राग—तो काय आहे?
“रागासाठी देवाने दिलेल्या कौशल्यास दडपून टाकता म्हणजे तुम्ही स्वतःची हत्या करता.” असा इशारा न्यूज वीक मासिकातील लेखाने अवतरीत केला. व्यक्त न केलेल्या रागाचा परिणाम उच्च रक्तदाब हृदय रोग, खिन्नपणा, चिंता व मद्यार्क प्राशन समस्येत दिसतो अशी कल्पना पुष्कळ मनोविकार तज्ज्ञानी लोकप्रीय केली आहे.
उलटपक्षी पवित्रशास्त्राने हजारो वर्षापूर्वीच बोध केला: “राग सोडून दे क्रोधाविष्टपणाचा त्याग कर.” (स्तोत्रसंहिता ३७:८) पवित्रशास्त्र मुद्देसुद निदान करते: “मन उतावळे होऊन देऊन रागावू नको; कारण राग मूर्खाच्या हृदयात वसतो.”—उपदेशक ७:९, किंग जेम्स व्हर्शन.
मग, पवित्रशास्त्र की तज्ज्ञ, कोण बरोबर आहेत? राग खरोखरी काय आहे? रागाचा उद्रेक आम्हासाठी चांगला आहे का?
उद्रेकी राग
रागाचे सर्वसाधारण वर्णन असंतुष्टता व विरोध या विषयीची प्रतिक्रीया किंवा क्लिष्ट भावना असे आहे. असे इतरही शब्द आहेत जे रागाचा पारा, किंवा तो कसा व्यक्त केला जातो, ते प्रकट करतात. क्रोध अतिप्रखर रागास सूचित करतो. त्वेष हानीकारक असू शकतो. चीड नीतिमान कारणाच्या रागास संदर्भित करते. संताप बहुदा सूड किंवा शिक्षा यास सूचित होतो.
राग साधारणतः विशिष्ट गोष्टी विषयी असतो. कशा तरी बाबतीत आम्ही रागावितो. परंतु आम्ही तो जसा व्यक्त करतो किंवा हाताळतो त्याने मोठा फरक पडतो.
चित्तवेधकपणे कांही तज्ज्ञ रागाचा उद्रक फायदेकारक आहे यावर तग धरून असले तरी अलिकडील मानसशास्त्र संशोधन दाखविते की जे लोक राग प्रदर्शित करण्यास स्वतःस वाव देतात ते मानहानी, खिन्नपणा, दोषी असल्याची गुंतागुंत, वाढणारे वैर किंवा चिंता याने पछाडले जातात. याहून अधिक, “एकाद्याचे अंतःकरण हलके करणे” किंवा “मनावरील ताण कमी करणे” हे बहुधा रागाचा आटापिटा, किंचाळणे रडणे, अगर शारिरिक दुखापत याजसोबत होते पण हे सर्व काही निरसन करण्यापेक्षा अधिक समस्या आणविते. रागिष्ट मनुष्य रागाने भरतो व इतरामध्ये इजेच्या भावना निर्माण करतो.—नीतीसूत्रे ३०:३३; उत्पत्ति ४९:६,७.
आम्ही रागात ओरडतो किंवा किंचाळतो तेव्हा आम्हास बहुधा त्याचे अपेक्षिलेले परिणाम मिळत नाहीत, उलटपक्षी दुसरी व्यक्ती प्रतिहल्ला करण्यास चेतविली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमची मोटर चालवित आहात, दुसरा ड्रायव्हर तुम्हास त्रास देण्यासाठी कांहीतरी करतो. त्याच्या प्रत्युत्तरात तुम्ही ओरडता व तुमचा हॉर्न वाजविता. तुमचा उद्रेक सहजपणे तुमच्या प्रतिस्पर्ध्याचा सूड घेण्यास चेतवितो. काही वेळेस अशा परिस्थितीतून दुखःद प्रसंग ओढवतात. उदाहरणार्थ, ब्रुकलिन न्यूयॉर्क मधील एक मनुष्य रस्त्यावरील पार्किंग जागेसाठीचा झालेल्या बाचाबाचीत मारला गेला. पवित्रशास्त्र या समस्येवर असे म्हणते तेव्हा प्रकाशझोत टाकते: “रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात.” (नीतिसूत्रे २९:२२) याकरताच ही सूचना पाळणे किती सूज्ञपणाचे आहे: “वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करून नका . . . शक्य तर सर्व माणसाबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा”!—रोमकरास १२:१७, १८.
याकारणास्तव रागाचा उद्रेक सामाजिकरित्या आम्हास मदत करीत नाही. परंतु तो शारिरिकरित्या आम्हास चांगला आहे का? असंख्य वैद्यांनी तो फायदेकारक नाही असा निष्कर्ष काढला. अभ्यासाने दाखविले आहे की राग व्यक्त करण्याकडे कल असणाऱ्या व्यक्तिला अतिउच्च रक्तदाब असतो. कांहीनी अहवाल दिला की रागामुळे हृदय विकाराची लक्षणे, डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, चक्कर किंवा अबोल राहाणे हे घडते. उलटपक्षी आमच्या जीवनाचा दाता स्पष्टीकरण करतो: “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.” (नीतिसूत्रे १४:३०) येशूने म्हटले: “शांती करणारे ते धन्य त्यांना ‘देवाची मुले’ म्हणण्यात येईल.”—मत्तय ५:९.
रागाची कारणे
आमच्या स्वाभिमानावर हल्ला, व्यक्तीगत टीका, अपमान, अवाजवी वागणूक व नाहक विफलता ही रागाची कारणे आहेत. लोक रागावतात तेव्हा ते ठासून संकेत देतात: “तू माझ्या सौख्यानंदास व सुरक्षिततेस धमकावतोस! तू माझ्या स्वभिमानास दुखावतोस! तू माझा स्व-आदर हिरावून घेतोस! तू माझा गैरफायदा घेत आहेतस!”
कांहीवेळेस लोक रागास काही गोष्टींवर पर्याय म्हणून उपयोगात आणतात. उदाहरणार्थ न्युयॉर्क शहरातील १४ वर्षाचा मुलगा नेहमीच रागाने भारावलेला व भांडणास तयार व्हावयाचा. डॉक्टरांच्या मदतीने सरतेशेवटी मुलाने कबूल केले की: “मला मदतीची गरज आहे, मला बोलण्यास कोणी तरी पाहिजे असे मी कधीच म्हणालो नाही, . . . लोकांना तुम्ही आवडत नाही ही भीती तुम्हाला वाटत असते.” यास्तव त्याला लक्ष देणे व आपुलकी याविषयीची गरज होती.
पत्नी आपल्या मैत्रीणीला भेटायला जावयाची, तेव्हा प्रत्येक वेळेस कॅलेफोर्नियातील एका विवाहित दांपत्यामध्ये भांडणे होत. पतीच्या रागिष्ट वागणूकीने पत्नीमध्ये तीच प्रतिक्रिया संचारली. सल्ला मसलतीच्यावेळी पतीने तिला, त्याने कधिही कोणास पूर्वी सांगितले नव्हते ते, सांगितले. त्याची पत्नी त्याला सोडून एकटी थोड्या क्षणासाठीही दूर जाते तेव्हा ती त्याला सोडून जाणार याचे भय त्याला वाटते कारण तो लहान होता तेव्हा त्याच्या बापाने त्याला सोडून दिले होते. पत्नीने तिच्या पतीच्या रागा मागील कारण—सोडून जाण्याचे भय—जाणले यामुळे तिला तिचा स्वतःचा त्याच्यावरील राग दूर करण्यास मदत केली व त्याला तिच्या प्रेमाची खात्री दिली.
अशाप्रकारे राग संकेत असू शकतो. अशा प्रकरणात त्याच्या मागील कारण जाणण्याने आम्ही त्याजसोबत योग्यपणे तोंड देण्याचे शिकू शकतो.
[४ पानांवरील चित्रं]
असंख्य वैद्यांनी निष्कर्ष काढला की रागाचा उद्रेक प्रकृतीस घातक आहे