एक आनंदी लोक—का?
खरे ख्रिस्ती आज आनंदी लोक आहेत. आम्ही “आनंदी देव” यहोवा याची निर्विवादपणे सेवा करतो. (१ तिमथ्यी १:११) तो त्याचा आत्मा आम्हास पुरवितो व त्या आत्म्याची फळप्राप्ती आनंद आहे.—गलतीकर ५:२२.
अशाप्रकारचा मुळावलेला आनंद संवेदनाक्षम व दबावात ही टिकणारा आहे. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्तास वधस्तंभी खिळण्याच्या वेदना व देवनिंदक म्हणून निर्दयीपणाने मारण्यास तुकविले होते. तथापि “जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला.” (इब्रीकर १२:२) येशूस हे ठाऊक होते की त्याजपुढे यहोवाची सेवा करण्यासंबंधी भव्य संधी व हक्क होता. भवितव्यातील हक्कावरील दृष्टीने त्याला त्रासातही त्याचा आनंद टिकविण्यात मदत केली.
आपल्या शिष्यांनी सुद्धा आनंदी असावे असे येशू इच्छितो. तो म्हणाला: “माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हास ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” (योहान १५:११) हेच यहोवाच्या साक्षीदारासंबधी सत्य असल्याचे शाबीत झाले आहे. आम्ही आनंदी लोक असण्याची पुष्कळ कारणे आहेत. आम्हास सत्य ज्ञात आहे, ज्याने आम्हास दुरात्मीक पकडीतून व खोट्या धर्माच्या विश्वासापासून स्वतंत्र केले. (योहान ८:३२) या शिवाय, काळाच्या ओघात आम्ही कोठे आहोत हे आम्हास माहीत आहे व तारणाची आशा लवकरच साकार होणार याने आम्ही हर्ष करतो. (लूक २१:२८) आम्हास पुष्कळशा समस्यापासूनही संरक्षित केले आहे—ज्यामध्ये संसर्गजन्य लैगिंक आजार—जे पवित्रशास्त्र आधारित नीती अवलंबीत नाहीत त्यांना होतात. यहोवाची इच्छा करण्यात आस्थेवाईक असणाऱ्या लोकांच्या उत्कृष्ट संगतीचा आनंद आम्ही लुटतो. होय, आम्हास राज्याची सुवार्ता याच्या प्रचार कार्यात व मेंढरासमान जनांना शिष्य बनविण्याच्या कार्यात सहभागी होण्याचा बहुमान लाभला आहे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
ही गोष्ट यहोवाचे साक्षीदारांचा गट म्हणून सत्य आहे तरी एक व्यक्ती यानाते तुमच्या बाबत काय? तुम्हा जवळ यहोवाच्या इतर लोकासोबत हर्ष करण्याचे कारण आहे असे का म्हटले जाऊ शकते?
सुवार्तिक कार्यात आनंद मिळविणे
घरोघरच्या प्रचार कार्यात सहभागी होणे काहींना अवघड वाटते. कदाचित ते अनोळखी जणांना भेटणे व संभाषण सुरु करण्यात संकोचित असतात किंवा इतरांना शिकविण्याच्या बाबतीत आपण अपात्र आहोत असे त्यांना वाटते. कांही वेळेस तुम्हास अशाप्रकारे वाटते का? होय तर तुम्हास सुवार्तिक कार्यात आनंद कसा मिळविता येईल?
प्रथमतः निश्चयी मनोवृती ठेवा. कोणा सुप्रसिद्ध व्यक्ती किंवा राजकिय ख्यातनाम व्यक्तीने नाकरीस ठेवून घेतले तर पुष्कळ लोकांना अभिमान वाटतो. परंतु “सदाजीवी राजा” यहोवा देव याने स्वतः उपयोगात आणलेले म्हणून आम्हास केवढा अत्यानंद वाटला पाहिजे बरे!—१ तिमथ्यी १:१७.
हे आठवणीत असू द्या की हे कधीही पुनरावृती न होणारे कार्य आहे. अंमळ विचार करा! स्वतः देवदूत, मेंढरासमान लोकांना शोधण्यात ख्रिश्चनांना त्यांच्या प्रयत्नात मार्गदर्शन व दिग्दर्शन करतात. (प्रकटीकरण १४:६) हे तुमच्या अंतःकरणास आनंदी बनवित नाही का?
राज्य वृद्धीत आनंद मिळविणे
प्रचार कार्यात निश्चयी दृष्टी राखण्याचे आणखी एक कारण त्यापासून प्राप्त होणारा चांगला परिणाम हा आहे. पवित्र शास्त्र भाकीत करते: “जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र हेतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी यहोवा योग्य समयी यास चालना देईल.” (यशया ६०:२२) हे यहोवाचे अभिवचन अलीकडील वर्षात सत्य ठरले आहे. उदाहरणार्थ, १९८६च्या कार्यवर्षात २,२५,८६८ जनांचा यहोवा देवास पूर्णपणे समर्पित झालेल्याचे द्योतक म्हणून बाप्तीस्मा झाला. पवित्रशास्त्र सत्य इतरांना घोषित करणाऱ्यांच्या संख्येत ६.९ची वाढ होती.
हीच वाढ तुमची मंडळी किंवा विभागात स्पष्ट आहे. नवे लोक सभांना येतात व देवाची सेवा करण्यास शक्य व्हावे म्हणून त्यांच्या जीवनात जरूर ते परिवर्तन करीतात. तर मग, यहोवाचे आशीर्वाद प्रचार कार्यावर आहेत ही वास्तविकता नाही का? या वाढीत सहभागी होणे अशाप्रकारे तुमच्या अति आनंदाचा स्रोत होऊ शकेल. हे खरे की तुम्ही स्वतःहून कदाचीत एकाद्याने बाप्तीस्मा घेण्याप्रत त्याजसोबत अभ्यास कला नसेल. परंतु एकाद्यास सत्यात आणण्याचे श्रेय आम्ही स्वतःकडे घेऊ शकत नाही. ‘देव वाढवितो’ असे पौल म्हणतो. (१ करिंथकर ३:६–९) मंडळीच्या सर्व सभासदांना नविन जणांना मदत करण्याचा सहभाग आहे. कसा? सभेत उपस्थीत राहून, अभिप्राय मांडून, नविन जणांना आदरातिथ्याने अभिवादन करून व त्यांना सत्य अर्जविणारे ठरेल अशामार्गी सहवास देऊन.
तथापि घरोघरची प्रचार कार्य हालचाल व घरगुती पवित्रशास्त्राभ्यास कार्यात तुमचा सरळपणे अधिक सहभाग असेल तर अत्यानंद प्राप्त केला जाऊ शकतो. गतवर्षी, सरासरीने साप्ताहीक २७,२६,२५२ पवित्र शास्त्र अभ्यास चालविले गेले. या आनंदी कार्यात सहभागी होण्यास अधिक पराकाष्टा का करू नये? तुम्हास ज्ञात असणाऱ्या कोणास, कदाचीत शेजारी किंवा ज्याला तुम्ही वाडमय दिले आहे अशास पवित्रशास्त्र अभ्यास सादर करा. अशा प्रकारच्या लोकांना शोधण्यास यहोवाच्या मदतीची याचना करा.
आनंदाआड येणाऱ्या अडखळणावर मात
अर्थात, व्यक्तीस इतरांना शिकविण्यात अपात्र वाटते तर क्षेत्र कार्यातील त्याच्या आनंद प्राप्त करण्यातील हे अडखळण होऊ शकते. लक्षात ठेवा की “आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.” (२ करिंथकर ३:५) यहोवाने त्याच्या संस्थेमार्फत प्रभावी सेवक म्हणून पात्र होण्यासाठी सहाय्य म्हणून सुंदर मदत पुरविली आहे.
सर्वप्रथमतः आम्हात देवाची सेवा दिर्घकाळ करणारे व क्षेत्र उपाध्यपणाचा भरपूर अनुभव असणारे पुष्कळ आहेत. आम्ही या अनुभवी सेवकांच्या त्याच्या कार्य हालचालीस सोबत देऊन त्यांच्यापासून बरेच कांही शिकू शकतो. याहून अधिक दर महिन्यास उत्तम सूचना आमची राज्य सेवा यात येतात. याशिवाय रिझनिंग फ्राम द स्क्रिप्चर्स हे प्रकाशन आहे जे आमचे प्रचार कार्याचे कौशल्य वाढविण्याचे प्रबल साहित्य सामावून आहे. या साधनांचा उपयोग करा व क्षेत्र सेवेसाठी सुसज्ज तयारी करा. दरवाज्यावर तुम्ही स्वतःची ओळख चित्तवेधकपणे करून देण्याच्या नवीन पद्धतीचा विचार करा. किंवा घरमालकाला संभाषणात सामावून घेण्याच्या विविध मार्गाचा विचार करा. तुम्ही क्षेत्रात अधिक प्रभावी व्हाल तेवढी तुमची प्रचार कार्यातील उमेद व आनंदी निसंशये वाढेल.
आम्ही लोकांबरोबर बोलण्यास समर्थ होतो तेव्हा उपाध्यपण अधिक आनंदी असते. कांही विभागात ही समस्या आहे. तुम्ही क्षेत्र कार्याची योजना अधिक लोक घरी भेटतात तेव्हा जसे की संध्याकाळी करू शकाल का? असे करणे पुष्कळांना प्रभावी आढळून आहे. तुम्ही, लोक कोठे आढळतात—गल्लीत, पार्क मधील बाकावर बसलेले, त्यांची कार धुऊन काढीत असतील तेथे त्यांच्यासोबत पुढाकार घेऊन बोला. ध्यानात ठेवा की लोकांना सत्याची गरज आहे व त्यांचे जिवन त्यात समाविष्ट आहे. हे तुम्हास लाजाळू वृतीवर मात करण्यास मदत करील. अधिकांशी लोक अनुकूल प्रतिसाद देणार नाहीत पण जे देतील ते आम्हास अत्यांनद देते.
तथापि, आमचा आनंद टिकविण्याच्या महान मदतीतील एक प्रार्थना आहे. तुम्हास दृढ करण्यास व उत्तेजन देण्यास यहोवाकडे त्याच्या आत्म्याची मागणी करा. पौल म्हणाला: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व कांही करावयास शक्तीमान आहे.” (फिलिपैकरास ४:१३) आम्ही यहोवावर पूर्णपणे विसंबून राहाण्याचे शिकू तसे आम्हास सुद्धा तसेच वाटू शकते.
आनंदी लोक म्हणून टिकून राहणे
पुष्कळ लोक आमच्या कार्याची आवड बाळगीत नाहीत. असे होणार याबाबत येशू जागरूक होता. म्हणून त्याने आपल्या अनुयायांना प्रचार करण्यास बाहेर पाठविले तेव्हा त्याने त्यांना सूचना दिली: “जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमचे ऐकणार नाही त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका. . . . पहा! लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे साळसूद व्हा.” येशूने असेही म्हटले: “तुमच्या डोक्यावरचे सर्व केस मोजलेले आहेत, म्हणून भिऊ नका.”—मत्तय १०:११–१६, ३०, ३१.
हे शब्द आम्हास आनंदीपणे टिकून राहण्यात मदत करतात. त्यांच्या साठी आम्ही घेतलेल्या परिश्रमाची लोक तमा बाळगीत नाहीत तरीही आम्ही यहोवाचे नाव ज्ञात करून देत आहात, त्याची स्तुती करतो हे जाणणे मदत करते. (स्तोत्रसंहिता १००:४, ५) चित्तवेधकपणे दरवाजा उघडण्याचे नाकरणारा घरमालक इतरांना: “यहोवाचे साक्षीदार होते” असे म्हणताना ऐकतो. होय, आम्ही एक शब्द सुद्धा उच्चारण्याशिवाय यहोवाचे नाम गौरविले जाते व लोकांना सत्य स्विकारणे अगर नाकारणे याची संधी प्राप्त होते. (मत्तय २५:३१, ३२) यास्तव प्रतिकूल क्षेत्रेही आनंदीपणे टिकून पूर्ण केली जाऊ शकतात.
यापेक्षा अधिक, अशाप्रकारची व्यक्ति त्याची मनोवृती केव्हा बदलेल हे आम्हास कधीही जाणता येणार नाही. एके दिवशी, एका स्त्रीने जिने ख्रिस्ती बहीणीस तिच्या दरवाज्यातून बरेच वेळा धुडकावले तिने बहीणीस तिच्या जवळ नविन वाडमय आहे का असे विचारले. बहीणीस आश्चर्य वाटले व म्हणाली की यापुर्वी त्या स्त्रीने केव्हांही वाडमय स्विकारले नव्हते. त्या स्त्रीने म्हटले तिचा पति, यहोवाच्या साक्षीदारासोबत अभ्यास करीत होता त्या मनुष्यासोबत काम करतो. त्याने तिला व तिच्या पतिला वॉचटॉवर सोसायटीचे प्रकाशनातील एक दिले होते. जिज्ञासूपणामुळे त्या स्त्रीने ते वाचले व संदेश सत्य असल्याचे ओळखले. त्याच वेळी तिने ठरविले की पुढील वेळेस साक्षीदार भेट देईल तेव्हा ती तिला आत घेईल. घरगुती पवित्र शास्त्राभ्यास सुरु झाला व नंतर ती स्त्री समर्पित यहोवाची साक्षीदार बनली!
अशाप्रकारे आम्हास महान हक्क—एक आनंदी—जगात आशायुक्त असणारा एकमेव संदेश घोषित करण्याचा हक्क आहे. या शेवटच्या दिवसात प्रचारकार्याची नेमणूक देवाने आम्हास दिली आहे. ती शेवट येण्यापूर्वी पूर्ण केली पाहिजे. (मत्तय २४:१४) सैतानी दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होण्यापूर्वी ती केवढी दिर्घ असेल? आम्हास ठाऊक आहे की शेवटास उशीर व्हावयाचा नाही. (हबकूक २:३ तुलना करा) दरम्यानच्या काळात इतरांना सत्य शिकण्यास अजूनही वेळ आहे. या उरलेल्या वेळेचा फायदा घेऊन व आवेशाने आमच्या प्रचार कार्यात असू या. निश्चयी मनोवृत्ती राखू या, ‘स्वतःचे व आमचे ऐकणाऱ्यांचे तारण साधण्यास’ परिश्रम करू या. (१ तिमथ्यी ४:१६) असे करण्यात, आम्ही राज्य वाढीत सहभागी करणारे आनंदी लोक म्हणून स्थिर राहू या.
[३१ पानांवरील चित्रं]
राज्य संदेशाला लोक कधी उत्तम प्रतिसाद देत नसले तरी आमचे सुवार्तिक कार्य खऱ्या आनंदाचा उगम ठरते