अविवाहित, पण देवाच्या सेवेकरिता परिपूर्ण
“जो आपल्या कुमारपणाचे लग्न करून देतो तो बरे करितो पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करितो.”—१ करिंथकर ७:३८, न्यू.व.
१. विवाह, एक आशिर्वाद कसा शाबीत झाला?
यहोवाने, पहिला पुरूष तसाच एकटा राहावा असे कधीच इच्छिले नाही. खरे तर, आदाम, जो मानवी वंशाचा पूर्वज, त्याजकरिता देवाने लग्न सोबतीण उत्पन्न केली. (उत्पत्ति २:२०–२४; प्रे. कृत्ये १७:२६) आणि तो विवाह केवढा आशिर्वादीत ठरला! त्याने सहकारी पुरविला, आपसांतील सहकार उपलब्ध केला, वंशवृद्धीच्या योजनेस थोरवी दिली आणि मानवी सौख्यतेस समृद्ध पुष्टी दिली. शिवाय केवढीही संपत्ति ज्याची खरेदी करू शकणार नाही ते, विवाहातील प्रेमाचा गरीब तसेच पददलितहि सारखेपणात आनंद लुटू शकतात.—गीतरत्न ८:६, ७.
२, ३. (अ) एक धार्मिक प्रकाशन ब्रम्हचर्य आणि विवाह यांचेबद्दल कोणता दृष्टीकोन बाळगते? (ब) शास्त्र वचनीय उल्लेखांनुसार विवाहाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पहावे?
२ तथापि, काहीजन, लग्न संबंधाचा वेगळाच दृष्टीकोन बाळगून आहेत. एक धर्मविचारी प्रकाशन म्हणते: “ब्रम्हचर्य हा, पाश्चिमात्य चर्चसंस्थेच्या धर्मखात्याचा कायदा आहे, जो पाद्रीगटास या करिता बजावला जातो की जे विवाहीत आहेत अशांच्या अभिषेकास मनाई असावी आणि जे पवित्र नियमांत आहेत अशांना विवाहापासून दूर ठेवावे. यांत कडक कुमारपण टिकविण्याचेहि शपथपूर्वक बंधन समाविष्ठ आहे. याकरिता कारणे हीच: की ज्यांचा देवाची सेवा करण्याकरिता अभिषेक होतो त्यांनी अधिक सड्या मनाने सेवा करीत राहावे (१ करिंथकर ७:३२), आणि असे जीवन कंठण्यात त्यांनी विवाहापेक्षा अधीक पवित्र व चांगले ते कुमारपण टिकवावे. नव्या करांरात ब्रम्हचर्यत्व किंवा कुमारपण यांस विवाहीत अवस्थेपेक्षा अधीक उच्चप्रतीचे पाचारण आहे.”—द कॅथोलिक एन्सायक्लोपिडीया, रॉबर्ट. सी. ब्रॉड्रीक्स द्वारा संपादीत.
३ मग, बळजबरीने अमलात आणलेले ब्रम्हचर्य खरोखरी “विवाहापेक्षा अधीक पवित्र व चांगले” आहे? “नवीन करार”नुसार नाही, कारण ते, कॅथोलिक जेरूशलेम बायबल नुसार म्हणते: “आत्मा स्पष्ट म्हणतो की शेवटल्या काळी विश्वासापासून किती एक लोक भ्रष्ट होतील. आणि ते लबाडपणे फुसलाविणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. त्या मनुष्यांचा सदसद्विवेक डागलेला असा होईल; लग्न करावयाला ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे यांनी ईशोपकारस्मरण करून ज्यांचा उपयोग घ्यावयाचा अशी देवाने उत्पन्न केलेली भक्ष्ये वर्ज करण्यास सांगतील.” (१ तिमथ्यी ४:१–३) प्रत्यक्षांत, विवाह हा परमेश्वराकडील दान आहे, व तो चांगला आहे.—रूथ १:९.
४. करिंथकरास पहिले पत्र ७:३८च्या दृष्टीकोणानातून कोणते प्रश्न उत्पन्न होतात?
४ जरी विवाह हा देवाकडिल दान आहे, प्रेषित पौल लिहितो: “जो आपल्या कुमारपणाचे लग्न करून देतो तो बरे करितो, पण जो लग्न करून देत नाही तो अधीक बरे करितो.” (१ करिंथकर ७:३८) पौल असे का सूचवितो की अविवाहीत राहणे अधीक बरे? एकट्या व्यक्तिस अपुरे असल्याचे वाटावे का? व एकटेपण हे प्रतिदान ठरेल का?
ख्रिस्ती जीवनाचा मध्य भाग
५. ख्रिस्ती जीवनाचा मध्यभाग काय असावा?
५ यहोवाची सेवा ही ख्रिस्ती जीवनांतील अगदी मध्य भाग असावा, मग आम्ही सडे असो की विवाहीत असोत. देवासाठी पवित्र सेवा आनंदाने करणे, हा पुरावा असतो की सार्वभौम सत्ताधारी म्हणून आम्हाठायी त्याच्याबद्दल तेवढे प्रेम आहे. अंतःकरणपूर्वक आज्ञापालन आणि ख्रिस्ती सेवकपणांतील उत्सुकता हे त्या प्रेमास व्यक्त करण्याचे मार्ग आहेत. (१ योहान ५:२, ३; १ करिंथकर ९:१६) दैवी इच्छेच्या एकवाक्यतेतील सेवकपण आणि इतर आज्ञाकित हालचाली जर व्यक्ति अविवाहीत असली तर सिद्धीस नेऊ शकेल.
६. आम्ही विवाहीत असो किंवा सडे, उत्सुक उपाध्यपणाने आम्हास काय करण्यास समर्थ करावे?
६ सुवार्तिक आज राज्य प्रचाराचे काम यहोवाच्या गौरवार्थ करीत आहेत. मग आम्ही विवाहीत असोत की एकटे, उत्सुक सेवकपण आम्हास आमच्या वैयक्तित साधनांना व शक्तिला तसेच गुणांना देवाच्या सेवेत लावण्याची सवड पुरवील. पण आम्ही आमच्या परिस्थितीस असे विकसीत करावे व नियंत्रणाधीन ठेवावे की ज्यामुळे आमचे सेवकपण आमच्या जीवनाच्या मध्यकेंद्रापासून कधीहि कनिष्ठ दर्जावर ढासळणार नाही. आम्ही देवराज्यास प्रथमस्थान देण्यास हवे. (मत्तय ६:३३) केवळ स्वहिताकडेच लक्ष देऊन असण्यापेक्षा दैवी हित संबंधात चित्त रमविणे अधीक आनंदविणारे असते.
सेवकपणाकरिता परिपूर्ण
७. कोणाचे उदाहरण समोर आहे जे हे स्पष्ट दाखविते की अविवाहीत ख्रिस्तीहि उपाध्यपणास परिपूर्ण असू शकतो?
७ ख्रिस्ती मग ते सडे असोत किंवा विवाहीत, सेवकपणाकरिता परिपूर्ण असू शकतात. अशा प्रकारे अविवाहीत स्थिती हा एक असा पाया आहे जिचे मध्ये बदल करण्याची सहसा गरज भासत नाही. (१ करिंथकर ७:२४, २७ पडताळा) देवाचे वचन कोणाहि वंशाचा दृष्टीकोन पाळीत नाही की मनुष्य विवाहीत झाल्याविना त्याच्या प्रौढतेस पोहंचत नाही. येशू ख्रिस्त अविवाहीत वारला, आणि स्वर्गातील आध्यात्मिक वधुला, एकमेव पत्नी म्हणून स्विकारावे हाच अधिकार यहोवाने येशूला दिला. (प्रकटीकरण २१:२, ९) तरी देवाचा पुत्र, मनुष्य असता जरी अविवाहीत राहिला तरी सेवकपणातील परिपूर्ण व्यक्तिचे सर्वोत्तम उदाहरण होता.
८. पौलाने स्पष्ट केल्यानुसार, अविवाहित राहण्यात कोणत्या मुभा असतात?
८ प्रत्यक्षात, एकटेपण व्यक्तिगत स्वतंत्रतेस आणि सेवकपणात अधीक वेळ देण्यास मुभा देते. एकटेपणाची शिफारस करण्यांत, पौल म्हणतो: “तुम्ही निर्श्चित असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयी चिंता करितो. . . . अविवाहित असते ती आपण शरीराने व आत्म्यानेहि पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टीविषयीची चिंता करित्ये.” (१ करिंथकर ७:३२–३४) हे, जे सडे ख्रिस्ती आहेत, तसेच जे एकेकाळी विवाहीत होते पण परिस्थितीत बदल झाल्याने जणू आता परत अविवाहीतांच्या स्थितीस परतले, त्यांच्याकरिता म्हटले आहे.—मत्तय १९:९; रोमकर ७:२, ३.
९. येशूच्या उदाहरणाने हे कसे स्पष्ट केले की अविवाहित राहणे हे त्या व्यक्तिस ख्रिस्ती उपाध्यपणाकरिता अपूर्ण बनवीत नाही?
९ शारीरिक, मानसिक आणि आत्मिक प्रौढतेची प्राप्ति देवाच्या सेवेतील परिपूर्णता मिळवून देते. देवाचा मुख्य उपाध्याय आणि ज्याच्या द्वारे खंडणी पुरविली जाणार तो बनण्याकरिता परिपूर्ण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताला कोणाहि लग्न सोबतीची गरज भासली नाही. (मत्तय २०:२८) अविवाहित राहिल्यामुळे येशू त्याच्या सेवकपणाकडे पूर्ण बलाने लक्ष देण्यास स्वतंत्र होता. ज्या यहुदी पंथात ही रूढी होती की विवाह व संतती यांवर जोर देणे, तीत येशूचे अविवाहीत राहणे एकदम वेगळे होते तरी सुद्धा देवाने नमून दिलेले काम पूर्ण करण्यास तो पूर्णपणे लायक होता. (लूक ३:२३; योहान १७:३, ४) यास्तव, अविवाहित राहणे हे कोणाहि व्यक्तिस ख्रिस्ती सेवकपणाकरिता अपात्र बनवीत नाही.
विवाहीत व्यक्ति “विभक्त” असतात
१०. “एक देह” बंधनात असल्यामुळे पौलाने जे विवाहीत त्यांच्या तुलनेत जे अविवाहीत त्यांच्याबद्दल काय म्हटले?
१० सडे लोकांच्या अगदी विरूद्धतेत, विवाहीत ख्रिस्तीनी आपले सेवकपण “एक देह” बंधनाची ओळख ठेऊन करावे. (मत्तय १९:५, ६) ते बंधन आणि त्यासोबतच्या अनेक जबाबदाऱ्यांमुळे, पौलाने म्हटले की विवाहीत व्यक्ति “विभक्तित” आहे. त्याने लिहिले: “तुम्ही निर्श्चित असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरूष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयीची चिंता करितो. परंतु विवाहित पुरुष, आपल्या बायकोला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टीविषयीची चिंता करितो. तो विभक्तित आहे. तसेच, अविवाहित स्त्री आणि कुमारीचे आहे, आपण शरीराने व आत्म्यानेहि पवित्र राहावे म्हणून त्या प्रभूच्या गोष्टीविषयी चिंता करितात. परंतु विवाहीत असते ती आपण आपल्या नवऱ्याला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टी विषयीची चिंता करित्ये. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो. तुम्हावर फास टाकण्यासाठी नाही, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो.”—१ करिंथकर ७:३२–३५, न्यू.व.
११. पौल, १ करिंथकर ७:३२–३५ मध्ये कसली स्पष्टता पुरवितो?
११ होय, अधीक अभेद्य जीवनाकरिता पौल येथे एकटेपणाची शिफारस करतो. तो स्वतः कदाचित, विधूर असावा, ज्याने परत लग्नाचा विचार केला नसावा. (१ करिंथकर ९:५) कसेहि असो, या जगात विवाहीत जीवनाला काळजी, अडचणी यांची साथ आहे याची त्याला चांगली जाणीव होती. तेच अविवाहित ख्रिस्तीजनास तुलनात्मकतेत केवढी स्वतंत्रता अनुभवता येते आणि विवाहित विश्वासूजनांचे पार्थिव व आध्यात्मिक गोष्टीत कशाप्रकारे लक्ष विभक्तित असते हे तो दाखवीत होता. विवाहीत व्यक्तिस स्वतःचे शरीरावर पूर्ण हक्क नसतो, कारण त्याजसोबत त्याची सोबतीन ही एकदेह असते, म्हणून त्याच्या शरीरावर तिचा हक्क असतो. (१ करिंथकर ७:३–५) या दृष्टीकोनातून पाहता, पौल अगदी बरोबर म्हणाला, अविवाहीत ख्रिस्ती हा पवित्र राहू शकतो म्हणजेच यहोवा देवाच्या थेट उपयोगाकरिता, अलग असे दोन्ही, शरीर व आत्म्याने स्वतःस वेगळेच ठेऊ शकेल.
१२. सोबती नसल्यामुळे, अविवाहित व्यक्ति काय करू शकतो?
१२ सडेपण असणाऱ्या ख्रिस्तीचा आत्मा, किंवा मनाचा कल त्याना देव राज्य सेवेत तत्पर, अव्यग्र राहण्यात प्रवृत करतो. त्याच्या शरीरावर अर्धहक्काचा दावा करणारी बायको नसल्यामुळे तो आत्म्याच्या किंवा त्याच्या मनाच्या आणि हृदयाच्या विचारांनी चालू शकतो. आपल्या, शरीर आणि विचारांवर पूर्णपणे ताबा राखून तो यहोवाच्या सेवेत वैशिष्ठपूर्ण प्रगती करू शकतो. ह्याप्रमाणे अविवाहित पुरूष किंवा स्त्री सर्वथोर वैयक्तिक स्वातंत्र्य हक्काने केवळ प्रभूला संतोषविण्यांत संपूर्ण लक्ष घालू शकतो. पौलाने जे काही म्हटले, त्याबद्दल आम्ही कोणताहि आक्षेप घेऊ शकत नाही, कारण ते सर्व आमच्या बोधाकरिता चांगले म्हणून नोंदणीस यहोवाने अनुमति दिली.
विवाहीत व्यक्ति अपूर्ण?
१३, १४. कोणत्या चुकीच्या वागणूकीने “एक देह” बंधनाची उपेक्षा होते व जे सर्व विवाहित व्यक्तिस ख्रिस्ती उपाध्यपणाकरिता अपूर्ण बनवील?
१३ देवाच्या सेवेत याहिपेक्षा पुष्कळ अधीक करू या भ्रामक कल्पनेने, काही विवाहीत ख्रिस्ती त्यांच्या विवाहास जीवनात गौण स्थान देतील. उदाहरणार्थ, पत्नी नवऱ्यापेक्षा अधीक स्वतंत्रतेतील अहंमन्य मार्गी वागू लागेल. नवरा कदाचित मंडळीच्या जबाबदारींनी व्यग्र असेल. अशा परिस्थितीत ते कदाचित ही समज बाळगून असणार की यहोवाच्या सेवेत ते सर्वकाही चांगले करीत आहेत. तथापि, प्रत्यक्षात ते कदाचित “एक देह” बंधनाचा अनादर करणारा मार्ग अनुसरीत असतील. तसे आहे तर ते यहोवास आनंदविणारे नाही.
१४ प्रत्यक्षांत, “एक देह” बंधनाचा अनादर करणे हे विवाहीत व्यक्तिस ख्रिस्ती उपाध्यपणाकरिता अपूर्ण बनविते. विवाह हा उपाध्यपणाच्या परिपूर्णतेस वाढवित नाही, उलट सेवकपणाच्या जबाबदारीवरील वैयक्तित लक्ष कमी करतो. (लूक १४:१६, १७, २० पडताळा) तरी, जर विवाहीत लोक देवास संतोषवू इच्छितात व त्याचे उपाध्याय म्हणून परिपूर्ण राहू इच्छितात, त्यांनी त्यांच्यावरील विवाह बंधनातील जबाबदाऱ्याबात जागृत राहिलेच पाहिजे.
राज्याकरिता अविवाहीत
१५. (अ) अविवाहीत ख्रिस्तींनी कोणते गुण मिळवावेत? (ब) पौल, १ करिंथकर ७:३६, ३७ मध्ये विवाहीत आणि अविवाहित यांचेबद्दल कोणात मूळ मुद्दा स्पष्ट करतो?
१५ यहोवाच्या विवाहीत सेवकांनी त्यांच्यावरील विवाह जबाबदाऱ्यांबाबत जागृत राहिलेच पाहिजे, तर सडेपणाच्या ख्रिस्तीनी त्यांच्या अविवाहीत परिपूर्णतेत समाधान मानून राहण्यास शिकावे. जसे पौलोन म्हटले: “जे अविवाहीत व ज्या विधवा आहेत त्यांस मी म्हणतो की तुम्ही मजसारखी (अविवाहीत) राहिला तर ते तुम्हास बरे. तू बायकोला बांधलेला आहेत काय? आहेस तर मुक्त होण्यास पाहू नको; बायकोपासून मुक्त आहेस काय? आहेस तर बायको करण्यास पाहू नको.” (१ करिंथकर ७:८, २७) सडी व्यक्ति म्हणून यहोवाकडिल मदतीने, ती निर्णायक मनःस्थिती रूजवीत असते जी देव शक्य करीत असतो. या स्थितीत जर कोणताहि बदल झाल्यास, तर प्रथा किंवा दबावाच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय होता असे समजू नये. या उलट, शास्त्रवचनीय गरज म्हणून तो सुचला असा असावा, कारण पौलाने म्हटले: “परंतु जर कोणाला असे वाटते की आपण आपल्या कुमारपणाच्या अपमानास (गैरवर्तणुकीने) कारण होतो, मग तारूण्याचा भर ओसलेला असला तरी आणि तसे अगत्य आहे तर, जशी इच्छी असेल तसे त्याने करावे, तो पाप करीत नाही. ती लग्न करोत तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला अगत्य नाही ज्याची आपल्या इच्छेवर सत्ता आहे, आणि आपल्या कुमारपणास तसेच ठेवावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरविले आहे, तो बरे करतो.”—१ करिंथकर ७:३६, ३७, न्यू.व.
१६. (अ) “तारूण्याचा भर ओसरलेला असेल” याचा अर्थ काय होतो? (ब) जे ख्रिस्ती अविवाहीत राहतात त्यांची कसली खात्री झालेली असावी?
१६ अशा तऱ्हेने पौलाने हे स्पष्ट केले की जर कोणी व्यक्ति तिच्या कुमारपणाविरूद्ध गैरशिस्त वागू लागली तर लग्न करण्यात काहीच चूक नाही, यात प्रेषित कोणाहि गंभीर पातकास अप्रत्यक्षपणे सूचवीत आहे असे नाही. जसे त्याने आधी म्हटले: “जळण्यापेक्षा लग्न करणे बरे आहे.” (१ करिंथकर ७:९) अर्थात, तो त्या परिस्थीतीतील व्यक्तिच्या लग्नाबद्दल बोलत होता ज्याचा कदाचित, तो “तारूण्याचा भर ओसरलेला” असेल, व ज्यांत सुरवातीला लैंगिक परस्पराकर्षण तीव्र असते. जर कोणा प्रौढ व्यक्तिची “आपल्या इच्छेवर सत्ता आहे,” व ज्याने आपल्या अंतःकरणात सडे राहण्याचा ठाम निश्चय केला तो बरे करितो. विवाह करावा, कौटुंबिक जीवन असावे या उत्कट इच्छेस वेळोवेळी उबळ येत असताहि दबाबणे म्हणजे यशस्वी सडेपण नव्हे, याऊलट जी ख्रिस्ती व्यक्ति अविवाहित राहण्याची निवड करते तिने आपल्या अंतःकरणात ही पूर्ण खात्री बाळगली पाहिजे, की त्याच्या किंवा तिच्या स्थितीत एकटेपण टिकविणे हितावह आहे, आणि ती स्थिती तिच्या शुद्धतेत स्वइच्छेने टिकवून ठेविण्याचे हरप्रयत्न करावेत. जे ख्रिस्ती तसे करितात त्यांच्याकरिता ओढाताण कमी असेल, आणि ते प्रभूच्या सेवेतील सर्वथोर स्वतंत्रता अनुभवितील.
१७. येशूच्या विधानानुसार काहींजन अविवाहीत का राहतात?
१७ अविवाहीत ख्रिस्तीनी येशू ख्रिस्ताच्या विचारांचा मागोवा घेतल्यांस त्यांचे सडेपण टिकवून ठेविण्यात सहाय्य होईल. तो जरी, ज्या संस्कृतीत विवाहावर जोर होता तीत अविवाहित राहिला तरी त्याने आपल्या वेळेचा आणि दानांचा अशा सेवेत उपयोग केला जिची पुनरावृत्ति होणार नाही. येशू प्रमाणे जो ख्रिस्ती अविवाहित राहतो तोहि एकटेपणाच्या दानांचा आनंद मिळवितो जी देवाकडून अशांना प्राप्त होतात जे स्वतःस त्याकरिता उपलब्ध करीतात. येशूने म्हटले: “हे वचन सर्वांच्याने स्वीकारवत नाही; ज्यांस हे दान दिले आहे ते स्वीकारितात. कारण आईच्या उदरापासून जन्मलेले असे नपुंसक आहेत, मनुष्यांनी केले असेहि नपुसंक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुसंक करून घेतले असे नपुसंक आहे. ज्यांच्याने हे स्वीकारवते तो स्वीकारो.”—मत्तय १९:११, १२.
१८. राज्याकरिता काही विवाह न करिता स्वतःस “नपुसंक” ठेवितात ते का?
१८ येशूने असे म्हटले नाही की विवाहीतापेक्षा अविवाहित व्यक्ति वरिष्ठ श्रेणीची आहे. त्याने, सडेपणाकरिता जोर देऊन म्हटले ते केवळ बेपर्वाईचे जीवन जगण्याकरिता नव्हे; तसेच कोणाहि अविवाहित व्यक्तिचे लक्ष विरूद्ध लिंगी व्यक्तिकडे सतत फैलावलेले राहावे म्हणून नव्हे; तर जे स्वतःस राज्याकरिता “नपुसंक” बनवितात त्या व्यक्ति नीतिमध्ये सरळ राहून स्वतःच्या अंतःकरणात त्यास जागा देतात. लग्न करण्यापासून काय त्यांस दूर ठेविते? कोणाहि प्रकारचे अपंगत्व नव्हे तर देवाच्या सेवेत जितके अधीक तेवढे साध्य करावे ही इच्छा बळावलेली असते. ही सेवा, १९१४ मध्ये स्वर्गात देवराज्याची स्थापना झाल्यापासून, या काळात अधीक महत्वाची बनली आहे, आणि “राज्याची ही सुवार्ता” सबंध जगभर, या नाशाधीन व्यवस्थिकरणाचा नाश होण्याआधी, साक्ष व्हावी म्हणून प्रचारीत झाली पाहिजे.—मत्तय २४:१४.
अविवाहित ख्रिस्तींची प्रशंसा करा
१९. जे राज्याकरिता स्वतःस सडे ठेवितात त्यांच्याकरिता सर्व ख्रिस्तींनी काय करावे?
१९ जे सर्व राज्याकरिता अविवाहित राहिले अशांची सर्व ख्रिस्तींनी प्रशंसा करावी व त्यांना उत्तेजन द्यावे, मदत करावी. काही झाले तरी, सडे राहणे, हे त्यांच्या “हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून” असावे. (१ करिंथकर ७:३५) पालकांनी त्याच्या लेकरांना, अविवाहितपणा आणि यहोवाच्या सेवेतील त्याचे फायदे याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते ते शिकविलेले बरे! आम्ही सर्व, आमच्या संगतीतील समविश्वासू अविवाहितांना उत्तेजन देऊ शकतो व राज्याकरिता त्यांनी अविवाहित राहण्याचा जो निर्णय घेतला त्याला कधीहि दुर्बल बनवू नका.
२०. आपण जर अविवाहीत ख्रिस्ती आहांत तर तुम्ही स्वतः काय करावे?
२० अविवाहित ख्रिस्ती देवाचे परिपूर्ण सेवक म्हणून आनंद लुटू शकतात. या शेवटल्या काळात, देवराज्य प्रचाराच्या निकडीच्या सेवेत सहभागी होण्यात त्याना आनंद वाटतो. आपण जर सडे असाल, व यहोवा, तुमचा एक परिपूर्ण उपाध्याय म्हणून उपयोग करीत आहे तर हर्षित व्हा. ‘भीत व कांपत आपले तारण साधा, सोबत जगासमोर एखाद्या ज्योतीसारखे चकाकत राहा व जीवनाच्या वचनावर सतत भक्कम पक्कड ठेवा.’ (फिलिपैकर २:१२–१६, न्यू.व.) यहोवाच्या साक्षीदारांतील अंतरराष्ट्रीय बंधुत्वाच्या सलगीत राहून राज्यावर लक्ष केंद्रित ठेवा व आपली ख्रिस्ती कामगिरी पुरी करा. एकटेपणात हे करणे फलदायी जीवनी मार्ग आहे, ते पुढे पाहू.
तुमची उत्तरे काय असतील?
◻ ख्रिस्ती जीवनाचा मध्यभाग काय असावा?
◻ यहोवाचे अविवाहित सेवक कशाप्रकारे ख्रिस्ती उपाध्यपणाकरिता परिपूर्ण असू शकतात?
◻ कोणत्या मार्गी कोणी विवाहित व्यक्ति अपूर्ण असू शकतो?
◻ राज्याकरिता म्हणून “नपुसंक” राहणे याचा काय अर्थ होतो?
◻ आम्ही, अविवाहीत ख्रिस्तींना का उत्तेजन द्यावे?
[१० पानांवरील चित्रं]
पौल अविवाहीत होता तरी तो पूर्ण होता
[१२ पानांवरील चित्रं]
उपाध्यपणाच्या बाबतीत पूर्ण असणाऱ्या व्यक्तींमध्ये येशू सर्वोच्च उदाहरण ठरला
[१५ पानांवरील चित्रं]
राज्यासाठी अविवाहितपणा पत्करणाऱ्यांची तुम्ही प्रशंसा करता का?