यिर्मया देवाचा न्यायदंड वदविणारा अप्रिय संदेष्टा
इश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेसाठी यिर्मयाच्या पुस्तकातील शास्त्रभागाचे साप्ताहिक वाचन जून १२ ते ऑक्टोबर १६ पर्यंत योजिलेले आहे. संदेष्ट्याच्या लिखाणाच्या समज प्राप्तीकरता हे अभ्यासाचे दोन लेख आणि जून १९८८च्या अंकात प्रसिद्ध होणारा तिसरा लेख सुंदर पार्श्वभूमि देतील
“मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी . . . मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे.”—यिर्मया १:५.
१. (अ) गत गोष्टींचा विचार करताना काहींना यिर्मयाबद्दल काय वाटते? (ब) पण त्याला स्वतःबद्दल काय वाटले होते?
“संदेष्ट्यांच्या समूहात यिर्मया उठून दिसतो.” एका पवित्र शास्त्र प्रामाण्यांनी केलेले हे विवेचन स्वतः यिर्मयाला यहोवाकडून यहुदा व राष्ट्रांचा संदेष्टा या अर्थी प्रथमच नेमणूक मिळाल्यावर त्याला जे वाटले होते त्याविषयीचा मोठा फरक दाखविणारे आहेत. यिर्मयाने म्हटले होते: “अहा, प्रभु यहोवा, पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही. मी केवळ बाळ आहे.” यिर्मयाला येथे आपल्या तरूणपणाविषयी तसेच विरोधी राष्ट्रांकरवी प्रस्तुत असणारे आव्हान याविषयीची केवढी जाणीव होती ते त्याच्या या उद्गारांद्वारे कळते. तरीपण यहोवाला वेगळेच वाटत होते.—यिर्मयाह १:६.
२. यहोवाने यिर्मयामध्ये आत्मविश्वास कसा रोवला?
२ यहोवाने तरूण यिर्मयासोबत जे भाष्य केले त्याद्वारे हे कळते की तो त्या काही जणांपैकी एक होता ज्याचा जन्म घडवून आणण्याविषयीची जबाबदारी यहोवाने घेतली होती. पण यहोवाने यिर्मयाची गर्भधारणा होण्यापासून पुढे एवढी आस्था का दाखवली बरे? कारण यहोवाने त्याच्यासाठी खास नेमणूक राखली होती. या कारणामुळेच तो म्हणू शकला: “तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले.” (यिर्मया १:५) त्यानंतर त्याने या तरूणाला म्हटले: “‘मी बाळ आहे’ असे म्हणू नको. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याजकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यांस भिऊ नको, ‘तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.’ असे यहोवा म्हणतो.” यास्तव त्याने आपल्या नेमूणकी विषयी कसलेही दुटप्पी धोरण बाळगावयाचे नव्हते. त्यात धैर्यवान होऊन यहोवावर भिस्त ठेवण्याची हाक होती.—यिर्मया १:७, ८.
३. यिर्मयाला लाभलेली नेमणूक मोठी आव्हानात्मक का होती?
३ देवाकडून ही थेट नेमणूक आपल्याला मिळते आहे हे बघून तो तरूण केवढा अचंबित व भारावला गेला असावा! शिवाय ती नेमणूक सुद्धा केवढी प्रबळ स्वरूपाची होती! “पहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमिले आहे.” इ. स. पूर्वीच्या सातव्या शतकाच्या मध्यात यहुदामध्ये काढलेल्या या उद्गारांमुळे त्या तारूण्यात बहरत असलेल्या संदेष्ट्यावर मोठीच जोखीम टाकली. त्याला गर्विष्ठ, आत्मसंतुष्ट आणि पवित्र नगर यरूशलेम व त्याचे मंदिर हे संरक्षण देणारे सामर्थ्य वाटणाऱ्या राष्ट्राला तोंड द्यावयाचे होते. यरूशलेमात आपले ४० वर्षांचे भविष्यवादित उपाध्यपण पार पाडताना त्याला आपला संदेश योशीया, यहोआहाज, यहोयाकीम, यहोयाखीन आणि सिद्किया या वेगवेगळ्या पाच राजांच्या राजकीर्दीत सादर करावा लागणार होता. त्याला यहुदा आणि बाबेलोनी राष्ट्रांना अप्रिय असा निषेधात्मक न्यायदंड जाहीर करावा लागणार होता.—यिर्मया १:१०; ५१: ४१–६४.
यिर्मयाच्या घटना आम्हाला आस्थेच्या का वाटाव्या?
४, ५. (अ) यिर्मयाच्या काळातील घटना आज आम्हास चिंतनीय का आहेत? (रोमकर १५:४) (ब) कोणता खास अवलंब आम्हाला आस्थेचा वाटतो?
४ पण आम्हास विचारावेसे वाटेल की, आम्ही आता विसाव्या शतकाच्या अंतास आलेलो असता त्यामागे घडलेल्या घटनांचा काय संबंध असावा? प्रेषित पौलाने करिंथच्या मंडळीस लिहिलेल्या पत्रात इस्राएली इतिहासाच्या काही भागाची उजळणी करताना याविषयीचे उत्तर दिले आहे. त्याने लिहिले: “ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणांदाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरिला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. . . . आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहंचलो आहोत त्या आपल्या इशाऱ्यासाठी त्या लिहिल्या आहेत.”—१ करिंथकर १०:६, ११.
५ या समाप्तीकाळात असलेल्या खऱ्या ख्रिस्ती मंडळीकरता इस्राएल व यहुदा यात घडलेल्या घटना इशारा देणारी उदाहरणे आहेत. यात आपल्याला भावी घटनांची चुणूक दर्शविणाऱ्या समांतरता व नमुने सुद्धा दिसतील. (पडताळा यिर्मया ५१:६–८ आणि प्रकटीकरण १८:२, ४) या कारणास्तव यिर्मयाचे भविष्यवादित कार्य व यरूशलेमाच्या बाबतीत घडलेल्या घटना आजच्या यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या ख्रिस्ती धर्मराज्याच्या क्षेत्रातील कार्याच्या अनुषंगाने खासपणे मोठ्या अभुतपूर्व आहेत, जे आपल्याला नंतरच्या लेखांमध्ये दिसेलच.
यहोवाच्या न्यायदंडाची यिर्मयाने केलेली निर्भिड घोषणा
६. यिर्मयाला लाभलेली नेमणूक कशामुळे खडतर झाली तरी त्याला कोणते उत्तेजन मिळाले?
६ यिर्मयाला त्याच्या प्रचंड जबाबदारीकरता अधिक दृढ करावे यासाठी यहोवाने त्याला आणखी असे म्हटले: “ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग; त्यांस घाबरू नको. . . . पाहा, आज या सगळ्या देशांविरूद्ध, यहुदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक यांविरूद्ध तुला मी तटबंदीचे नगर . . . असे करितो.” यिर्मया, यहुदाचे शासनकर्ते व याजक यांना तोंड देता यावे याकरता तटबंदीच्या नगराप्रमाणे मजबूत बनणार होता यात काही संशय नव्हता. शिवाय लोकांना अप्रिय व आव्हानपर संदेश देणे हे सोपे काम ठरणार नव्हते.—यिर्मया १:१७, १८.
७. यहुदी शासनकर्ते यिर्मयाचा सामना का करणार होते?
७ “ते तुजबरोबर निश्चये सामना करतील,” असे यहोवाने बजावले, “पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही.” (यिर्मया १:१९) त्या यहुद्यांना व त्यांच्या शासनकर्त्यांना या संदेष्ट्यांविरूद्ध का लढत द्यावी लागणार होती? यिर्मयाने तर त्यांच्याविरूद्ध लढण्याचा पवित्रा स्वतः उभा केला नव्हता, तर ‘पाहा, यहोवाचे वचन त्यांस निंदास्पद झाले होते व त्यांत त्यांस काही संतोष वाटत नव्हता. लहानथोर सर्व स्वहिताला हापापले होते. संदेष्ट्यापासून याजकापर्यंत (ज्यांनी खरे पाहता नैतिक व आध्यात्मिक मूल्ये राखून ठेवायची होती तेच) सगळे कपटाचा व्यवहार करीत होते.’—यिर्मया ६:१०, १३.
८. याजक व संदेष्टे लोकांना कसे फसवीत होते?
८ हे खरे की ते यज्ञयाग करण्यात राष्ट्राचे नेतृत्व करीत होते. ते खऱ्या भक्तिच्या वहीवाटीतून स्वतःला नेत होते पण त्यांची अंतःकरणे त्यामध्ये जडलेली नव्हती. योग्य वागणूकीपेक्षा निव्वळ विधी त्यांना महत्वाचे वाटत होते. याच सुमाराला यहुदी धार्मिक पुढारी, खरी शांती उपलब्ध नसताना, “शांती, शांती असे म्हणून” राष्ट्राला सुरक्षेच्या खोट्या आशेत झुलवीत होते. (यिर्मया ६:१४; ८:११) होय, ते लोकांना, तुम्ही देवासोबत खरेच शांतीसौख्यात आहात असे संबोधून त्यांची फसवणूक करीत होते. आपण यहोवाचे उद्धारित लोक आहोत, आपल्यापाशी त्याचे पवित्र नगर व मंदीर आहे यामुळे आपल्याला कसलीही चिंता करण्याचे कारण नाही असे त्यांना वाटत राहिले होते. पण यहोवाला देखील असेच वाटत होते का?
९. उपासकांना त्यांच्या मंदिराविषयी यिर्मयाने कोणता इशारा दिला?
९ यहोवाने यिर्मयाला, तो तमाम लोकांस दिसू शकेल असा मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहण्यास सांगितले व मंदिरात प्रवेश करणाऱ्या उपासकांना देवाचा संदेश घोषित करायला सांगितले. त्याने लोकांना असे सांगायचे होते: “‘हे यहोवाचे मंदिर, हे यहोवाचे मंदिर, हे यहोवाचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. . . . यापासून काही लाभ नाही.” मंदिराविषयीची घमेंड आपल्या अंतःकरणी राखून ते यहुदी विश्वासाने नव्हे तर डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत होते. ते यहोवाचे हे इशारेवजा शब्द विसरले होते: “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही मजसाठी कशाप्रकारचे घर बांधणार?” या प्रचंड विश्वाचा र्सावभौम प्रभु यहोवा, मंदीर कितीही दिमाखी असले तरी त्याच्या चार कोपऱ्यात निश्चितच बंदिस्त असणार नव्हता!—यिर्मया ७:१–८; यशया ६६:१.
१०, ११. यिर्मयाने ज्या राष्ट्राचा धिक्कार केला होता त्याची आध्यात्मिक दशा कशी होती आणि ख्रिस्ती धर्मराज्यातील स्थिती यापेक्षा काही वेगळी आहे का? (२ तिमथ्यी ३:५)
१० यिर्मयाने आपला जाहीर दंशपूर्ण वाग्दंड चालू ठेवला: “हे काय, तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता खोटी शपथ वाहता, बालाच्या मूर्तीस धूप दाखविता व ज्यास तुम्ही ओळखीत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता, आणि मग . . . ‘आमची मुक्ति झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करावयास आम्हास हरकत नाही,’ असे मनात म्हणता?” देवाचे ‘निवडलेले लोक’ या नात्याने यहुद्यांना वाटले की ते त्याच्या मंदिरात यज्ञार्पणे आणीत राहीले तर त्यांची कसलीही वागणूक तो चालवनू घेईल. त्यांनी देवाबद्दल, एकुलत्या एका मुलास लाडाने वागवून बिघडविणारा बाप अशी धारणा करून घेतली होती तरी त्यांचे डोळे भयप्रद गोष्टीकरता खाडकन उघडले जाणार होते.—यिर्मया १७:९, १०; निर्गम १९:५, ६.
११ यहोवाच्या दृष्टीने यहुदाची उपासना इतक्या नीचावस्थेत गेली होती की हा विध्वंसकारी प्रश्न अत्यंत उचितपणे विचारला जाऊ शकत होता: “माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारुंची गुहा झाले आहे काय?” यानंतर सुमारे ७०० वर्षानी सुद्धा परिस्थिती व्हावी तितकी सुधारली नाही कारण यिर्मयापेक्षा थोर असणारा संदेष्टा येशू याने हेच शब्द, पुनर्बांधणी झालेल्या मंदिरात त्याच्या काळी जी पिळवणूक व जो व्यापार चालविला जात होता त्याच्या निषेधार्थ उद्गारले. याचप्रमाणे आजच्या ख्रिस्ती धर्मराज्यातील परिस्थिती देखील चांगली नाही.—यिर्मया ७:११; मत्तय १६:१४; मार्क ११:१५–१७.
पहारेकऱ्यांना दुर्लक्षिले गेले, विपत्ती भाकीत करण्यात आली
१२. यहोवाने यहुद्यांकडे ज्या संदेष्ट्यांना पाठविले होते त्याविषयी त्यांनी कशी प्रतिक्रिया व्यक्त केली?
१२ इस्राएल व यहुदा यांना त्यांच्या खोट्या मार्गाक्रमणाबद्दल इशारा देण्यात देवाने ज्या संदेष्ट्यांचा वापर केला होता त्यात यिर्मया पहिला नव्हता. त्याच्या गेल्या शंभर वर्षे किंवा अधिक काळी यशया, मीखा, होशेय आणि ओदेद या संदेष्ट्यांना पहारेकरी या अर्थाने राष्ट्राला इशारा देण्याकरता पाठविण्यात आले होते. (यशया १:१; मीखा १:१; होशेय १:१, २; २ इतिहास २८:६–९) त्या काळात बहुतेकांनी कसा प्रतिसाद दाखविला? “मी तुम्हावर पहारेकरी ठेवून तुम्हास म्हटले: ‘रणशिंगाचा शब्द ऐका!’ पण ते म्हणाले: ‘आम्ही ऐकत नाही.’” (यिर्मया ६:१७; ७:१३, २५, २६) त्यांनी यिर्मयाचे देखील ऐकून घेतले नाही. उलटपक्षी, त्यांनी त्याचा छळ करून त्याला स्तब्ध बनविण्याचा प्रयत्न केला. या कारणास्तव, यहोवाने त्यांचा उद्धटपणा व अविश्वास याविषयीचा मोबदला त्यांना देण्याचे निश्चित केले.—यिर्मया २०:१, २; २६:८, ११; ३७:१५; ३८:६.
१३. राष्ट्राचा न्यायनिवाडा करण्यासाठी देवापाशी कोणता आधार होता?
१३ राष्ट्रांनी आपल्या संदेशवाहकांचा धिक्कार केला याविषयीची प्रतिक्रिया व्यक्त करावी म्हणून यहोवाने पृथ्वीरील राष्ट्रांना जणू हे आव्हान असे म्हणून केले: “अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती त्यांजवर आणीन, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे.” या राष्ट्राला विपत्ती का सहन करावी लागणार होती? आपल्या चुकीच्या विचार प्रवृत्तीमुळे त्यांनी जी वाईट कृति आचरली होती त्यामुळे. त्यांनी यहोवाचे वचन व त्याचे नियमशास्त्र त्यागून आपल्या स्वतःच्या स्वार्थी व दैहिक इच्छा आकांक्षांचा पाठपुरावा धरला होता.—यिर्मया ६:१८, १९; यशया ५५:८, ९; ५९:७.
१४. त्यांच्या खोट्या उपासनेने कितपत मजल मारली? (पडताळा २ इतिहास ३३:१–९)
१४ याचप्रमाणे ते यहुदामध्ये कसले आचरण करीत होते की ज्यामुळे यहोवाचा कोप त्यांच्यावर भडकला? ते “आकाश राणीप्रीत्यर्थ [यज्ञार्पणाच्या] पोळ्या” करीत होते. यहोवास हेतुपुरस्सर दुखवावे यासाठी ते अन्य देवांस पेयार्पणे देत होते. यामुळेच यहोवा हे रास्तपणे विचारतो: “ते मला संताप आणितात किंवा स्वतःला संताप करून घेऊन आपले तोंड काळे करतात?” (यिर्मया ७:१८, १९) एवढे होते तरी त्यांची निंद्य कृत्ये अधिकच खालावत गेली—यहोवाचे नाम ज्या मंदिराला होते त्यामध्येच त्यांनी अमंगळ मूर्त्या स्थापिल्या. यरूशलेमाबाहेर हिन्नोमाच्या दरीत त्यांनी “आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी” वेद्या बांधल्या. खऱ्या उपासनेची ही अशी विटंबना केल्यामुळे त्यांना केवढी किंमत द्यावी लागणार होती!—यिर्मया ७:३०, ३१.
यहुदा किंमत देतो
१५. यिर्मयाने यहुदासाठी कोणती अनिष्ट बातमी कळविली?
१५ इ.स.पूर्व ६३२ पर्यंत अश्शुर खास्द्यांपुढे पडले होते आणि मेद व मिसर या यहुदाच्या दक्षिणेकडील दुर्बळ सत्ता बनल्या होत्या. त्यामुळे यहुदाला खरी भीती उत्तरेकडील प्रदेशाकडून येणार होती. अशाप्रकारे यिर्मयाला आपल्या सहयहुद्यांना अनिष्ट बातमी सांगावी लागली! “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे. . . . ते क्रूर आहेत, त्यांस दयामाया नाही. . . . हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुजविरूद्ध एकजुटीने येत आहेत.” हे आक्रमण करणारे जागतिक साम्राज्य त्या काळी बाबेलोन होते. विश्वासहीन यहुद्यांना शिक्षा करण्याचे ते देवाकडील साधन होते.—यिर्मयाह ६:२२, २३; २५:८, ९.
१६. यिर्मयाने राष्ट्रासाठी रदबदली करण्याच्या बाबतीत कसलाही अर्थ नव्हता तो का?
१६ अशावेळी यिर्मयाने आपल्या नगरवासियांसाठी रदबदली करण्यात काही अर्थ होता का? खऱ्या उपासनेच्या अनुषंगाने काही तडजोड घडविता येणे शक्य होते का? कदाचित यहोवा अर्धा दंड देऊन लोकांची क्षमा करणार का? यहोवाची भूमिका स्पष्ट होती. त्याने यिर्मयाला निदान तीनदा आज्ञापिले: “तू या लोकांसाठी प्रार्थना करू नको. . . . कारण मी ऐकावयाचा नाही.” याच्या समांतर पूर्णतेत हा इशारा ख्रिस्ती धर्मराज्यासाठी अनिष्ट चिंतितो.—यिर्मया ७:१६; ११:१४; १४:११.
१७, १८. यहुदावर देवाचा न्यायदंड सरतेशेवटी कसा बजावण्यात आला?
१७ मग, यहुदाच्या प्रकरणाचा कसा शेवट झाला? यहोवाने यिर्मयाद्वारे जसे भाकित केले होते अगदी त्याप्रमाणेच घडले. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीत यहुदा राष्ट्र प्रबळ बाबेलोनच्या अंकित झाले. तीन वर्षांनी यहोयाकीमने बंड केले. ही मूर्ख कृति आचरल्यामुळे बाबेलोन्यांकडून अधिकच नीचावस्था लाभली. त्यांनी यरूशलेमास वेढा दिला. यावेळेपावेतो यहोयाकीम वारला होता व त्याचा पुत्र यहोयाखीन राज्यपदावर आला होता. बाबेलोनी वेढ्याने यहुदांची अधोगति घडविली आणि यहोयाखीन, त्याचे सर्व बादशाही घराणे आणि यहुदी संघटना बाबेलच्या बंदिवासात अडकली.—२ राजे २४:५–१७.
१८ पण पवित्र मंदिर व त्यातील मौल्यवान अलंकाराचे काय घडले? ते यहुदासाठी जादुप्रमाणे ठरले नाहीत. नबुखदनेस्सराने “यहोवाच्या मंदिरात व राजवाड्यात ठेविलेले सारे धन लुटून नेले. शलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून यहोवाच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्याचे त्याने तुकडे केले.” (२ राजे २४:१३) ओघाओघाने बाबेलोनने नियुक्त केलेला सिदकिया राजा, जो यरूशलेमात उरलेल्या गोष्टींवर राजा म्हणून नियुक्त करण्यात आला होता त्यानेही आपल्या वरिष्ठांविरूद्ध बंड केले. हे नबुखद्नेस्सर करता शेवटले बुजगावणे ठरले. त्याने पुन्हा यरूशलेम शहराला वेढा दिला व इ. स. पू. ६०७ मध्ये त्याचा पाडाव करून त्याची पूर्णतयः धुळधाण केली.—यिर्मया ३४:१, २१, २२; ५२:५–११.
१९, २०. भाकित केलेल्या विपत्तीसंबंधाने यहुदा व यिर्मया यांच्या प्रवृत्तीत कोणता फरक होता आणि प्रत्येकाला कोणता परिणाम मिळाला?
१९ ‘निवडलेल्या लोकां”साठी हा केवढा विपत्तीकारक सर्वनाश ठरला! तसेच यिर्मयाने घोषित केलेला न्यायदंड हा केवढा विजयी ठरला! यहुदी आपल्या काल्पनिक जगतात स्वप्नील बनले होते आणि आपल्याला काहीएक इजा होणार नाही असे त्यांना वाटत होते तरीपण “विपत्ती घडविणारा” यिर्मया खरा ठरला, तो पराजित स्वप्नदर्शी ठरला नाही. (यिर्मया ३८:४; हे लक्षात घ्या की “विपत्ती” किंवा नुकसान हे शब्द यिर्मयाच्या पुस्तकात ६४ वेळा आढळतात.) यहोवाचा न्यायदंड केवढा अचूक ठरला: “त्यांस असे सांग की, ‘आपला देव यहोवा याचा शब्द ऐकत नाही व शिस्त लावून घेत नाही ते हेच राष्ट्र आहे. विश्वासूपणा नष्ट झाला आहे, तो त्यांच्या मुखातून नाहीसा झाला आहे. हर्षाचा व आनंदाचा शब्द . . . यहुदाच्या नगरातून व यरूशलेमाच्या रस्त्यातून बंद पडेल असे मी करीन, कारण भूमि वैराण होईल.”—यिर्मया ७:२८, ३४.
२० अशाप्रकारे या खडतर मार्गाद्वारे त्या गर्विष्ठ, आत्मसंतुष्ट यहुद्यांना हे प्रत्ययास आले की त्यांचे देवाला आळवणे व त्याजसोबत असणारे त्यांचे खास नातेसंबंध यांनी त्यांना तारणाची हमी दिली नाही. भाकितात म्हटले होते: “आम्ही शांतीची अपेक्षा करितो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी. सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही.” (यिर्मया ८:१५, २०) तो काळ यहुदासाठी जाब देण्याचा काळ होता. पण निर्भिड संदेष्टा यिर्मयाला त्याच्या ध्येयाची पूर्ति करण्यासाठी व त्याचा कार्यभाग पूर्ण करण्यासाठी बचावून ठेवण्यात आले. त्याने बाबेलात आपल्या अपमानित राष्ट्रासोबत नव्हे तर मिसरात बंदिवासात आपले शेवटले दिवस घालवले. त्याने ६५ पेक्षा अधिक वर्षे विश्वासूपणे व निर्भिडपणे देवाच्या न्यायदंडाची घोषणा केली.
२१. आणखी कोणते प्रश्न उद्भवतात?
२१ तथापि, आम्ही आता यिर्मयाचे जीवन व त्याचे उपाध्यपण याचा आमच्या काळाकरता कोणता अवलंब होत आहे ते जाणून घेण्यास उत्सुक आहोत. या २० व्या शतकात यिर्मयाचा प्रतिनमुना कोण असणार? तसेच यहुदा व इस्राएल यांचे चित्र आज कोणामध्ये दिसणार? शिवाय उत्तर भागाकडून जी दहशत आली होती तिचे साम्य आज कोठे दिसते? आमचा पुढचा लेख या प्रश्नांचे परिक्षण करील.
तुम्हाला आठवते का?
◻ यिर्मयाने आपल्या नेमणूकीबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली, पण यहोवाने काय उत्तर दिले?
◻ यिर्मयाच्या काळातील घटनेबाबत आम्ही आस्थेवाईक का आहोत?
◻ यिर्मयाने कोणत्या धार्मिक स्थितीचा निषेध केला आणि यहुदी कशावर आपली भिस्त ठेवून होते?
◻ यरूशलेम व यहुदासाठी अंतिम परिणाम कोणता दिसला?
[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]
यिर्मयाने यहुदी नेते व लोकांना देवाचा न्यायदंड निर्भिडपणे घोषित केला
[२४ पानांवरील चित्रं]
स्त्रियांनी “आकाश राणी”साठी पोळ्या केल्या