देव व तुम्हामधील प्रकरणांचा शहनिशा करणे
“तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील.”—यशया १:१८.
१, २. (अ) “चला, या आपण बुद्धीवाद करू” असे कोणी तुम्हास म्हटले तर तुम्ही त्याचा काय अर्थ काढणार? (ब) अशाप्रकारची देवाणघेवाण देवाबरोबर करण्याची अपेक्षा आम्हाला का करता येणार नाही?
तुम्ही आणि दुसरा कोणी यांच्यामध्ये मागील चुका किंवा निर्दयीपणामुळे आपसातील नाते बिघडले गेले आहे असे समजा. आता तुम्हाला ही हाक मिळाली आहे: “चला, या आपण बुद्धीवाद करू.” अशा वेळी तुमचा कसा प्रतिसाद दिसेल? त्या हाकेत एकत्रपणे बसून उभयतामधील सवलती व तडजोडी देण्या–घेण्याचे पत्करण्याचे निमंत्रण असेल. शिवाय त्यात प्रत्येकाला आपला दृष्टीकोण मांडता येऊन काही चुका वा गैरसमजूती मान्य करता येणे शक्य आहे.
२ तर आता यशया १:१८ मध्ये जे लिखित आहे ते निर्माणकर्ता वरील अर्थाने गृहीत धरून, “चला, या, आपण बुद्धीवाद करू” या प्रकारे आर्जवील असे तुम्हास वाटते का? तसे नाही. आम्ही “वाद घालू” (द न्यू इंग्लीश बायबल) किंवा यहोवासोबत, तो जणू चुका मान्य करून हातमिळवणी करू शकेल या अर्थाने त्याच्यासोबत देवाणघेवाण करू शकू अशी आम्हाला अपेक्षा धरता येणार नाही. पण मग देवासोबत शांतीसख्य जोडायचे आहे तर यशया १:१८ कसली अपेक्षा करते?
३. यशया १:१८ मधील “बुद्धीवाद करू” यासाठी असणाऱ्या इब्री शब्दाचा खरा अर्थ कोणता आहे?
३ ज्याचा अनुवाद “बुद्धीवाद करू” असा करण्यात आला आहे त्या इब्री शब्दाचा मुलभूत अर्थ “ठरविणे, न्यायानुसार निर्णय देणे, सिद्ध करणे” हा आहे. त्यात कायद्याची झलक दिसते, दोघांपेक्षा अधिक जण एकत्रित बसून वादविवाद करीत असल्याचे सूचित होते. त्यात निर्णय समाविष्ट असतो.a (उत्पत्ती ३१:३७, ४२; इयोब ९:३३; स्तोत्रसंहिता ५०:२१; यशया २:४) विल्सन्स ओल्ड टेस्टमेन्ट वर्ड स्टडीज हे प्रकाशन त्याचा अर्थ “बरोबर असणे; बरोबर व खऱ्या गोष्टीविषयीचा विचार विनिमय करणे, ती प्रदर्शित करणे” असा देते. देव आज्ञा देत होता की, “चला, या आपण सर्व यथास्थित करू.” (द न्यू अमेरिकन बायबल) किंवा, “आपण प्रकरणांचा शहनिशा करू.”
४-६. यशया कोण होता व त्याने संदेष्टा या अर्थी केव्हा सेवा केली?
४ हा शक्तीमान संदेश देण्यासाठी यहोवा देवाने यशया संदेष्ट्यास वापरले. पण हा यशया कोण होता व त्याचा संदेश त्या काळी योग्य का होता? त्यापेक्षा, याचा आज आम्हाला कसा फायदा मिळू शकतो?
५ “संदेष्टा” म्हटला की आज अनेकांना वाटते की तो कोणी तरूण तपस्वी माणूस असावा व त्याने वास्तवतेविषयीचा आपला विपर्यस्त दृष्टीकोण सांगितला आहे. इतर काही जण त्याला तऱ्हेवाईक म्हातारा असल्याचे समजतील, जो त्याच्या काळात स्वतःला जणू न्यायाधीशाप्रमाणे समजत होता. तथापि, यशया हा या दोघांपासून वेगळा, केवढी तर्कबुद्धि व समतोल राखणारा गृहस्थ होता व त्याचाच यहोवा देवाने त्याचे नाव असणाऱ्या पुस्तकाचे लिखाण करण्यासाठी वापर केला!
६ “आमोजाचा पुत्र यशया” यहुदात राहात होता, त्याने “यहुदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्किया यांच्या काळी” यहोवाची सेवा ४० पेक्षा अधिक वर्षे क्रियाशीलपणे केली. यशयाने स्वतःविषयी अधिक काही माहिती देऊ केली नाही ही त्याची लीनता होय. तो यहुदाच्या बादशाही घराण्याशी संबंधित होता असे संप्रदाय सांगतो. तो कुटुंब वत्सल होता हे खात्रीने सांगता येते, त्याला बायको व दोन मुले होती. ही बायको वारल्यावर त्याने दुसरे लग्न केले आणि आणखी एका मुलाचा बाप झाला ज्याचे भविष्यवादित नाव इम्मानुएल ठेवण्यात आले.—यशया १:१; ७:३, १४; ८:३, १८.
७. आम्ही यशयाच्या भविष्यवादाबद्दल आस्था का राखावी?
७ यशयाचा व आमचा काळ यामध्ये खूप साम्य आहे. आपण युद्ध व त्यासोबत असणाऱ्या दहशतींच्या आंतरराष्ट्रीय तणावपूर्ण समयात जगत आहोत हे आपल्याला माहीतच आहे. देवाची भक्ती करीत असल्याचा दावा करणारे धर्म व राजकारणी नेते, आपण उदाहरणशील आहोत असे दाखवीत असले तरी त्यांचे स्वरूप आर्थिक व नैतिकदृष्ट्या धक्का देणारे आहे हे आपल्याला वर्तमानपत्रातील अहवालाद्वारे नियमित रूपाने दिसते. अशा नेत्यांकडे व जे खासपणे ख्रिस्ती धर्मराज्यासोबत संलग्न आहेत त्यांच्याकडे देव कोणत्या दृष्टीने बघतो? त्यांच्यासाठी व त्यांना अनुसरणाऱ्यांसाठी पुढे काय उभे आहे? यशयाच्या पुस्तकात आपल्याला अशी इश्वरी विवेचने दिसतात जी सध्याच्या गोष्टींना अत्यंत प्रसंगोचित वाटतात. शिवाय देवाची सेवा करणाऱ्या आम्हा प्रत्येकासाठी देखील धडे नमूद आहेत.
दोषी राष्ट्रासाठी संदेष्टा
८. यशयाच्या पुस्तकात काय काय समाविष्ट आहे व ते कोणत्या पद्धतीने लिहिले गेले?
८ यशयाचे पुस्तक वाचताना यहुदा व यरूशलेमाचा दोष, शत्रूंनी घातलेल्या वेढ्यांचा ऐतिहासिक वृत्तांत, सभोवतालच्या राष्ट्रांना सांगण्यात आलेली विध्वंसमूलक वचने आणि इस्राएलाची पुनर्स्थापना व तारण याविषयीची प्रोत्साहनदायक भाकिते ही माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. ही माहिती जोमदारपणे व मनावर पकड बसवील या पद्धतीने लिहिण्यात आली आहे. डॉ. आय. स्लॉटकी म्हणतात: “यशयाची अप्रतिम विचारधारा, त्याने केलेले चित्रमय व भौगोलिक वर्णन, सामर्थ्ययुक्त रूपक, अनुप्रास, शब्दांमधील स्वरसादृश्य याविषयी असणारा हातखंडा आणि वाक्याचा सुंदर तोल व लयबद्धता याविषयी प्रामाण्य त्याची भरपूर स्तुति करतात.” यासाठी आपण यशयाच्या अगदी आरंभाच्या म्हणजे पहिल्या अध्यायातील संदेशाचे परिक्षण करून पाहू या.
९. यशयाच्या पहिल्या अध्यायाच्या लिखाणाचा काळ व परिस्थिती याविषयी आपल्याला काय समजते?
९ या अध्यायाचे लिखाण लेखकाने नक्की केव्हा केले ते तो सांगत नाही. यशया ६:१–१३ उज्जीया राजा मरण पावला त्याची तिथि देते. यास्तव यशयाने त्याच्या सुरुवातीच्या अध्यायांचे अध्याय त्या आधी लिहीले असले तर त्यात उज्जीयाच्या कारकीर्दीतील शेवटली परिस्थिति प्रवर्तित झाली पाहिजे. उज्जीयाने (इ.स.पू. ८२९–७७७) वस्तुतः “यहोवाच्या दृष्टीने जे नीट ते” केले. त्यामुळे यहोवाने त्याला त्याच्या कारकीर्दीत समृद्ध केले. तरीपण एकंदरीत परिस्थिती चांगली नव्हती हे सुद्धा आपल्याला सांगता येईल कारण उज्जीयाने (अजऱ्या) मंदिरात उद्दामपणे धूप दाखविला म्हणून देवाने त्याला कोडी बनविले त्या आधी “लोक अद्यापि उच्च स्थानी यज्ञ करीत व धूप जाळीत.” (२ इतिहास २६:१–५, १६–२३; २ राजे १५:१–५) उज्जीयाच्या काळी हयात राहिलेल्या दुष्ट परिस्थितीमुळे त्याचा नातू आहाज राजा (इ.स.पू. ७६२–७४५) याने जी भरघोस दुष्टता आचरली, ज्याचे आम्ही वाचन करतो, त्याचेच वर्णन यशया करतो. अशाप्रकारे अध्याय १ केव्हा लिहिला गेला त्यापेक्षा कशामुळे देव “चला या, आपण बुद्धीवाद करू” असे बोलला ते महत्वाचे आहे.
१०. आहाज राजाच्या कारकीर्दीत कोणती परिस्थिति सर्वसाधारणपणे पण खासरित्या नेत्यांमध्ये अस्तित्वात होती?
१० यशयाने उघडरित्या ही घोषणा केली: “किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतति! ही आचारभ्रष्ट मुले! यांनी यहोवाला सोडिले आहे. इस्राएलाच्या पवित्र प्रभूस तुच्छ मानले आहे. ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत . . . हर एक मस्तक व्यथित झालेले आहे, हर एक हृदय ग्लान झाले आहे. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही.” (यशया १:४–६) आहाज राजाची १६ वर्षांची कारकीर्द मूर्तिपूजेच्या आचाराने भरली होती. त्याने “राष्ट्रांच्या अमंगळ कृतीस अनुसरून आपल्या मुलांचा अग्नीत होम केला.” तो “उच्च स्थानी टेकड्यांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करी व धूप जाळी.” (२ इतिहास २८:१–४; २ राजे १६:३, ४) राजपुत्रांमध्ये अन्यायीपणा, लाच व अनैतिकता या गोष्टी इतक्या फलवान झाल्या होत्या की ते प्राचीन सदोमामध्ये राज्य करणारे अधिपती शोभले असते. (यशया १:१०, २१–२३; उत्पत्ती १८:२०, २१) खरेच, देव अशांना मुळीच कृपापसंती दाखवणार नव्हता. आणि पुढाऱ्यांचीच स्थिति अशी आहे तर मग लोकांची काय व्यथा?
११. यशया १:२९, ३०चा अर्थ आम्ही कसा समजावा?
११ यशया संदेष्ट्याने लोकांच्या शोचनीय स्थितीचे वर्णन, ते जेथे आपली मूर्तिपूजक यज्ञार्पणे करीत व धूप दाखवीत त्या पवित्र वृक्ष व बागांचे चित्र देऊन स्पष्ट केले. त्यांची ही “आवडीची झाडे” त्यांना लज्जित करणार होती. (यशया १:२९; ६५:३) ते प्रतिकात्मक वर्णन मूर्तिपूजकांना लागू करून यशया म्हणाला: “तुम्ही पाला सुकून गेलेल्या एलाच्या झाडासारखे, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.” (यशया १:३०) होय, यहोवाला सोडून जाणारे लोक “नष्ट होतील.” ते पिंजलेल्या तागासारखे (ज्वलनास उपयुक्त) व त्यांच्या मूर्त्या ठिणगी–दोन्ही जळून नष्ट होणार होते.—यशया १:२८, ३१.
१२, १३. यशयाचा व आमचा काळ यात कोणते साम्य दाखविता येईल?
१२ आता याची सध्याच्या परिस्थितीबरोबर तुलना करून बघा. एकाच महिन्याच्या कालावधीत अमेरिकेतील वृत्तपत्रांनी कळविले: राष्ट्रपतीपदाच्या एका उमेदवाराने त्याच्या “स्त्रीलंपट” कारवायाच्या धक्कादायक वृत्तामुळे आपली उमेदवारी काढून घेतली. एका ख्यातनाम धर्मपुढाऱ्याला व्यभिचाराची कबुली, पुरुषगमन, बायकांची अदलाबदली आणि वाच्यता होऊ नये म्हणून गप्प बसविण्यासाठी लाच देण्याकरता निधिचा गैरवापर या आरोपामुळे काढून टाकण्यात आले. (“१९८४ पासून त्याने नुकसान भरपाई प्रीत्यर्थ ४.६ दशलक्ष डॉलर्स काढल्याचे वृत्त आहे.” टाईम, मे ११, १९८७) गेल्या वर्षी ऑस्ट्रियात रेईन येथील मठाधिपतीला ‘लॉज धुंडाळीत राहणे, माजी शासनकर्त्यांच्या कुटुंब सदस्यांबरोबर मेजवान्या झोडणे व कमी प्रतिष्ठित स्त्रियांबरोबरील सहवासात ६० लाख डॉलर्स उधळणे याकारणामुळे हाकलून देण्यात आले.’ अशा प्रकारच्या आणखी काही नेत्यांची तुम्हाला उदाहरणे देता येतील. अशांकडे देव कोणत्या दृष्टीने पाहतो असे तुम्हाला वाटते?
१३ सर्वसाधारण लोकांच्या बाबतीत पाहता, मोठी धार्मिक विरूद्धता दिसते. काहीजणांना धर्माविषयी किळस वाटून ते उदासीनता धारण करतात. उदाहरणार्थ, इंग्लंडमधील लोकवस्तीच्या फक्त ३ टक्केच चर्चला उपस्थिति दाखवितात. दुसऱ्या ध्रुवावर पराकोटीची धार्मिकता दिसते. ही, “तारण” प्राप्ती होण्याचे भावनिक अपील, अन्य भाषेत बोलणे व आजारी “बरे” झाल्याचे पाहणे याकरवी मंत्रमुग्ध व आकर्षित करणाऱ्या चर्चेसच्या वाढीत दिसते. चमत्कार घडला जावा या आशेने लोक घोळक्याने वेदीजवळ गर्दी करतात. इतर काहीजण [मेक्सिको शहरात] ग्वाडेलोप कुमारी (देवीची) भेट घेण्यासाठी रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत जाऊन “विश्वास” रूपी कृत्ये प्रदर्शित करतात. एका वृत्तपत्राने म्हटले: “परक्यांना या देवीचे अस्तित्व व ज्या भावनेने तिची उपासना केली जाते त्या गोष्टी ख्रिस्ती धर्म व मूर्तिपूजक यांचे मिश्रण वाटत असल्या तरी या देवीने मेक्सिकोतील कॅथोलिक धर्मात आपले स्थान अग्रगण्य केले आहे.”
त्याची कृपादृष्टी तुम्हाला कशी मिळवता येईल?
१४. देवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्या सर्वाचाच तो स्विकार करीत नाही हे यशया मार्फत यहोवाने कसे स्पष्ट दाखविले?
१४ देवाच्या बाजूस असण्याचा दावा करणाऱ्या पण “पित्याची भक्ती आत्म्याने व खरेपणाने” न करणाऱ्यांच्या बाबतीत यहोवा देवाने पत्करलेला दृष्टीकोण गोंधळात्मक नाही. (योहान ४:२३) कोणतेहि राष्ट्र, एखादा धार्मिक गट किंवा व्यक्ती देवाने प्रकटविलेल्या दर्जांनुरूप राहात नसेल तर त्याकरवी व्यक्त होणारा सर्व धार्मिक भाव दिखाऊ, व्यर्थ आहे. प्राचीन इस्राएलात धार्मिक मेळे व यज्ञार्पणे या गोष्टी खऱ्या भक्तीतील भाग होत्या. (लेवीय, अध्याय १–७, २३) तरीपण हे आचरण करणाऱ्या अविश्वासू यहुद्यांच्या बाबतीत देवाचा दृष्टिकोण—त्याची नापसंती—यशयाने स्पष्टरितीने वदविली. देव म्हणाला: “तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो. तुम्ही कितीहि विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही.” (यशया १:११–१५) हेच आज देखील खरे आहे. धार्मिक विधि व पाठांतरीत प्रार्थना व पाठ यापेक्षा देव प्रार्थना व बरोबरची कृत्ये यांची अंतःकरणापासून अपेक्षा करतो.
१५. यशया १:१८ आम्हाला आशेचे कारण का देते व मग “चला या, आपण बुद्धिवाद करू” या शब्दांचा अर्थ काय होतो?
१५ ही गोष्ट जाणणे आम्हाला आशेचा आधार देते. मानवाला देवाची कृपादृष्टी मिळवता येईल. ती कशी? यशया आर्जवितो: “आपणास धुवा व स्वच्छ करा, माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा.” आणि यालाच जोडून यशया देवाची ही आज्ञा कळवितो: “चला, या आपण बुद्धिवाद करू.” अशाप्रकारे समान पदावर असणाऱ्यांनी एकत्र बसून वैचारिक अदलाबदल मांडण्याच्या वा स्विकारण्याच्या बैठकीला अनुलक्षून येथे यहोवा बोलत नव्हता. जे योग्य, सरळ ते देवाला ठाऊक आहे. त्याचा निर्णय होता: काही बदल करायचा आहे तर मानवाने करून त्याच्या न्याय्य व नीतीमान दर्जाना अनुसरून स्वतःला ठेवावे लागेल. हेच आजही तसेच आहे. बदल घडवून आणणे शक्य आहे व त्याचा परिणाम कृपादृष्टीत होणारा आहे. ज्याचे मार्गाक्रमण निःसंशये वाईट आहे त्याला सुद्धा बदल करता येणे शक्य आहे. यामुळेच यशयाने लिहीले: “तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील.”—यशया १:१६–१८.
१६. काही लोकांनी चुकीच्या कृत्यांविषयीच्या पवित्र शास्त्रीय उपदेशाला कसा प्रतिसाद व्यक्त केला?
१६ परंतु या सूचनेबद्दल असे पहायला मिळते की ही सूचना चांगली आहे असे बहुतेकांना वाटते पण ती आमच्यासाठी नव्हे तर दुसऱ्यांना लागू आहे असे त्यांना वाटते. खरे म्हणजे यशयाच्या काळातील बहुसंख्यांकाना तेच वाटत होते. त्यामुळेच प्रत्येकाने स्वतःचे परीक्षण करून पाहिले पाहिजे. कोणी ख्रिस्ती लबाडी करणे, अफरातफर, लैंगिक अनैतिकता यासारख्या किंवा इतर काही गंभीर पापाचा दोषी आहे तर पश्चाताप व पश्चातापास साजेशी असणारी फळे जरूरीची आहेत. (प्रे. कृत्ये २६:२०) काहीनी ही कृति आचरून ‘आपल्यातील व यहोवातील प्रकरणांचा शहनिशा केला’ ही प्रशंसनीय गोष्ट आहे. उदाहरणार्थ, डिसेंबर १, १९८५च्या टेहळणी बुरुज मध्ये, बाहेरच्या लोकांना न दिसणाऱ्या पण देवाकरवी निरिक्षिल्या जाणाऱ्या चुकांची चर्चा करण्यात आली आहे. (मत्तय ६:६; फिलिप्पैकर ४:१३) त्यात तीन क्षेत्रांचा उल्लेख होता: गुप्तपणे रक्तसंक्रमणाचा स्विकार करणे, हस्तमैथुन व मद्याचा दुरुपयोग. त्या साहित्याचा विचार केल्यावर कित्येक वाचकांनी रसिकतापूर्ण पत्रे पाठविली; त्यांनी म्हटले की अशा चुका त्यांच्यामध्ये होत्या पण त्यांनी पश्चाताप व्यक्त करून स्वतः मध्ये बदल केला.
१७. आम्ही गंभीर पातक करीत नसलो तरी आम्हास यशया १:१८ चा अवलंब कसा लागू पडू शकतो व कशी मदत मिळू शकेल?
१७ हे खरे की या प्रकरणाचा विचार करणारे बहुतेक ख्रिस्ती गंभीर पापाचे दोषी नाहीत. तरीपण यशया करवीच्या संदेशाने आम्हाला आमच्या अंतःकरणाची तपासणी करण्याची चालना द्यावी. आम्हाला देवासोबत काही गोष्टी अद्याप ठीकठाक करायच्या आहेत का? यशयाच्या संदेशाचा मुलभूत घटक योग्य कार्यप्रवण करणारे अंतःकरण हा होता, प्रार्थनेवषियी स्वतःला विचारता येईल: ‘मी अंतःकरणापासून प्रार्थना करतो का आणि माझ्या हालचाली प्रार्थनेच्या सहमतात सर्वतोपरि असतात का?’ असे परीक्षण केल्यामुळे काहींना सुधारणा घडवून आणण्यास वाव मिळाला. देवाच्या इच्छेविषयी आपले ज्ञान वाढावे यासाठी ते प्रार्थना करीत होते पण पवित्र शास्त्र व ख्रिस्ती प्रकाशनांचे वाचन व अभ्यास यासाठी प्रत्यक्षात फारच थोडा वेळ देत होते. दुसरे काही जण उपाध्यपणातील सहभाग वाढवला जावा यासाठी प्रार्थना करीत होते, पण आपला प्रापंचिक व्यवसाय कमी करून थोड्याशा अर्थप्राप्तीत राहणीमान ठेवता येईल अशी काही सुधारणा त्यांनी केली नाही. तुम्ही तुमच्या शिष्य बनविण्याच्या कामावर देवाने आशीर्वाद पाठवावा अशी प्रार्थना केली आहे का? तर मग प्रभावी शिक्षक होण्यासाठी तुम्ही आपल्यापरिने केवढे परिश्रम घेत आहात? तुम्ही पुनर्भेटी घेण्यात जाणीवपूर्वकतेने वाढ केली आहे का आणि कोणासोबत नियमितपणे पवित्र शास्त्राचा अभ्यास करता यावा यासाठी वेळ ठरविला आहे का? प्रार्थनेच्या अनुषंगाने चिकाटीचा प्रयत्न राखणे ही गोष्ट देवाने तुमचे ऐकावे असे तुम्हास प्रांजळपणे वाटत असते असे दाखवून देईल.
१८. देव व आम्हामधील प्रकरणांचा शहनिशा करण्याबद्दल आम्ही लक्ष का दिले पाहिजे?
१८ आम्हा प्रत्येकाने आमच्या जीवनाच्या सर्व बाबींचा आमचा देव, निर्माणकर्ता याजशी ‘शहनिशा करावा’ हे योग्यच आहे. याच्या अनुषंगाने यशयाने कोणता विवाद मांडला ते लक्षात घ्या: “बैल आपल्या धन्याला ओळखितो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो; पण इस्राएल ओळखीत नाही. माझे लोक विचार करीत नाहीत.” (यशया १:३) बैल किंवा गाढव यापेक्षा आम्ही कमी जाणतो किंवा अल्परसिक आहोत असे आम्हाला कोणाला दाखवावेसे वाटणार नाही. पण आम्ही आमचा जीवनदाता व त्याच्या गरजा याविषयी शिकून घेण्याचे व त्यानुरूप चिकाटीने जीवन व्यतित करीत राहणे याच्यासाठी आणखी परिश्रम घेण्याची गरज नाही असे स्वतःला वाटू दिले तर मग आम्हाला ते वर्णन सुयुक्त ठरेल.
१९. देवासोबत सर्व प्रकरणे व्यवस्थित करणाऱ्यांबद्दल यशयाने कोणती संभाव्यता विदित केली व याचा आम्हासाठी काय अर्थ होतो
१९ यशयाने त्याच्या लोकांना आशावादी राहण्याचे कारण दिले. यहोवासमोर असणारी त्यांची भूमिका त्यांना शुद्ध स्थितीत आणता येईल असे त्याने म्हटले. ते जणू त्यांची किरमिजासारखी तांबडी झालेली वस्त्रे हर्मोन डोंगराच्या माथ्यावर साचलेल्या बर्फासारख्या किंवा लोकरीसारख्या शुभ्रतेची होण्याप्रमाणे घडणार होते. (यशया १:१८; स्तोत्रसंहिता ५१:७; दानीएल ७:९; प्रकटीकरण १९:८) मोठ्या जमावाने प्रतिसाद दिला नाही व त्यामुळे राष्ट्राला तरवार व बंदिवानपणा लाभला तरी अवशिष्ट लोकांना परतता आले. याचप्रमाणे आम्हाला, मंडळीत प्रेमळ ‘न्यायाधीश व मंत्री’ असणाऱ्या दक्ष देखरेख्यांच्या मदतीने यहोवाची कृपादृष्टी मिळविता येईल. (यशया १:२०, २४–२७; १ पेत्र ५:२–४; गलतीकर ६:१, २) तद्वत, देव व तुम्हामधील प्रकरणांचा शहनिशा होऊ शकतो याविषयी खात्रीदायक असा. किंवा जर तुम्ही आधीच देवाची कृपादृष्टी मिळविली आहे तर त्याच्या सोबतचे आपले संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न ठेवा. तसे करणे योग्यतेचे ठरेल.
[तळटीपा]
a डॉ. इ.एच. प्लमत्रे विवेचीत करतात: “[किंग जेम्स आवृत्तीत देण्यात आलेले] विवेचन समपदावर असणाऱ्यांमधील चर्चेचा विचार प्रस्तुत करते. तरीपण इब्री भाषेतील विचार जसा न्यायाधीश आरोप्यांबद्दल व्यक्त करतो त्याप्रमाणे अधिकारयुक्त निर्वाळा कोणी देत असल्याचा सूर व्यक्त करतो.”
उजळणीचे मुद्दे
◻ ‘या व देवासोबत बुद्धिवाद करा’ या आज्ञेचा कोणता अर्थ होतो?
◻ यशयाचा काळ आमच्या काळासारखाच कसा होता?
◻ देवाची कृपादृष्टी मिळविण्यासाठी काय करण्याची जरूरी आहे असे यशयाने दाखविले?
◻ गंभीर पातकाशिवाय आणखी कशाबाबतीत आम्ही देव व आमच्या मधील प्रकरणांचा शहनिशा केला पाहिजे?
[१० पानांवरील चित्रं]
उंच यार्देनेची दरी यापलिकडे गालील पर्वतापर्यंत दिसणारे हर्मोन डोंगराचे बर्फाच्छादित माथे
[१३ पानांवरील चित्रं]
यशयाने म्हटले की, “गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो.” यामध्ये कोणता धडा आहे?