वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ५/१ पृ. १५-२०
  • एकटेपण, फलदायी जीवनी मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकटेपण, फलदायी जीवनी मार्ग
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एकटेपणाची फलदायी वर्षें
  • शुद्ध एकटेपणाची फळे
  • गत काळातील नमुने
  • आधुनिक नमुने
  • शुद्धतेतील एकटेपणा संभाळणे
  • फलदायी भविष्य
  • अविवाहित, पण देवाच्या सेवेकरिता परिपूर्ण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • ‘हे स्वीकारावे’
    आमची राज्य सेवा—२००३
  • सडेपण—अविचलित कार्याचे द्वार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ५/१ पृ. १५-२०

एकटेपण, फलदायी जीवनी मार्ग

“तिची इच्छा असेल त्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावयाला ती मोकळी आहे, जर ती तशीच राहील तर . . . ती अधिक सुखी होईल.”—१ करिंथकर ७:३९, ४०.

१. आम्ही एकटे असोत की विवाहीत आम्ही यहोवास कशाबद्दल उपकारबद्ध आहोत?

यहोवा, जे सर्व त्याला समर्पित आहेत अशा सर्वांकडून संपूर्ण जीवनाच्या भक्‍तिस पात्र आहे. विवाहीत असोत किंवा एकटे, आम्ही देवावर पूर्ण अंतःकरणाने, जिवाने, बुद्धीने व शक्‍तिने प्रीति केली पाहिजे. (मार्क १२:३०) हे खरे की जे लग्न बंधनांत संयुक्‍त आहेत अशा पेक्षा सड्या ख्रिस्तींना कमी ओढाताण असते. पण, यहोवाचा अविवाहीत सेवक खरोखरी आनंदी असू शकेल का?

२, ३. (अ) पौलाने १ करिंथकर ७:३९, ४० मध्ये जे काही म्हटले त्यातील आवश्‍यक तत्वे कोणती? (ब) कोणत्या प्रश्‍नांचा विचार होणे आवश्‍यक आहे?

२ प्रेषित पौल उत्तर देतो; होय, जे एके काळी विवाहीत होते पण ज्यांची स्थिती बदललेली आहे अशांना तो लिहितो: “नवरा जीवंत आहे तो पर्यंत बायको बांधलेली आहे, नवरा मेल्यावर तिची इच्छा असेल त्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावयाला ती मोकळी आहे, जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधीक सुखी होईल; मला वाटते मलाहि देवाचा आत्मा आहे.”—१ करिंथकर ७:३९, ४०.

३ अविवाहित लोकहि सुखी राहू शकतात असे जर पौल सुचवीत आहे, तर मग कोण शहाणपणाने, सडे राहण्याचा, मग काही काळापुरतेच का होईना, विचार करू शकतो? अविवाहीत ख्रिस्तींच्या सुखाला कशाने हातभार लागतो? वास्तविकतः, एकटेपण हा फलदायी जीवनी मार्ग कसा बनावा?

एकटेपणाची फलदायी वर्षें

४. मुलां मुलींच्या आयुष्यातील तारूण्याच्या वर्षाबद्दल काय सत्यता आहे?

४ शहाणा राजा शलमोनाने विनविले: “आता, आपल्या तारूण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, (उतार वयाचे) अनिष्ट दिवस येत आहेत. आणि अशी वर्षें जवळ येत आहेत की त्यांत ‘मला काही सुख नाही’ असे तू म्हणशील.” (उपदेशक १२:१) मुला मुलीचे आयुष्यांतील तारूण्याची वर्षे सर्वसाधारणपणे जोम आणि आरोग्यपूर्ण असतात. मग हे तेवढेच उचीत ठरेल की हे उपयुक्‍त गुण कोणत्याहि आकर्षणामागे न धावता यहोवाच्या सेवेत खर्च करावेत. शिवाय ही सुरवातीची वर्षे आयुष्यांतील अनुभव मिळविणारी आणि स्थिरता कमवणारी असतात. पण हा एक असा काळ असतो जेव्हा जगातील तरूण भावनांनी उन्मत होतात. उदाहरणार्थ, १८ ते २४ वयोगटांतील १,०७९ तरूणांच्या पाहणीचा निकाल लक्षांत घ्या. प्रत्येकजन सरासरी सात वेळां “प्रेमरोग” ग्रस्त होता आणि काहींचे म्हणणे होते त्यांचा सध्याचा प्रेमरोग अनुभवी उन्मतता नसून खरे प्रेम आहे.

५. विवाहाबद्दल, कोणाहि तरूण व्यक्‍तिने कोणत्या व्यक्‍तिगत प्रश्‍नांचा विचारविनिमय करणे हितावह ठरेल?

५ विभक्‍तता, घटस्फोट, आणि कुटुंबे मोडण्याची इतर कारणे यांचे अनुमान, कोवळ्या वयांतील लग्नाची अग्राह्‌यता स्पष्ट करते. एकटे भेटणे, प्रेमाराधना आणि विवाह यात त्वरीत पावले उचलणे, यापेक्षा तरूण ख्रिस्तींनी निदान ही तारूण्यातील वर्षे यहोवाच्या सेवेत अधीक उपयुक्‍ततेत कशी उपयोगात आणली जाऊ शकतात याचा वास्तविकतेत विचार करावा. तरूण व्यक्‍ति म्हणून तुमच्या परिस्थितीचे मुल्यमापन करितांना तुम्ही कदाचित स्वतःस असे प्रश्‍न विचारावेत: मी सध्या मनोविकारांनी एवढा उंचबळलेला प्रौढ बनलो का की आताच गंभीरपणे विवाहबद्ध होण्याचा विचार करावा? एक विवाह सोबती बनण्यास मला जीवनांतील पुरेसा अनुभव आहे का? मला विवाहानंतरच्या जबाबदाऱ्‍या आणि मुले झाल्यानंतरचा कौटुंबिक भार झेपेल का? यहोवास केलेल्या माझ्या समर्पणानुसार, केवळ लग्नाच्या भावनेने व्यग्र न होता माझ्या तारूण्याचे बळ आणि जोम ही त्याला का देऊ नये?

शुद्ध एकटेपणाची फळे

६, ७. (अ) अविवाहीत ख्रिस्तींना सर्वसाधारणपणे अनुभवास येणारे काही फायदे कोणते? (ब) याबाबतीत आफ्रिकेतील एका अविवाहीत मिशनरीने काय म्हटले आहे?

६ अविवाहीत ख्रिस्ती, भावनांच्या व्यग्रतेपासूनच्या स्वतंत्रतेचा आनंद तर अनुभविल शिवाय स्वतःस “प्रभूच्या कामांत सर्वदा अति तत्पर” ठेवील. (१ करिंथकर ७:३२–३४; १५:५८) विरूद्ध लिंगातील केवळ एकाच व्यक्‍तिकडे लक्ष केंद्रित करून राहण्यापेक्षा, ख्रिस्ती प्रेमात अधीक विस्तृत बनून स्डी व्यक्‍ति मंडळीतील अनेकांकडे, खास करून वयस्करांकडे व गरजवंताकडे, लक्ष पुरवू शकेल. (स्तोत्र ४१:१) साधारणतः एकट्या व्यक्‍तिस देववचनांचा अभ्यास व त्यावर मनन करण्यास अधीक वेळ असतो. (नीतिसुत्रे १५:२८) यहोवाशी घनिष्ठ संबंध वाढविण्याची, त्याजवर सर्वस्वी विसंबून राहण्याचे शिकण्याची, व त्याचे मार्गदर्शनाचा मागोवा घेत राहण्याची सुलभ संधी असते. (स्तोत्र ३७:५; फिलिपैकर ४:६, ७; याकोब ४:८) ज्याने मिशनरी म्हणून आफ्रिकेत अनेक वर्षे यहोवाची सेवा केली अशा एका अविवाहीत पुरूषाने म्हटले:

७ “या सर्व वर्षांत, आधुनिक संस्कृतीचे कोणतेहि आकर्षण न वाटता आफ्रिकेतील ते ग्रामस्थ जीवन अगदी साधेपणातील होते. देव वचनांचा अभ्यास करून त्यावर मनन करण्यास भरपूर वेळ मिळे. यामुळेच मी सबळ राहू शकलो. होय, जडवादाच्या विरूद्धतेत मिशनरी जीवन हे, वास्तवीकतेत आशिर्वाद आणि संरक्षण ठरले. उष्ण ऋतुतील त्या मोकळ्या वनांतील सुखद सायंकाळच्या वेळी यहोवाच्या सृष्टीकृत्यांवर मनन करण्यास व त्याच्या अधीक समीप जाण्यास बराच वेळ मिळे. दर दिवशी सायंकाळी मी एकटाच जागा असेपर्यंत, नभोमंडळातील ताऱ्‍यांकडे पाहात शत पाऊल करतांना यहोवाशी बोलण्यात फार आनंद वाटे. याने मला यहोवाच्या अधीक नजीक आणले.”

८. एकटेपणाबद्दल, संस्थेच्या मुख्य केंद्रात अनेक वर्षें सेवा करणाऱ्‍या एका अविवाहीत भागिनीने काय म्हटले आहे?

८ एका सड्या भगिनीचे हे उद्‌गारहि लक्षांत घेण्याजोगे आहेत, जिने अनेक वर्ष वॉचटॉवर संस्थेच्या केंद्रिय दप्तरपरिसांत काम केल्यानंतर म्हटले: “यहोवाच्या सेवेत असेच एकटेपणांत जीवन घालविण्याचा मी स्वतः निर्णय घेतला. पण मला कधी एकटे भासले का? कधीच नाही. प्रत्यक्षांत, जो वेळ एकांतवासांत घालविते तो फार मोलाचा आहे. मी प्रार्थनेद्वारा यहोवाशी बोलणी करते. मला, मनन करणे व वैयक्‍तिक अभ्यास करणे अगदी निवांतपणे जमते . . . एकटेपणाने माझ्या आनंदात काहीही विरजण घातले नाही!”

९. सेवेतील असे कोणते खास हक्क आहेत जे कदाचित फक्‍त सडे ख्रिस्ती अनुभवू शकतील?

९ सडी व्यक्‍ति, अशा काही विशिष्ठ सेवा हक्कांचा स्विकार करू शकते ज्या विवाहीतांना, त्यांचेवरील कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमुळे मिळू शकत नाहीत. उदाहरणार्थ, जेथे राज्य घोषकांची मागणी अधीक मोठी आहे अशा भागांत पायनियर म्हणून सर्व वेळेची सेवा करण्याच्या हांकेस होकार देऊन ती संधी साध्य करणे किंवा कोणा सड्या तरूणास, वॉचटावर संस्थेच्या मुख्य किंवा शाखादप्तरांना जोडून जे बेथेलगृह असते तेथील कुटुंबियांच्या समवेत सेवा करता येईल. कोणी अविवाहीत तरूणी त्यांच्या स्थानिक मंडळीतील कोणा वयस्कर पायनियर भगिनीचा साथ मिळवून जे क्षेत्र, सेवेकरिता बाकी असेल तेथे काम करू शकतात. या प्रकारच्या सुविधांबाबत विभागिय सेवकांसोबत बोलणी का करू नये? अविवाहीत ख्रिस्ती असता यहोवाच्या गौरवार्थ अधीकाधीक सेवा करण्यात स्वतःस उपलब्ध करा, आणि तो तुम्हांवर समृद्ध आशिर्वाद पाठवील.—मलाखी ३:१०.

गत काळातील नमुने

१०. यहोवाच्या अविवाहीत सेवकात कोणाचे प्रमुख उदाहरण आहे, व त्याचे एकटेपण हितावह होते असे विचारात का आणता?

१० यहोवाच्या सेवकांतील अविवाहीतांमधील सर्वथोर नमुना येशू ख्रिस्त होता. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात तो सर्वस्वी गढलेला होता. “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) तो सतत, उपदेश करण्यांत, बरे करण्यात आणि तत्सम कामात केवढा मग्न असे. (मत्तय १४:१४) येशूठायी लोकांबद्दल खरी आस्था होती आणि तो पुरुष, स्रियां आणि मुले यांच्या पुढ्यात अगदी मोकळेपणाने वागे. वास्तविक, तोहि, त्याच्या उपाध्यपणाच्या प्रवासात अनेक वेळा इतरांना संगतीत ठेवी. (लूक ८:१–३) पण तेच जर त्याची बायको व लेकरे असती तर ही सर्व हालचाल केवढी अवघड, त्रासदायक बनली असती. यात प्रश्‍नच नाही की, एकटेपण हे येशूकरिता केवढे हितावह ठरले. आजहि जो सडा ख्रिस्ती तो त्याचप्रकारच्या फायद्यांना अनुभवू शकतो, खासकरून जर राज्य प्रचारार्थ दूरच्या स्थळी किंवा धोक्याच्या परिसांत सेवा करण्याची हाक असेल तर अधीक बरे!

११, १२. आज यहोवाच्या सेवेत असलेल्या सड्या स्त्रियांकरिता कोणती छान उदाहरणे दिली आहेत?

११ तसेच इतरांनाहि एकटेपण व्यवहारीक आणि फायदेकारक वाटले. ज्या समाजांत विवाह आणि मुले प्रसविणे या गोष्टीवर अधीक जोर दिला जाई अशांचेमध्ये आपल्या पित्याचे वचन पुरे करण्यास, इफ्ताहाची सुपुत्री स्वच्छेने सडी राहिली. यहोवाच्या सेवेत राहण्यात तिने आनंद मानला व हे लक्षांत घेण्यासारखे आहे की इतरांनी नियमितपणे तिला उत्तेजन दिले. “इस्राएली कन्या गिलादी इफ्ताह याच्या कन्येचे माहात्म्य गाण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात.” (शास्ते ११:३४–४०) याच प्रकारे, आज ज्या एकट्या स्त्रिया यहोवाची सेवा धाडसाने करीत आहेत त्यांची विवाहीत ख्रिस्तींनी व इतरांनीहि प्रशंसा करावी.

१२ फिलिप्पच्या चार कुमारी मुली “ईश्‍वरी संदेश देत असत.” (प्रे. कृत्ये २१:८, ९) या अविवाहीत स्त्रीयांनी यहोवाच्या गौरवार्थ केलेल्या उत्साहि सेवेत खरे समाधान मिळविले. त्याच तुलनेत आजहि अनेक, तरूण एकट्या स्त्रियाकरिता पायनियर, सर्व वेळेची राज्य प्रचारसेवा करण्याची उत्तम संधी आहे. “मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्‍या स्त्रियांची मोठी सेना,” हिचे सहभागी म्हणून ज्या सर्व ते करीत आहेत त्यांची प्रशंसा झाली पाहिजे.—स्तोत्र ६८:११.

१३. कशाप्रकारे पौलाचे उदाहरण हे स्पष्ट करते की एकटेपण हे फलदायी जीवनी मार्ग बनू शकते?

१३ प्रेषित पौलास एकटेपण फायदेकारक वाटले. त्याच्या उपाध्यपणात त्याने हजारो मैलांचा प्रवास केला आणि अनेक संकटांना तोंड दिले व जागरणे, भूकतहानेचा तडाखा सहन केला. (२ करिंथकर ११:२३–२७) यांत संशय काय की, पौल जर विवाहीत असता तर हे सर्व केवढे अवघड बनले असते. याशिवाय, हे कदापि, शक्य नव्हते की त्याला “विदेशी लोकांचा प्रेषित” बनण्याची संधी प्राप्त झाली असती. (रोमकर ११:१३) ज्या सर्व परिक्षांना त्याने तोंड दिले त्यांचे व्यतिरिक्‍त पौलापाशी हा पुरावा होता की एकटेपण फलदायी जीवनी मार्ग बनु शकतो.

आधुनिक नमुने

१४. ज्यांचेपैकी बहुतेक अविवाहीत होते अशा कोलपोर्टरांना कोणते आनंदविणारे अनुभव आले?

१४ सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांतील पौल आणि इतर अविवाहित सारखे (इ.स. १८८१ पासून पुढे) देवाच्या लोकांतून असे अनेक होते जे कौटुंबिक जबाबदारीखाली नसलेल्या सड्या व्यक्‍ति होत्या व ‘कोलपोटर’ म्हणजे सर्ववेळची सेवा करण्यांत मग्न होते. ते स्वच्छेने अपरिचीत देशास, नगरांना व ग्रामीण भागांत गेले व सदेच्छुना शोधून त्यांना पवित्र शास्त्रीय प्रकाशने देत. त्यांचा प्रवास काही वेळा आगगाडीने, सायकलवर, घोडागाडीने किंवा मोटारने होई. बहुतेक ते घरोघरची सेवा पायीं फिरून आनंदाने करीत. (प्रे. कृत्ये २०:२०, २१) “काही वेळा ते [पवित्र शास्त्रीय प्रकाशन] देण्याघेण्यात व्यवहार करीत, काहीं शेतीची उत्पादने, कोंबडीची पिल्ले, साबण यांसारख्या वस्तुंचा स्विकार करून प्रकाशने देत. काही वेळा ह्‍या वुस्तु ते इतरांना विकत.” असे एक यहोवाचा साक्षीदार आठवतो, “काही वेळा, तुरळक वस्तीच्या भागांत ते शेतकरी किंवा धनगरांच्या घरी मुक्कामास राहात व अनेकवेळा तर गवताच्या गंज्यावर झोपत . . . हे विश्‍वासू सेवक (ज्यांच्यापैकी बहुतेक अविवाहीत होते) वर्षानुवर्षे म्हणजेच वयस्कर होईपर्यंत सेवा करीत होते.” त्यांच्या पैकी एक जुन्या काळांतील कोलपोटर आपल्या लिखाणांत म्हणते: “आम्ही तरूण व सेवेत आनंदी होतो व याव्हेच्या सेवेत आपले सर्व बळ खर्चण्यास उत्सुक होतो.”

१५. सुमारे ४५ वर्षांआधी अनेक अविवाहित पायनियरांकरिता अधीक विस्तारीत हालचालीचा कोणता दरवाजा उघडला गेला?

१५ अनेक पायनियर्स, म्हणजेच राज्याचे सर्ववेळ घोषक, कालांतराने अविवाहीतच राहिले. ते, विरळ, विरळ स्थळी जाऊन साक्षीकार्य करीत, नवीन मंडळ्याची सुरवात करण्यांत मदत करत तसेच यहोवाच्या सेवेतील इतर आशिर्वादांचा आनंद लुटीत. त्यांचेतील काहीं जनाकरिता, दुसरे जागतिक महायुद्ध कहर माजवीत असता १९४३ मध्ये वॉच टॉवर बायबल स्कुल ऑफ गिलीयडची जी सुरवात झाली तिजमुळे शिरशिरी भरविणाऱ्‍या सर्वथोर हालचालीचे द्वार उघडले. (१ करिंथकर १६:९) होय, त्या अविवाहीत पायनियरांपैकी अनेकांना गिलीयड शाळेतील मिशनरी कामाचे शिक्षण देण्यांत आले व राज्य संदेश प्रचारार्थ नवीन क्षेत्रांवर पाठविले. कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांचा अडथळा समोर नसल्यामुळे यहोवाच्या सेवेकरिता ते स्वतःस उपलब्ध करू शकले आणि सुरवातीच्या पदवीधरांपैकी काही अद्याप एकटे आहेत तरी मिशनरी क्षेत्रांत किंवा सर्ववेळच्या कोणा तरी सेवेत क्रियाशील आहेत.

१६. असा कोणता पुरावा आहे की बेथेल कुटुंबातील अविवाहीत सदस्यांना एकटेपण हे फलदायी जीवनी मार्ग असल्याचे दिसले?

१६ अनेक अविवाहीत ख्रिस्ती वॉच टॉवर सोसायटीच्या मुख्य कार्यालयास तसेच त्याच्या जगभर पसरलेल्या शाखांना जोडून असलेल्या बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून अनेक वर्षें सेवा करीत आहेत. अशांना एकटेपण हे फलदायी जीवनी मार्ग असल्याचे आढळले का? होय, खरोखरी आढळले. उदाहरणार्थ, ज्याने अनेक वर्षे अमेरिकेतील ब्रुकलीन बेथेलमध्ये अनेक प्रकारची सेवा केली तो म्हणतो: “देव वचनांतील संदेश बाळगणारी करोडो मासिके, पाक्षिके व इतर प्रकाशने तयार होऊन पृथ्वीच्या चारी दिशांना पाठविली जात आहेत हे पाहण्याचा आनंद लुटणे हेहि स्वतः एक केवढे विस्मयकारक दान आहे.” बेथेल सेवेत ४५ वर्षांच्या सेवेनंतर, एक अविवाहीत बंधू म्हणतो: “दर दिवशी मी प्रार्थनेत आपल्या प्रिय स्वर्गीय पित्याकडे, त्याच्या पवित्र इच्छेनुसार सर्व काही करीत राहण्याकरिता आत्मिकपणे व शारीरिक आरोग्यांत सुदृढ व खंबीर राहावे म्हणून मदत आणि सुज्ञानाची मागणी करतो . . . मी खरोखरी सुखद, फलदायी आणि आशिर्वादीत जीवनी मार्गाचा आनंद अनुभविला आहे.”

शुद्धतेतील एकटेपणा संभाळणे

१७. शुद्धतेतील एकटेपण संभाळण्यातील दोन मदतनीस कोणते आहेत?

१७ एकटेपणातील जीवन केवढे फलदायी बनु शकते याचे पुरावे पवित्र शास्त्रातून तसेच आधुनिक उदाहरणांतूनहि सापडतात. हे खरे की, तुमच्या जीवनातील जो काळ तुम्ही सडेपणात घालवाल त्यांत ‘अंतःकरणाने स्थिर असणे’ अगत्याचे आहे. (१ करिंथकर ७:३७) याशिवाय, अविवाहीतावस्थेत असता आपली शुद्धता कशी राखू शकाल? सहाय्याचे सर्वथोर उगमस्थान, यहोवा, “जो प्रार्थना ऐकतो,” तो आहे. (स्तोत्र ६५:२) यास्तव त्याजकडे वारंवार याचना करण्याची स्वतःस संवय लावा. देवाचा आत्मा आणि त्याची फळे, ज्यांत शांति आणि आत्मसंयमन यांचहि समावेश आहे ती प्रदर्शित करण्यातील मदतीकरिता “प्रार्थनेत तत्पर” असा. (रोम १२:१२; लूक ११:१३; गलतीकर ५:२२, २३) त्यानंतरहि, नियमितपणे त्यावर चिंतन करा शिवाय देववचनातील उपदेश सतत आचरीत असा.

१८. अविवाहीत व्यक्‍ति म्हणून शुद्ध राहण्यांस १ करिंथकर १४:२०चा संबंध कसा असतो?

१८ शुद्धतेतील एकटेपण राबविण्यातील दुसरा पर्याय म्हटल्यास ज्याद्वारा लैंगिक भावनांचा उद्रेक वाढेल ते सर्व टाळणे. यात पॉअर्नाग्रफिचे बीभस्त साहित्य आणि अनीतीमान मंनोरंजन हे सहाजिकच समाविष्ठ आहे. पौलाने म्हटले: “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलांसारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढ असे व्हा.” (१ करिंथकर १४:२०) जे सर्व दुष्कर्मीय त्याची ज्ञानप्राप्ति किंवा अनुभव घेण्यामागे लागू नका तर यागोष्टींबाबात देवाकडिल मदतीने सूज्ञतेत लहान बाळासमान अडाणी व अज्ञान राहा. सोबतच हे आठवणीत ठेवावे की अनीती आणि अपराध यांचा यहोवास वीट आहे.

१९. सडी व्यक्‍तिचे शुद्धतेत राहण्यात कोणती शास्त्र वचने इतर गुणांकडेहि अंगुली दाखवितात?

१९ तसेच तुम्ही जर आपल्या संगतीबद्दल कटाक्षाने दक्षता बाळगली तर तिजकरवीहि अविवाहित अवस्थेतील शुद्धता राखून ठेविण्यात सहाय्य होईल. (१ करिंथकर १५:३३) जे कोणी लिंग विशिष्ठता व विवाहास आपल्या जीवनांत व बोलण्यात नेहमीच प्राधान्य देऊन असतात अशांची संगत टाळा. सर्वाअर्थांची विचकट थट्टा करण्यांपासून तीत सामील होण्यापासून दुर राहा: “जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचा तुम्हांमध्ये उच्चारहि न होवो; हे पवित्र जनांस शोभते. तसेच अमंगळपण, बाष्फळगोष्टी व टवाळी ह्‍यांचाहि न होवो. ती उचित नाहीत; तर त्यांऐवजी ईशोपकारस्मरण होवो.”—इफिसकर ५:३, ४.

फलदायी भविष्य

२०. यहोवाच्या सेवेत एकटेपणांतील अनेक वर्षांना उत्तम मार्गी उपयोग करण्याचा परिणाम कशात होईल?

२० यहोवाच्या सेवेत यथाशक्‍ति जेवढे करता येईल तेवढे करण्यात अविवाहीत ख्रिस्ती जेवढी वर्षे खर्चील त्यांत त्याला सद्य काळातहि समाधान आणि विचार शांती ही प्राप्त होतील. तुम्ही जर या दुष्ट व्यवस्थिकरणाच्या अंतापर्यंत सडे राहिला तर त्याच्या पवित्र सेवेकरिता तुम्ही जे स्वसमर्पणाचे परिश्रम उचलले त्यांचा यहोवाला कधीहि विसर पडणार नाही.

२१. काही काळ शुद्धतेतील व फलदायी एकटेपण अनुभविल्यानंतर जर विवाहबद्ध होणेच असले तर केवळ कोणाबरोबर लग्नबंधनांत संयुक्‍त व्हावे?

२१ अविवाहीत पुरुष किंवा स्त्री म्हणून तुम्ही राज्य आस्थेमागे मेहनतीने सेवा करीत राहिल्यास, अनेक आशिर्वादांचा आनंद लुटाल. (नीतीसूत्रे १०:२२) नतंर कधी जरी विवाह करावासा वाटला तर तुम्ही त्या विवाह बंधनांत अधीक अनुभवांसह आणि समृद्ध आध्यात्मिक पाठबळाने प्रवेश कराल. याशिवाय, शास्रवचनांतील उपदेशाकडे लक्ष देऊन अनुसरीत राहिल्यास तुम्ही अशी समर्पित, सचोटीत टिकलेली सोबतीन निवडाल ती तुमचे देवाची सेवा निष्ठावंतपणे करीत राहण्यात मदत करील. मध्यंतरी, आमचा प्रेमाळू देव, यहोवा याच्या सेवेतील एकटेपणाची वर्षें प्रत्यक्षात फलदायी जीवनी मार्ग ठरतील.

तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?

◻ यहोवाच्या सेवकांमध्ये शुद्ध एकटेपणाची काही फळे कोणती आहेत?

◻ एकटेपण फलदायी असू शकते अशी काही शास्त्रवचनीय उदाहरणे कोणती आहेत?

◻ आधुनिक काळांत, एकटेपणाच्या फलदायीत्वाची कोणती उदाहरणे आहेत?

◻ अविवाहीतावस्थेत शुद्ध राहण्यात ख्रिस्ती व्यक्‍तिला कसले सहाय्य मिळू शकते?

[१९ पानावरील चौकट]

शुद्ध एकटेपण संभाळण्यातील सहाय्यक गोष्टी

◆ देवाच्या आत्म्याकरिता व त्याची फळे प्रदर्शित करण्यातील मदतीकरिता नियमित प्रार्थना करा.

◆ देववचनांतील उपदेशाचे चिंतन करा व नेहमी त्याचाच अवलंब करा.

◆ पॉअर्नाग्राफिचे बीभत्स लिखान–चित्रे–चित्रपट आणि अनीतीचे मनोरंजन टाळा.

◆ संगतीबाबत सावध असा.

◆ घाणेरडे बोलणे आणि विचकट थट्टा करणे टाळा.

[१८ पानांवरील चित्रं]

इफ्ताहाची कन्या, प्रेषित पौल आणि यहोवाच्या इतर सेवकांना एकटेपण हा जीवनी मार्ग असल्याचे आढळून आले. तुम्हाला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा