“हा मी आहे! मला पाठीव” असे तुम्ही म्हणाल का?
“यहोवाने [म्हटले]: ‘मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?’ तेव्हा मी म्हणालो: ‘हा मी आहे! मला पाठीव.’”—यशया ६:८.
१, २. आनंदाचे असे कोणते खास कारण एका जोडप्याला लाभले?
“कोलंबियाला जाण्याच्या आमच्या नेमणूकीचा आम्ही स्विकार करीत आहोत व त्याविषयीचे हे पत्र आम्हाला पाठविण्यास आनंद वाटतो. येथे इक्वेडोरमध्ये राहून आम्ही आमच्या सेवा कार्याचा आनंद मनमुराद लुटला, हे येथे टाईपरायटरवर व्यक्त करता येणे शक्य नाही.” असे हे पत्र इक्वेडोर येथे वॉचटावर संस्थेच्या नव्या शाखा दप्तराच्या बांधणी कामासाठी गेलेल्या यहोवाच्या साक्षीदारांपैकीच्या एका दांपत्याने पाठविले.
२ इक्वेडोरमध्ये हे उपाध्याय इमारत बांधणी कामासाठीच गेले नव्हते. त्यांनी ख्रिस्ती शिक्षक या अर्थी देखील मदत दिली. ते लिहितात: “क्षेत्र कार्य आम्हाला अत्यंत महत्वपूर्ण वाटले. आत्ताच तीन आठवड्यांआधी आम्ही नऊ लोक खुल्या बाजारात गेलो होतो व तेथे ७३ पुस्तके व ४० पेक्षा अधिक मासिकांचे वितरण केले. एका आठवड्याआधी आम्ही दोन नवे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करू शकलो. पूर्ण वेळेच्या सेवेच्या खास प्रकारात सहभागी होण्याचा हक्क दिल्याबद्दल मी व माझी बायको तुमचे आभार मानतो.” ते आता कोलंबियात आहेत.
३. यशयाने प्रदर्शित केलेल्या आत्म्यासारखाच आत्मा पुष्कळांनी कसा प्रदर्शित केला?
३ या जोडप्याने तसेच या सारख्या इतर शेकडोंनी स्वतःला परदेशात कार्य करण्यासाठी पाठविण्याची स्वेच्छा दर्शविली. या सर्वानी यशया संदेष्ट्यासारखाच आत्मा प्रवर्तित केला. यशयाने यहोवाकडून जेव्हा असे ऐकले: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा यशया उत्तरला: “हा मी आहे! मला पाठीव.” तेव्हा देवाने त्याला आज्ञा केली: “जा, या लोकांस सांग की, ‘ऐकत राहा पण समजू नका.’” (यशया ६:८, ९) यशयाने कशासाठी पाठविण्याची स्वयंसेवकता दाखविली व त्याकरवी काय परिणाम उद्भवला? या अहवालाद्वारे आधुनिक साम्यतेविषयी आज आपल्याला काय शिकायला मिळते, तसेच आम्हासाठी कोणता व्यक्तिगत धडा ठेवलेला आहे?
यशयाची प्रचार करण्याविषयीची नेमणूक
४, ५. (अ) यशयाच्या ६व्या अध्यायात लिखित असणारा दृष्टांत त्याला मिळाला त्यावेळी कोणती परिस्थिती अस्तित्वात होती? (ब) यशयाने या दृष्टांतात काय बघितले?
४ उज्जीया राजा मरण पावला त्यावर्षी यहोवाने, “मी कोणाला पाठवू?” असे यशयाला विचारले. (यशया ६:१) हे इ.स.पू. ७७७ हे वर्ष किंवा बाबेलोन्यांनी यरूशलेम व यहुदाचा विध्वंस केला त्याच्या साधारण १७५ पेक्षा अधिक वर्षे आधी घडले. ती दुःखित घटना घडण्याची वेळ येत आहे हे यहोवाने पाहिले होते त्यामुळेच यासंबंधीचा संदेश विदीत करण्यासाठी त्याने यशयाला नियुक्त केले. यशयाच्या प्रचाराच्या नेमणूकीबद्दल आपण काय शिकू शकतो?
५ यशयाला त्याची नेमणूक ज्या परिस्थितीत लाभली त्यामध्ये तो खूपच स्तंभित बनला होता व हाच परिणाम आम्हाला सुद्धा लाभला असता. त्याने लिहिले: “यहोवास उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहासहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी तो उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत: ‘पवित्र! पवित्र! पवित्र! सेनाधीश यहोवा! अखिल पृथ्वीची समृद्धि त्याचे वैभव होय.’”—यशया ६:१–३.
६. यशयाला जे पहावयास मिळाले तो त्याच्यासाठी हक्क का होता?
६ यशयाला हे ठाऊक होते की उज्जीयाने याजकवर्गाचा नसताना मंदिराच्या पवित्र भागात शिरून उद्दामपणे धूप दाखविल्यामुळे यहोवाने त्याला कोडी केले होते. तर मग यहोवाचे प्रत्यक्ष अस्तित्व पाहण्याचा यशयाला केवढा अद्भूत हक्क मिळाला होता! यशयाला आपल्या अपूर्णत्वामुळे यहोवाला खरोखरी बघता आले नाही पण त्याला दृष्टांतात पाहण्याची अनुमति देण्यात आली. (निर्गम ३३:२०–२३) या प्रसंगाची भव्यता यहोवाच्या सिंहासनाच्या सभोवार उभे असणाऱ्या उच्च पदस्थ दिव्यदूतांकरवी [सराफीम] ठळकपणे साधण्यात आली. देवाच्या पवित्रतेची जाणीव राखून त्यांनी आदराने आपली ‘मुखे’ झाकली होती. ही विनम्र कृति आचरण्यासोबत त्यांनी देवाच्या पवित्रतेची जोरदारपणे घोषणा केली. या सर्व गोष्टी बघताना त्याचा मानवावर कसा परिणाम झाला असता असे तुम्हास वाटते बरे?
७. यशयाने कोणती प्रतिक्रिया दाखवली, आणि आम्हाला सुद्धा तसेच का वाटले असते?
७ याचे उत्तर यशयालाच देऊ द्या. “तेव्हा मी म्हणालो: ‘हाय, हाय! आता माझे वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि मी सेनाधीश यहोवा, राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.’” (यशया ६:५) स्वतः देवाचा प्रवक्ता असल्याचे यशयाला ठाऊक होते तरीपण बघितलेल्या दृष्टांतामुळे त्याला खूप अशुद्ध असल्याचे वाटायला लागले आणि वैभवी व पवित्र राजाच्या वतीने भाष्य करण्यास पात्र असणारे शुद्ध ओठ आपले नाहीत असे सुद्धा त्याला वाटू लागले. आम्हापैकी सुद्धा काहींना आमच्या पापीष्ठपणाची प्रकर्षाने जाणीव झाली असेल आणि देवाची प्रार्थना करण्यास आपण पात्र नाही, त्याचे नाव स्वतःला लावून घेण्यास आपण अपात्र आहोत असेहि वाटले असेल. या कारणास्तव यशयाचा यानंतरचा अनुभव आम्हास प्रोत्साहनदायक ठरला पाहिजे.
८. एका देवदूताने काय केले व त्याचा काय परिणाम झाला?
८ एक सराफीम, प्राण्यांचे यज्ञार्पण झालेल्या वेदीवरील एक इंगळ घेऊन उडत यशयाकडे आला. ते इंगळ त्याने यशयाच्या ओठांना लावून म्हटले: “पाहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे.” (यशया ६:६, ७) शलमोनाच्या काळी वाहिलेल्या यज्ञार्पणामुळे प्रत्यक्षात याजक देवासमोर पूर्णपणे शुद्ध करण्यात आले नव्हते तरी देवाने स्वर्गातून अग्नि पाठवून वेदीवरील यज्ञाचा स्विकार केला असे सुचविले. (२ इतिहास ७:१–३; इब्रीयांस १०:१–४, ११) आता एका इंगळामुळे यशयाची अशुद्धता काढून टाकल्यामुळे त्याच्या पापांचे प्रायश्चित्त होऊन त्याला खास प्रचाराची नेमणूक स्विकारण्याच्या पात्रतेचा तो बनू शकला. हे भविष्यकाळासंबंधाने केवढे मनोरंजक चित्र देते!
९. यशयाच्या संदेशाचा रोख कोणता होता?
९ त्या आश्चर्यकारक अनुभवामुळे संदेष्ट्याला आधी उल्लेखिण्यात आलेली प्रचाराची नेमणूक मिळाली. (यशया ६:८, ९) तरीपण यशयाला आपले म्हणणे लोकांना असे का सांगावे लागणार होते की ज्याकरवी ते वारंवार ऐकून देखील त्याची समज प्राप्त करू शकणार नव्हते? देवाने आपल्या वाणीने पुढे म्हटले: “लोकांनी . . . पाहून, . . . मनाने समजून मजकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.” (यशया ६:१०) याचा अर्थ हा होता का की यशयाने आडमुठेपणाने व धुसमुसळ्या पद्धतीने बोलणे करायचे होते की ज्याचा परिणाम यहुद्यांत तिरस्कार उत्पन्न होऊन ते यहोवा देवाच्या दूर राहतील? नाही. तर ती वस्तुस्थिती, यशयाने ज्यासाठी “हा मी आहे! मला पाठीव” हे म्हणण्याद्वारे आपली तयारी दाखवली होती ते कार्य विश्वासूपणे कसून केले तरी त्याविषयी यहुदी कोणती प्रतिक्रिया व्यक्त करणारे असतील त्याची सूचकता देत होती.
१०. (अ) लोकांनी बहिरे व अंधळे असण्याविषयीचा दोष कोठे होता? (ब) “असे कोठवर?” असे विचारण्यात यशयाचा कोणता अर्थ होता?
१० यात दोष लोकांचा होता. यशयाने लोकांना ‘ऐकत राहण्यासाठी’ पुनःपुन्हा सांगितले तरी ते माहिती मिळवून त्याकडून समज प्राप्त करणार नव्हते. लोकांच्या या हट्टी व अनाध्यात्मिक प्रवृत्तीमुळेच देवाने, ते लोक प्रतिसाद देणार नाहीत असे आधीच सांगितले होते. केवळ थोडे ऐकणार होते. पण बहुतांश लोक त्यांचे डोळे जणू अगदी मजबूत अशा डिंकाने लिंपिलेले राहिल्यामुळे बघू शकणार नव्हते. ही अशी वाईट स्थिती किती काळ चालू राहणार होती? आपल्याला आणखी किती काळ सेवा करावी लागणार हे विचारण्यापेक्षा याच मनोदयाने यशयाने विचारले: “हे यहोवा, असे कोठवर?” देवाने उत्तर दिले: “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील . . . तोवर.” आणि नेमके तसेच, यशायाच्या हयातीनंतर घडले. बाबेलोन्यांनी लोकांस दूर केले व यहुदा देश “ओसाड व वैराण” केला.—यशया ६:११, १२; २ राजे २५:१–२६.
११. यशयाच्या संदेशाने कसे सांत्वन दिले?
११ तथापि, सरतेशेवटी सगळेच निराशाजनक नसेल असे यहोवाने यशयाला खात्रीपूर्वक सांगितले. “देशात लोकांचा दहावा हिस्सा राहील.” असे तो म्हणाला. होय, “एखादा प्रचंड वृक्ष तोडून टाकल्यावर त्याचा बुडखा, पवित्र बीज जसे राहते” त्याप्रमाणे हे होते. (यशया ६:१३) ७० वर्षांच्या बाबेलोनी दास्यत्वानंतर बीज किंवा अवशेष आपल्या देशी परतला व हे जणू त्या प्रचंड वृक्षाच्या बुडख्यातून नवा अंकुर फुटण्यासारखे झाले. (२ इतिहास ३६:२२, २३; एज्रा १:१–४; पडताळा इयोब १४:७–९; दानीएल ४:१०, १३–१५, २६.) अशाप्रकारे यशयाने दिलेला संदेश दुःखाची छाया पाडणारा होता तरी त्यात सांत्वनदायक घटक सुद्धा होता. तरीपण यामध्ये आम्हाला शास्त्रवचनीय दृष्ट्या यशयाला भावी घडामोडीच्या दृष्टीने एक नमुना असे पाहता येईल. ते कसे?
मोठी पूर्णता
१२. येशू हा थोर यशया आहे हे म्हणण्यात कोणता शास्त्रवचनीय आधार आहे?
१२ यशयाच्या मृत्युनंतर काही शतकानंतर असा एक माणूस दृष्टीपथात आला ज्याला आपल्याला थोर यशया म्हणता येईल. तो येशू ख्रिस्त होता. आपल्या मनुष्य प्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात असताना त्याने पित्याकरवी या पृथ्वीवर येण्याची स्वेच्छा दर्शविली व येथेच त्याला आपल्या प्रचार कार्यात यशयाने लिहून ठेवलेल्या गोष्टीची परिपूर्णता करता येणार होती. (नीतीसूत्रे ८:३०, ३१; योहान ३:१७, ३४; ५:३६–३८; ७:२८; ८:४२; लूक ४:१६–१९; यशया ६१:१) येशूने आपले शिक्षण दिले ते त्या पद्धतीने का दिले ते विवेचीत करताना स्वतःला यशयाच्या ६व्या अध्यायासोबत संलग्न केले. (मत्तय १३:१०–१५; मार्क ४:१०–१२; लूक ८:९, १०) ते योग्यच होते कारण ज्या बहुतेक यहुद्यांनी येशूकडील गोष्टींचे श्रवण केले होते त्याचा त्यांनी, यशया संदेष्ट्याने सांगितलेल्या गोष्टीचा स्विकार जसा त्याच्या काळच्या लोकांनी केला नाही त्या प्रमाणेच स्विकार केला नाही व कृति आचरली नाही. (योहान १२:३६–४३) ज्या यहुद्यांनी स्वतःला येशूच्या संदेशाच्या बाबतीत ‘अंधळे व बहिरे’ केले होते त्यांना इ.सन ७० मध्ये मागे इ.स.पू. ६०७ मध्ये लाभला त्यासारखाच नाश मिळाला. पहिल्या शतकात घडलेली ही घटना यरूशलेमावर आलेल्या एका मोठ्या संकटासारखी होती जे “जगाच्या स्थापनेपासून तेव्हापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही” अशा प्रकारातील होते. (मत्तय २४:२१) तथापि, यशयाने भाकित केले होते त्याप्रमाणे अवशेषाने किंवा “पवित्र बीज” याने विश्वास राखला व यांचे मिळून आध्यात्मिक राष्ट्र, “देवाचा [अभिषिक्त] इस्राएल” बनले.—गलतीकर ६:१६.
१३. यशयाच्या ६व्या अध्यायाची आम्ही आणखी एक पूर्णता का अपेक्षू शकतो?
१३ आता आम्ही यशयाच्या ६ व्या अध्यायाच्या आणखी एका पवित्र शास्त्र आधारित पूर्णतेकडे येतो. त्याच्या समजावणूकीची किल्ली मिळावी याकरता प्रेषित पौलाने इ.सन ६० च्या सुमारास जे शब्द उद्गारले त्यांचा विचार करा. त्याने म्हटले की रोममध्ये ज्या यहुद्यांनी त्याचे ऐकून घेतले त्यांनी “देवाच्या राज्याविषयीची साक्ष” का स्विकारली नाही. त्याचे कारण म्हणजे यशया ६:९, १० ची आणखी एक पूर्णता तेव्हा झाली. (प्रे. कृत्ये २८:१७–२७) तर याचा अर्थ हा होत होता का की येशूचे पृथ्वीवरील दृश्यातून प्रस्थान झाल्यानंतर त्याच्या अभिषिक्त शिष्यांनी यशयासारखी असणारी नेमणूक पुढे न्यावयाची होती? होय, अर्थातच!
१४. येशूचे शिष्य यशयाप्रमाणेचे कार्य कसे करणार होते?
१४ थोर यशयाचे स्वर्गारोहण होण्याआधी त्याने म्हटले की, त्यांच्या शिष्यांना पवित्र आत्मा मिळेल व त्यानंतर ते ‘यरूशलेमात, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत [त्याचे] साक्षी’ होतील. (प्रे. कृत्ये १:८) यज्ञार्पणाच्या वेदीने जसे यशयाच्या बाबतीत त्याची चूक काढून टाकण्याविषयी आवश्यक ते केले त्याप्रमाणे येशूचे यज्ञापर्ण त्याच्या शिष्यांच्या “पापाचे प्रायश्चित करण्याचा” आधार ठरला. (लेवीय ६:१२, १३; इब्रीयांस १०:५–१०; १३:१०–१५) त्यामुळे देव त्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक करू शकत होता आणि याच आत्म्याकरवी त्यांना ‘पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी’ होण्याचे सामर्थ्य लाभणार होते. यशया संदेष्टा व थोर यशयाला देवाचा संदेश सांगण्यासाठी पाठविण्यात आले होते. याच प्रमाणे येशूच्या अभिषिक्त अनुयायांना ‘देवाकडून ख्रिस्ताच्या पद्धतीने बोलण्यासाठी’ पाठविण्यात आले.—२ करिंथकर २:१७.
१५. यशयाप्रमाणे होणाऱ्या प्रचाराचा आमच्या काळी कोणता सर्वसाधारण प्रतिसाद दिसला आहे व त्याने कसल्या भविष्याकडे अंगुली दर्शविली आहे?
१५ आधुनिक काळात, खासपणे पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीनंतर अभिषिक्त ख्रिश्चनांनी देवाचा संदेश घोषित करण्याची निकड हेरली. त्यात “आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस” समीप असल्याचा चिंतनशील विषयही समाविष्ट होता. (यशया ६१:२) त्यामुळे येणारा अनर्थ, ज्याने प्राचीन इस्राएलाप्रमाणे आपण देवाचे लोक असल्याचा दावा बऱ्याच काळापासून केला आहे त्या ख्रिस्ती धर्मराज्यावर चांगलाच तडाखा देणार. देवाच्या अभिषिक्त साक्षीदारांनी कित्येक दशके निष्ठावंत प्रचार केला असला तरीही ख्रिस्तीधर्मराज्यातील बहुतेकांनी आपले ‘अंतःकरण जड केले आहे, कान बधिर केले आहेत व डोळे चिपडे केले आहेत.’ अशी ही परिस्थिती, यशयाचा भविष्यवाद दाखवितो त्याप्रमाणे “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल” तोपर्यंत असेल. हे या दुष्ट व्यवस्थिकरणाच्या अंताचे दृश्य चिन्ह राहील.—यशया ६:१०–१२.
“मला पाठीव”
१६. “मोठा लोकसमुदाय” यशयाप्रमाणेच्या कार्यात सहभागी होत आहे असे का म्हणता येते?
१६ आज कित्येक लाख भक्तीमान ख्रिस्ती आहेत ज्यांना नंदनवनमय पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची पवित्र शास्त्रीय आशा आहे. येशूच्या यज्ञार्पित रक्ताच्या आधारावर या ‘मोठ्या लोकसमुदायाची’ पापे आता जरूरी आहे त्या पातळीपर्यंत क्षमा केली जातात. यांनाही देवाच्या आत्म्याकरवीचे सामर्थ्य व आधार, ते ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांसोबत एकजुटीने जेव्हा म्हणतात की, “हा मी आहे! मला पाठीव” तेव्हा मिळत राहतो. पाठीव? पण कशासाठी? पौल रोमकरांस पत्र १०:१३–१५ मध्ये म्हणतो: “‘जो कोणी यहोवाचे नाम घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण हाईल.’ तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील? ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत!’ या [यशया ५२:७ मधील] शास्त्रवचनाप्रमाणे ते आहे.”—प्रकटीकरण ७:९–१५.
१७. यशयाच्या भविष्यवादाच्या तुलनात्मकतेत बघता आमच्या संदेशातील मसुदा काय आहे?
१७ “हा मी आहे! मला पाठीव” असे यशयाने म्हटले होते खरे, पण त्यास प्राप्त झालेल्या संदेशाची पूर्ण माहिती मिळण्याआधी तो ते तसे म्हणाला होता हे लक्षात घ्या. पण आता आमच्याबाबतत पाहता, देवाला जे आता जाहीर करण्याची इच्छा आहे ते माहीत असल्यामुळे आम्ही त्याच्या, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” या आमंत्रणास प्रतिसाद देऊ शकतो. त्या जाहीर घोषणेत “आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस” याबद्दल आगाऊ इशारा देण्याचे समाविष्ट आहे. तरीपण त्या संदेशात “चांगल्या गोष्टीची सुवार्ता” सुद्धा अंतर्भूत आहे. उदाहरणार्थ, ज्यांना “पाठविले” आहे ते “धरून नेलेल्यांस मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विदित” करण्यात सहभागी होत आहेत. असे करणे खऱ्या समाधानाचा स्रोत ठरत नाही का?—यशया ६१:१, २.
१८, १९. आज कोणत्या खास अर्थाने पुष्कळ जण “मला पाठीव” असे म्हणत आहेत?
१८ तुम्ही आधीच “चांगल्या गोष्टीचा सुवार्ता” सांगण्यामध्ये सहभागी होत आहात तर यशयाच्या ६व्या अध्यायाच्या या उजळणीने तुम्हाला हे विचारण्यास प्रवृत्त करावे की: यशया ६:८च्या आत्म्यास मी अधिक पूर्णतेने कसा प्रतिसाद देऊ शकेन? या लेखाच्या आरंभाला ज्या जोडप्याचा उल्लेख आला आहे त्यांच्याप्रमाणे शेकडोंनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक इमारत बांधणी कामाचे कामकरी कार्यक्रमात सहभाग घेतला. ज्यांच्याठायी बांधणी कामाचे कौशल्य नाही त्यांनी जेथे राज्य प्रचारकांची अधिक निकड होती त्या देशात स्वतःला स्थलांतरीत केले. हे वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तराकडे पत्रव्यवहाराद्वारे चांगल्या रीतीने साध्य होऊ शकते. यासाठी योजना ही केली गेलीच पाहिजे कारण परदेशातील भाषा, राहणीमान, नोकरीच्या सुसंध्या आणि इतर गोष्टी अगदीच भिन्न असतात. तरीपण हे मोठे बदल करावे लागतात म्हणून या संधीस नजरेआड करू नका. ज्यांच्यापाशी “हा मी आहे! मला पाठीव” ही प्रवृत्ती होती त्यांनी स्वतःला या कामासाठी दुसरीकडे आणले आणि असे केल्यामुळे यहोवाने त्यांना समृद्धरित्या आशीर्वादित केले.—पडताळा नीतीसूत्रे २४:२७; लूक १४:२८–३०.
१९ त्याचप्रमाणे काही सडे बंधुभगिनी, विवाहीत दंपति, आणि संपूर्ण कुटुंबांनी देखील स्वतःच्या देशात इतर ठिकाणी जेथे राज्य प्रचारकांची किंवा ख्रिस्ती देखरेख्यांची गरज होती तेथे स्वेच्छेने स्थलांतरीत केले. (प्रे. कृत्ये १६:९, १०) हे करण्यासाठी त्यांना नवीन प्रापंचिक काम जे कदाचित कमी वेतन देणारे होते त्यास धुंडाळावे लागले असेल व याप्रमाणे कित्येक त्याग पत्करावा लागला असेल. काहीनी अल्प सेवानिवृत्तीच्या वेतनासह लवकर सेवानिवृत्ती पत्करली आणि अर्धवेळेचे काम घेतले व त्याद्वारे पूर्ण वेळेच्या उपाध्यपणास अधिक वेळ दिला. सबंध कुटुंबानेच जर “हे आम्ही आहोत! आम्हाला पाठवा” असे म्हटले तर ते किती उत्तम ठरेल! ते यशयाच्या परिस्थितीस प्रतिबिंबित करणारे ठरेल. त्याच्या बायकोने संदेष्ट्री या अर्थी देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात क्रियाशील सहभाग घेतला आणि त्याच्या मुलांनी स्वतःला भविष्यवादित संदेशात समाविष्ट करून घेतले.—यशया ७:३, १४–१७, ८:३, ४.
२०. यशया ६:८ हे वचन मनात राखून तुम्ही कोणता विचार करण्यास हवा?
२० असे हे मोठे बदल करण्यासाठी तुम्हाला तुमची परिस्थिती मुभा देत नसली तरी, ‘यशयाने दाखविलेल्या प्रतिसादाप्रमाणे जेथे मला काही करता येणे शक्य आहे तेथे मी पूर्ण रूपाने सहभाग देतो का?’ हा प्रश्न स्वतःला विचारणे साजेसे ठरेल. तेव्हा देवाच्या संदेशाची घोषणा प्रतिकुल हवामानात किंवा लोकांचा जाहीरपणे विरोध झाला तरी शिकस्तीने करीत राहा. यशयानेही हेच केले. “चांगल्या गोष्टीची सुवार्ता” इतरांना सांगण्यात आवेशी असा! यहोवाने म्हटलेच आहे की, “मी कोणाला पाठवू?” याचे उत्तर देताना तुम्हीही यशयासारखेच आहात असे सिद्ध करा व म्हणा की देवाचा संदेश घोषित करण्यासाठी “हा मी आहे! मला पाठीव.”
उजळणीचे मुद्दे
◻ यशयाच्या ६व्या अध्यायात नमूद असणारा दृष्टांत त्याला कोणत्या परिस्थितीत मिळाला व त्याने काय पाहिले?
◻ यशयाला कोणती नेमणूक मिळाली?
◻ येशूला थोर यशया का म्हणता येते व त्याचे शिष्य यशयासारख्याच कामात कसे समाविष्ट आहेत?
◻ तुम्हाला यशयासारखाच आत्मा कसा प्रदर्शित करता येईल?
[१७ पानांवरील चित्रं]
प्रचारासाठी यशयाची शुद्धी करण्यात येऊन त्याला पाठविण्यात आले
[१८ पानांवरील चित्रं]
पुष्कळानी “हा मी आहे! मला पाठीव” असे म्हणून उत्तम प्रतिसाद दर्शविला