खऱ्या देवासाठी तुम्ही साक्षीदार व्हाल का?
“तुम्ही माझे साक्षीदार आहा व मीच देव आहे,” असे यहोवा म्हणतो.—यशया ४३:१२.
१. खऱ्या देवाचा आम्ही का सन्मान करावा?
आपल्या मृत्युच्या काही काळाआधी येशूने “वर आकाशाकडे दृष्टी लावून” प्रार्थना केली. ज्याला तो प्रार्थना करीत होता त्याला त्याने “एकच खरा देव” असे संबोधिले. (योहान १७:१, ३) वस्तुतः विश्वाचा सार्वभौम तसेच निर्माता असणारा असा केवळ एकच जिवंत खरा देव आहे. या खऱ्या देवावर आमचे अस्तित्व अवलंबून असल्यामुळे त्याच्या हक्काचा सन्मान त्याला दिला पाहिजे. प्रकटीकरण ४:११ मध्येही तेच म्हटले आहेः “हे यहोवा, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”
२. (अ) खऱ्या देवाबद्दल काय मानणे व्यवहार्य आहे? (ब) त्याची भक्ती करणाऱ्यांसोबत तो कसे दळणवळण ठेवतो?
२ आपल्या पृथ्वीवरील सृष्टीला कुरुप करणाऱ्या वाईट परिस्थितीला खरा देव सर्वकाळासाठी अनुज्ञा देईल असे अपेक्षिणे व्यवहार्य ठरणार नाही. यासाठीच तो याबद्दल काय करणार आणि आपला न्यायदंड बजाविण्याआधी आपल्या उपासकांकडून काय केले जावे अशी त्याची अपेक्षा आहे त्यासाठी तो त्यांच्याशी दळणवळण राखून असणार हे देखील व्यवहार्यतेचे वाटते. (आमोस ३:७) अशा सत्य शोधकांसोबत तो कसे दळणवळण ठेवतो? तो याकरता स्वेच्छेने पुढे येणाऱ्या लोकांना त्याचे प्रवक्ते या अर्थी वापरतो. “तुम्ही माझे साक्षी आहा,” असे यहोवा म्हणतो. “माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही. . . . मीच यहोवा आहे, मजशिवाय कोणी त्राता नाही.” (यशया ४३:१०, ११) तर मग ज्याला हा खरा देव आपले साक्षीदार या नात्याने वापरीत आहे त्यांची कशी ओळख पटणार? हे लोक व त्यांचा संदेश इतर दैवतांच्या उपासकांपेक्षा कसा भिन्न दिसतो?
इतर देवांना आव्हान
३. यहोवा इतर देवांना कोणते आव्हान देत आहे?
३ यहोवाने इतर देवांना दिलेले आव्हान कळविण्यासाठी यशयाला प्रेरित केले. तो म्हणालाः “अशा [अचूक भविष्यवादाच्या] गोष्टी त्यातला कोण [राष्ट्रांचे व लोकांचे देव] सांगेल? किंवा त्यातील कोण [भविष्यात घडणाऱ्या गोष्टी] आधीच आम्हास सांगू शकेल? त्यांनी [देवांनी] आपले [देव या अर्थाने] खरे करण्यास साक्षी आणावे. किंवा त्यांनी [राष्ट्रातील लोकांनी] ते ऐकून म्हणावे की, ‘हे खरे आहे.’” (यशया ४३:९) अशाप्रकारे लोक ज्यांची भक्ती देव या अर्थाने करीत आहेत अशा सर्वांना यहोवा आव्हान देतो. त्यांच्या साक्षीदारांनी, त्यांचे देव विश्वासपात्र आणि भक्ती करण्याजोगे आहेत याचा पुरावा सादर करावा.
४. प्राचीन राष्ट्रातील देव निरर्थक होते हे आपल्याला कसे कळते?
४ पण त्या देवांनी व त्यांच्या भक्तांनी काय सामोरे आणले? त्यांनी आम्हाला अस्सल शांती, समृध्दता, आरोग्य व जीवनाकडे निरवले का? प्राचीन काळच्या राष्ट्राचे बहुतेक देव निरर्थक व सामर्थ्यहीन होते असे इतिहास साक्ष देतो. आज त्यांचे अस्तित्व नसल्यामुळे ते भक्तीस पात्र या अर्थाने बचावू शकले नाहीत. प्राचीन मिसर, अश्शुर, बाबेलोन, मेद-पारस, ग्रीस, रोम व इतर राष्ट्रातील देव खोटे असल्याचे सिध्द झाले. त्यांचे अस्तित्व केवळ इतिहासाच्या पानापुरतेच किंवा संग्रहालयातील पुतळ्यापर्यंतच राहिले आहे. तेथे त्यांजकडे नुसते औत्सुक्य असे पाहिले जाते.
५. आधुनिक काळच्या देवांबद्दल आपल्याला काय विचारता येईल?
५ पण मग, आधुनिक देव व त्यांचे उपासक त्या प्राचीन देवदेवतांपेक्षा काही अधिक चांगले वाटतात का? हिंदू धर्मात लाखो देवदेवता आहेत, बौध्द, कॅथोलिक, कन्फ्युशनिस्ट, यहुदी, मुस्लीम, प्रॉटेस्टंट, शिंतोइस्ट, ताओइस्ट यांना स्वतःचे देव आहेत. आफ्रिका, आशिया व इतरत्र निसर्गाची शक्ती, जनावरे व काही पदार्थ यांची देव म्हणून भक्ती केली जाते. राष्ट्रीयवाद, जडवाद आणि स्वतः एखादी व्यक्ती या गोष्टी देव बनल्या आहेत व पुष्कळ लोक मोठ्या आस्थेने याला भजतात. तर मग यापैकीची कोणती भक्ती ज्याने असे घोषित केले की, “मी यहोवा आहे, अन्य कोणी नव्हे, मजवेगळा देव नाही,” त्याचे खरेपणाने प्रतिनिधित्व करते बरे?—यशया ४५:५.
“त्यांच्या फळावरुन तुम्ही त्यांना ओळखाल”
६. खरी भक्ती व खोटी भक्ती यातील फरक आपल्याला कसा दाखविता येईल?
६ धर्माविषयी खरेपणा वा खोटेपणा याविषयीची ओळख मिळावी यासाठी येशूने एक विश्वासपात्र नियम दिला. त्याने म्हटलेः “त्यांच्या फळावरुन तुम्ही त्यांना ओळखाल. . . . प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. . . . ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.” (मत्तय ७:१६-१९) अशाप्रकारे खऱ्या देवास खोट्यापासून तसेच खऱ्या उपासकांना खोट्यापासून भिन्न दाखविण्यासाठी आम्हाला ते ज्याची निर्मिती करीत आहेत त्याची तपासणी केली पाहिजे. त्यांची फळे “चांगली” की “वाईट” दिसतात?
७. या शतकातील इतिहास आपणाला या जगाच्या धर्मांबद्दल काय सांगतो?
७ उदाहरणार्थ, जगातील कुठल्या धर्माने आपल्या भक्तांमध्ये पृथ्वीभरात खरी शांती स्थापित केली आहे बरे? खऱ्या धर्माचे सदस्य असणाऱ्या आध्यात्मिक भावांनी एकमेकांचा वध करणे निश्चितच चांगले नाही. तरीपण या २०व्या शतकाच्या युध्दात लाखो लोकांना ठार करण्यात आले आहे आणि या युध्दांना जगातील धर्मांकरवी पुष्टी मिळाली होती! याचा परिणाम, धर्म मानणाऱ्या लोकांनी इतर धर्मीयांची कत्तल केली. बहुतेकदा तर त्यांनी आपलाच धर्म मानणाऱ्यांची कत्तल घडवून आणली. कॅथोलिकांनी कॅथोलिकांची, प्रॉटेस्टंटांनी प्रॉटेस्टंट पंथीयांची, मुस्लीमांनी मुस्लीमांची कत्तल केली व इतर धर्मीयांनी याच मार्गाचे अनुकरण केले.
८. आमच्या काळात जे धार्मिक अपयश लाभले आहे त्याविषयी जाणकार काय विवेचन देतात?
८ “देवाच्या नामात केला जाणारा हिंसाचार” या संपादकीय लेखात माईक रोयको हे जणू देवाला संबोधून या जगाच्या धर्मांबद्दल म्हणतातः “ते तर आपसात शेकडोंची हत्त्या करुन आपली निष्ठा तुला दाखवीत आहेत. एका बाजुने दुसऱ्या बाजूचा पूर्णपणे निःपात केला तर तुला दिली जात असलेली आपली भक्ती यथार्थ आहे असे त्यांना वाटत असावे असे मला वाटते.” त्यांनी असेही म्हटले की, पोप स्वतः शांतीप्रिय व्यक्ती वाटत असले तरी “त्यांचे अनुयायी आपले माथे भडकले म्हणजे कित्येक गॅलन्स रक्तसिंचन करीत असल्याचे परिचित आहे.” अशाचप्रकारे अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष कार्टर यांनी “जगाला वेड लागले आहे” असे म्हटले तेव्हा त्यांनी असेही परिक्षिलेः “ज्यांनी लोकांना प्रीतीच्या कटिवेष्टनात बांधावयास हवे त्या खोल धर्मकल्पनाच सहसा वेडेपण व रक्तपाताच्या मागे असलेल्या दिसतात.”
९. ‘निरर्थक देवांच्या’ मागे आम्ही का लागू नये?
९ ही निरर्थक फळे, खऱ्या देवाच्या उपासकांकरवी निर्मित करण्याची अपेक्षा धरलेल्या फलप्राप्तीच्या विरुध्द दिसतात. (गलतीकर ५:१९-२३) या कारणास्तव, झगडणाऱ्या धर्मांना व तत्वप्रणालींना पाठबळ देणारे सर्व खोट्या भक्तीचे भागीदार आहेत व हेच त्या प्राचीन मिसर, अश्शुर, बाबेलोन व इतर जे “मुक्या व निरर्थक देवावर” आपला भाव ठेवीत होते त्यांजविषयीही खरे होते. (हबक्कुक २:१८ न्यू.व.) जसे प्राचीन खोट्या उपासनेच्या बाबतीत खऱ्या देवाचे भविष्यवादित वचन पुरे झाले त्याचप्रमाणे आजच्या काळीही तेच घडणार की, “निरर्थक देव तर अगदी नाहीसे होतील.” (यशया २:१८ न्यू.व.) यास्तव, “तुम्ही निरर्थक देवांकडे वळू नये” हा इशारा खराच विश्वासपात्र आहे.—लेवीय १९:४, न्यू.व.
यहोवासाठी कोण साक्ष देत आहेत?
१०. या जगाच्या धर्मांचे पुरस्कर्ते खऱ्या देवाचे साक्षीदार आहेत का?
१० खऱ्या देवाच्या साक्षीदाराने स्वतःपाशी त्याच्याविषयीची साक्ष वागविली पाहिजे. या जगाच्या धर्मांचे पुरस्कर्ते अशी साक्ष धारण करुन आहेत का? अशा धर्माचे लोक कितीदा तुम्हापाशी आपल्या भक्तीविषयी बोलतात? आपल्या देवाविषयी साक्ष देण्यासाठी यांनी केव्हा तुमची तुमच्या घरी भेट घेतली होती? खऱ्या देवाने खोट्यांना आपले साक्षीदार सामोरे आणावे असे जे आव्हान प्रस्तुत केले त्याकडे कानाडोळा होत आहे. या जगातील धर्मांचे लोक अशाप्रकारची साक्ष धारण करून नाहीत. खरा देव कोण किंवा त्याचे उद्देश काय याविषयी ते तुम्हाला सांगू शकत नाही. त्यांच्या धर्मपुढाऱ्यांनी त्यांना सत्य गोष्टींचे शिक्षण देण्यात अपयश दाखविले आहे. “ते आंधळ्यांचे आंधळे वाटाड्ये आहेत. आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेहि खाचेत पडतील.”—मत्तय १५:१४.
११. खऱ्या देवाच्या नावाविषयी केवळ कोण साक्ष देऊन आहेत?
११ खऱ्या देवासाठी आपला वेळ, भौतिक साधन, एवढेच काय पण स्वतःचा जीवही समर्पित करण्याची कोणाची स्वेच्छा आहे? “मी यहोवा आहे, हे माझे नामे आहे” असे जे खऱ्या देवाने घोषित केले आहे ते आज कोण लोकांना सांगतात? (यशया ४२:८) “तू केवळ तूच यहोवा या नामाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस” असे शिक्षण कोण देत आहेत? (स्तोत्रसंहिता ८३:१८) येशू आपल्या काळी खऱ्या देवाबद्दल असे म्हणू शकला की, “मी तुझे नाव प्रगट केले.” (योहान १७:६) आमच्या काळी केवळ यहोवाचे साक्षीदारच असे म्हणू शकतात. या कारणास्तव, यहोवाचे साक्षीदार हे त्यांचे नाव केवढे समर्पक वाटते!
राज्याविषयीची साक्ष
१२. खऱ्या साक्षीदारांनी इतरांना कोणते महत्वपूर्ण शिक्षण देण्यास हवे?
१२ खऱ्या देवाचे नाव कळविण्यासोबत हे साक्षीदार त्याच्या उद्देशाच्या बाबतीत खासपणे काय सांगतील? आपल्या अनुयायांना खऱ्या देवाला अशा स्वरुपाची प्रार्थना करावयाला शिकवून येशूने स्वतःचे उदाहरण दिलेः “तुझे राज्य येवो.” (मत्तय ६:१०) देवाचे स्वर्गीय राज्य हे असे सरकार आहे जे सरतेशेवटी या सबंध पृथ्वीवर आपला अंमल गाजवील. (दानीएल २:४४) हाच येशूच्या शिक्षणाचा विषय होता. (मत्तय ४:२३) मानवजातीच्या सर्व समस्यांचा तोडगा केवळ देवाचे राज्य असल्यामुळेच येशूने असा आग्रह धरलाः “तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याच्या मागे लागा.”—मत्तय ६:३३.
१३. (अ) यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याविषयीचे जे साक्षीकार्य करीत आहेत त्याबद्दलची वस्तुस्थिती काय सांगते? (ब) राज्याचे साक्षीकार्य यहोवा हाच केवळ खऱ्या भविष्यवादाचा देव आहे हे कसे दाखवून देते?
१३ देवाच्या राज्याविषयीची साक्ष सध्या कोण देत आहेत? जगातील धर्मांचा पराकाष्ठेने अभ्यास करणारे प्राध्यापक सी. एस. ब्रॅडन यांनी म्हटलेः “यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या साक्षीकार्याद्वारे अक्षरशः सबंध पृथ्वी व्यापून टाकिली आहे. . . . यहोवाच्या साक्षीदारांनी राज्याची सुवार्ता प्रसारीत करण्यामध्ये जितका आवेश व सातत्य दाखविले आहे जगातील कोठल्याही धार्मिक गटाने दाखविले नाही हे खरेपणाने म्हणता येईल.” ही गोष्ट त्यांनी सुमारे ४० वर्षांआधी लिहिली होती! आज मोठ्या भव्य प्रमाणात राज्याची साक्ष प्रसारीत होत आहे कारण आता साक्षीदारांची सख्या दसपटीपेक्षाही अधिक वाढली आहे! आता जगभरातील ५४,९०० पेक्षा अधिक मंडळ्यातून जवळजवळ पस्तीस लाख साक्षीदार राज्याविषयीची साक्ष देत आहेत व त्यांची संख्या जलद गतिने वाढत आहे. ही सुंदर फलप्राप्ती, यहोवा हा खऱ्या भविष्यवादाचा देव आहे याचा पुरावा देते. तोच असा होता ज्याने आपल्या पुत्राला, येशूला, आमच्या काळाविषयी असे भाकित करण्यास सांगितले होतेः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट हाईल.”—मत्तय २४:१४; योहान ८:२८.
देवाच्या प्रीतीचे अनुकरण करणे
१४. देवाच्या खऱ्या साक्षीदारांनी कोणत्या गुणाचे अनुकरण करावे, व त्यांनी ते केले नाही तर त्याचा काय अर्थ होतो?
१४ देवाच्या खऱ्या साक्षीदारांनी त्याच्या प्रीती ह्या सर्वश्रेष्ठ गुणाचे अनुकरण करण्यास हवे. “जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे.” (१ योहान ४:८) खरेच, “देवाची मुले व सैतानाची मुले यावरुन उघड दिसून येतातः जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. . . . आपण एकमेकांवर प्रीती करावी. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला त्याप्रमाणे आपण नसावे.”—१ योहान ३:१०-१२.
१५. यहोवाचे साक्षीदार खऱ्या प्रेमाचे प्रदर्शन करीत आहेत असे आपल्याला का म्हणता येईल?
१५ केवळ यहोवाच्या साक्षीदारांपाशीच असे प्रेम आहे. ते युध्द, राष्ट्रीयवाद व वंशाभिमानाच्या देवाच्या अधीन नाहीत. या जगातील कोणत्याहि युध्दास ते पाठबळ देत नाहीत व त्यामुळे जगात इतरत्र राहात असलेल्या आपल्या आध्यात्मिक बांधवांची हत्त्या करण्यास पाठबळ मिळेल अशा स्थितीत ते येत नाहीत. येशूने म्हटल्याप्रमाणे ते “या जगाचे नाहीत” व त्यांनी ‘तरवार खाली टाकली आहे.’—योहान १७:१४; मत्तय २६:५२.
१६. देवाच्या खऱ्या साक्षीदारांची ओळख देण्यात इतर कसे सहाय्य करीत आहेत?
१६ “हिंसाचाराचे समर्थन करण्याच्या बाबतीत अधिक” हे शीर्षक असणारा अभ्यास म्हणतोः “यहोवाच्या साक्षीदारांनी आपली ‘ख्रिस्ती तटस्थते’ची अहिंसक भूमिका टिकवून ठेवली आहे. . . . कोणत्याहि प्रकारच्या राष्ट्रीय सेवेत, मग ती लष्करी असो की मुलकी, त्यात समाविष्ट न होण्याचा पवित्रा, तसेच राष्ट्राची ओळख देणाऱ्या चिन्हांची भक्ती करण्याचे नाकारण्यामुळे कित्येक देशात त्यांना छळ, तुरुंगवास व जमावाचा हल्ला या गोष्टींना तोंड द्यावे लागले . . . तरीपण साक्षीदारांनी केव्हाही याबद्दल हिंसाचाराने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.” ओ टेम्पो या ब्राझिलच्या वृत्तपत्राने त्यांच्याविषयी म्हटलेः “आज कितीतरी धर्म आपला मतप्रसार पृथ्वीवर चालवून आहेत तरी यांच्याप्रमाणे एकाच प्रकारची प्रीती दाखविणारा एकमेव धर्म पृथ्वीच्या पाठीवर कोठेही सापडणार नाही.” ही अस्सल प्रीती, येशूने घोषित केल्याप्रमाणे देवाच्या खऱ्या साक्षीदारांची ओळख देते. तो म्हणालाः “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५.
छळ साक्षीचे कार्य वाढवितो
१७, १८. छळ राज्याच्या साक्षीकार्यास अधिक हातभार लावत असतो हे कोणत्या आधुनिक उदाहरणावरुन दिसते?
१७ छळ हा व्याप्तरुपाने राज्याची साक्ष वाढविण्यास हातभार लावू शकतो. उदाहरणार्थ भारतात केवळ ८,००० यहोवाचे साक्षीदार आहेत. तरीपण येथे यहोवाचे नाम व त्याच्या उद्देशाविषयीची प्रभावी साक्ष जाहीरपणे दिली गेली. हे त्या ११ साक्षीदार मुलांकडून घडले. यांनी पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी न्यायसभेपुढे जे सांगितले त्याप्रमाणे आपला पवित्रा घेतला की, “आम्ही मनुष्यापेक्षा देवास आपला शासक मानून त्याची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रे. कृत्ये ५:२९) त्या भारतीय मुलांना राष्ट्रगीत गात नाहीत म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तरीपण, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, बंगलोरच्या डेक्कन हेरल्ड मध्ये प्रसिध्दीस आलेला हा निर्वाळा दिलाः “राष्ट्रगीत म्हटलेच पाहिजे असे कसलेही बंधन या देशामध्ये नाही.” न्यायालयाने याची दखल घेतली की, मुलांनी “योग्य आदर दाखविला होता” व त्यांनी राष्ट्रगीत न म्हणण्यामुळे “कसलीही शिरजोरी झाली नाही.” न्यायालयाने मुलांना शाळेत परत रुजु करण्याचा हुकूम दिला.
१८ याच वृत्तपत्राने आणखी असे परिक्षिलेः “या मुलांनी राष्ट्रगीत म्हणण्याचे नाकारले ते यासाठी की यहोवाचे साक्षीदार स्वत:ला ख्रिस्ती समजतात व ते देवाच्या राज्याला पूर्णपणे समर्पित आहेत. . . . या कारणास्तव ते कोणत्याही राज्याच्या राजकीय घडामोडीत स्वतःला समाविष्ट करीत नाहीत.” याचप्रमाणे, कलकत्त्याच्या द टेलेग्राफ या वृत्तपत्राने म्हटलेः “शाळकरी मुलांच्या हालचालीने यहोवाच्या साक्षीदारांना प्रकाशझोतात आणले जे आतापर्यंत आमच्या देशात अगदीच अस्पष्ट राहिले होते.” होय, शेवट येण्याआधी ‘राज्याची ही सुवार्ता सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी प्रसारीत करण्यात येईल.’—मत्तय २४:१४.
खऱ्या देवासाठी साक्षीदारांचे एकत्रीकरण
१९. खऱ्या देवाची भक्ती करण्याची इच्छा आहे तर प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी काय करण्यास हवे?
१९ आज खरा देव यहोवा आपल्या लोकांना त्याचे सार्वभौमत्व व उद्देशांविषयी साक्ष देण्यास लावीत आहे. ते त्याचा हा संदेश अधिक प्रभावशाली रितीने घोषित करतात तेव्हा तो सर्व राष्ट्रातून प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आपल्या भक्तांच्या सहवासात आणून त्यांच्यात वाढ आणीत आहे. (यशया २:२-४) ते आपले खोटे देव त्यागत आहेत व खरा देव यहोवा याच्या भक्तीकडे वळत आहेत. हे खोट्या दैवतांची भक्ती चालणाऱ्या प्राचीन बाबेलच्या दास्यत्वात अडकलेल्या ज्यांना असे वाटत होते की त्यांनी यहोवाची उपासना करावी, त्यांची जी मुक्तता करण्यात आली त्याप्रमाणेच आहे.—यशया ४३:१४.
२०, २१. खोट्या देवांना त्यागणे आणि बघ्याची भूमिका न घेणे हे आज इतके निकडीचे का आहे?
२० तुम्ही खऱ्या देवासाठी साक्षीदार व्हाल का? खऱ्या भक्तीसाठी आपली भूमिका धारण करुन हे जग व त्याची खोटी दैवते यांच्या नैतिक अधोगतीत व रक्तदोषात सहभागी होण्याचे टाळाल का? देवाचे वचन आर्जवितेः “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या [बाबेलोनी खोट्या उपासनेच्या] पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यातून निघा.” (प्रकटीकरण १८:४) होय, विलंब होण्याआधी “निघा”, कृती करा! एका कॅथोलिक मासिकाने एका माणसाला त्याच्या धर्मपसंतीविषयी विचारले तेव्हा त्याने उत्तर देण्याकरवी त्याची जी मनोवृत्ती प्रदर्शित केली त्याच्यासारखे असू नका. तो म्हणाला होताः “मला वाटते की मी यहोवाच्या साक्षीदारांमध्ये बघ्यासारखा आहे. यहोवाचे साक्षीदार मानतात त्याप्रमाणे मी बहुत काही मानतो, पण मला त्यात अधिक शिरायचे नाही.”
२१ तरीपण लवकरच जेव्हा यहोवा या जगाच्या खोट्या देवांवर व त्यांच्या उपासकांवर जो न्यायदंड बजावील तेव्हा त्यात पृथ्वीतील प्रत्येकाला समाविष्ट व्हावेच लागेल. “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरुन, आकाशाखालून नष्ट होतील.” (यिर्मया १०:११) त्यावेळी कोणी बघा राहणार नाही. तेव्हा एकतर खऱ्या देवाचा साक्षीदार असेल किंवा नसेल. (मत्तय २४:३७-३९; २ पेत्र २:५; प्रकटीकरण ७:९-१५) तुम्ही खऱ्या देवासाठी साक्षीदार म्हणून राहणार का? तुम्ही राहिले पाहिजे, कारण “देव आम्हाला संकटातून मुक्त करणारा देव आहे, आणि मृत्युपासून सोडविणारा सार्वभौम प्रभु यहोवा आहे.”—स्तोत्रसंहिता ६८:२०.
उजळणीचे प्रश्न
▫ खरा देव खोट्या दैवतांना कोणते आव्हान देऊन आहे?
▫ कोणत्या विश्वासपात्र नियमाद्वारे आम्ही खरा धर्म व खोटा धर्म यातील फरक पाहू शकतो?
▫ या जगाची दैवते प्राचीन जगताप्रमाणेच निरर्थक आहेत हे कोणती फलप्राप्ती दाखविते?
▫ खऱ्या देवाच्या साक्षीदारांनी कोणती चांगली फलप्राप्ती निर्मिली पहिजे व कोण ती दाखवीत आहेत?
▫ खोट्या धर्मांना त्यागण्याची कृति आत्ताच करणे का निकडीचे आहे?
[१७ पानांवरील चित्रं]
प्राचीन राष्ट्रांचे निरर्थक देव आता भक्तीसाठी अस्तित्वात राहिले नाहीत
[१८ पानांवरील चित्रं]
आमच्या या शतकात या जगाच्या धर्मांनी पाठबळ दिलेल्या युध्दांमध्ये लाखो माणसांची हत्त्या झाली
[१९ पानांवरील चित्रं]
येशूने म्हटले की खरे साक्षीदार आपणामधील एकमेकांवरील प्रीतीमुळे ओळखू येतील