वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 १२/१ पृ. ३-४
  • दिव्यदूत पूर्वीचे व आत्ताचे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दिव्यदूत पूर्वीचे व आत्ताचे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काही धर्मांतील दिव्यदूत
  • तुम्ही दिव्यदूतांवर विश्‍वास ठेवता का?
  • देवदूत—“परिचारक आत्मे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • विश्‍वासू स्वर्गदूतांसारखं वागा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 १२/१ पृ. ३-४

दिव्यदूत पूर्वीचे व आत्ताचे

“त्यांचे प्रदर्शन नाताळच्या सजावटीत केलेले असते; आम्ही त्यांना झाडावर टांगतो किंवा नाताळ भेटकार्डावर बघतो—सुंदर मुखवट्याच्या सोनेरी बाहुल्या, तंतुवाद्य किंवा चर्चचा बाजा वाजवताना किंवा मेणबत्त्या वाहताना. लहान पक्ष्याप्रमाणे त्यांना आखूड जाड पंख आहेत. शब्दशः म्हणायचे तर ते मोहक असतात.”—द संडे डेन्व्हर पोस्ट.

“दिव्यदूतांकडे वेदांती शाळात दुर्लक्ष केले जाते, शब्बाथ शाळेत उपेक्षा केली जाते व तसेच यांचा, अमेरिकेतील कॅथोलिक धर्मशिक्षणाचे मार्गदर्शक पुस्तक नॅशनल कॅटेकेटीकल शब्दकोशातील सूचित उल्लेख देखील नाही.”

अशाप्रकारे चार्ल्स डब्ल्यु बेल या धार्मिक संपादकांनी घोषित केले. त्यांनी म्हटले की काही वेदांती, खासकरुन प्रमुख प्रॉटेस्टंट चर्चना “दिव्यदूतांविषयीची अनिश्‍चितता वाटते.” द न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआने न्याहाळले की, काही आधुनिक विचारकर्ते म्हणतात, “दिव्यदूतांच्या अस्तित्वावरील सर्व विश्‍वासांना नाकारले पाहिजे.”

ही नेहमीची गोष्ट आहे असे नाही. उदाहरणार्थ, १३ व्या शतकात ज्या विद्वानांनी, दिव्यदूतांसंबंधीच्या वेदांतीय शाखेतील दिव्यदूत शास्त्राचा अभ्यास केला त्यांनी दिव्यदूतांचे “स्वरुप, बुध्दिमत्ता व इच्छा” याविषयीचे औत्सुक्य राखले होते असे म्हटले गेले आहे. खरे तर कित्येक शतके “रक्षक दिव्यदूता”साठी प्रार्थनाहि केल्या जात होत्या. परंतु, वर उल्लेखिल्याप्रमाणे नंतर या प्रवृत्तीत फरक झाला.

न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडीआनुसार “आधुनिक मनोवृत्ती दिव्यदूत . . . स्वर्गीय दंतकथा, परीकथा व मुलांच्या कहाण्या यापुरतेच मर्यादित होत आहेत.” खरेतर, १९ व्या शतकाच्या मध्यंतरात पुष्कळ लोकांच्या मनात देवदूतांना धार्मिकतेचे कमी पण ऐहिक रोमहर्षक कल्पना म्हणून अधिक स्थान होते. सध्या अनेक लोक त्यांची काल्पनिक निर्मिती असा विचार करतात. या कारणास्तव पुष्कळ लोक दिव्यदूतांचे अस्तित्व अमान्य करतात.

काही धर्मांतील दिव्यदूत

तथापि, दिव्यदूत काही धर्मात अजूनही स्थान राखून आहेत. उदाहरणार्थ, रोमन कॅथोलिक चर्च “विश्‍वासूंना प्रेम, आदर व दिव्यदूतांचा धावा” करण्यास उत्तेजन देते. वास्तविक कॅथोलिकतेने ज्यांना दिव्यदूत असे मानले त्या—मीखाएल, गाब्रिएल व रफायल—या तिघांना तर संतापर्यंत उंचावले. रफायल हा केवळ अपोक्रायफलमध्ये आढळतो, पवित्र शास्त्रात नाही.

पूर्वेकडील कर्मठ चर्चेसमध्ये दिव्यदूत हे लिटनी या प्रार्थनापध्दतीत, ज्यात धावा व विनवण्या मंडळीच्या प्रतिसादाने केल्या जातात त्यात महत्वाचे मानण्यात येतात. मुस्लीमांमध्येही दिव्यदूतांना स्थान आहे. देवदूतावरील विश्‍वास हा मुस्लीम विश्‍वासाच्या धार्मिक शिक्षणाचे एक कलम आहे.

तरीही यात संशय नाही की आमच्या दिवसात दिव्यदूतांच्या अस्तित्वावरील विश्‍वास कमी होत चालला आहे.

तुम्ही दिव्यदूतांवर विश्‍वास ठेवता का?

दिव्यदूतावरील विश्‍वासासंबंधी न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणतेः “हळुवारपणे . . . दीर्घ सुधारणेच्या व संस्कृतीच्या ओघात . . . पवित्र शास्त्रात असणाऱ्‍या कल्पनेचा, तर्काच्या तपशीलवार सुधारणेद्वारा दिव्यदूत विषयक शास्त्र विविध परिणामांनी विकसित झाले आणि विविध प्रमाणात ते चर्चचे तत्व बनले.” [तिरप्या वळणाचा प्रकार आमचा.] तुम्हाला हे कळाले की तुमचा विश्‍वास हा “तर्काच्या तपशीलवार सुधारणेवर” आधारित आहे तर मग तुम्हाजवळ असणारा दिव्यदूतांबद्दलचा विश्‍वास केवढा दृढ असणार?

चित्तवेधक गोष्ट ही आहे की या विषयावर देखील कॅथोलिक चर्चमध्ये भिन्‍न विचारसरणी दिसून येते. दिव्यदूतांना केव्हा निर्मिण्यात आले या विषयावर माहिती देताना एन्सायक्लोपिडिआ डी ला रिलिजन कॅटोलिका म्हणतेः “ग्रीक फादर्सच्या म्हणण्यानुसार दृश्‍य जगाच्या पूर्वी देवदूत निर्मिले गेले. परंतु, लॅटिन फादर्सचे सर्वसाधारण मत असे आहे की त्यांना नंतर निर्माण करण्यात आले. तरीसुध्दा अधिकांश पाठिंबा असणारे मत जगाच्या निर्मितीवेळेसच त्यांना निर्माण केले गेले असे आहे.” अशाप्रकारची अनिश्‍चितता लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करते व सध्याच्या त्यावर विश्‍वास प्रदर्शित न करण्याच्या प्रादुर्भावास मदत करते.

एक यहुदी तत्ववेत्ता फिलो याने देवदूत केवळ “विश्‍वाच्या शक्‍तीचे प्रकटीकरण” म्हणून समाधान मानले. याला पुष्कळ वर्षे झाली जेव्हा वेदान्ती लोकांनी दिव्यदूतांच्या स्वरुपासंबंधी, जसे की, किती देवदूत सुईच्या टोकावर उभे राहू शकतील अशा प्रकारच्या पोरकट प्रश्‍नांच्या वादविवादास सुरुवात केली. मग आमच्या आधुनिक युगातील पुष्कळ लोक दिव्यदूतांवर विश्‍वास न ठेवण्याचे निवडतात यात आश्‍चर्य करण्यासारखे काही आहे का?

या परस्परविरोधी कल्पनांच्या दृष्टीकोनातून पाहता, पवित्र शास्त्रास देवदूतांसंबंधी काय म्हणावयाचे आहे त्याची पारख का करु नये? हे आम्हास या प्रश्‍नांची खंबीर उत्तरे मिळविण्यास मदत देईल की, दिव्यदूत खरेच आहेत का? होय तर, मानवाच्या कारभारात त्यांनी हस्तक्षेप कधी केला आहे का? आणि अधिक महत्वाचे ते हे की दिव्यदूतांचा तुमच्या जीवनावर प्रभाव आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा