यहोवाची आशा धरा
“यहोवाची आशा धर व त्याच्या मार्गांचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नति करुन तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.”—स्तोत्रसंहिता ३७:३४.
१, २. मानवजात कोठे उभी आहे असे दिसते, आणि संयुक्त राष्ट्र संघ स्वतःला कसा समाविष्ट करून आहे?
मानवी कुटुंब बौद्धिकरित्या आपल्या अधिक प्रगत स्थितीला येऊन पोहोचले आहे. प्रयत्नानिशी त्याला शेवटी अणुयुगाप्रत येऊन पोहोचता आहे. अणुची शक्ती प्रचंड उर्जा पुरवू शकते असे दिसल्यामुळे गोलार्धव्याप्ततेत मोठमोठ्या गोष्टी उघड झाल्या. तरीपण यानेच विलक्षणरित्या मानवी वंशाला भयंकर इजा करण्याचा मार्गही मोकळा केला.
२ तथापि, अण्वस्त्र भडक्यात मानवी कुटुंबाचे स्वतः दहन होऊ नये यासाठी कोण मध्ये उभा आहे? तो संयुक्त राष्ट्र संघ आहे हे बहुधा भासविले जाते. आपली विविध प्रकारच्या राजवटीची १५९ रा सदस्य आहेत याचा त्याला मोठा अभिमान वाटतो. राजकीय दृष्ट्या ही सरकारे मात्र आपणात सहमत राखत नाही. आपलेच शासन श्रेष्ठ, होय, सर्वोत्तम आहे असे ते मानतात. या कारणास्तव संयुक्त राष्ट्रसंघ अंतर्गतरित्या विसंगत बनला आहे. राष्ट्रभिमान आणि स्वतंत्र असण्याची इच्छा सर्वत्र पसरली आहे. यासोबत, कित्येक राष्ट्रांनी देवावरील आपला विश्वास त्यागला आहे व ते निरिश्वरवादी बनले आहेत.
३. देवाविषयी ख्रिस्ती धर्मराज्याने बाळगलेला दृष्टीकोण देवाच्या दृष्टीकोनापेक्षा कसा भिन्न आहे?
३ ख्रिस्ती धर्म राज्य ही संज्ञा, अभक्त आहोत या वर्गवारीत येण्याची इच्छा न करणाऱ्या पण “देव जो पिता,” येशू व व्यक्तित्ववादी पवित्र आत्मा या त्रेक्याच्या भाग असणाऱ्या येशू ख्रिस्तावर आपला विश्वास आहे असा दावा करणाऱ्यांना अद्याप लागू आहे. त्र्यैक्याचे हे सदस्य समसमान आहेत असे मानले जाते. तरीपण येशूच्या पित्याने यशया संदेष्ट्याला आपली ओळख दर्शविणारे हे शब्द लेखणीकरवी लिहिण्यास संगितले: “मी यहोवा आहे. हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा कोरीव मूर्तीस देणार नाही.” (यशया ४२:८) हा यहोवा किंवा याव्हे (द जरूसलेम बायबल) याने इतिहासात आपणासंबंधीचा अतुलनीय अहवाल राखला आहे.
४. संयुक्त राष्ट्र संघ मानवजातीला कशापासून विचलीत करीत आहे?
४ देवाच्या नामाला योग्य तो सन्मान व मान्यता दाखविण्याच्या बाबतीत संयुक्त राष्ट्रसंघाने स्वतःला वेगळे राखले आहे. सध्या अत्यंत शोचनीय अवस्था समोर असणाऱ्या मानवजातीला त्याने ते नाव धारण करणाऱ्याची आशा धरण्याचे कसलेही प्रोत्साहन दिले नाही. तरीपण “आशेचा देव” असा किताब असणाऱ्या त्याने, मानवजातीला एकमात्र सार्थ आशेचा आधार मिळत आहे याकडे लक्ष दिले आहे. (रोमकर १५:१३, किंग जेम्स व्हर्शन) त्याने देऊ केलेल्या आशेमुळे पुष्कळ स्त्री, पुरुषांनी स्वतःची दृढता करून स्वतःला टिकवून ठेवले आहे.
आशा–अगदी आरंभालाच!
५. आशेचा आधार केव्हा दिला गेला?
५ ही आशा राखण्याविषयीचा आधार मानवी कुटुंबाच्या इतिहासाच्या आरंभालाच दिला गेला. मध्यपूर्वेच्या एदेन या उद्यानगृहातून आमच्या प्रथम पालकांची हकालपट्टी करण्याच्या आधी तो दिला गेला. ते उद्यान वा नंदनवनाविषयी इब्री भाषेत लिखित असणारा अहवाल कहाणी तसेच निर्माणकर्त्याकडे पाठ फिरवून वेगळी दिशा धरणाऱ्या लोकांकरवीची दंतकथा नाही.—उत्पत्ती २:७–३:२४.
६. मानवजातीला आशेची कशी गरज भासली?
६ सुमारे ४,००० पेक्षा अधिक वर्षानंतर ख्रिस्ती प्रेषित पौलाला हे लिहीण्यास प्रेरित करण्यात आले: “एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले व पापाच्या द्वारे मरण शिरले. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये आशाप्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) आपल्या दुसऱ्या एका लिखाणात त्या एका दोषी माणसाची ओळख करून देताना तो म्हणतो: “जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.” (१ करिंथकर १५:२२) लूक नामे एका वैद्याने आपल्या शुभवर्तमानाच्या ३ऱ्या अध्यायात येशू पर्यंत आलेला वंश मालिकेचा सुगावा मागे आदामापर्यंत लावला. याच आदामाने, त्याला एदेनातून हाकलून देण्याआधी यहोवाचा आशेचा संदेश ऐकला.—लूक ३:२३–३८.
७. आदाम जिवंत असतानाच देवाने कोणते उत्तेजनात्मक कार्य घडविले?
७ तुम्हालाही त्या संदेशातील मजकुर जाणण्याची स्वाभाविकपणे इच्छा असणार. त्याची माहिती करून घेण्याआधी याची दखल घ्या की यहोवा हा दीर्घकाळासाठी आशाप्रदायक देव ठरला. आरंभाला आदाम देवाचा ऐहिक पुत्र होता व त्याने त्याला मुले निपजविण्याची अनुज्ञा दिली. तुम्हापुढे दारूण परिस्थिति उभी आहे तर आपल्या मुलांना उत्तेजन व आशा देण्याचे नक्कीच तुम्हाला वाटेल. देवाने या सारखेच काही केले. देवाकडिल व्यक्तिगत रूपाचे नापसंतीचे उद्गार आदामाने ऐकल्यानंतर त्याच्या संतानाकरता त्याने आशेचे बोलही ऐकले.
८. उत्पत्ती ३:१५ आशेचा कसा आधार देते?
८ तर त्या आशाप्रदायक देवाकडिल बोल कोणते होते? आदामाच्या पापात समाविष्ट असणाऱ्या एका “सर्पास” उद्देशून देवाने म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति [मूल] यांजमध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ती ३:१४, १५) या शब्दांमधून कोणती आशा मिळते याचे बहुधा तुम्हाला नवल वाटायला लागले असेल. तरीपण प्रथमतः त्या “सर्पा”चे डोके फोडले जाईल ही प्रथमदर्शनी माहिती त्यात मिळते.
९. उत्पत्ती ३:१४, १५ मधील ‘सर्प’ कोण आहे?
९ प्रकटीकरण १२:९ मध्ये असे लिखित आहे: “मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.” होय, एदेनच्या प्रकरणाशी संबंधित असणारा “सर्प” दियाबल सैतान ह्या दुरात्मिक प्राण्याशिवाय दुसरा कोणीही नव्हता. या लाक्षणिक सर्पाला स्वर्गात आपले दूत मिळाले इतकेच नाही तर त्याने येथे पृथ्वीवर कालांतरात आपली “संतति” सुद्धा मिळविली. ही “संतति” त्याच्याबरोबर योग्य समयी नाहीशी करण्यात येईल.
१०. येशूने “सर्पा”च्या ओळखीस कशी पुष्टी दिली?
१० आमच्या मूळ पालकाच्या पतनामागे असणाऱ्या दियाबल या “सर्पा”च्या ओळखीविषयी पुष्टी देताना येशू ख्रिस्ताने पहिल्या शकाच्या यहुदी धर्मनेत्यांना म्हटले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास पहाता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही . . . तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) त्या धर्म विरोध्यांना येशूने “सापाच्या पिलांनो” या अर्थीही संबोधिले.—मत्तय १२:३४; २३:३३.
आशा जिवंत ठेवली गेली
११. उत्पत्ती ३:१५ ने आशेसंबंधाचे आणखी कोणते कारण पुरविले?
११ लाक्षणिक सर्पाचे डोके फोडण्याविषयीच्या इश्वरी अभिवचनाने भावी काळात अस्तित्वात येत असलेल्या सर्व मानवी कुटुंबियांना अंतःकरणास उबविणारी आशा खरीखुरी दिली. ते का हे आपल्याला उत्पत्ती ३:१५च्या आणखी एका गोष्टी विषयीचे परीक्षण केल्याने समजू शकेल. त्यात स्त्रीच्या “संतति”चा सुद्धा उल्लेख आहे. या “संतति”ची ओळख बऱ्याच काळासाठी गूजाप्रमाणे राहिली होती. तथापि हे स्पष्ट होते की देव अद्याप त्या ओळख न दिलेल्या “संतति”ला लाक्षणिक सर्प व त्याची देवविरोधी “संतति” यांचा शत्रू म्हणून ठेवणार होता. यामुळेच “स्त्री”ची “संतति” याजकरता विजयाचे अभिवचन, होय त्याची खात्री वदविली गेली! त्याचा विजय हीच मानवजातीसाठी आशा ठेवण्यात आली. तद्वत मानवी कुटुंबाचे सदस्य “स्त्री”च्या भावी “संतति” विषयीची आशा धरू शकत होते.
१२. काही काळातच “स्त्री”च्या “संतति” बद्दल अधिक काय प्रकट करण्यात आले?
१२ शतकांच्या दरम्यान देवाने प्रकटविले की ही “संतति” त्याचा एकुलता एक पुत्र होती, त्याला पृथ्वीवर मशीहा बनण्यासाठी आणि खंडणी यज्ञार्पणात आपले जीवन देण्यासाठी पाठविण्यात आले. (उत्पत्ती २२:१७, १८; गलतीकर ३:१६; १ योहान २:२; प्रकटीकरण ५:९, १०) याकारणास्तव, यहोवाच्या साक्षीदारांची आशा संयुक्त राष्ट्र संघावर विसंबून नाही. ती यहोवा देवाचा प्रमुख प्रवक्ता जिवंत अशा येशू ख्रिस्तावर आहे. ख्रिस्त हा जिवंत आहे हे आम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकतो कारण त्याचे मृतातून पुनरूत्थान करण्यात आले असून तो स्वर्गात यहोवाकडे उजव्या बाजूला बसला आहे. पौल म्हणतो: “आपण ह्या आयुष्यात [ज्यामध्ये आजच्या २०व्या शतकातील जीवनाचा समावेश आहे] ख्रिस्तावर आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. तरी पण आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेलाच आहे. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथमफल असा आहे.” (१ करिंथकर १५:१९, २०) या मासिकाच्या पृष्ठांत शास्त्रवचनीय दृष्ट्या हे वारंवार सिद्ध करून देण्यात आले आहे की येशू ख्रिस्त आज स्वर्गीय राजा यानात्याने अधिष्ठित आहे.—प्रकटीकरण ११:१५.
१३, १४. यहोवाचे साक्षीदार आपली आशा कोणावर ठेवून आहेत व ते त्याविषयी काय करतात?
१३ मानवजातीच्या आशेविषयी येशूने यहोवाची जागा अर्थातच घेतली नाही. स्तोत्रसंहिता ३७:३४ अद्याप लागू होणारे आहे, जे म्हणते: “यहोवाची आशा धर व त्याच्या मार्गांचे अवलंबन कर म्हणजे तो तुझी उन्नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.” लोकांनी मानव–निर्मित संस्थांवर आशा ठेवण्याचे सोडून देऊन यहोवाची आशा धरणे अद्याप जरूरीचे आहे.
१४ याच्या अनुषंगानेच यहोवाचे साक्षीदार आज २०८ देशात राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात क्रियाशील आहेत. ते असे करण्याचे थांबवू शकत नाहीत. राजकारणी संस्था धार्मिक संस्थांच्या मदतीने व पाठबळाने त्यांचे काम बंद पाडण्याचा जो प्रयत्न करीत आहेत त्याला इश्वरी अनुमति नाही. आम्ही यहोवाचे साक्षीदार असण्याचे व त्याच्यावरच बेथलहेमाच्या दावीदासारखी आपली आशा ठेवण्याचे चालूच ठेवू. त्या दावीदाने असे लिहिले:
१५. दावीदाने यहोवाविषयी कसल्या प्रकारची आशा धरली?
१५ “यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो; तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नावासाठी मला नीतीमार्गांनी चालवितो. मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही; कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील, आणि यहोवाच्या घरात मी चिरकाल राहीन.”—२३वे स्तोत्र.
१६. येशूठायी दावीदासारखाच दृष्टिकोण होता असे का म्हणता येऊ शकते?
१६ दावीद राजा प्राचीन इस्राएलांच्या वंशावर यहोवाचा आध्यात्मिक मेंढपाळ होता व त्यानेच यरूशलेमास राष्ट्राची राजधानी बनविली; येथे त्याचा पुत्र शलमोन याने ४० वर्षे राज्य केले. येशू ख्रिस्ताला “दाविदाचा पुत्र” असे उचितार्थाने संबोधिण्यात आले. (लूक १:३१; १८:३९; २०:४१) दावीदाने यहोवा देवाची आशा धरली तर त्याचा ऐहिक वंशज येशू ख्रिस्ताने सुद्धा तेच करावयास हवे होते; आणि ते त्याने तसेच केले.
१७. येशूने यहोवाची आशा धरली याचा कोणता पुरावा आहे?
१७ दावीदाचा हा अत्यंत महशूर असा दैहिक वंशज येशू याने स्तोत्रसंहिता ३७:३४चा सल्ला अनुसरला याचा पुरावा त्याने वधस्तंभावर आपल्या शेवटल्या श्वासोच्छ्वासाच्या वेळी जे म्हटले त्यात दिसतो. तो म्हणाला: “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (लूक २३:४६) यावेळी तो स्तोत्रसंहिता ३१:५ मधील दावीदाचे शब्द, “तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो” हे अवतरीत व पूर्ण करीत होता. दावीद राजाचा आशा भंग केला गेला नाही त्याप्रमाणेच येशूचाही आशाभंग झाला नाही. तिसऱ्या दिवशी ख्रिस्ताचे पुनरूत्थान करण्यात आले. चाळीस दिवसांनी तो आपल्या स्वर्गीय पित्याकडे परतला. विदेश्यांच्या काळाची १९१४ मध्ये समाप्ती झाली त्यावेळी यहोवाने आपल्या या पुत्राला पृथ्वीचा शासनाधिपति असे उंचावले.
आता आशा धरण्याजोगा काळ
१८. आशेसाठी आजचा काळ उचित समय का आहे?
१८ सध्या (जागतिक वर्षाच्या) ६,०१४ या नव्या वर्षी मानवजात शिरली असता तिच्या साठी कोणती आशा रखली जाऊ शकते? हा प्रश्न अत्यंत उचित असा आहे कारण आम्ही पवित्र शास्त्र युगानंतर आता १,९०० वर्षे पुढे आलो आहेत. दावीदाने स्तोत्रसंहिता ३७:३४चे लिखाण केले त्यानंतर हा बराच काळ झाला आहे.
१९. यहोवाने येशूसाठी असे काय केले की त्यामुळे आम्हास आशा मिळते?
१९ येशूला मृतातून पुनरूत्थित करणाऱ्या सर्वसमर्थ यहोवा देवापाशी त्याजकरता भव्य स्वरूपाचे काम आहे. हा मनोगत अल्पदृष्टीच्या मनुष्यांपेक्षा अतिश्रेष्ठ आहे. आपल्या एकुलत्या एका पुत्राचे पुनरूत्थान करून व त्याला स्वर्गात आपल्या उजव्या हस्ते उंचावून यहोवा देवाने आम्हाला त्याची अटळ आशा धरण्याचे त्याच्याकडे सर्वतोपरि विश्वस्तपणे पाहण्याचे अधिक कारण पुरवले आहे. याचा अर्थ आम्हासाठी सौख्यानंदातील सार्वकालिक जीवन असा होऊ शकतो. जसे प्रेरित लेखक पौलाने सुद्धा म्हटले होते: “आपण अशी आशा धरून तर[तो].”—रोमकर ८:२४.
२०. यहोवा सध्या “आशेचा देव” आहे असे आम्ही का म्हणू शकतो?
२० प्रेषित आणखी पुढे म्हणतो: “जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करीत असतो.” (रोमकर ८:२४, २५) त्यामुळेच ती मूळची आशा अद्याप जिवंत आहे व ती मानवजातीत भव्यपणे पूर्ण होण्याच्या बेतात आहे. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:४, ५) वस्तुतः ती सबंध मानवजातीसाठी असणारी आशा आहे त्यामुळेच तिची घोषणा सर्वत्र होण्यास हवी. आमच्या “आशेचा देव” या संज्ञेमागील हाच अर्थ अभिप्रेत आहे.
२१, २२. राष्ट्रे नजीकच्या भवितव्यात काय करतील असे आम्ही अपेक्षू शकतो?
२१ या कल्पनेची पूर्ति करण्याची त्याची ही महान वेळ आहे. आमच्या या शतकात संयुक्त राष्ट्रसंघातील काही राष्ट्रांनी सर्व गोष्टींच्या गाभ्यावर वैज्ञानिक ताबा प्राप्त केला असला तरी त्यांच्या सरकारांना समस्या सोडविण्याचे काम कोणा श्रेष्ठ बुद्धीकडे सोपवावे अशी गरज वाटत नाही.—पडताळा उत्पत्ती ११:६.
२२ प्रसिद्ध धर्म पूर्वी नव्हता इतक्या आत्मसंरक्षणाच्या तयारीत आता उभा आहे. त्यातील फुटीर वर्चस्व काढून टाकलेच पाहिजे. पवित्र शास्त्र दाखविते की शासकीय घटक आपल्या श्रेष्ठत्वाच्या जोरावर, ज्यांनी इतक्या काळ हांजी हांजी करीत या व्यवस्थीकरणातून करता आले तेवढे शोषण केले त्या या धर्मांना त्यागपत्र देतील. राजकीय घटक हे मार्गाक्रमण चोखाळतील यात काही नवल नाही. त्यांनी सहजगत्या धर्मावर केलेला हल्ला त्यांच्या दृष्टीने हे दाखवू इच्छिल की भक्ति व सेवा करण्याजोगा समर्थ असा देवच नाही. भविष्यवादित संकेत सुचवितो की त्यानंतर ते बाकी राहिलेल्या देवाच्या साक्षीदारांवर उचल घेतील. आपल्या देव–विरोधी मोहिमेत यहोवाच्या साक्षीदारांवर अगदी सहजगत्या विजय मिळेल व तो कळस ठरेल असे ते मानतील.—प्रकटीकरण १७:१२–१७; यहेज्केल ३८:१०–२३.
२३, २४. आपल्या लोकांवर राष्ट्रांनी केलेल्या हल्ल्याविषयी यहोवा कोणती प्रतिक्रिया दाखीवल?
२३ तथापि सरतेशेवटी त्यांना कळून येईल की सेनाधीश यहोवा याच्या विरूद्ध उभे ठाकण्याचे धाडस केल्यामुळे लज्जास्पद पराजय आता आपल्याला मिळत आहे. याचे कारण हे की सेनाधीश यहोवाला कोणत्याही युद्धात कधीही हार मिळाली नाही. त्या करवी हे स्पष्ट होईल की ती लढत देणारी रा खऱ्या देवाचा मुख्य प्रतिस्पर्धी “या युगाचा देव” सैतान या ‘सर्पा’ची कास धरून होते.—२ करिंथ ४:४.
२४ त्यांना ती केवढी लज्जास्पद मानहानी मिळणार! जे करून दाखविण्याची त्यांनी आशा धरली ती धिटाईची कमाल ठरेल व तीच स्वर्ग व पृथ्वीच्या देवास न्याय्य हालचाल करण्यास उद्युक्त करील. अत्यंत क्षुद्र मानवजातीला तो म्हणू शकेल. “‘माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत; माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत. . . . कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात, आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्यांस बीज व खाणाऱ्यांस भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठविले आहे ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:८–११.
२५. तर मग, यहोवा हा आमचा “आशेचा देव” आहे या अर्थी त्याजकडे बघण्याचे उत्तम कारण आता आम्हाला का आहे?
२५ मानवाच्या या निर्मात्याने त्याला जशी संवेदना आहे तशीच मानवाच्या अंतःकरणी घातली आहे. “सेनाधीश यहोवा असे म्हणतो: ‘ज्या राष्ट्रांनी तुम्हाला लुटिले त्यांच्या प्रतापाच्या मागे याने मला पाठविले आहे. जे कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.’” (जखर्या २:८) त्यावेळी यहोवाच्या साक्षीदारांना यहोवाची आशा धरावी लागेल. आपल्या विश्वव्यापी र्सावभौमत्वाला अत्यंत सुशोभित करून तो त्या आशेची जाण व्यक्त करील. स्वर्ग व पृथ्वीच्या त्याच्या प्राणिमात्रांच्या सर्वोंच्च आशा पूर्ण करून दाखविणारा असा तोच सर्वोच्च, सर्वसमर्थ व युगानुयग देव आहे हे तो निर्विवादपणे सिद्ध करून दाखवील. हालेलूया!—स्तोत्रसंहिता १५०:६.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ राष्ट्रांची आशा भ्रामक का आहे?
◻ उत्पत्ती ३:१५ मध्ये देवाने आशेचा आधार कसा दिला?
◻ स्तोत्रसंहिता ३७:३४ च्या बाबत येशूचा पवित्रा कसा होता?
◻ आता आम्हाला आशेचे कारण का आहे?
[१८ पानांवरील चित्रं]
मेंढरे आपल्या मेंढपाळामागे जातात त्याचप्रमाणे दावीदाने यहोवाचा मागोवा घेतला व त्याची आशा धरली