वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ६/१ पृ. ३-४
  • देवाने तुम्हासाठी काय केले आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाने तुम्हासाठी काय केले आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निर्मिती आश्‍चर्याचे निश्रीत पुरावे
  • देव आहे हे आपल्याला कसे समजू शकते
    देव खरोखरी आपली काळजी करतो का?
  • गवत हिरवे का असते प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेवर शोधक नजर
    सावध राहा!—१९९७
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
  • देवाने दिलेल्या चांगल्या गोष्टींची तुम्ही कदर करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ६/१ पृ. ३-४

देवाने तुम्हासाठी काय केले आहे?

‘कांहीच नाही!’ असे कांहीजण उत्तर देतील. ‘मलाच कष्ट करून माझे मला पहावे लागते.’ असेच तुम्हास वाटते तर केवळ क्षणभर विचार करा. तुम्ही कसे अस्तित्वात आला?

तुम्ही जन्मण्याआधी नऊ महिन्यापूर्वी तुमच्या आई मध्ये दोन सूक्ष्म जीवाणू संयुक्‍त झाले. त्यांनी मिळून एक नवीन अतुलनिय जीव तयार केला.

त्या जीवाणूपैकी मोठे म्हणजे तुमच्या आईने पुरविलेले एक बीजांड किंवा अंडे होते. लहानसा शुक्र जीव म्हणजे तुमच्या बापाचे विर्यातील होते! शैला किटझींगरचे द एक्सपीरियन्स ऑफ चाईल्डबर्थ नुसार जगभरातील सर्व लोक ज्या विर्यातील शुक्र पेशीने निपजविले ते एकास एक चिटकून ठेवले तर ते “एक इंचापेक्षा [२.५ से.मी] किंचित अधीक जागा व्यापतील.” तुमच्या बापाचे वीर्य तुमच्या आईच्या बीजांड कोशात शिरले तेव्हा तुमचा अनुवंशिक साचा तयार होऊन तुमची गर्भधारणा झाली!

मग त्यानंतर वाढीची केवढी गुंतागुंतीची घडामोड सुरू झाली. ते “फारच गुंतागुंतीचे, शतकांपेक्षा अधिकाच्या अभ्यासानंतरही शास्त्रज्ञांना त्याचे कोडे उलगडले नाही,” असे ॲन्ड्रीआ डॉरफमॅन सायन्य डायजेस्ट मध्ये लिहितात.

वाढीच्या घडामोडीने शास्त्रज्ञाना ज्या पेचात पाडले त्याच्या उदाहरणात तोच लेखक अभिप्राय मांडतो: “वाढीचे नियंत्रण समान गुंतागुंतीचा प्रश्‍न आहे. उदाहरणार्थ डावा व उजवा खांदा पूर्णपणे वेगवेगळा असा स्वतंत्रपणे मिलीमिटर-लांब पेशींच्या अंकुराने वाढतात, तरीही त्यांची वाढ समप्रमाणात होऊन थांबते. पेशींना वृद्धींगत होण्याचे केव्हा थांबवावयाचे ते कसे कळते? . . . प्रत्येक अवयवाला वाढ नियंत्रणाची एक अंतर्गत जाण दिसते.” हे असे आहे म्हणून आम्ही आनंदी नाही का?

सर्व जिवंत जिवांच्या वाढीवर काय नियंत्रण करते? निसर्ग म्हटलेली बुद्धीहीन शक्‍ती की? अंदाज पंचे असणारा उत्क्रांतीवाद का? ही आश्‍चर्यकारक घडण, विलक्षण वैचित्र्यपूर्ण व या मोहक ग्राहवरील उत्कृष्ट सुंदर जीवांचे प्रकार फक्‍त सर्वसमर्थ निर्मात्याचे काम असू शकते हे स्पष्ट नाही का? हे असे असल्यामुळेच त्याने आम्हासाठी जे काही केले त्याबद्दल आम्हास त्याच्याविषयी सखोल कृतज्ञता वाटू नये का?

निर्मिती आश्‍चर्याचे निश्रीत पुरावे

प्रत्येक दिवशी—एवढेच काय तासाला—आम्हास निर्मितीपासून फायदा होतो. उदाहरणार्थ, आम्ही झोपतो तेव्हा काय होते? मानसिक व स्नायुच्या हालचाली आपोआप थंडावतात. हे काही आमच्या स्वतःच्या विचाराने नव्हे, कारण कित्येक वेळेस आम्ही कोणत्याही जाणीवेविना झोपी जातो. चांगली झोप केवढी आल्हाददायक असते! कांहीजण कांही आठवडे अन्‍नाविना घालवू शकतात परंतु ज्यांचे तीन दिवस झोपेविना जातात त्यांना विचार करणे, पहाणे व ऐकणे फार त्रासाचे जाते.

सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुम्हासाठी कोणीतरी गोड कॉफी आणील. त्यात असणारी साखर एके काळी दूर्मिळ व महाग होती, पण आता इतकी मुबलक की क्वचितच आम्ही त्याकडे लक्ष देतो. परंतु ती कशी बनविली जाते? फोटोसिन्थेसिसच्या प्रक्रियेने—सूर्यप्रकाशाची पाणी व कर्बद्वीप्राणील वायु सोबतीची प्रक्रिया यामुळे ती झाडात बनविली जाते. त्याचवेळी प्राणवायु, पृथ्वीवरील सर्व जीवधाऱ्‍यांच्या साठी महत्वपूर्ण, तो सोडला जातो. फोटो सिन्थेसीस ही अती गुंतागुंतीची प्रक्रिया अजून ही पूर्णपणे शास्त्रज्ञांना ज्ञात झाली नाही. “फोटोसिन्थेसीस स्वतःहून . . . कशी घडते?” द प्लॅन्टस पुस्तक विचारते. (लाईफ नेचर लायब्ररी) “हे, जीवन कसे सुरू होते हे विचारअयासारखे आहे—आम्हास ते ठाऊक नाही.”

कदाचीत तुम्ही तुमची कॉफी घेत असता काल सायंकाळचा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आठविता. तुमच्या मनाच्या चक्षुत ते चित्तवेधक दृश्‍य तुम्ही पुन्हा पाहू शकता. ते तुमच्या बुद्धीत कसे संक्रमीत, फिल्मच्या गुंडाळीप्रमाणे कसे राखले जातात व परत आठविता येतात ज्यामुळे ते तुम्हाला इतारांना वर्णन करून सांगता येऊ शकतील? आश्‍चर्यावह, असेच नव्हे का? मनुष्याला तो साध्य करीत असलेल्या गोष्टीसाठी चातुर्य कसे मिळाले? निश्‍चितपणे जनावरांपासून नाही. मानवाचा मेंदू आश्‍चर्यावह नाही का?

दिवस नुकताच सुरू झाला. तरीपण उत्पन्‍नकर्त्याला कृतज्ञता दाखविण्यासाठी आम्हापाशी किती गोष्टी सापडल्या! परंतु त्याहीपेक्षा अधिक आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा