशास्त्र आम्हाजवळ आहे,’ असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पहा, लेखकांच्या लबाड लेखणीने ते खास खोटे केले आहे. . . . पाहा, यहोवाचे वचन ते धिक्कारतात, त्यांच्यात शहाणपण कोठेचे असणार!” (यिर्मया ८:८, ९) त्यांनी यहोवा व त्याचे प्रतिनिधि, त्याच्या साक्षीदारांना धिक्कारले आहे. यिर्मयाला जसे याजकांनी व संदेष्ट्यांनी छळले त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मगुरु या शतकभरात यहोवाच्या साक्षीदारांवर आलेल्या भयानक छळाच्या मागे राहिले आहेत.
२१ तथापि, त्यांनी या छळास का उद्युक्त केले आहे? त्यांचा क्रोध भडकला जाऊन त्यांचा रोष यावा असे साक्षीदारांनी काय केले आहे? पुढील अंकी प्रसिद्ध होणारा या मालिकेतील शेवटला लेख या आणि तत्संबंधी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देईल.
[तळटीपा]
a या मुद्यांच्या सविस्तर विचारासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉक, इन्का. तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स या पुस्तकाची पृष्ठे ७६–८०, ३५६–६१ व ३७९–८० पहा.
b इश्वरी नाम कसे दाबून टाकण्यात आले त्याच्या अधिक माहितीसाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इन्का. तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या द डिव्हाईन नेम दॅट वील एन्डयुअर फॉरएव्हर हे ३२ पानी माहितीपत्रक पहा.
c द इमेज ऑफ ग्वाडेलोप—मिथ ऑर मिरॅकल, लेखक जॉडी ब्रान्ट स्मिथ, पृष्ठ ६.
d द ग्लोरीस ऑफ मेरी, लेखक अल्फान्सोस डी लिगोरी, पृष्ठ ४२४.
e लास ग्रान्देस रिलिजनेस इलस्ट्रेडास (द ग्रेट रिलिजन्स इलस्ट्रेटेड), पृष्ठ ४०८.
f त्रेकत्व शिक्षणाच्या अभ्यासासाठी रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स पुस्तकातील ४०५–२६ पृष्ठे पहा.
g १ योहान ५:७ ही बनावट तऱ्हेची भर आहे आणि मत्तय २४:३६ मध्ये “पुत्रालाहि नाही” हे शब्द दिसत नाही, जे खोटेपणात काढून टाकण्यात आले आहेत. पहा द एम्फॅटिक डायग्लॉट, तळटीप, पृष्ठ ८०३, जे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क इन्का. तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच कोडेक्स सिनायटिकस ॲण्ड द कोडेक्स अलेक्झांड्रीनस, पृष्ठ २७, पहा, जे ब्रिटीश संग्राहलयाच्या विश्वस्तांमार्फत प्रकाशित आहे.
तुम्हाला आठवते का?
◻ आधुनिक यिर्मया वर्गाची कशी ओळख देण्यात आली?
◻ प्राचीन यरूशलेम व ख्रिस्तीधर्मराज्य यात कोणत्या समांतरता दिसतात?
◻ लोकांनी देवासोबत शांतीसख्य प्रस्थापिले आहेत हे कोणत्या मार्गानी धर्मपुढाऱ्यांनी भासवून त्यांना झुलवीत ठेवले आहे?
◻ ख्रिस्ती धर्मराज्यातील कोणती हेळसांडवृत्ती व मूर्तिपूजा लक्षणीय आहे?
[२७ पानांवरील चित्रं]
१९३८ मध्ये साक्षीदार खोट्या धर्माचा धिक्कार करीत होते
[२८ पानांवरील चित्रं]
यहुद्यांनी आपल्या मंदिरावर भाव ठेवला त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मराज्य, फार पुरातन म्हणून आदरास पात्र असणाऱ्या आपल्या इमारतींवर भाव ठेवतो
[२९ पानांवरील चित्रं]
ख्रिस्ती धर्मराज्यातील दुरदर्शनवरील प्रवचनकार लाखोंना, त्यांचे “तारण झाले आहे” व ते “नव्याने जन्मलेले आहेत” असे मानण्यास लावून झुलवीत आहेत