वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 १/१ पृ. २४-२९
  • आशेच्या देवाचा आदर करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आशेच्या देवाचा आदर करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मानव देवाचा आदर करतात
  • तुम्ही “आशेचा देव” याचा आदर कराल का?
  • आमच्या मोलवान ठेव्यानिशी
  • दुसऱ्‍यांना आदर द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • सर्वांस मान द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • जे सन्मानास पात्र आहेत, त्यांना सन्मान द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • यहोवाचा प्रमुख प्रतिनिधि, त्याचा पुत्र याचा सन्मान करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 १/१ पृ. २४-२९

आशेच्या देवाचा आदर करणे

“यहोवा असे म्हणतो . . . ‘जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.’”—१ शमुवेल २:३०.

१. यहोवाचा आदर करण्याविषयीची इच्छा असण्यासाठी आम्हापाशी कोणते कारण आहे? (१ तिमथ्यी १:१७; प्रकटीकरण ४:११)

पवित्र शास्त्राच्या आधारावर जे भवितव्य आम्हापुढे उभे आहे ते लक्षात घेता आम्ही “आशेचा देव,” “आशा देणारा देव” याचा आदर करणे पूर्णपणे योग्य व व्यवहार्य आहे. (रोमकर १५:१३, किंग जेम्स व्हर्शन; न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन) हे असे का? आम्हा कःपदार्थ, अपूर्ण मानवांना, सबंध विश्‍वाच्या थोर निर्मात्याचा आदर करणे कसे शक्य आहे? याच्या मोबदल्यात तो आमचा बहुमान करील का?

२. देवास आदर दाखविण्याबाबत येशूला कसे वाटत होते?

२ येशूच्या बाबतीत जे घडले त्याद्वारे आम्हाला शिकता येईल. येशूला त्याच्या पित्याचा नेहमी आदर, गौरव करावेसे वाटत होते हे आम्हापैकी कोणीही अमान्य करणार नाही. (योहान ५:२३; १२:२८; १५:८) जे ‘देवाचा केवळ ओठांनी सन्मान करीत पण ज्यांचे अंतःकरण त्याच्यापासून दूर गेले होते’ अशा परूशी व शास्त्र्यांची येशूने टीका केली. त्यांनी देवाचा आदर न करणे यात योग्य भावना व कृति समाविष्ट होती हे कृपया लक्षात घ्या. (मत्तय १५:७–९) तर मग, ख्रिस्ताने देवाचा आदर केला तेव्हा त्यात त्याची आशा सुद्धा समाविष्ट होती असे आपल्याला म्हणता येईल का? अशा प्रकारच्या आदरासंबंधाने यहोवाने कसा प्रतिसाद दाखविला?

३. येशूने यहोवाची आशा धरली होती हे आम्हास कसे कळते?

३ स्तोत्रसंहिता १६:१० मधील दावीदाचे शब्द येशूने आपल्या अंतःकरणी लावले: “तू माझा जीव शिओलात राहू देणार नाही. तू आपल्या निष्ठावंत भक्‍तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.” पुनरूत्थानाची ही आशा त्याच्याठायी होती त्यामुळेच तो वधस्तंभी असताना आपल्या बाजूच्या एका चोराला हे आश्‍चर्याचा धक्का देणारे उद्‌गार बोलू शकला: “आजच मी तुला सांगतो की तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.” (लूक २३:३९–४३) तो चोर मेला त्यामुळे त्याला तीन दिवसांनी, येशूने पुनरूत्थानाविषयी राखलेली आशा साकार झालेली पाहता आली नाही. तरीपण ते पाहणाऱ्‍यांनी असा अहवाल दिला: “त्या येशूला देवाने उठविले ह्‍याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो.” (प्रे. कृत्ये २:३१, ३२) ती खरी वस्तुस्थिती होती.

४. येशू कोणत्या बहुमानास पात्र होता व तो त्याला मिळाला? (प्रकटीकरण ५:१२)

४ येशूने ज्यांची सेवा केली त्या सर्वसाधारण लोकांना हे ज्ञात होते की तो आदर वा सन्मानास पात्र आहे. (लूक ४:१५; १९:३६–३८; २ पेत्र १:१७, १८) पण तो तर शेवटी एका गुन्हेगारासारखा वारला. यामुळे सगळ्या गोष्टी उलटल्या का? नाही. कारण येशूने ज्याची आशा धरली होती त्या देवाची मर्जी त्याने प्राप्त केली होती. त्यामुळे यहोवाने त्याला परत जीवन दिले. “आशेचा देव” ह्‍याने आपल्या पुत्राला जिवंत केले व त्यास आत्मिक क्षेत्रातील अमरत्व लेवविले ही गोष्ट हे शाबीत करते की पिता आपल्या पुत्राचा बहुमान करीत होता. पौल म्हणतो: “देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून . . . येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी ह्‍यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो.”—इब्रीयांस २:७, ९; फिलिप्पैकर २:९–११.

५. येशूचा कोणत्या खास अर्थी बहुमान झाला व त्यामुळे देवाला आणखी कसा आदर मिळाला?

५ यहोवाचा आदर केला त्या येशूनेच आपल्याला कोणत्या खास अर्थी पित्याकडून बहुमान मिळाला ते सांगितले. आपल्या विश्‍वासू प्रेषितांना दिलेल्या दर्शनात त्याने म्हटले: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या . . . पाहा! युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.” (मत्तय २८:१८–२०) अशाप्रकारे अद्वितीय अधिकार देऊन पित्याने पुत्राचा आणखी बहुमान केला. या अधिकाराचा वापर येशू, त्याने ज्याचा आदर केला होता त्याचा आदर करणारी कृत्ये जे लोक करतील त्यांच्या खातर करणार होता. तर मग याचा अर्थ, आम्हा अपूर्ण मानवांना सुद्धा काही मार्गाने पित्याचा आदर करता येऊ शकेल व त्याच्या मोबदल्यात त्याच्याकडून बहुमान मिळू शकेल असा होतो का?

मानव देवाचा आदर करतात

६. सन्मानित होण्याची अपेक्षा धरणे रास्ता आहे का, पण यात कोणता धोका असतो? (लूक १४:१०)

६ देवाचा आदर करण्याचे बहुतेक लोकांच्या विचारातच येत नाही कारण आपल्याला मानसन्मान कसा मिळू शकेल यात ते अधिक आस्थेवाईक दिसतात. इतरांनी आमचा आदर करावा हे सर्वसाधारण आहे असे काही म्हणतील सुद्धा. त्यात काही अंशी सत्य असू शकेल कारण चांगली ख्याति असावी व त्याद्वारे थोडा फार तरी सन्मान मिळावा ही साधारण इच्छा असते. (१ तिमथ्यी ३:२, १३; ५:१७; प्रे. कृत्ये २८:१०) तरीपण मानवाकडून सन्मान मिळण्याची इच्छा सहजगत्या अतिशयोक्‍तीची बनू शकते. ही गोष्ट, काही जण कोणाही किंमतीवर किर्ती प्राप्त करण्याच्या मागे असतात किंवा जे तोंड लपविण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात त्याद्वारे दिसून येते.

७. मानवाकरवी सन्मानित होणे मर्यादित स्वरूपाचे का असते?

७ तुम्ही थोडासा विचार केला तर मानवाकडून लाभलेला सर्वथोर सन्मान सुद्धा क्षणभंगुर असतो हे दिसेल, कारण सर्वजण लवकरच मरतात. ओह, थोड्याफार शौर्यवान वा नायक लोकांचे स्मरण काही काळासाठी सन्मानित होते पण बहुतेक सर्व मृतांचे विस्मरण होत असते. आपले पणजोबा कोण होते ते तसेच शंभर वर्षाआधी आपल्या राष्ट्राचे नेते कोण होते ते किती लोकांना आठवते बरे? खरे म्हणजे कोणी जिवंत होता व कोणी मेला त्यामुळे काही बदल होत नाही. तो काळाच्या तराजूत धुळीचा कण किंवा जीवनाच्या कालप्रवाहातील एक थेंब असतो. मरणानंतर जरी त्याचा काही कालावधीकरता सन्मान होत असतो तरी त्याची त्याला कल्पनाच नसते. (इयोब १४:२१; २ इतिहास ३२:३३; उपदेशक ९:५; स्तोत्रसंहिता ४९:१२, २०) मात्र ज्या एका गोष्टीमुळे फरक घडू शकतो ती आहे देव देणारी आशा, देवाचा आदर करणे व त्याच्याकरवी बहुमान प्राप्त करणे. प्राचीन इस्राएलात समकालीन राहणाऱ्‍या दोघांच्या जीवनात या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला पाहता येईल.

८. आदर देण्याच्याबाबतीत एली कोठे मागे पडला?

८ एली हा त्यापैकीचा एक होता. त्याने सुमारे ४० वर्षांसाठी देवाचा प्रमुख याजक या अद्वितीय स्थानावर देवाची सेवा केली व शिवाय त्याला इस्राएलांचा न्याय करण्याचा हक्कसुद्धा मिळाला. (१ शमुवेल १:३, ९; ४:१८) तरीपण काही काळाने त्याने आपले दोन पुत्र हफनी व फिनहास यांच्याबाबतीत हेळसांडपणा प्रदर्शित केला. ते याजकपदावर होते तरी त्यांनी यज्ञार्पणे चोरून आणि अनैतिक लिंगाचारात समाविष्ट होऊन ते पद भ्रष्टाविले होते. त्यांच्या बापाने त्यांची कानउघाडणी करण्यात फार काही केले नाही. देवाने म्हटले की एली ‘आपल्या पुत्रांचा मजपेक्षा अधिक आदर करीत’ होता. यहोवाने अहरोनाचे याजकत्व चालू राहण्याचे अभिवचन दिलेच होते पण आता या प्रमुख याजकाच्या पदावरून तो एलीच्या घराण्यास दूर करणार होता. ते का? देवाने विवेचीत केले: “जे माझा आदर करितात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.”—१ शमुवेल २:१२–१७, २९–३६; ३:१२–१४.

९. शमुवेलाला यहोवाचा आदर करण्याची कशी संधि दिली गेली?

९ पण याच्या दुसऱ्‍या बाजूस शमुवेल होता. तुम्हाला माहीत असेलच की त्याच्या आईवडिलांनी तो लहान होता त्यावेळी त्याला शिलो येथील सभास्थानात सेवा करण्यास आणले होते. एके रात्री यहोवा या बाळाशी बोलला. या विषयीचा अहवाल तुम्हाला १ शमुवेल ३:१–१४ मध्ये वाचण्यास आवडेल आणि हा मुलगा मोठ्या गर्जनेच्या आवाजाने नव्हे तर मंद आवाजामुळे कसा जागा होतो व तो आवाज वृद्ध एलीचाच आहे हे त्याला कसे वाटते याचे चित्र तुमच्या डोळ्यापुढे उभे राहील. त्यानंतर याचा विचार करा की या तरूण शमुवेलाला देवाने एलीच्या घराण्यास शासन करण्याचा जो निश्‍चय केला आहे तो त्या वृद्ध प्रमुख याजकाकडे बोलून दाखविण्यामध्ये किती भीती वाटली असावी. तरीपण शमुवेलाने ते म्हणणे सांगितलेच. हे आज्ञापालन करून शमुवेलाने देवाचा आदर केला.—१ शमुवेल ३:१८, १९.

१०. आदर प्रदर्शित केल्यामुळे देवाने शमुवेलास कसे बहुमानित केले?

१० शमुवेलाने कित्येक वर्षे संदेष्टा या अर्थी यहोवाचा आदर केला व यहोवाने सुद्धा त्याला बहुमानित केले. १ शमुवेल ७:७–१३ मध्ये याविषयीची दखल घ्या. पलिष्ट्यांचा पराजय करण्याविषयी मदत मिळावी म्हणून शमुवेलाने केलेल्या प्रार्थनेस यहोवाने त्वरित उत्तर दिले. अशी इश्‍वरी मान्यता प्राप्त होत आहे हे जाणून बहुमानित झाल्यासारखे वाटणार नाही का? जेव्हा शमुवेलाच्या मुलांनी त्याचे मार्गदर्शन मान्य केले नाही त्यावेळी देवाने त्याचा एलीप्रमाणे त्याग केला नाही. याचे कारण हे की देवाचा आदर करण्यात शमुवेलाला करता आले तेवढे सर्वकाही त्याने केले. शमुवेलाने लोकांची मानवी राजाविषयीची विनंति अमान्य केली याद्वारे त्याने देवाचा आदर करण्याविषयीचे आणखी एक प्रमाण दाखविले. (१ शमुवेल ८:६, ७) देवाने शमुवेलाचा शौल व दावीदाचा अभिषेक करण्यासाठी वापर केला. शमुवेलाचा मृत्यु झाला त्यावेळी इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी विलाप करून सन्मान दाखविला. तथापि, अधिक महत्वाचे ते हे की देवाने शमुवेलाचा पवित्र शास्त्रात विश्‍वासू लोकांच्या यादीत उल्लेख करून त्याला सन्मानित केले. या विश्‍वासू लोकांना पुनरूत्थान मिळण्याचा व देवाने त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या उत्तम गोष्टी प्राप्त होण्याचा आशीर्वाद मिळेल. (स्तोत्रसंहिता ९९:६; यिर्मया १५:१; इब्रीयांस ११:६, १६, ३२, ३९, ४०) याद्वारे हे प्रदर्शित होत नाही का की “आशेचा देव” याचा आदर करणे हे मोठे मोल राखून आहे?

तुम्ही “आशेचा देव” याचा आदर कराल का?

११, १२. यहोवाचा आदर करण्याबद्दल आम्ही कशाचा विचार केला पाहिजे आणि हे करण्याचा एक मार्ग कोणता आहे?

११ पवित्र शास्त्रातील केवळ दोन उदाहरणे, येशू व शमुवेल यांची, हे दाखविण्यास पुरेशी आहेत की मानवाला “आशेचा देव” याचा आदर करण्याच्या गोष्टीस आपल्या जीवनात सर्वोच्च प्राधान्य देता येईल. शिवाय ती दोन प्रकरणे आणखी हे स्पष्ट करतात की तसे करण्यामुळे आम्हाला देवाकडून सन्मानित होता येते व तशी अपेक्षा करता येते. तरीपण, आपण देवास संतुष्ट करीत आहोत, त्याच्या कडून आपणाला सन्मानित होता येईल आणि पवित्रशास्त्र आधारीत आपली आशा प्राप्त करता येईल याची व्यवहार्य खात्री बाळगून ते तुम्हाला कसे करता येईल?

१२ देव असंतुष्ट होणार नाही याविषयी त्याची अस्सल व आदरयुक्‍त भीती बाळगणे हा तो एक मार्ग आहे. (मलाखी १:६) आम्हाला या विधानाशी अगदी सहजगत्या सहमत होता येईल. तरीपण एलीचे पुत्र आठवा. तुम्ही त्यांना विचारले असते की, देवाचे आदरयुक्‍त भय बाळगून तुम्ही त्याचा सन्मान करण्याची इच्छा बाळगता का, तेव्हा त्यांनीही ‘होय’ म्हटले असते. पण देवाचे भय बाळगून त्याचा सन्मान करण्याची इच्छा आमच्या दैनंदिनीच्या खरेपणात व कृतीत उतरविणे येथे खरी समस्या येते.

१३. देवाचे भय बाळगून त्याचा आदर करण्याची इच्छा आम्हास कशी मदत करू शकते ते विवेचीत करा.

१३ आम्हापुढे काही चोरण्याचा किंवा अनैतिक कामात गढण्याचा मोह उभा आहे आणि आमची ही कृति लोकांच्या लक्षात सुद्धा येणार नाही तर अशा वेळी देवाचा आदर करण्याची आमची इच्छा आमच्या कृतीवर प्रभाव पाडू शकेल का? होय, त्याकरता आपल्याला ही भावना स्वतःमध्ये वाढवावी लागेल की, ‘माझे चुकीचे कर्म गुप्त राहिले तरी या पापासाठी मी स्वतः स्वतःला देऊ करणे हे ज्याचे नाम मी धारण करून आहे त्या “आशेचा देव” याचा अपमान करण्यासारखे आहे.’ शिवाय ही वस्तुस्थिति आहे की चुकीची गोष्ट कायमची लपून राहणार नाही. हेच एलीच्या पुत्रांनी केलेल्या कर्माबद्दल देखील घडले. “देवाचा नीतीमान न्यायदंड” याविषयी पौलाने जे लिहिले त्यात याची स्पष्टता आढळते. तो म्हणतो: “तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल; जे कोणी धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीपणा ही मिळविण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप, . . . येतील.”—रोमकर २:५–८.

१४. देवाचा आदर करण्याचा आणखी एक मार्ग कोणता, व आम्ही स्वतःला काय विचारावे?

१४ दुसऱ्‍या बाजूस पौल “सत्कर्मे” यांचा उल्लेख करतो. ही देवाचा आदर करतात त्यामुळे त्याजकडिल “गौरव व सन्मान” मिळतो. आज या सत्कर्मातील मुलभूत काम येशूने मत्तय २८:१९, २० मध्ये जे सांगितले तेच आहे की, ‘सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांचा बाप्तिस्मा करा आणि जे करण्याची आज्ञा [येशूने] दिली ते सर्व त्यांना पाळावयास शिकवावे.’ देवाचा आदर करणाऱ्‍या या प्रचाराच्या व शिक्षणाच्या कामात जगभरात आज लाखो यहोवाचे साक्षीदार क्रियाशील आहेत. यापैकीचे काही नेटाचा प्रयत्न करून पायनियर या अर्थी पूर्णवेळेचे उपाध्याय एकतर कायम स्वरूपाचे बनतात वा आपला प्रापंचिक व्यवसाय वा शाळा यांच्या सुट्टीच्या दरम्यान करतात. ही गोष्ट लक्षात ठेवून आपण या कार्याच्या बाबतीत कोठे उभे आहोत हे आम्हापैकी प्रत्येक जण पडताळून पाहू शकतो. तुम्हाला असे विचारता येईल: ‘प्रचार कार्यात पूर्ण तऱ्‍हेचा सहभाग घेऊन मी “आशेचा देव” याचा आदर करतो का?’

१५. जाहीर उपाध्यपणाद्वारे यहोवाचा आदर करण्याच्या बाबतीत काही ख्रिश्‍चनांचे काय झाले?

१५ कित्येक वर्षे क्रियाशील असणारे काही ख्रिश्‍चन हळुवारपणे मंदावले. या शिष्य बनविण्याच्या महत्वपूर्ण कामात थोडाफार व अधुनमधून सहभाग घेण्याच्या चाकोरीत ते स्थिर झाले आहेत. ज्यांना शारीरिक अपंगत्व आहे व वार्धक्य आहे त्यांच्याविषयी आम्ही हे बोलत नाही. यांच्या व्यतिरिक्‍त विविध वयोमानाच्या गटातील साक्षीदारात मंदपणा दिसत आहे. पौलाने ख्रिश्‍चनांना ‘थकण्या’ विषयी जो इशारा दिला त्यावेळी तो विशिष्ट वयोगटाचा उल्लेख करत नव्हता. एखाद्या व्यक्‍तिचे वय कितीही असले तरी उपाध्यपणात नियमाने सहभागी होण्याला प्रयत्न लागतो. पौलाच्या काळी दिसून आले त्याप्रमाणे आजसुद्धा काही सबब सांगतात: ‘हे पहा, मी इतक्या वर्षे माझा सहभाग दिलाच आहे. आता नव्या लोकांची पाळी आहे. त्यांनी या कामात परिश्रम घ्यायला हवेत.’—गलतीकर ६:९; इब्रीयांस १२:३.

१६. याविषयी स्वपरिक्षण करण्यामुळे आम्हाला फायदा का घडू शकतो?

१६ ज्यांनी असा परिणाम स्वतःवर करून घेतला आहे ते अर्थातच थोडे जण आहेत. तरीपण तुम्हाला स्वतःला हे विचारून पाहता येईल: ‘माझ्या बाबतीत असे काही घडत आहे याची मी स्पष्ट कबूली देतो का? उपाध्यपणातील माझा सध्याचा सहभाग मी पूर्वी केलेल्या कामासमोर कसा दिसतो?’ आमच्याबाबतीत मंदावणे झालेले असो वा नसो, आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की आमचा “आशेचा देव” “सत्कृत्य करणाऱ्‍या प्रत्येक [व्यक्‍तिस] गौरव, सन्मान व शांती” देण्याचे अभिवचन देऊन आहे. (रोमकर २:१०) पौलाने येथे जो शब्द वापरला त्याचा अर्थ “काही काम करणे, निर्मिणे, सिद्धीस नेणे” असा आहे. परूशी व शास्त्रयांनी केवळ ओठाद्वारे देवाचा सन्मान करून जे प्राप्त केले तसे स्वतःला प्राप्त होऊ न देण्याविषयी दक्षता बाळगणे किती जरूरीचे आहे बरे! (मार्क ७:६; प्रकटीकरण २:१०) उलटपक्षी, अम्ही जाहीर उपाध्यपणात हृदयपूर्वकतेने क्रियाशील सहभाग घेता त्यावेळी आम्हापाशी खरी आशा आहे ही स्वतःला व इतरांना पुष्टी देत असतो. आम्ही आमचा निर्माता व जीवनदाता याचा आदर करतो. यामुळे आम्हाला त्याने आता व कायमचे बहुमानित करावे अशा स्थितीत स्वतःला ठेवीत असतो.—लूक १०:१, २, १७–२०.

आमच्या मोलवान ठेव्यानिशी

१७, १८. आम्हाला आणखी कोणत्या मार्गी देवाचा आदर करता येईल आणि याबाबतची टाळाटाळ बरोबर का होऊ शकणार नाही?

१७ “आशेचा देव” याचा आदर करण्याचा आणखी एक मार्ग आहे ज्याविषयी नीतीसूत्रे ३:९ म्हणते: “तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्‍नाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर.” स्परेल याच वचनाचे भाषांतर असे देतात: “आपल्या संपत्तीने व आपणास मिळालेल्या सर्व वाढीने यहोवाचे गौरव करा.”—ए ट्रान्सलेशन ऑफ द ओल्ड टेस्टमेन्ट स्किसपचर्स फ्राम द ओरिजिनल हिब्रु.

१८ बहुतेक धर्मपुढारी आपल्या अतिलोभिष्टपणा व खर्चिक जीवनपद्धतीबद्दल महशूर असल्यामुळे बहुतेक लोक चर्चना तसेच ज्यांचे लक्ष्य नुसती संपत्ति प्राप्त करणे आहे हे स्पष्ट दिसते त्यांना साहाय्य देण्याची टाळाटाळ करीत आहेत. (प्रकटीकरण १८:४–८) तरीपण अशा गोष्टी नीतीसूत्रे ३:९ चे मोल कमी करीत नाहीत. तर मग या प्रेरित सूचनेनुरूप आपल्याला “यहोवाचा” किंवा आमचा “आशेचा देव” याचा “सन्मान” कसा करता येईल?

१९. नीतीसूत्रे ३:९ या अवलंब काहीनी कसा केला ते विवेचीत करा.

१९ यहोवाच्या साक्षीदारांना हे दिसते की राज्याच्या संदेशास प्रतिसाद देणाऱ्‍या लोकांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यसभागृहांचा विस्तार करावा लागत आहे किंवा नवीन बांधावे लागत आहेत. येथेच “आपल्या संपत्तीने . . . यहोवाचे गौरव” करता येते. बांधणी कामाच्या निधिला व्यक्‍तिगत रित्या सढळ हस्ते अनुदान देण्याचा निश्‍चय करून तरूण व वृद्धांनी यात सहभाग घेतला आहे. असा हा गुप्त निश्‍चय पूरा करावयाला वैयक्‍तिक शिस्त तसेच इमारत बांधणीचे काम पूर्ण होण्याला वेळ लागला तर त्याकरता काही त्याग सुद्धा पत्करावा लागतो. (२ करिंथकर ९:६, ७) तरीपण या पद्धतीने आपला निधि वापरणे यहोवाचा खरा सन्मान करते कारण राज्य सभागृहे या ख्रिस्ती उपासनेच्या त्याचप्रमाणे स्वतःला व आपल्या बरोबरच्या परिचितांना देवाविषयीचे ज्ञान प्राप्त होणाऱ्‍या जागा आहेत. मत्तय ६:३, ४ मधील येशूचे शब्द हा भाव ठेवण्यास आम्हाला चांगले कारण देतात की जे या पद्धतीने देवाचा आदर करतात अशांना तो सन्मानित करील.

२०. (अ) नीतीसूत्रे ३:९चा अवलंब करताना स्वपरिक्षण कसे योग्य ठरते? (ब) आम्ही कोणते प्रश्‍न स्वतःला विचारून पहावे?

२० सावधानीचा इशारा: येशूने म्हटलेच होते की शास्त्री व परूशी देवाचा आदर करण्यात प्रयत्न घेत नव्हते पण आपल्या संपत्तीचा उपभोग पहिल्या प्रथम आपणाला मिळत आहेत यात ते गढले होते. या कारणास्तव, मत्तय १५:४–८ मधील सल्ला आम्हाला “आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान कर”ण्याच्या विषयासंबंधाने स्व–परिक्षण करण्याची चालना देतो. (यिर्मया १७:९, १०) उदाहरणार्थ, आपल्या व्यवसायाद्वारे धनवान बनलेल्या कोणा ख्रिश्‍चनाला वाटेल की त्याने अधिक आर्थिक प्राप्ती करता यावी यासाठी पूर्ण वेळेचे कार्य पुढे चालू ठेवण्याची तितकी गरज नाही. तो कदाचित म्हणेल: ‘इतरांनी पायनियरिंग कार्यात भाग घ्यावा व प्रचारकांची खास गरज जेथे आहे तेथे स्थलातरित व्हावे. मी तर अधिक आर्थिक कमाई मिळवून अधिक अनुदान देवाच्या कार्याला देईन. हा माझा, देवाच्या सेवेचा खास हक्क आहे.’ त्याचे अनुदान पुष्कळशा चांगल्या गोष्टी करील. तरीपण त्याने हे विचारून पहावे: ‘देवाच्या आदरासाठी धनाचा वापर करणे हा माझी अधिकाधिक आर्थिक कमाई मिळवण्यामागील प्रधान हेतु आहे हे माझ्या व्यक्‍तिगत राहणीमानाद्वारे प्रवर्तित होते का?’ (लूक १२:१६–१९; पडताळा मार्क १२:४१–४४) त्याचप्रमाणे, ‘मला आमच्या काळासाठी जे महत्वपूर्ण काम आहे त्यात म्हणजे सुवार्ता घोषित करणे यात व्यक्‍तिशःअधिक सहभागी होण्यासाठी मी माझ्या उद्योगात आवश्‍यक बदल करू शकतो का?’ हे सुद्धा विचारावे. आमची जीवनातील परिस्थिती कशीही असली तरी आम्ही आमचे हेतु पडताळावे व विचारावे: ‘मला माझा जीवनदाता आणि “आशेचा देव” याचा कशाप्रकारे अधिक सन्मान करता येईल?’

२१. यहोवाचा आम्ही आता आदर केल्यास आम्हाला कसले भवितव्य आहे?

२१ यहोवा आमची निराशा करणार नाही. त्याने प्राचीन विश्‍वासू इस्राएलाला जे म्हटले तेच त्याने आमच्याबाबतीत सध्या व भावी काळात म्हटले तर ते किती विलोभनीय भवितव्य आम्हासाठी ठरेल! त्याने म्हटले: “तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुजवर प्रेम करतो.” (यशया ४३:४) हाच तो, जे “गौरव, सन्मान मिळविण्याचा प्रयत्न करतात त्यांना सार्वकालिक जीवन देईलच.” हे अभिवचन तो, “सत्कर्मे” करीत त्यात टिकून राहणाऱ्‍यांना देऊन आहे. केवढा हा “आशेचा देव”!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ मानवांनी यहोवास आदर दाखविण्याच्या बाबतीत आम्हाला येशूच्या उदाहरणाद्वारे काय शिकता येईल?

◻ देवाचा आदर करण्यामध्ये एली व शमुवेल कसे भिन्‍न ठरले?

◻ देवाचा आदर करण्यामध्ये तुम्हाला वाढ करता येईल असे कोणते मार्ग आहेत व त्याकरवी तुम्हाला कोणता प्रतिसाद मिळेल?

◻ आमचा “आशेचा देव” याचा आदर करणे ही गोष्ट जे सर्वप्रथम ठेवतात त्यांच्यासाठी कोणते भवितव्य वाट पाहून आहे?

[२९ पानावरील चौकट]

अनुदानाविषयीची पत्रे

वॉचटावर संस्थेच्या ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील दप्तरात जी पत्रे आली त्यातील काही मजकूर या प्रमाणे:

“माझे नाव अबीया आहे. मी नऊ वर्षाचा आहे. जे बांधव राज्य सभागृहावर काम करीत आहेत त्यांना मी हे चार डॉलर्स देऊ इच्छितो. यातून त्यांना खाऊ द्या किंवा कॅन्डी बार द्या. माझ्या मते काहीही चालेल.”—ऑरिगन.

‘मी सोबत एक चेक पाठवीत आहे. माझे वय आता ९६ होऊन गेले आहे व मला बरेच कमी ऐकू येते. तरीपण मी आनंदाने पैसे साठवून ठेवू शकलो. मी सध्या जुनी कार वापरतो, फ्लॉरिडा वा कॅलिफोर्निया येथे हिवाळ्‌याची सुटी घालवित नाही. मी लोकांचे दार ठोठावून त्यांच्याकडे सुवार्ता नेण्यात जितके काही करता येते ते करतो. मी हे जे पैसे जमविले त्यातून तुम्हाला पाठवीत आहे. मला हा सहभाग देण्यास आनंद वाटतो.’—ओहायो.

‘राज्य सभागृहासाठी तुम्ही जे करू शकला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हे पैसे [५ डॉलर्स] मी, तुम्ही आमच्या मदतीसाठी जी प्रकाशने व वॉचटावर्स छापता त्यास थोडीफार मदत व्हावी म्हणून देतो. हे पैसे मी माझ्या छोट्या डबीत जमविलेले आहेत. स्कूल माहितीपत्रक छापून मादक द्रव्याविषयी जी माहिती स्पष्ट केली त्याबद्दल आभारी आहे.’

“येथे सोबत चेक जोडला आहे. या पैकीचे २०० डॉलर्स राज्य सभागृह इमारत निधि साठी आहे. बाकीचे प्रचाराचे कार्य वाढावे म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने वापरावे असे वाटत त्यात उपयोगी आणा.”—मिसोरी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा