वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ३/१ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मिळती जुळती माहिती
  • अबशालोमने गर्वामुळे बंड केलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्याने आपला आत्मविश्‍वास वाढतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • २ शमुवेल रूपरेषा
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ३/१ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

◼ दुसरे शमुवेल १८:८ जे म्हणते की, “तरवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला” त्याचा अर्थ काय?

दावीद राजाचा रूपवान मुलगा अबशालोम याने सिंहासनाविरूद्ध बंडाळी केली आणि आपल्या बापाला यरूशलेमाकडे पळ काढावयास लावले. त्यानंतर एफ्राइमाच्या अरण्यात (जे बहुधा यार्देन नदीच्या पूर्वभागाकडे असावे) अबशालोमाचे सैन्य व यहोवाचा अभिषिक्‍त राजा दावीद याला निष्ठावंत असणाऱ्‍यांमध्ये युद्ध झाले. २ शमुवेल १८:६, ७ मधील अहवाल कळवतो की या घनघोर युद्धात दावीदाच्या लोकांनी २०,००० बंडखोरांची हत्या केली. नंतर पुढचे वचन अर्ध्या भागात म्हणते: “त्या दिवशी तरवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला.”

या वचनाबाबत काहींचे असे स्पष्टीकरण आहे की रानातील वनपशूंनी बहुधा बंडखोर सैनिकामधील अधिक लोकांचा फडशा उडविला असावा. (१ शमुवेल १७:३६; २ राजे २:२४) परंतु जसे प्रत्यक्षात “तरवारीने” युद्धात ठार झालेल्यांना फस्त केले तसे पशूंनीच अक्षरशः तो फडशा उडविला असा सर्वतोपरी अर्थ असू शकणार नाही. खरे म्हणजे “लढाई देशभर चालली.” त्यामुळे या घटनेचे असे स्पष्टीकरण देता येईल की, अबशालोमाच्या सैन्याची दाणादाण झाली तेव्हा खडकाळी रानात वाट फुटेल तेथे घाबरून पलायन केलेली माणसे खाचेत व न दिसणाऱ्‍या नाल्यात पडून खाली असलेल्या झाडाझुडुपात अडकून मेली असावी. अशाच पद्धतीने अबशालोम स्वतः अरण्यात बळी झाला हे अहवालात असणारे वर्णन मनोरंजक वाटते. त्याच्या विपुल केसामुळे तो मोठ्या झाडात अडकून असहाय्य स्थितीत राहिला व यामुळेच यवाब व त्याच्या लोकांना त्याच्यावर प्राणघातक हल्ला करता आला. अबशालोमाचे प्रेत “वनातल्या मोठ्या खड्यात टाकिले [गेले] व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली” गेली.—२ शमुवेल १८:९–१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा