भूतविद्येचे जोखड झुगारुन देणे
मी१४ वर्षांची मुलगी असताना माझ्या कुटुंबावर अरिष्ट कोसळले. त्यावेळेस एका दुष्ट खुनीने माझ्या नातेवाईकांना एकेक असे दूर करण्यास सुरुवात केली. त्याचे पहिले सावज माझ्या बहिणीची मुले होती—ती सर्व नऊ. त्यानंतर तो तिच्या पतीविरुध्द आला. त्यानंतर त्याने थोडक्याच अवधीत माझ्या बहिणीतील एकीलाही ठार केले. यानंतर माझे चार भाऊ व बहीण यांची तीच गत झाली. शेवटी केवळ माझी आई व मीच बाकी राहिलो. होय, मी खरोखरी भ्याले होते!
यानंतरच्या वर्षात मी काम केले, पोट भरले व विश्रांतीसुध्दा घेतली. पण दररोज मला भीती पछाडत होती. मी विस्मित होत होतेः ‘केव्हा तो तडाखा देणार? पहिली कोणाची पाळी असणार—आई की मी?’
माझी पार्श्वभूमि
तद्नंतर काय घडले हे तुम्हास समजण्यास मदत करण्यासाठी मला माझ्या पार्श्वभूमीबद्दल सांगू द्या. १९१७ मध्ये माझा जन्म पारामाकानर बुश—निग्रो सदस्य म्हणून सुरीनाम मधील मारोनी नदीच्या बेटावर झाला. माझे पूर्वज डेन लोवनेनग्रो किंवा पळून गेलेले दास जे अरण्यात कष्टदायी पण स्वतंत्र जीवन कंठण्यास आले होते. खरेतर, ते अक्षरशः मानवाच्या दास्यत्वातून मुक्त झाले होते पण दुरात्म्यांपासून नव्हते.
आमच्या गावात प्रत्येक दिवसाच्या जीवनावर दुरात्म्यांचे व पूर्वजांच्या भक्तीचे वर्चस्व होते. मंत्राने इतरांना बांधून व सोबतीच्या मानवावर आजार व मृत्यु लादण्यास काही लोक विसी, ब्लॅक मॅजिक किंवा ते कोइनोई (उच्चार, कू नू) चेष्टा त्याची मदत घेत. ही चेष्टा कौटुंबिक सदस्यांनी गैरवर्तणूक दिलेले इसम होते असा त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. त्यांच्या मृत्युनंतर ते त्यांच्या कुटुंबावर सूड घेण्यास माघारी येतात. अक्षरशः, हे चेष्टेखोर नीच दुरात्मे आहेत, जे लोकांना त्यांची भक्ती करण्याची जबरदस्ती करतात.
एक प्रॉटेस्टंट चर्च इव्हॅन्जेलिकल ब्रदर कम्युनिटि याचा सदस्य म्हणून मी देवाबाबत काहीतरी शिकले होते. त्याची भक्ती कशी करावी याबाबत मला अंधारात ठेवले होते तरी माझ्या सभोवताली विस्तृतपणे पसरलेल्या मेघाच्छादित अरण्याने, तो चांगला पुरवठा करणारा आहे याचा भरपूर पुरावा दिला. ‘त्रासाचे कारण असणाऱ्या दुरात्म्यांची नव्हे तर मी चांगल्या देवाची भक्ती करणार’ अशी मी विचारसरणी बनवली. ते दुरात्मे त्यांच्या नाखूष सावजांना मृत्युपर्यंत त्रास देण्यात आनंद मानतात हे मला माहीत होते.
तेव्हा आमच्या कुटुंबाच्या वैऱ्याने आम्हावर कोइनोई पाठविला होता असे मला समजले त्यावेळी ते किती धक्कादायक होते त्याचा जरा विचार करा. मी १४ वर्षांची असताना त्याने त्याची मृत्युमय कामगिरीची सुरुवात केली. सव्वीस वर्षांनंतर मी व माझी आई एवढेच उरलो होतो.
पहिला सामना
आई फार कष्टाळू होती. एके दिवशी ती शेताकडे जात होती तेव्हा तिला असा तडाखा दिला की ती उठूच शकली नाही. कोइनोईने माझ्या आईस निवडले होते. तिची प्रकृति ढासळली व ती पक्षघाती बनली. तिला मदतीची—माझ्या मदतीची गरज होती. तिच्या बद्दलचे प्रेम व तिला लागलेल्या दुरात्म्याविषयीच्या भयाने मी दुभंगलेली होते. कोइनोईच्या हल्ल्यादरम्यान होणाऱ्या त्रासामुळे आई फारच तडफडत असे. मला ते बघवेना व समाधानासाठी तिचे डोके मी माझ्या मांडीवर घेतले. त्यानंतर ती शांत झाली पण माझे शरीर “हातांनी” रगडल्यासारखे मला वाटले.
मला पळून जावेसे वाटे तेव्हा आई पुन्हा ओरडे. तिच्यासाठी मी त्या खूनीचा माझ्यावरील पहिला तो चित्तथरारक हल्ला सहन केला. मी आता ४० वर्षांची होत्ये.
तीव्र हल्ला
आई मृत्यु पावली. केवळ तीन दिवसानंतर मी मित्रत्वाचा आवाज असे म्हणताना ऐकलाः “लिनटीना, लिनटीना, तू माझे ऐकत नाहीस का? मी तुला बोलावीत आहे.” ती त्या भव्य अरिष्टाची सुरुवात होती त्यामुळे मी लवकर मृत्यु यावा असे अपेक्षिले.
सुरुवातीला मला त्या दुरात्म्याने मी झोपण्यास जाई तेव्हा त्रास देण्यास सुरुवात केली. मला डुलकी लागे तोच, आवाज मला उठवीत असे व मरण आणि दफनभूमीविषयी बोले. निद्राभंगामुळे मला अशक्त वाटू लागले होते, तरीही मी माझ्या लेकरांची काळजी घेण्याचे चालूच ठेवले.
नंतर दुरात्म्याने त्याचा हल्ला चढविला. पुष्कळ वेळा मला वाटे की तो जणू माझ्याबरोबर झटापटी करतोय. मी बाजूस पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी मी काहीही करु शकत नव्हते कारण माझ्या शरीरावर मोठे वजन दाबल्यासारखे वाटत होते. मला किंचाळावेसे वाटे पण आवाज काढू शकत नव्हते. तथापि, मी त्या हल्लेखोराची भक्ती करण्याचे नाकारले.
प्रत्येक हल्ल्यानंतर प्रकृती सुधरल्यावर मी शेती करुन कासावा व उसाचा उपज काढून या समुद्रकिनाऱ्याच्या छोट्या गावात बाजारात ते विकत असे. उपजिविका मिळविणे सोपे झाले परंतु माझा दारुण छळ आणखी पुढे होता.
इलाजाचा शोध
एके दिवशी मी दुरात्म्याचा भयानक आवाज असे म्हणताना ऐकलाः “मी तुझे पोट चेंडुप्रमाणे सुजवितो.” काही वेळेनंतर माझ्या पोटात घट्ट गाठ झाली व मी जणू गरोदर असल्यासारखी दिसेपर्यंत ती वाढली. खरोखर भीतीने मी अचंबीत झाले. ‘देव, निर्माणकर्ता कोइनोईपासून माझी सुटका प्राप्तीसाठी मदत करु शकेल काय? तो त्यास पळवून लावणारा त्याच्यापेक्षा शक्तीशाली आत्मा पाठवील काय?’ असा मी विचार केला. हे पाहण्यास मी बोनोईमॅन एक चेटूक वैद्यापाशी गेले.
पहिल्या वैद्याने मला टापोअझ किंवा ताईत दिले, पण सूज तशीच होती. इलाज शोधण्याच्या निश्चयाने मी एकापासून दुसऱ्या बोनोईमॅनकडे धावले—पण निष्फळ. या भेटीदरम्यान मी शेती करुन बीअर, दारु, शॅम्पेन दारु व अंतर्वस्त्रे ही चेटुक वैद्याची गरज भागविण्यासाठी खरेदी करुन त्यांना देऊ लागले. त्यांनी पुष्कळदा मला उपदेश केलाः “कोइनोईसाठी गुडघे टेक, त्याच्याकडे धनी म्हणून धाव. त्याची भक्ती कर म्हणजे तो तुला सोडून देईल.” परंतु जो आत्मा मला मारु इच्छित आहे त्यापुढे मी कशी गुडघे टेकणार? मी ते केले नाही.
तथापि, नैराश्याने मी, मला चेटकी वैद्याने जे करायला सांगितले होते ते सर्व मी केले. त्यातील एकाने मजवर पाच महिने उपचार केला. त्याने मला वनस्पतीने अंघोळ घातली व माझ्या डोळ्यात अकरा वेगवेगळ्या वनस्पतींचा रस पिळला. मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो म्हणाला की याने ‘डोळ्यांची शुध्दी होते.’ इलाजाच्या शेवटी माझी दशा मजकडे काही पैसा नाही व धिक्कारलेली स्थिती अशी झाली. आता पूर्वी कधीही नव्हत्ये एवढी आजारी होऊन मी माझ्या घरी परतले.
“हाच तुझा शेवट”
नेदरलँडमध्ये राहणाऱ्या माझ्या एका मुलाने मला इलाजासाठी पैसे पाठविले. मी औषधोपचारासाठी शहरात डॉक्टरकडे गेले. तपासणीनंतर तो म्हणालाः “मी तुला मदत करु शकत नाही. जा, बोनोइमॅनकडे बघ.” या कारणास्तव मी इस्ट इंडियनांच्या दुरात्मिक माध्यमाचा इलाज या अर्थी शोध घेतला पण तेही निष्फळ. मी घरी परतण्यास आरंभ केला पण मुलीच्या घरी कशीबशी पोहंचले व धाडकन कोसळले आणि आजारी झाले. मी माझ्या इलाजास्तव १७ वर्षे १५,००० गायडलर्स (८,३०० यु. एस. डॉलर्स) व्यर्थपणे खर्च केले. आता मी ५७ वर्षांची होते.
पुन्हा दुरात्म्याने धमकी भरलीः “मी तुझा आता अंत करतो. हाच तुझा शेवट.”
“अरे, पण तू काही देव नाहीस, तू येशू नाहीस.” मी ओरडलेच.
“देव सुध्दा मला रोखू शकत नाही,” तो दुरात्मा म्हणाला. “तुझे दिवस आता संपलेत.”
शेवटचा लढा
काही सप्ताह निघून गेले. मीना, यहोवाच्या साक्षीदारामधील पूर्ण वेळेची सेविका, हिने माझ्या मुलीकडे माझ्या प्रकृतीविषयी विचारणा केली व म्हटलेः “तुझ्या आईला केवळ पवित्र शास्त्राद्वारेच सहाय्य केले जाऊ शकते.” त्या दोघीतले संभाषण मी दुरुन ऐकले व मी त्यांच्याकडे यायला सुरुवात केली. पण जवळ येण्यापूर्वीच मला जमिनीवर आदळण्यात आले. मीना चट्कन धावतच आली व म्हणालीः “तो दुरात्मा तुम्हाला एकटे सोडणार नाही. केवळ एकच जण तुम्हाला मदत देऊ शकेल व तो यहोवाशिवाय दुसरा कोणीही नाही.” यानंतर तिने मजसोबत प्रार्थना केली व ती मला भेट देऊ लागली. ती जितकी अधिक भेट देई तितके दुरात्म्याचे हल्ले तीव्र होत. रात्री माझे शरीर एवढे भयानक रितीने हलू लागे की घरातील कोणालीहि झोप येत नसे. मी जेवण सोडले, माझी विचारशक्ती नष्ट झाली होती.
माझी परिस्थिती एवढी गंभीर झाली की माझी मुले मला माझ्या गावी मरण्यासाठी घेऊन जाण्यास बाहेरुन आली. प्रवास करण्यास मी खूपच अशक्त झाल्यामुळे मी ते नाकारले. मरण जवळ येत आहे असे वाटून मी साक्षीदार सेविकेस निरोप घेण्यासाठी बोलाविले. मीनाने पवित्र शास्त्रातून हे स्पष्टीकरण दिले की मी मेले तरी मला पुनरुत्थानाची आशा आहे.
“पुनरुत्थान? काय म्हणतेस तू हे?”
“देव तुला नंदनवनात जीवनासाठी पुन्हा उठवील.” तिने उत्तर दिले. एक आशेचा किरण दिसला.
परंतु त्याच रात्री दुरात्म्याने मजवर ताबा घेतला. तंद्रीतच मी पाहिले की कोइनोईच्या पाठोपाठ लोकसमुदाय येत आहे. तो चेष्टा करतोः “ती समजते की तिला पुनरुत्थान मिळणार आहे.” तेव्हा लोकसमुदाय हसू लागला व हसतच राहिला. याच वेळी मी पूर्वी कधीही केली नव्हती ती गोष्ट केली. मी म्हटलेः “यहोवा! यहोवा!” एवढेच म्हणणे मला ठाऊक होते. तेव्हा मला दुरात्म्याने सोडले!
माझा मुलगा पुन्हा मला आर्जवू लागलाः “मंमी, तू शहरात मरु नकोस. आम्हाला तुला तुझ्या गावी नेऊ दे.” मी नाकारले कारण मला यहोवाबाबत अजून अधिक शिकणे होते. “मला आता मरायचे आहे,” मी म्हटले, “पण निदान मी थोडीतरी निर्माणकर्त्याची सेवा केली असती.”
बळकट दुर्गाप्रमाणे
मीना व इतर साक्षीदारांनी मला भेट देणे चालूच ठेवले. त्यांनी मला यहोवास प्रार्थना करण्यास शिकविले. इतर गोष्टीमध्ये त्यांनी यहोवा देव व सैतान यांच्यामधील वादविषय व सैतानाने इयोबावर, त्याने देवास नाकारावे म्हणून छळ कसा आणला ते सांगितले. या गोष्टी शिकण्याने दुरात्म्यांची भक्ती न करण्याच्या माझ्या अंतरिक खात्रीस दृढ केले. साक्षीदाराने एक वचन वाचले जे मला प्रिय बनलेः “यहोवाचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.”—नीतीसूत्रे १८:१०.
हळूवारपणे माझी शक्ती मला पुन्हा प्राप्त झाली. माझा मुलगा परत आला तेव्हा मी त्याला बाहेर उभे राहण्यास सांगितले. मी पेहराव चढविला व ब्लाउज स्कर्टमध्ये आत घातला केवळ हे दाखविण्यासाठी की ती सूज संपूर्णपणे गेली. नंतर मी बाहेर चालत आले.
“ही मंमा लिनटिनाच का?” माझा मुलगा एकदम बोलला.
“होय, मीच ती. याबद्दल मी माझा देव यहोवा याचे आभार मानते.”
माझी भूमिका घेणे
मला चालण्यास येऊ लागले तेव्हापासूनच मी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहास जाऊ लागले. तेथे मला मित्रांकडून फारच फार उत्तेजन मिळाले. मी तेव्हापासून सभांना जाणे थांबविले नाही. काही महिन्यानंतर मी साक्षीदारांना जाहीर प्रचारकार्यामध्ये सोबत देऊ लागले. यानंतर थोड्याच कालावधीत माझा बाप्तिस्मा झाला व माझा मुक्तिदाता यहोवा देवाची सेविका बनले. मी आता ५८ वर्षांची होते.
तथापि, अजून काहीतरी करणे बाकी होते. काही वर्षापूर्वीपासून गावातील माझ्या झोपडीत, मी माझ्या पूर्वजांना अर्पणे वाहण्यास वेदी बांधली होती. आध्यात्मिकतेत शुध्द राहण्यासाठी मला ती नष्ट करणे होते. मी यहोवाकडे मदतीकरता धावले, कारण माझा निर्णय गावकऱ्यांमध्ये गोंधळ माजवू शकला असता. मी माझ्या झोपडीत पोहंचले व दार उघडले तेवढ्यात कोणीतरी ओरडलेः “पींगोस!” (रानडुकरे!) डुकरांचा एक कळप बेट ओलांडून जाण्यासाठी पाण्यात पोहू लागला होता. तत्काळ तरुण व वृध्द यांनी या सोप्या शिकारीसाठी गाव सोडून तिकडे धाव घेतली. हे शिरशिरी भरविणारे होते. मी गुडघे टेकून या घटनेबाबत यहोवाचा धन्यवाद केला. चटकन् मी वेदी घराबाहेर खेचली, रॉकेल तिच्यावर टाकले व आग लावली. लोकसमुदाय परत येईपर्यंत वेदी भस्म झाली होती. अर्थात, त्यांना ते समजले, परंतु त्याबाबत ते काही करु शकले नाहीत. अशाप्रकारे, शांत चित्तवृत्तीने मी शहराकडे परत आले.
क्लेशापासून सुखापर्यंत
मला यानंतर पुष्कळ आशीर्वाद आले. माझ्या नेदरलँडमधील मुलाचा या गोष्टीवर विश्वास बसेना. त्याने मजविषयी ऐकले व स्वतःहून पाहण्यासाठी त्याने सुरीनामकडे जाणारे विमान पकडले. मला सुदृढतेत पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने माझ्यासाठी या शहरात एक सुंदर घर विकत घेतले, येथेच मी सध्या राहात आहे. केवढे परिवर्तन मी अनुभवले—पै नसलेली दुरात्म्यांची दासी ते चांगली काळली घेतली जाणारी यहोवाची सेविका!
माझ्या बाप्तिस्म्यानंतरच्या ११ वर्षांनी मजपाशी कृतज्ञ असण्याचे अजूनही अधिक कारण होते. मला प्राप्त झालेल्या पुष्कळ आशीर्वादाने माझी तीन मुले व जावई पवित्र शास्त्र सत्याविषयी आस्थेवाईक बनले व सरतेशेवटी त्यांनी त्यांचे जीवन यहोवास समर्पित केले. पुन्हा एकवार भूताटकीविषयीचा माझा अनुभव बांधव व बहिणी मला त्यांचे पवित्र शास्त्र विद्यार्थी ज्यांच्याजवळ भूताटकीपासून दूर राहण्यास धैर्याची कमतरता आहे त्यांच्याजवळ नेत तेव्हा सांगितला. अशा रितीने ती भयभीत वर्षे राज्य हालचालीत काहीशी उपयोगी पडली.
मला माझा देव यहोवा याला माझी कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपूरे आहेत. खात्रीने, मी माझ्या वतीने, त्याने दाखविलेला शक्तीशाली हात पाहिला. होय, यहोवा माझ्यासाठी चांगला आहे!—स्तोत्रसंहिता १८:१७-१९ पडताळा.
[७ पानांवरील चित्रं]
भूताटकीपासून मुक्त होताना लिनटिना वॅन गिनेन शिकल्या की, “यहोवाचे नाम बळकट दुर्ग आहे”
[९ पानांवरील चित्रं]
जेथे पुष्कळ लोक भूताटकीचे दास आहेत ती सुरीनामची पार्श्वभूमि