वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ९/१ पृ. १२-१६
  • तुमचा समावेश असणारे विश्‍वव्यापी प्रकरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचा समावेश असणारे विश्‍वव्यापी प्रकरण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परिक्षा प्रकरणे
  • आमच्या काळातील भविष्यवाद
  • खऱ्‍या देवासाठी तुम्ही साक्षीदार व्हाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • केवळ एकच खरा देव आहे का?
    सावध राहा!—२००६
  • यहोवाच्या मार्गदर्शनामुळे आनंदी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ९/१ पृ. १२-१६

तुमचा समावेश असणारे विश्‍वव्यापी प्रकरण

“‘आपला वाद पुढे आणा,’ असे यहोवा म्हणतो. ‘आपले बळकट पुरावे आणा.’”—यशया ४१:२१.

१, २. (अ) चालू असलेल्या खडतर न्यायालयीन प्रकरणात कोण समाविष्ट आहे? (ब) काय पणाला लागलेले आहे?

सबंध इतिहासभर महामूर न्यायालयीन प्रकरणे सामोरी आली. त्यामध्ये साक्षीदार सामोरे आले व त्यांनी पुरावा सादर करुन या किंवा त्या बाजूकडील आपली साक्ष दिली. यापैकीची बरीच प्रकरणे व्यक्‍तीगत स्तरावरील होती तर इतर अनेक सामूहिक होती ज्याचा बहुतेकांवर परिणाम झाला. तथापि, ही सर्व प्रकरणे, सध्या ज्या विश्‍वव्यापी प्रकरणाची सुनावणी चालू आहे त्यापुढे अगदीच फिकी आहेत. ते तसे पाहता, इतिहासातील अत्यंत खडतर प्रकरण आहे. या प्रकरणाचा निकाल, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्‍तीवर, जरी त्याने स्वतःला यात समाविष्ट करण्याचे पसंद केले वा नाकारले तरी तो त्याच्यावर परिणाम करील.

२ या प्रकरणात असणारी मध्यवर्ती व्यक्‍ती ही विश्‍वामध्ये असणारी सर्वोच्च व्यक्‍ती, यहोवा देव, “आकाश निर्माण करुन विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकात प्राण घालणारा” हा आहे. (यशया ४२:५) पण येथे काय पणाला लागलेले आहे? त्याचे देवत्व—सबंध विश्‍वावर, तसेच ही पृथ्वी व तिजवरील निवासी यांजवर त्याचे आधिपत्य गाजविण्याची नीतीमत्ता ही पणाला लागली आहे. याला विश्‍वव्याप्त सार्वभौमत्वाचे प्रकरण म्हणता येईल.

३. विश्‍वव्याप्त सार्वभौमत्वाच्या वादाशी संबंधित असणारे कोणते मुलभूत प्रश्‍न आहेत?

३ या प्रकरणात समाविष्ट असणारे मुलभूत प्रश्‍न हे आहेतः ज्यांची भक्‍ती म्हणून करण्यात येते त्यापैकी कोणत्या देवाने आपण विश्‍वासपात्र आहोत असे दाखविले ज्यावर तुम्ही आपले जीवन व भवितव्य विसंबून ठेवू शकता? यापैकीचे किती खरे अस्तित्वात होते व किती मानवाने संशोधित केले? मानवजातीची सध्याच्या दयनीय परिस्थितीतून सुटका करणारा आणि खरी शांती, सुरक्षा, समृध्दता व आरोग्य देणारे योग्य प्रकारचे सरकार स्थापन करु शकणारा कोणी खरा, जिवंत व सर्वोच्च देव आहे का?

४. आपला देवावर आधीपासूनच विश्‍वास आहे त्यामुळे आपण कोणत्याही वादविषयात समाविष्ट नाही अशांच्या बाबतीत काय म्हणता येईल?

४ काही लोकांना वाटते की आपण तर आधीपासूनच देवावर विश्‍वास ठेवून आहोत तर आपल्या या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. पण ज्याची ते उपासना करतात तो खरेपणाने सत्य देव आहे, त्याची अभिवचने विश्‍वासपात्र आहेत आणि त्याचे उद्देश व नियमांचे त्यांच्या जीवनावर प्रभुत्व आहे याबद्दलचा ते पुरावा देऊ शकतात का? जर या लोकांचे उत्तर ‘होय’ असे आहे तर त्यांनी या प्रश्‍नांची सुध्दा उत्तरे द्यावीतः कोणी खरा देव आहे व त्याची अभिवचने विश्‍वासपात्र आहेत याचा पुरावा काय? देवाचा मानवजात व या पृथ्वीविषयीचा काय उद्देश आहे? देवाच्या वेळापत्रकानुसार आपण कोठे आहोत व नजीकचे भवितव्य आपणासाठी काय राखून आहे? आम्ही त्यालाच आपला सर्वोच्च मानू इच्छितो तर त्याच्या आम्हा विशिष्ठांबद्दल काय अपेक्षा आहेत?

५. देवावरील विश्‍वासाचा पुरावा सादर न करणाऱ्‍या लोकांची तुलना आम्हाला कोणासोबत करता येईल?

५ आपला देवावर विश्‍वास आहे असे मानणाऱ्‍या बहुतेक लोकांना या प्रश्‍नांची उत्तरे अधिकारयुक्‍तपणे देता येत नाहीत. अशा लोकांची तुलना आम्हाला पहिल्या शतकातील त्या लोकांसोबत करता येईल ज्यांनाही वाटत होते की त्यांचा देवावर विश्‍वास होता पण त्यांची कृत्ये त्या गोष्टीला दुजोरा देत नव्हती. यांच्याविषयी देवाचे वचन म्हणतेः “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात.” होय, “विश्‍वास क्रियांवाचून निर्जीव आहे.” (तीतास १:१६; याकोब २:२६) अशाप्रकारे देवावर विश्‍वास आहे असे म्हणणाऱ्‍या पण तो सिध्द करुन दाखविण्यासाठी कोणताही पुरावा सादर करु न शकणारे लोक गेल्या शतकातील लोकांपेक्षा भिन्‍न नाहीत जे अशा खोट्या दैवतांना मानीत जे आता पूजनीय असे राहिले नाहीत, त्यांचा ऱ्‍हास होऊन बराच काळ लोटला.

परिक्षा प्रकरणे

६, ७. (अ) प्राचीन मिसऱ्‍यांच्या धर्माचे वर्णन करा. (ब) इस्त्राएली लोक यहोवा व मिसऱ्‍यांची दैवते यातील वादविषयात कसे समाविष्ट झाले होते?

६ आमच्या समान शकाआधी १,५०० वर्षांपूर्वी प्राचीन मिसराच्या दैवतांविरुध्द जे प्रकरण आणले गेले ते याविषयीचे एक उदाहरण आहे. मिसरी लोक बहुत दैवतांची भक्‍ती करीत. त्यात बैल, मांजर, गाई, मगर, गरुड, बेडूक, कोल्हा, सिंह, सर्प, गिधाड व लांडगा यासारख्या प्राण्यांचासुध्दा समावेश होता. यापैकीच्या बहुतेक जनावरांना कोणा दैवताचे वा देवीचे अवतार मानले जाई व यांना जाणूनबुजून ठार करणाऱ्‍यांवर मृत्युदंड लादला जाई. पवित्र जनावरांचे स्मारक उभारले जाई व त्यांचा दफनविधि शाही इमानाने होत असे.

७ या सर्व दैवतांविरुध्द प्राचीन इस्त्राएली लोक ज्याची भक्‍ती करीत तो यहोवा देव होता. त्याचा प्रतिनिधी मोशे याला फारोकडे त्याच्या काळी दास्यत्वात असणाऱ्‍या यहोवाच्या लोकांना मुक्‍त करावे अशी विचारणा करण्यासाठी पाठविण्यात आले. वस्तुतः यहोवानेच त्यांच्या मुक्‍ततेचे अभिवचन दिले होते. (निर्गम ३:६-१०) परंतु फारो दरडावून म्हणालाः “हो कोण यहोवा की ज्याचे एकून मी इस्त्राएलांस जाऊ द्यावे? मी त्या यहोवाला जाणत नाही, आणि इस्त्राएलांस काही जाऊ देणार नाही.” (निर्गम ५:२) मिसऱ्‍यांची दैवते यहोवापेक्षा श्रेष्ठ आहेत असा फारोला आत्मविश्‍वास वाटत होता.

८, ९. (अ) यहोवाने मिसऱ्‍यांच्या दैवतावरील आपले प्राबल्य कसे सिध्द केले? (ब) जे काही घडले त्या दृष्टीने बघता मिसऱ्‍यांच्या दैवताबद्दल काय म्हणता येईल?

८ तर मग आपले अभिवचन पाळणारा व आपल्या लोकांचे संरक्षण करणारा कोणता देव खरा असल्याचे कोण सिध्द होणार बरे? याचे उत्तर लवकरच मिळणार होते. यहोवाने भाकित केलेः “मी . . . मिसर देशातील सर्व देवांना शासन करीन.” (निर्गम १२:१२) त्याने आपले भाकित खरे करुन दाखविले का? होय! यहोवाने मिसऱ्‍यांच्या देवांना नमविण्यासाठी दहा भयंकर पीडा आणल्या. मिसऱ्‍यांच्या कोणाही दैवताला आपल्या लोकांचे रक्षण करण्याचे जमले नाही. दहावी पीडा तर अगदीच अभूतपूर्व होती कारण त्यामध्ये सर्व मिसऱ्‍यांच्या ज्येष्ठ पुत्रांचा वध करण्यात आला. फारोचा ज्येष्ठ पुत्र देखील यात ठार झाला. हा तर मिसऱ्‍यांचे प्रमुख दैवत रा (अम्मोन रा) याला थेट तडाखा होता, कारण मिसऱ्‍याचे अधिकारी स्वतःला देव व रा चे पुत्र संबोधीत. फारोचा ज्येष्ठ पुत्राचा मृत्यु हा मिसऱ्‍यांसाठी देवाचा मृत्यु होता.

९ तथापि, यहोवाचे संरक्षण असल्यामुळे एकाही इस्त्राएलाच्या ज्येष्ठ पुत्राचा संहार घडला नाही. याशिवाय देवाने त्याच्या लोकांना अभिवचन दिले होते ती सुटकाही प्रदान केली. मिसऱ्‍यांच्या खोट्या दैवतांना शेवटचा तडाखा म्हणून फारो व त्याचे सैन्य—त्यातील प्रत्येक जण—तांबड्या समुद्रात नष्ट झाला. अशाप्रकारे यहोवा हा खरा देव असल्याचे सिध्द झाले. त्याने दिलेली अभिवचने खरी ठरली व त्याच्या लोकांचे संरक्षण झाले. (निर्गम १४:२१-३१) उलटपक्षी, मिसरी देव आपल्या भक्‍तांना संरक्षण देण्यात सामर्थ्यहीन ठरले. ते देव खरे पाहता अस्तित्वातच नव्हते, ते सर्व मानवी संशोधनाचे उत्पादन होते.

१०. यहोवाचे उपासक व अश्‍शुर यात कोणते प्रकरण उद्‌भवले

१० देवत्वाविषयीचे आणखी एक प्रकरण सुमारे आठ शतकानंतर म्हणजे हिज्किया राजाच्या काळी सामोरे आले.a त्यावेळी, आपल्या मार्गात येणाऱ्‍या सर्व राष्ट्रांचा विमोड करणाऱ्‍या क्रुध्द अश्‍शुरी जागतिक साम्राज्याकरवी यहोवाच्या लोकांना दहशत घातली गेली. आता त्याने यरुशलेमास शरणागति पत्करण्यास सांगितले होते. यरुशलेमात “यहोवाचे सिंहासन” पृथ्वीवरील त्याच्या भक्‍तीचे प्रतिनिधित्व करीत होते. (१ इतिहास २९:२३) यहुदाचा राजा हिज्किया याने मान्य केले की, अश्‍शुरने ‘सर्व देश व त्यातली जमीन ओसाड केली व त्यांचे देव त्याने अग्नीत टाकले, कारण ते देव नव्हते तर माणसांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते.’—यशया ३७:१८, १९.

११. यहोवाने आपल्या उपासकांची कशी सुटका केली व यामुळे काय प्रदर्शित झाले?

११ तेव्हा विश्‍वासू हिज्कियाने यहोवाकडे संरक्षणासाठी प्रार्थना केली. यहोवाने अभिवचन दिले की एकही अश्‍शुरी शस्त्र यरुशलेमाविरुध्द उगारण्यात येणार नाही. (यशया ३७:३३) या भविष्यवादानुरुप अगदी तसेच घडले. आणखी, “यहोवाच्या दिव्यदूताने जाऊन अश्‍शुरी गोटातल्या एक लक्ष पंचायशी हजार लोकांस मारिले.” असा हा शोचनीय पराभव मिळाल्यावर अश्‍शुरचा राजा सन्हेरीब याने माघार घेतली. त्यानंतर असे झाले की तो आपले दैवत निस्त्रोख याची भक्‍ती करीत असता त्याच्या पुत्रांनी त्याचा वध केला. (यशया ३७:३६-३८) अशाप्रकारे यहोवा परत एकदा खरा भविष्यवाद वदविणारा आणि आपल्या लोकांची सुटका करणारा देव या अर्थी विजयी ठरला. अश्‍शुरची व सभोवतालच्या राष्ट्रांची दैवते खोटी, अस्तित्वात नसलेली व त्यांच्या अनुयायांचे रक्षण करु न शकणारी असल्याचे सिध्द झाले.

१२. बेलशस्सरने यहोवाची कशी थट्टा केली?

१२ सुमारे दोन शतकांनी देवापासून दुरावलेले त्याचे लोक बाबेलोन या त्यानंतरच्या जागतिक साम्राज्याच्या दास्यात अडकले. बहुत देवदेवता व त्यांची मंदीरे याकरता हे साम्राज्य प्रसिध्द होते. पण मोठ्या घमंडी सुरात बेलशस्सर या बाबेलोनी राजाने यहोवाची थट्टा केली. एका मोठ्या मेजवानीत त्याने, यरुशलेमाच्या मंदीरातून जिंकून आणलेली पवित्र पात्रे आणण्याचा हुकुम दिला. तेव्हा “राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्याली. त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.”—दानीएल ५:१-४.

१३. बेलशस्सरास काय सांगण्यासाठी यहोवाने दानीएलास समर्थ केले?

१३ हा यहोवाचा थेट उपमर्द होता, बाबेलोनी दैवताच्या नामात त्यापुढे मोठे आव्हान प्रस्तुत झाले होते. यावेळी यहोवाने दानीएल या आपल्या संदेष्ट्याला राजा बेलशस्सर व मेजवानीत उपस्थित असणाऱ्‍या सर्वांपुढे निर्भिड रुपाने साक्ष देण्यास समर्थ केले. दानीएलाने यहोवाचे देवत्व उंचावले व तो बेलशस्सर राजाला म्हणालाः “तू आपले अंतःकरण नमविले नाहीस, तर स्वर्गीच्या प्रभुसमोर तू उद्दामपणा केला, . . . आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यांची घडलेली दैवते, ज्यांस दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही त्यांचे तू स्तवन केले; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाही.”—दानीएल ५:२२, २३.

१४. खरा देव असल्याचे यहोवाने कसे प्रदर्शित केले?

१४ यानंतर दानीएलाने यहोवाकडील संदेश घोषित केला, जो असा होताः अगदी त्याच रात्री उध्दट बेलशस्सरास व त्याच्या बाबेलोनी साम्राज्यास मेद व पारसाकरवी उलटविले जाणार! (दानीएल ५:२४-२७) हा भविष्यवाद खरा झाला का? होय. “त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला व दारयावेश मेदी हा . . . राज्यारुढ झाला.” (दानीएल ५:३०, ३१) परत एकदा यहोवाने मिसर व अश्‍शुरप्रमाणेच या खेपेलाही आपण खरा देव असल्याचे व अभिवचन पूर्ण करुन दाखविणारा देव असल्याचे शाबीत करुन दाखविले. याचा देवाच्या सेवकांसाठी लाभ घडला कारण त्यांची दास्यत्वापासून सुटका होऊन ते आपल्या स्वगृही परतले. खोट्या दैवतांच्या मागे जाणाऱ्‍यांचा नाश झाला.

आमच्या काळातील भविष्यवाद

१५. (अ) काही पवित्र शास्त्र भविष्यवादात कोणता विशेष प्रकार आढळतो? (ब) ज्यावेळी आम्ही “दैवत” असा शब्द वापरतो तेव्हा ते कशास देखील अनुलक्षून असते?

१५ मागे प्राचीन काळी ज्यांची पूर्णता झाली त्या भविष्यवादांचे लिखाण करण्यासाठी यशया संदेष्ट्याला यहोवाकडून प्रेरित करण्यात आले. तरीपण पवित्र शास्त्र भविष्यवादात आमच्या काळाशी संबंधित असणारी दीर्घ पल्ल्याची पूर्णता पहावयास मिळते. हीच गोष्ट यशयाने ज्या गोष्टी लिखित केल्या त्यापैकी कित्येकांच्या बाबतीत दिसते. त्याच्या संदेशाच्या काही भाग, यहोवा आधुनिक रा व त्यांच्या दैवतांविषयी जे आव्हान देऊन आहे त्याविषयीचे भविष्यकथन सामावून आहे. आता “दैवते” याचा अर्थ लोक व मुर्तीपूजक रा आज ज्यांची भक्‍ती करीत आहेत त्यापुरताच मर्यादित नसून या शब्दाच्या व्याखेशी सुसंगत असणाऱ्‍या सर्व वर्णनाला तो लागू आहे. एक शब्दकोष ‘दैवत’ याचा अर्थ देताना म्हणतोः “एखादी विशिष्ट गोष्ट वा काही भागावर नियंत्रण ठेवणारा; कोणी व्यक्‍ती किंवा सर्वोच्च महत्व राखणारी गोष्ट.”

१६. आज ख्रिस्ती धर्मराज्यासहित जगातील सर्व राष्ट्रातील लोक कोणकोणत्या देवांची भक्‍ती करतात?

१६ ज्यांना देव म्हणून मानले जाते त्यात हिंदूकरवी उपासना करण्यात येणारी लाखो दैवते, याचप्रमाणे बौध्द, शिन्तो व इतर धर्मीयांची देवदैवते समाविष्ट आहेत. याशिवाय यात जगातील बहुतेक लोकांच्या जीवनात महत्वपूर्ण वाटत असलेला जडवाद हे दैवत समाविष्ट आहे. तसेच राष्ट्रे सुरक्षितता व तारण या अर्थी ज्यांच्याकडे दृष्टी लावून आहेत ते लष्करी बळ व विज्ञानशास्त्र याचीही यात गणना होऊ शकते. हे खरे की देवावर आपला विश्‍वास आहे असे म्हणणारे ख्रिस्ती धर्मजगतातील कित्येक जण खरेपणाने त्याला मानीत नाहीत वा त्याची निष्ठावंतपणे सेवा करीत नाहीत. तर ते माणसावर वा ज्या गोष्टी त्यांना मुलभूत निष्ठेच्या वाटतात त्यावर ते भाव ठेवतात व त्यांची सेवा करतात.

१७. यशयाच्या संदेशाची भव्य पूर्णता कोणाकडे निर्देश करते?

१७ यशयाच्या संदेशातील भव्य पूर्णता आज अशा सर्व देवांकडे निर्देश करते. यहोवा सर्व राष्ट्रीय गटांना एकत्र येऊन ‘बोलण्यास’ सांगतो. तो आव्हान देतोः “निवाडा करण्यास आपण एकत्र बसू.” (यशया ४१:१) आज आपण या जगाचा “न्याय” होण्याच्या काळात जगत आहोत. हे जग, २ तीमथ्यी ३:१-५ व मत्तय २४:१-१४ मध्ये भाकित करण्यात आलेल्या “शेवटले दिवस” यात सध्या आहे. या काळी यहोवा राष्ट्राच्या देवांना आव्हान देतो की भविष्याचे भाकीत अचूकपणे वदवावे व त्याकरवी आपणे खरे देव आहोत असे सिध्द करावे. याशिवाय आपल्या पुरस्कर्त्यांचेसुध्दा त्यांनी संरक्षण करावे असे तो आव्हान करतो. “तुम्ही आपले बळकट पुरावे आणा,” असे तो म्हणतो, “ते आणा व पुढे काय घडणार ते आम्हास कळवा.”—यशया ४१:२१, २२.

१८. सर्वसमर्थ देव आपली ओळख कशी देतो, आणि तो आपल्या उपासकांना कोणते अभिवचन देतो?

१८ हा सर्वसमर्थ देव आपली ओळख याप्रकारे देतोः “मी यहोवा आहे, हे माझे नाम आहे ; मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही.” (यशया ४२:८) आपल्या समर्थकांना तो म्हणतोः “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरु नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्‍ती देईन, मी तुला सहाय्यही करीन.” तो त्यांना अभिवचन देतोः “पाहा, जे तुजवर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजीत होतील. तुजशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील.” “तुझ्यावर चालविण्याकरिता घडलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही. . . . यहोवाच्या सेवकांचे हेच वतन आहे.”—यशया ४१:१०, ११; ५४:१७.

१९, २०. (अ) सर्व प्रकरणांचा निकाल लावण्याची यहोवाची नियुक्‍त वेळ असते हे यशया कसे दाखवितो? (ब) या “शेवटल्या दिवसात” यहोवा कोणाला सामोरे आणतो व ते त्याचे कसे प्रतिनिधित्व करीत आहेत?

१९ कित्यके शतकांपासून, दीर्घकाळापासून यहोवाने राष्ट्रांना आपल्या स्वतःच्या मार्गाने जात राहण्याची मुभा दिली. तथापि, आता पृथ्वीवरील प्रकरणे निकालात काढण्याची त्याची नेमलेली वेळ आली आहे. या कारणास्तव तो घोषित करतोः “मी दीर्घकाळ मौन धरले; मी स्तब्ध राहिलो.” पण आता, “यहोवा वीरांप्रमाणे निघेल, रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील. तो प्रचंड शब्द करील. तो रणशब्द करील. तो आपल्या शत्रूंस आपला प्रभाव दाखवील.” (यशया ४२:१३, १४) यशया, इतर शास्त्रलेखक तसेच येशूकरवीच्या भविष्यवादाद्वारे यहोवा या “शेवटल्या दिवसात” आपणासाठी आवेशी साक्ष देणारे लोक पुढे आणण्याचे भाकीत करतो. ते जणू एखाद्या न्यायालयाच्या प्रकरणातील साक्षीदारांसमान असतील.

२० ज्या लोकांना यहोवा सामोरे आणतो ते त्याच्याबाबतीत, तो खरा देव आहे, आपल्या भक्‍तांचे रक्षण करणारा आहे आणि खोट्या देवांचे व त्यांच्या समर्थकांचे उच्चाटन करणारा आहे याविषयीचा पुरावा देतील. आज यहोवाचे लोक ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत, सर्व राष्ट्रे व द्वीपे, टेकड्यांच्या माथ्यावरुन’ त्याची स्तुती गातात. (यशया ४२:१०-१२) यामुळे यशयाच्या आणखी एका भविष्यवादाची पूर्णता होते ज्यात असे भाकित आहेः “ शेवटल्या दिवसात [आमच्या काळी] . . . यहोवाच्या मंदिराचा डोंगर [त्याची खरी भक्‍ती] पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून [इतर सर्व भक्‍तीपध्दतींपेक्षा] तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील.” हे इतरांना काय करण्याचे उत्तेजन देतात? ते सुहृदयी जणांना आर्जवितातः “चला, आपण यहोवाच्या पर्वतावर . . . चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.”—यशया २:२-४.

२१. यहोवाने राष्ट्रांच्या देवांना जे आव्हान दिले त्याकरवी कोणते प्रश्‍न सामोरे येतात?

२१ तद्वत, एका न्यायालयापुढे जणू संबोधीत असल्याप्रमाणे यहोवा म्हणतोः “सर्व राष्ट्रे एकत्र जमोत. लोक एकवटोत. . . . त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावे किंवा त्यांनी आमचे ऐकून हे म्हणावे की ‘हे खरे आहे.’” (यशया ४३:९) हे राष्ट्रांतील देवांसाठी थेट असे आव्हान आहे. यापैकी कोणाला भविष्यात काय घडेल ते सांगता येईल का? हेच त्यांना गतकाळी करता आले का? असे देव खरे, आमच्या निष्ठेस पात्र असल्याचे सिध्द झाले असा भक्कम पुरावा सादर करु शकणारे कोणी साक्षीदार त्यांना आढळतात का? राष्ट्रांचे देव त्यांचे अनुयायी यांनी आमच्या काळात कोणता अहवाल तयार केला आहे? प्राचीन मिसर, अश्‍शुर, आणि बाबेलोन यांच्या देवांपेक्षा तो काही वेगळा आहे का? दुसऱ्‍या बाजूस पाहता, जे यहोवाची साक्ष देतात अशांनी यहोवा हा खरा देव व आमच्या भक्‍तीस पात्र ठरणारा एकमेव देव असल्याचा सबळ पुरावा सादर केला आहे का? याविषयीची चर्चा पुढील लेखात दिसेल.

[तळटीपा]

a  दी वॉचटावर याच्या जानेवारी १५, १९८८ च्या अंकात हिज्कियाने यहोवावर दाखविलेल्या आत्मविश्‍वासाचे यहोवाने त्याला कसे प्रतिफळ दिले त्याची चर्चा आहे. त्या नाट्यमय घटनेतसुध्दा देवत्वाचे प्रकरण समाविष्ट आहे.

उजळणीचे प्रश्‍न

▫ विश्‍वव्यापी सार्वभौमत्वातील वाद कोणता आहे?

▫ आज या वादात राष्ट्रांचे कोणते देव समाविष्ट आहेत?

▫ तीन परीक्षा प्रकरणातील कोणता निकाल यहोवाचे खोट्या दैवतांवर प्राबल्य असल्याचे दाखवितो?

▫ यहोवा आमच्या दिवसात प्रकरणाचा निकाल लावणार हे यशया कसे दाखवितो?

▫ आजच्या सर्व धर्मांच्या समर्थकांच्या बाबतीत कोणत्या प्रश्‍नांच्या उत्तराची गरज आहे?

[१२ पानांवरील चित्रं]

खरा देव यहोवा याजपुढे मिसराचे देव सामर्थ्यहीन ठरले

[१३ पानांवरील चित्रं]

अश्‍शुरची दैवते व त्यांच्या समर्थकांना खऱ्‍या देवाकडून जबर तडाखा मिळाला

[१४ पानांवरील चित्रं]

बाबेलोनच्या खोट्या देवाच्या भक्‍तांना दानीएलाने यहोवाचा संदेश कळवला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा