“प्रथम . . . सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे”
“प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.”—मार्क १३:१०.
१. ख्रिस्ती धर्मराज्यातील सर्व धर्मांपासून यहोवाच्या साक्षीदारांना कोणती एक गोष्ट भिन्न ठरवते, व का?
आम्ही ख्रिस्ती आहोत असा दावा करणाऱ्या सर्वांमध्ये केवळ यहोवाचे साक्षीदार सुवार्तेचा प्रचार करण्याचे काम गंभीरपणे घेऊन आहेत. त्यांचा केवळ असा गट आहे ज्यातील प्रत्येक सदस्याला आपल्या वसाहतीतील शेजाऱ्यांकडे नियमितरित्या जाऊन देवाच्या उद्देशांची बोलणी करण्याचे बंधन आपल्यावर आहे असे सातत्याने वाटत असते. हे असे का? कारण प्रत्येक साक्षीदाराला ख्रिस्ती या नात्याने येशूच्या पावलास अनुसरणारा अनुयायी असले पाहिजे असे वाटते. (१ पेत्र २:२१) याचा काय अर्थ होतो?
२. येशू ख्रिस्ताविषयी पुष्कळांचा दृष्टीकोण कसा आहे पण त्याचे पृथ्वीवरील प्रमुख कार्य कोणते होते?
२ पुष्कळांच्या मनात येशू ख्रिस्त सत्कर्मे केलेला माणूस अशी विचारधारा आहे. त्याने आजाऱ्यांना बरे केले, भुकेल्यांना अन्न दिले आणि गरजवंतांना प्रेम व दयाळुपणा व्यक्त केला. पण येशूने यापेक्षाहि काही अधिक केले. तो सर्वप्रथमतः देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा आवेशी प्रचारक होता. यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही महिन्यांनी येशूने या पद्धतीने आपले जाहीर उपाध्यपण आरंभिले: “पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्तय ४:१७) मार्कचा अहवाल म्हणतो: “येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालीलात आला व म्हणाला: ‘काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.”—मार्क १:१४, १५.
३, ४. (अ) येशूने सर्व प्रकारचे आजार बरे केले तरी त्याने आपल्या उपाध्यपणात कशावर जोर दिला? (ब) येशूला का पाठविण्यात आले होते? (क) येशूने आपल्या प्रचार कार्याला कशाची उपमा दिली आणि त्याने आपल्या शिष्यांना काय करण्यास सांगितले?
३ येशूने पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांना त्याला अनुसरण्याचे आमंत्रण दिले, आणि आम्ही वाचतो: “नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला.” गालीलकरांनी त्याला अधिक काळ थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने म्हटले: “मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” त्यानंतर तो यहुदीयांच्या सभास्थानात प्रचार करीत गेला.—मत्तय ४:१८–२३; लूक ४:४३, ४४.
४ गलीलाकडे पुनः परतून, येशू “उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरला.” (लूक ८:१) त्याने आपल्या प्रचारकार्यास कापणीची उपमा दिली व म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३५–३८) जमावाने त्याला विरंगुळा मिळू दिला नाही तरीही “त्यांचे स्वागत करून तो त्यांच्या बरोबर देवाच्या राज्याविषयी बोलला, आणि ज्यांना बरे होण्याची जरूरी होती त्यांना त्याने बरे केले.”—लूक ९:११.
५. येशूने आपल्या प्रेषितांना व इतर शिष्यांना उपाध्यपणासाठी केव्हा बाहेर पाठविले व त्याने त्यांना कोणत्या सूचना दिल्या?
५ हे खरे की येशूने आजाऱ्यांना बरे केले व वेळ प्रसंगी भुकेल्यांना अन्नतृप्त केले तरीपण या सर्वापेक्षा अधिक तो लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यात कार्यमग्न होता. हेच आपल्या शिष्यांनीही करावे असे त्याला वाटत होते. त्यामुळेच त्याने प्रेषितांना तालीम देऊन त्यांना दोघे दोघे असे प्रचाराला पाठविले. त्याने त्यांना म्हटले: “जात असताना अशी घोषणा करा: ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” (मत्तय १०:७) लूक सांगतो: “त्याने त्यांस देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यांस बरे करावयास पाठविले.” (लूक ९:२) सत्तर शिष्यांनाही येशूने, “जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे” असे आज्ञापिले.—लूक १०:९.
६. स्वर्गारोहणापूर्वी येशूने आपल्या शिष्यांना त्यांच्या उपाध्यपणाविषयी कोणत्या सूचना दिल्या?
६ स्वर्गारोहणापूर्वी येशूने आपल्या शिष्यांना ते प्रचारकार्य पुढे चालू ठेवण्याची व त्याचा विस्तार करण्याची नियुक्ती दिली. त्याने त्यांना आज्ञापिले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा . . . जे काही मी तुम्हास आज्ञापिले आहे ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) त्याने आणखी त्यांना म्हटले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल व तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरूशलेमेत, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) अशाप्रकारे येशू व त्याच्या प्रेषितांनी आपले लक्ष पहिल्या प्रथम देवाच्या राज्याच्या सुवार्ता प्रचारासाठी लावले.
आमच्या काळी राज्याची घोषणा करावयाची आहे
७. “व्यवस्थीकरणाची समाप्ती” काळात करावयाच्या प्रचार कार्याविषयी येशू काय म्हणाला?
७ व्यवस्थीकरणाच्या समाप्तीला ज्या घटना घडणार त्याच्या भाकितात येशूने म्हटले की “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:३, १४) किंवा जसे मार्क १३:१० मध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे “प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.”—तसेच प्रकटीकरण १४:६, ७ सुद्धा पहा.
८. (अ) प्रेषितांच्या काळी या सुवार्तेमध्ये कशाचा समावेश होता? (ब) आज सुवार्तेच्या संदेशात कशाचा समावेश आहे?
८ “शेवटल्या दिवसात” राज्याच्या सुवार्तेमध्ये येशू पृथ्वीवर होता तेव्हाच्या सुवार्तेपेक्षा अधिक गोष्टींचा समावेश आहे. येशूने त्यावेळी राज्य जवळ आले आहे असा प्रचार केला व त्याद्वारे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधविले की तो लोकांमध्ये मशीहा आणि राजा असा होता. (२ तिमथ्यी ३:१; मत्तय ४:१७, लूक १७:२१) आरंभीच्या ख्रिश्चनांनी घोषित केलेल्या सुवार्तेमध्ये येशूचे पुनरूत्थान व स्वर्गारोहण या गोष्टी समाविष्ट होत्या व तिने लीन जणांना भावी राज्यावर विश्वास ठेवण्याचे प्रोत्साहन दिले. (प्रे. कृत्ये २:२२–२४, ३२; ३:१९–२१; १७:२, ३; २६:२३; २८:२३, ३१) आता आपण “युगाच्या समाप्तीला” पोहंचलो आहोत तेव्हा राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारात राज्य हे स्वर्गात स्थापित झाले आहे हा थरारक संदेश आहे.—प्रकटीकरण ११:१५–१८; १२:१०.
सुवार्तेचा प्रचार कोण करील?
९. (अ) राज्याचे प्रचार कार्य करण्याचे बंधन आज सर्व ख्रिश्चनांवर नाही असा विवाद काही कसा करतील? (ब) यहोवाने गतकाळी त्याच्या वचनाचा प्रचार करण्यासाठी कोणाला वापरले, तर मग, याचा आज आम्हासाठी काय अर्थ होतो?
९ या प्रचार कार्यात आज कोणी सहभागी होण्यास हवे? ही प्रत्येकाची जबाबदारी नाही असे ख्रिस्ती धर्मराज्याला स्पष्टपणे वाटते; शिवाय सुवार्तेचा प्रचार होईल असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा तो कोण करील याची स्पष्टता त्याने केली नव्हती. तर मग ज्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला व त्याचा अवलंब जे आपल्या जीवनात करीत आहेत त्यांच्या शिवाय इतर कोणाला यहोवा अशा कामासाठी वापरील बरे? नोहाच्या काळी मानवजातीच्या दुष्ट जगाला येणाऱ्या नाशाविषयीचा इशारा देण्याचे यहोवाने ठरविले तेव्हा त्याने “खऱ्या देवासमागमे चालणाऱ्या” मनुष्याला वापरले. (उत्पत्ती ६:९, १३, १४; २ पेत्र २:५) इस्राएलांना भविष्यवादित संदेश कळवावे असे त्याने इच्छिले तेव्हा त्याने ‘आपले सेवक, संदेष्टे” याना पाठविले. (यिर्मया ७:२५; आमोस ३:७, ८) इस्राएलाचे समर्पित राष्ट्र त्याचे साक्षीदार राष्ट्र होते. (निर्गम १९:५, ६; यशया ४३:१०–१२) होय, यहोवा त्याच्या समर्पित सेवकांना त्याचे साक्षीदार असे वापरतो.
१०. मत्तय २८:१९, २० मधील शब्दरचनेवरून, शिष्य बनविण्याची आज्ञा सर्व ख्रिश्चनांना लागू होणारी आहे हे कसे दिसते?
१० काही असेही म्हणतील की, मत्तय २८:१९, २० मध्ये शिष्य बनविण्याकरता देण्यात आलेली आज्ञा फक्त प्रेषितांपुरतीच होती त्यामुळे ती सर्वसाधारण ख्रिश्चनांना लागू होणारी नाही. पण येशूने काय म्हटले ते ध्यानात घ्या: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले आहे ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” येशूच्या अनुयायांना त्याने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी नव्या शिष्यांनी कशा पाळाव्या ते शिकवावयाचे होते. यापैकीची एक आज्ञा ही होती की, ‘जा व शिष्य बनवा.’ या विशिष्ट आज्ञेचे नव्या शिष्यांना पालन करण्याचे शिकविणे निश्चितच जरूरीचे होते.
११. (अ) पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीवर कोणती जबाबदारी विसावलेली होती? (ब) एखाद्याचे तारण होण्यासाठी कशाची जरूरी आहे व यात कशाचा समावेश आहे?
११ पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीला, ‘ज्याने त्यांना अंधःकारातून काढून आपल्या अद्र्भित प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण त्यांनी प्रसिद्ध करावेत असे देवाचे स्वतःचे लोक’ असे म्हटले जात होते. (१ पेत्र २:९) तिच्या सदस्यांनी देवाच्या राज्याविषयीची आवेशी साक्ष दिली. (प्रे. कृत्ये ८:४, १२) रोम येथील सर्व “पवित्र जनां”ना, अभिषिक्त ख्रिश्चनांना असे सांगण्यात आले होते की, “मुखाने तारणासाठी जाहीर घोषणा केली जाते” आणि “जो कोणी यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” (रोमकर १:७; १०:९, १०, १३) तारणासाठी ही जाहीर घोषणा, जी बाप्तिस्म्याच्या वेळी केली जाते त्यात यहोवाच्या राज्याचा जाहीर प्रचार देखील समाविष्ट आहे.
१२, १३. (अ) इब्रीकर १०:२३ मध्ये उल्लेखिलेली “आपली आशेची कबुली” यात काय समाविष्ट आहे? (ब) मंडळीच्या बाहेर जाहीर घोषणा करण्याची गरज ९६वे स्तोत्र कशी दाखवते व याला प्रकटीकरण ७:९, १० कशी पुष्टी देते?
१२ प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना लिहिले: “आपण आपल्या आशेची कबुली अढळ राखावी, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे.” (इब्रीयांस १०:२३) ही जाहीर घोषणा केवळ मंडळीतील सभांपुरती मर्यादित नाही. (स्तोत्रसंहिता ४०:९, १०) स्तोत्रसंहिता ९६:२, ३, १० मध्ये आम्हाला, मंडळीबाहेर, राष्ट्रांमध्ये प्रचार करण्याची भविष्यवादित आज्ञा याप्रकारे मिळते: “त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्र्भित कृत्ये जाहीर करा. राष्ट्रांमधील लोकांना हे विदित करा: ‘यहोवा स्वतः राजा झाला आहे.’” खरेच, मत्तय २८:१९, २० व प्रे. कृत्ये १:८ मध्ये येशूने ख्रिश्चनांना राष्ट्रांमध्ये प्रचार करायला सांगितला होता.
१३ हे जाहीर प्रचार कार्य पौलाने इब्री अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिलेल्या पुढील शब्दात उल्लेखित आहे: “त्याचे नाव जाहीरपणे पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” (इब्रीयांस १३:१५) प्रकटीकरणाच्या पुस्तकात सर्व राष्ट्रांतून गोळा करण्यात आलेला “मोठा लोकसमुदाय” उच्च स्वराने अशी घोषणा करताना पाहण्यात आला: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे.” (प्रकटीकरण ७:९, १०) अशाप्रकारे, या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीकाळात सुवार्तेचे प्रचार कार्य यहोवाच्या समर्पित साक्षीदारांद्वारे, ख्रिस्ताच्या आध्यात्मिक बंधूंचे शेष व ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ मेंढरासमान प्रवृत्तीचे त्यांचे सहकारी याजमार्फत केले जात आहे. पण हे कार्य त्यांना वस्तुतः कसे करायचे आहे?
“चार लोकात व घरोघरी”
१४. येशूने कोठे प्रचार केला व त्याद्वारे आम्ही कोणते तत्व शिकतो?
१४ येशूने लोकांना थेट प्रचार केला. उदाहरणार्थ, त्याने सभास्थानात प्रचार केल्याचे आम्ही वाचतो. ते का बरे? कारण येथे लोक शब्बाथ दिवशी जमत आणि शास्त्रवचनांचे वाचन व त्यावरील चर्चा ऐकत असत. (मत्तय ४:२३; लूक ४:१५–२१) याशिवाय येशूने रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना, समुद्र किनारी, डोंगराची उतरण, शहराबाहेरील विहीरीकाठी आणि घरी प्रचार केला.—मत्तय ५:१, २; मार्क १:२९–३४; २:१–४, १३; ३:१९; ४:१, २; लूक ५:१–३; ९:५७–६०; योहान ४:४–२६.
१५. (अ) येशूने आपल्या शिष्यांना प्रचारासाठी पाठविताना कोणत्या सूचना दिल्या? (ब) याविषयी काही पवित्र शास्त्र विवेचनकारांनी कोणते विवेचन दिले?
१५ येशूने आपल्या शिष्यांना प्रचारासाठी पाठविले तेव्हा त्याने त्यांना सुद्धा थेट लोकांकडेच पाठविले. ही गोष्ट आपल्याला, त्याने मत्तय १०:१–१५, ४०–४२ मध्ये त्यांना दिलेल्या सूचनांद्वारे कळते. ११व्या वचनात त्याने म्हटले: “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्या येथे राहा.” दी जरूशलेम बायबल हे वचन या प्रकारे देते: “कोणी विश्वासपात्र आहे का ते विचारा,” म्हणजे शिष्यांना त्या गावातील कोण चांगला मनुष्य आहे व जो संदेश स्विकारण्याच्या पात्रतेचा असू शकेल ते तेथील कोणा प्रतिष्ठित वा माहीतगाराला जणू विचारणे होते. (वे माऊथ व किंग जेम्स व्हर्शन हेही पहा.) असे हे स्पष्टीकरण ११ व्या वचनाविषयी काही पवित्र शास्त्र विवेचनकार देतात.
१६. मत्तय १०:११ मधील येशूच्या शब्दांचे कसले वस्तुनिष्ठ परीक्षण हे दाखविते की शिष्यांना योग्य जणांना कसे शोधून काढायचे होते?
१६ तथापि, आम्हाला हे लक्षात घेतले पाहिजे की ख्रिस्ती धर्मराज्यातील बहुतेक कोणी वेदांती घरोघरी जात नाही आणि पुष्कळ पवित्र शास्त्र विवेचनकार शास्त्रवचनांचा स्वतःच्या अनुभवाच्या संदर्भाधारे उलगडा करतात. येशूच्या सूचनांचा अधिक वस्तुनिष्ठ विचार सुचवितो की आपल्या शिष्यांनी घरोघरच्या किंवा जाहीर कार्याद्वारे लोकांना शोधून त्यांना राज्याचा संदेश सादर करणे होते असे येथे येशू म्हणत होता. (मत्तय १०:७) लोकांचा प्रतिसाद ते योग्य आहेत की नाहीत हे त्याविषयी सूचित करणार होता.—मत्तय १०:१२–१५.
१७. येशूचे शिष्य कोणा शिफारसीवर वा कोणाच्या नियुक्तीच्या आधारावर त्याला योग्य असे गृहीत धरून त्याची भेट घेत नव्हते हे कसे दिसते?
१७ हे येशूच्या मत्तय १०:१४ मधील शब्दाद्वारे दिसते: “जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.” ज्या लोकांनी आधी निमंत्रण दिले नव्हते तेथे शिष्यांनी प्रचार करावा असे येशू सांगत होता. हे खरे की, संदेशाचा स्विकार करणाऱ्या कोणा एका घरी ते राहण्याचे निमंत्रण स्विकारू शकत होते. (मत्तय १०:११) पण मुख्य गोष्ट प्रचाराचे कार्य ही होती. लूक ९:६ मध्ये सांगितले आहे: “मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले.” (लूक १०:८,९ सुद्धा पहा.) ज्यांनी शिष्यांचा आपल्या घरी संदेष्टे या अर्थी स्विकार केला होता, त्यांना “गार पाण्याचा एक प्याला” दिला वा वसतीस्थान दिले होते ते आपल्या प्रतिफळाला मुकणार नव्हते. त्यांना राज्याचा संदेश ऐकायला मिळणार होता.—मत्तय १०:४०–४२.
१८, १९. (अ) प्रे. कृत्ये ५:४२ च्या मते आरंभीच्या ख्रिश्चनांनी आपले प्रचार कार्य कसे केले? (ब) प्रे. कृत्ये २०:२०, २१ मधील पौलाचे शब्द कसे दाखवून देतात की तो अंतर्गतपणे केल्या जाणाऱ्या मेंढपाळकत्वाच्या कार्याबद्दल नव्हे तर विश्वास न राखणाऱ्या लोकांमध्ये केलेल्या उपाध्यपणाविषयी बोलत होता?
१८ ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यावर आम्ही प्रेषितांबद्दल असे वाचतो: “दररोज, मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रे. कृत्ये ५:४२; पहा रेफरन्स बायबल, तळटीप.) “घरोघर” ही संज्ञा कॅट’ऑय’कॉन या ग्रीक शब्दाकडून भाषांतरीत आहे. का.टा’ या शब्दात पसरविणे वा वाटप करण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. यास्तव असे म्हटले जाऊ शकते की प्रेषितांचा प्रचार घरोघर पसरविला वा वाटप केला जात होता. ते आधीच योजित असलेल्या सामाजिक भेटी घेत नव्हते. का.टा’ या शब्दप्रयोगाचा आणखी एक वापर लूक ८:१ मधील “नगरोनगरी व गावोगावी” या संज्ञेत सापडतो.
१९ हीच संज्ञा कॅट’ऑय’कोस या अनेकवचनी रूपात प्रेषित पौलाने प्रे. कृत्ये २०:२० मध्ये वापरली. येथे तो म्हणतो: “तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.” काही भाषांतरे “घरोघरी” ऐवजी “तुमच्या घरी” असा शब्दप्रयोग वापरतात. या कारणास्तव, ख्रिस्ती धर्मराज्यातील काही पवित्र शास्त्र विवेचनकार असे म्हणतात की पौल येथे समविश्वासूंच्या घरी दिल्या जाणाऱ्या मेंढपाळकत्वाच्या भेटीविषयीचा संदर्भ उल्लेखीत होता. पण पौलाचे त्यापुढील शब्द स्पष्ट करतात की त्याने विश्वास न धरणाऱ्या लोकात उपाध्यपण केले, कारण तो म्हणतो: “पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व हेल्लेणी ह्यांस मी साक्ष देत होतो.”—प्रे. कृत्ये २०:२१.
२०. (अ) आमच्या काळात यहोवाच्या साक्षीदारांनी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केवढ्या प्रमाणात केला आहे? (ब) प्रचार कार्य जारी ठेवण्याबद्दल काहींना कदाचित कसे वाटेल?
२० या कारणास्तव, आमच्या काळात “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात” गाजविली जाण्यासाठी लोकांकडे पोहचण्याच्या या पद्धतीचा वापर होण्यास हवा. (मत्तय २४:१४) आता सुमारे ६५ वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार अत्यंत आवेशाने देवाच्या प्रस्थापित राज्याची सुवार्ता जाहीरपणे व घरोघरी २१० देशात गाजवीत आहेत. याद्वारे किती भव्य साक्ष दिली जात आहे! आज बहुतेक लोक जरी ‘कानांनी मंद ऐकत असले’ आणि काहींना त्रागा वाटत असला तरीही सुवार्तेच्या संदेशाचा प्रचार होत आहे. (मत्तय १३:१५) जेथे लोक ऐकण्याचे नाकारतात वा विरोध देखील करतात त्या ठिकाणी यहोवाचे साक्षीदार प्रचार का जारी ठेवतात? या प्रश्नाचे उत्तर पुढील लेखात आढळेल.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ येशूच्या उपाध्यपणाची गुणलक्षणे कोणती असल्याची शास्त्रवचने दाखवितात?
◻ प्रेषितांना त्यांच्या उपाध्यपणासाठी कोणत्या सूचना मिळाल्या?
◻ आमच्याकाळी कोणते कार्य व्हावयाचे आहे व का?
◻ आमच्या काळी सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी यहोवा कोणाचा वापर करील?
◻ प्रचाराचे कार्य कोठे व कसे उरकायचे आहे?