वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ३/१ पृ. २६-३१
  • राज्याचा प्रचार करीत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्याचा प्रचार करीत राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पराकाष्ठा का करावी?
  • ‘ते कसे ऐकतील?’
  • रक्‍तदोष टाळणे
  • प्रचार करत राहा!
    आमची राज्य सेवा—२०००
  • “प्रथम . . . सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ३/१ पृ. २६-३१

राज्याचा प्रचार करीत राहा

“सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

१, २. (अ) या शतकातील अत्यंत महत्वपूर्ण काम कोणते आहे व ते केवढ्या प्रमाणात केले जात आहे? (ब) या कार्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे याचा कोणता पुरावा दिसतो?

देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे ही या शतकातील अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी आहे. ते उरकले जावे अशी सर्वसमर्थ देवाची इच्छा आहे व ते त्याच्या भविष्यवादित वचनाच्या पूर्णतेस अनुसरून घडत आहे. त्याविषयीचा तुमचा प्रतिसाद तुमचे चिरकाल भवितव्य ठरवील.—१ करिंथकर ९:१६, २३.

२ या प्रचार कार्यात सहभागी होणाऱ्‍यांची संख्या वाढती असून ती आता तीस लाखांपेक्षाहि अधिक झाली आहे हे पाहणे मोठे थरारक वाटते. पूर्वी नव्हते इतक्या मोठ्या संख्येने लोक आज पूर्ण वेळेच्या उपाध्यपणात शिरत आहेत. शिवाय अधिकाधिक आस्थेवाईक लोक पवित्र शास्त्र अभ्यासाचा स्विकार करून देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याचे शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

३. सुवार्तेचा प्रचार करीत राहण्याच्या गरजेविषयी काही कदाचित काय म्हणतील?

३ तथापि, काहींना अधूनमधून “चांगले ते करण्याचा कंटाळा” वाटतो व प्रचार कार्याच्याबाबतीत ते “थकून जाऊ” लागतात. (गलतीकर ६:९; इब्रीयांस १२:३) ते म्हणतील की आमच्या क्षेत्रावर तर प्रचारकार्य आधीच व्याप्त रूपाने उरकण्यात आले आहे आणि आता तर त्याच त्याच घरी जाण्याचा मोठा त्रागा वाटतो. येथे प्रचार कार्याकडून थोडेफार किंवा काहीच परिणाम प्राप्त होत नाहीत. त्यामुळे त्यांना वाटते की कार्य हे मुलभूतरित्या उरकलेच आहे तर आता ते परत परत करण्याची जरूरी नाही. असा विचार करीत राहण्यात काय चूक असते?

पराकाष्ठा का करावी?

४. ज्या क्षेत्रात अल्प प्रतिसाद मिळत आहे तेथे सुद्धा आम्हाला कशाने प्रचार कार्य करीत राहण्याची चालना दिली पाहिजे?

४ प्रथमतः, आमचे प्रचारकार्यात विश्‍वासूपणे टिकून राहाणे लोक आमचे ऐकोत वा न ऐकोत त्यावर अवलंबून राहता कामा नये. यिर्मयाचे खूपच थोड्या लोकांनी ऐकले व पुष्कळांनी त्याचा क्रुद्धपणे विरोध केला तरी तो ४० वर्षे यरूशलेमात प्रचार करीत राहिला. त्याने ही पराकाष्ठा का राखली? कारण यहोवाने आज्ञापिलेले काम तो करीत होता व शिवाय यरूशलेमाचे जे घडणार होते त्याविषयी त्याला असणाऱ्‍या भविष्यवादित ज्ञानाने त्याला बोलत राहण्यासाठी जोर दिला. (यिर्मया १:१७–१९) त्याने म्हटले: “माझ्या हाडात कोंडलेला अग्नि जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले. मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्मया २०:७–१०) आमची सुद्धा स्थिती यासारखीच आहे. “सुवार्ता” सर्व पृथ्वीभरात प्रसारीत व्हावी हे यहोवाने येशूद्वारे आम्हाला आज्ञापिले आहे. (मत्तय २४:१४) जेव्हा लोक ऐकण्याचे नाकारतात यावेळी चांगले तेच करीत राहण्याद्वारे आम्हाला यहोवावरील आमची प्रीती व निष्ठेची खोली किती आहे ते व्यक्‍त करण्याची संधि मिळते. (१ योहान ५:३) याशिवाय मानवजातीसाठी जे नजीकचे भवितव्य राखून आहे त्याविषयी आम्ही मनन करतो तेव्हा आमच्या शेजाऱ्‍यांना ताकीद देण्यापासून आम्हाला कसे मागे राखता येईल बरे?—२ तिमथ्यी ४:२.

५. (अ) आणखी कोणत्या कारणास्तव आम्ही प्रचार कार्यात टिकून राहिले पाहिजे? (ब) प्रचार कार्य न्यायनिवाड्याचा आधार कसे ठरते?

५ याखेरीज यिर्मयाचे प्रचारकार्य खरेच न्यायाचे होते. यरूशलेम इ.स.पू. ६०७ मध्ये पडले तेव्हा ज्यांचा नाश झाला वा ज्यांना बंदिवास मिळाला त्यापैकी कोणालाही हे असे का घडले ते आम्हाला माहीत नाही हे दाव्याने सांगता येणार नाही. कारण त्या आधी सुमारे ४० वर्षे यिर्मया त्यांना, त्यांनी यहोवाविरूद्ध बंड करण्याचे चालूच ठेवले तर अगदी असाच परिणाम घडणार असा इशारा देत होता. (पडताळा यहेज्केल २:५) याचप्रमाणे आज “सर्व राष्ट्रांसाठी साक्ष व्हावी” म्हणून केल्या जाणाऱ्‍या सुवार्तेचा प्रचार न्याय निवाड्याचा होण्याचा आधार ठरतो. याविषयीची स्पष्टता प्रेषित पौलाने असे म्हणण्याद्वारे केली होती की, “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत” त्यांचा ख्रिस्त येशू सूड घेईल. (२ थेस्सलनीकाकर १:८, ९) सुवार्तेविषयी लोक जो प्रतिसाद दाखवितात त्या आधारे त्यांचा न्याय करण्यात येईल. याकारणास्तव, प्रचार कार्य शेवटपर्यंत स्पष्ट व मोठ्याने होत राहिले पाहिजे. (प्रकटीकरण १४:६, ७) हा संदेश लोकांप्रत सतत आणण्यात कशानेही अडथळा निर्माण करता कामा नये. याद्वारे यहोवाच्या सर्व समर्पित सेवकांवर मोठी गंभीर जबाबादारी पडते.

६. आमचा संदेश व्याप्त रूपाने प्रचलीत असला तरी आम्ही प्रचार करीत राहण्याची का गरज आहे?

६ हे खरे की, आम्ही आमच्या क्षेत्रात सुवार्ता अगदी व्याप्त रूपाने प्रसारीत केली असेल. तरीपण जगात इतक्या उलाढाली होत आहेत की त्यामुळे लोकांनी जरी आमचा संदेश ऐकला असला तरी त्यांना त्याचा, आम्ही प्रचार कार्य करायचे थांबवले तर विसर पडू शकतो. ज्या घटनांचे वृत्त अगदी प्रशस्तरित्या प्रसिद्ध होत आहे त्या क्रांत्या, अतिरेकी हालचाली, संप, संतापजनक कृत्ये आणि इतर घटनांचा विचार करा. याखेरीज विविध स्वरूपाच्या प्रचलीत करमणुकी व चित्त विचलीत करणाऱ्‍या गोष्टीही आहेत. एवढ्या सगळ्‌या गोष्टी लोकांचे लक्ष वेधवून घेत असल्यामुळे आम्ही आमचा संदेश त्यांच्यापुढे नित्य राखण्यासाठी प्रचार नित्य केलाच पाहिजे.

७. यशयाच्या भविष्य कथनाच्या कार्याला इस्राएलांनी जी प्रतिक्रिया व्यक्‍त केली त्याच्यासारखीच आज पुष्कळांची प्रतिक्रिया कशी दिसते, पण यामुळे आमच्या प्रचाराला का बांध लागता कामा नये?

७ ज्यावेळी बहुतेक लोक आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आम्ही यशयाला कोणत्या प्रकारच्या लोकांना प्रचार करावा लागला ते ध्यानात आणावे. यहोवाने त्याला म्हटले: “हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत, ज्यांना यहोवाचे धर्मशास्त्र ऐकावयास नको अशी ही मुले आहेत. ते द्रष्ट्यांस म्हणतात: ‘दृष्टांत पाहू नका,’ संदेष्ट्यांस म्हणतात: ‘आम्हास यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हा गोड गोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा. मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा; आमच्या समोरून इस्राएलाच्या पवित्र प्रभुस दूर करा.’” तरीपण यशया लोकांना विश्‍वासूपणे सांगत राहिला: “यहोवा न्यायी देव आहे, जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.” (यशया ३०:९–११, १८) आम्हीही हेच करावे. जितकी अधिक आम्ही पराकाष्ठा धरू तेवढ्या अधिकपणे काही अंशी का होईना आमचा संदेश रूजविला जाईल. काही लक्ष देतील पण काही लक्ष देणार नाहीत. तरीपण सर्वांना ऐकण्याची सारखीच संधि मिळत राहील.

‘ते कसे ऐकतील?’

८. लोकांनी सत्याविषयी आपली भूमिका ग्रहण केली आहे असे दिसत असले तरी कोणत्या गोष्टी त्यांचे मन बदलू शकतात?

८ कदाचित आम्हाला वाटेल की आमच्या क्षेत्रातील लोकांनी आमच्या संदेशाविषयीची निश्‍चित भूमिका घेतली असून तिचा नकार तसेच धिक्कार करण्याचाही त्यांचा मनोदय आहे. तरीपण लोकांच्या जीवनातील परिस्थिती सारखी बदलत असते हे लक्षात ठेवा. त्यांना उद्या, पुढील आठवडी वा पुढील महिन्यात अशा काही नव्या समस्यांना तोंड द्यावे लागेल की ज्यामुळे सत्याविषयी रसिकता दाखविण्याकरता ते मृदु बनतील. त्रस्त करणाऱ्‍या जगातील गोष्टी कदाचित त्यांना ऐकायला मिळतील किंवा कुटुंबात आर्थिक तणाव, आजार आणि मृत्यु घडला गेला असेल. या गोष्टींमुळे त्यांचे डोळे उघडले जाऊन या त्रासांमागील कारण जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्‍न होईल. आम्ही नित्याने प्रचार करत राहिलो तर त्यांना वळण घेता येण्याजागी योग्य दिशा मिळेल.

९. आमच्या प्रचार कार्याची तुलना, आपत्ति आलेल्या विभागात साह्‍य देणाऱ्‍या स्वयंसेवकाच्या कार्यासोबत कशी करता येईल?

९ आमच्या परिस्थितीची तुलना भूकंप झालेल्या भागात संकट ग्रस्तांना साह्‍य देणाऱ्‍या स्वयंसेवकासोबत करता येईल. काही जण अशा भागात काम करीत असतील जेथे खूपच थोड्या लोकांना शोधता आले आहे असे दिसेल पण त्यांचे इतर सहकारी दुसऱ्‍या भागात पुष्कळांना शोधू शकत होते. तथापि यामुळे पहिले सहकारी आपले काम सोडून देत नाही वा मंद बनत नाही. उलट सर्वच्या सर्व कार्यकर्ते त्यांच्या नियुक्‍त विभागात आणखी कोणास शोधता आले नाही तरी अविश्रांतपणे शोधण्याचे व मदतीचे काम चालू ठेवतात. त्यामुळे कोठेतरी त्यांना एखादी व्यक्‍ती आढळतेच. शोध कार्यात घालविलेला वेळ व आता कोणीही सापडण्याची आशा नाही हे ठरविल्यानंतर तो शोध बंद केला जातो. आता, आमच्या बाबतीत पाहता आमचा शोध बंद करण्यात आलेला नाही त्यामुळेच या जुन्या जगापासून व “मोठ्या संकटा”तून बचाव मिळवू इच्छिणारे हजारो हजार लोक असल्याचे आम्हाला दिसेल. (प्रकटीकरण ७:९, १४) जी क्षेत्रे पूरेपूर कार्य करून झाली आहेत व जेथे बहुतेक चांगला प्रतिसाद दर्शवीत नाहीत तेथेही काही चांगले परिणाम निष्पण्ण होतात. या मुळेच प्रचार चालू ठेवण्याची आणखी कारणे आहेत.

१०. रोमकरास पत्र १०:१३, १४ नुसार लोकांना सत्याच्या शोध घेण्यासाठी कोठे वळावे हे कसे कळणार?

१० “जो कोणी यहोवाचे नाम घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल” याचे लोकांना सातत्याने स्मरण देण्याची गरज आहे. तरीपण, पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात पुढे म्हणतो त्याप्रमाणे “ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील?” (रोमकर १०:१३, १४) या वचनांनी आम्हा प्रत्येकावर, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार सातत्याने करीत राहण्याची गरज बिंबविली पाहिजे.

११. प्रौढत्वाप्रत वाढणाऱ्‍या युवकांच्या बाबतीत आम्हावर कोणती जबाबादारी आहे?

११ शेवटला काळ जात असता मुलांचा जन्म होऊन त्यांची प्रौढत्वाप्रत वाढ होत आहे वा ते जबाबदाऱ्‍या स्विकारण्याच्या वयापर्यंत येत आहेत. या युवकांनी सत्याकडे साधारणपणे गंभीररित्या लक्ष दिलेले नसते. त्यांच्या पालकांनी तो संदेश नाकारल्याचे किंवा त्याविरूद्ध बोलल्याचेहि पाहिले असेल. पण आता हे युवक स्वतःबद्दल, जागतिक परिस्थितीबद्दल, भवितव्याबद्दल आणि जीवनातील आपला उद्देश काय त्याविषयी गंभीरतेने विचार करण्याच्या पातळीपर्यंत आलेले असतात. यांचे तारण व्हावयाचे आहे तर यांनीही यहोवाचा धावा करण्याची गरज आहे. पण “ज्याच्या विषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील?” (रोमकर १०:१४) बहुतेक प्रकरणात हे युवक व प्रौढत्वाकडे झुकणारे सत्याला प्रतिसाद देणारे आहेत हे दिसले आहे. यासाठी त्यांना शोधून काढून प्रचार करणे जरूरीचे आहे.

१२. आमचे प्रचार कार्य सातत्याने राखण्याद्वारे यहोवाच्या दयेचे वक्‍तव्य कसे प्रगट होते?

१२ प्रचाराचा मार्ग अद्याप उघडा आहे ही गोष्टच मुळात यहोवाच्या दयेचे वक्‍तव्य करते. प्रेषित पेत्र लिहितो: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब यहोवा आपल्या वचनाविषयी करत नाही तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्‍चाताप करावा अशी आहे. आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.” (२ पेत्र ३:९, १५) सर्व लोकांचे तारण व्हावे ही यहोवाची इच्छा आहे हे त्याने न्यायदंड बजावण्याआधी धीराने जो वेळ देऊ केला आहे त्याद्वारे तसेच त्याच्याकडे वळून तारण साध्य करण्याचे जे अपील लोकांना तो सतत करीत आहे त्याद्वारे व्यक्‍त होते. (१ तिमथ्यी २:४) सुवार्तेचा सतत प्रचार करण्याद्वारे आम्ही देवाच्या दयेला ठळकपणे सामोरे सादर करतो व त्याद्वारे त्याची स्तुती करतो.

रक्‍तदोष टाळणे

१३, १४. (अ) यहेज्केलाच्या भविष्यवादात उल्लेखित असल्याप्रमाणे आमच्या प्रचार कार्याची तुलना पहारेकऱ्‍याच्या कामाशी कशी करता येइल? (ब) “मी सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी आहे” असे पौल का म्हणू शकला व हे आज केवळ यहोवाचे साक्षीदारच का म्हणू शकतात?

१३ लोकांना देवाच्या भावी न्यायदंडाविषयीचा इशारा देण्याविषयीच्या यहोवाच्या समर्पित साक्षीदारांच्या जबाबदारीची तुलना यहेज्केलाच्या काळासोबत करता येईल. त्याला इस्राएल घराण्याचा पहारेकरी अशी नियुक्‍ति मिळाली होती. त्याने इस्राएलांना, त्यांनी आपला वाईट मार्ग सोडला नाही तर त्यांच्यावर दंड येईल असे बजावून सांगायचे होते. त्याने पहारेकरी या अर्थी हा इशारा बजावण्यात अपयश दाखविल्यास दुष्ट लोकांवर दंड येणार होताच पण त्यांचे रक्‍त बेपर्वा पहारेकऱ्‍याच्या माथी येणार होते. यहोवा आपली दंडाज्ञा बजावण्यात ही वृत्ति राखून होता: “कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे. फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा, इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?”—यहेज्केल ३३:१–११.

१४ पहारेकरी या अर्थी असणाऱ्‍या आपल्या जबाबदारीची कबुली प्रेषित पौलाने इफिस येथील वडिलांपुढे दिली: “आजच्या दिवशी मी तुम्हाला खातरीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी आहे.” हे असे तो का म्हणाला? “कारण,” तो पुढे म्हणतो, “देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हास सांगण्यास मी कसूर केली नाही.” (प्रे. कृत्ये २०:२६, २७) हीच गोष्ट सध्याचा पहारेकरी, येशू ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांचा शेष याविषयी खरी आहे. या सर्वांनी तसेच ज्यांना या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीमधून बचावण्याची आणि पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाच्या प्राप्तीची आशा आहे त्या त्यांच्या तीस लक्षापेक्षा अधिक सहकाऱ्‍यांनी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यापासून व त्याचप्रमाणे त्याच्या येणाऱ्‍या दंडाविषयीचा इशारा देण्यापासून कधीही माघार घेऊ नये.

१५. यहेज्केलाच्या ९व्या अध्यायानुसार कोणावर चिन्ह करण्यात आले व कोणी ते केले?

१५ आजचे प्रचार कार्य हे यहेज्केलाच्या ९व्या अध्यायात भविष्यवादितरित्या वर्णिण्यात आले आहे. येथे यहोवाने यरूशलेम शहराला शिक्षा करण्याचा निश्‍चय केला होता हे दिसते. त्या दंडाज्ञेच्या पूर्तिच्या आधी तागाची वस्त्रे घातलेल्या व कमरेभोवती सचिवाची दऊत असणाऱ्‍या माणसाला नगरामधून जाऊन जे लोक तेथे होत असलेल्या अमंगळ कृत्यामुळे उसासे टाकत होते त्यांच्या कपाळावर चिन्ह करण्यास सांगितले. चिन्ह करण्याचे काम यशस्वीरित्यापूर्ण केल्यावर त्या माणसाने कळवले: “तुझ्या आज्ञेप्रमाणे मी केले आहे.” (यहेज्केल ९:११) आपली नेमणूक त्याने शेवटपर्यंत पूर्ण रीतीने हाताळली.

१६. (अ) तागाचे वस्त्र घातलेला माणूस आज कोणाचे चित्र आहे? (ब) यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनाचा वादविषय आम्हाला नित्याने प्रचार करीत राहण्याची कशी प्रेरणा देतो?

१६ तागाचे वस्त्र घातलेला माणूस ख्रिस्ताच्या अनुयायातील अभिषिक्‍त शेषांचे चित्र देतो. यांना “दुसरी मेंढरे” यांचा “मोठा लोकसमुदाय” येऊन मिळत आहे. यहेज्केलाच्या काळी होता त्याप्रमाणे आज देखील यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन हा मोठा वादविषय आहे. सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईत होणाऱ्‍या सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाच्या समाप्तीबद्दल यहोवा म्हणतो की त्यावेळी “मी यहोवा . . . आहे असे राष्ट्रांना समजून येईल.” (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६; यहेज्केल ३९:७) राष्ट्रांना हे समजायचे आहे तर यहोवाच्या पृथ्वीवरील सेवकांनी त्याचे नाव व त्याचा उद्देश सर्व राष्ट्रांना साक्ष या अर्थी प्रचार करण्याचे चालू ठेवले पाहिजे हे अगदी निर्विवाद आहे.

१७, १८. (अ) आमचे नित्याने प्रचार करीत राहणे आम्हाला जागृत राहण्यास कशी मदत देते? (ब) यहोवा या प्रचार कार्याची समाप्ति घडवून आणील त्यावेळी आम्ही त्याला कसला अहवाल कळविण्याची इच्छा करावी, पण हे केवळ कसे आम्हाला जमेल?

१७ राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करीत राहण्यामुळे आम्ही स्वतःला जागे ठेवीत असतो. यहोवाचे नाव व त्याचा उद्देश याविषयीच्या महत्वाबद्दल आम्ही नेहमी जागृत असतो. आम्ही मंदावलो तर आमची राज्य आशा डळमळेल आणि मग “संसाराची चिंता, धन व विषयसुख ह्‍यात” ओढले जाऊ व आम्हाकडून ‘प फळ मिळणार नाही.’ (लूक ८:१४) “सुवार्ता” घोषित करण्यात आवेशीपणाने टिकून राहण्यामुळे आम्हाला आमचा धनी येशू ख्रिस्त याची ही आज्ञा विश्‍वासूपणे पाळता येईल: ‘सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वाना सांगतो, जागृत राहा.”—मार्क १३:१०, ३३, ३७.

१८ तर मग, आपण सर्वजण यहोवा मुभा देत राहील त्या वेळेपर्यंत ‘उसासे टाकीत असणाऱ्‍या’ लोकांना शोधीत राहू या. आम्ही अभिषिक्‍त शेष असू की “दुसरी मेंढरे,” सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आमची नेमणूक विश्‍वासूपणे पूर्ण करू या. (मत्तय २४:१४) यहोवा “मोठ्या संकटा”ची सुरुवात करून स्वतः हे कार्य संपुष्टात आणील तेव्हा आम्हातील प्रत्येकजण यहोवाला हे म्हणण्यात समर्थ होवो की, ‘तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही सर्व काही केले आहे.’

तुम्हाला आठवते का?

◻ आमच्या प्रचार कार्याच्या बाबतीत परिणाम काय सुचवितात?

◻ आम्ही प्रचार करण्याचे का चालू ठेवावे याची इतर कारणे कोणती आहेत?

◻ आमचे प्रचार कार्य यहोवाच्या दयेचे कसे वक्‍तव्य करते?

◻ सर्व माणसांच्या रक्‍तापासून आपल्याला कसे निर्दोष राहता येईल?

◻ आमचे प्रचार कार्य आम्हाला जागृत राहण्यात कशी मदत देते?

[२९ पानावरील तक्‍ता]

प्रचार कार्याचे सात वर्षात दिसलेले परिणाम

बाप्तिस्मा झालेले स्मारक विधी उपस्थिती पवित्र शास्त्राभ्यास संख्या

१९८१ १,१९,८३६ ५९,८७,८९३ १४,७५,१७७

१९८२ १,३८,५४० ६२,५२,७८७ १५,८६,२९३

१९८३ १,६१,८९६ ६७,६७,७०७ १७,९७,११२

१९८४ १,७९,४२१ ७४,१६,९७४ २०,४७,११३

१९८५ १,८९,८०० ७७,९२,१०९ २३,७९,१४६

१९८६ २,२५,८६८ ८१,६०,५९७ २७,२६,२५२

१९८७ २,३०,८४३ ८९,६५,२२१ ३०,०५,०४८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा