कलकत्त्यातील एक दिवस “सर्व प्रकारच्या लोकांना” सुवार्ता पोंचविणे
कलकत्ता हे भारतातील असे शहर आहे जेथे “सर्व प्रकारचे लोक” राहतात. त्यातील एक कोटीपेक्षा अधिक निवासितांमध्ये यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याची सुवार्ता प्रसारीत करण्यामध्ये कार्यमग्न आहेत. वंश, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व आर्थिक पार्श्वभूमिच्या या लोकात सुवार्ता नेण्यासाठी खरे चातुर्य व सहनशीलता लागते. तथापि, ख्रिस्ती प्रेषित पौलाला ज्या प्रमाणे त्याचा सुवार्तिक प्रवास त्याच्या काळातील जगतात कानाकोपऱ्यात घेऊन गेला त्याच प्रमाणे कलकत्त्यातील यहोवाचे साक्षीदार सुद्धा “सर्व प्रकारच्या लोकांसाठी” सर्व काही झाले आहेत की ज्यामुळे यांचा ‘बचाव साध्य करता येईल.’—१ करिंथकर ९:२२; कलस्सैकर १:२३.
साक्षीदार आपले प्रचाराचे कार्य कसे उरकत आहेत व त्यांना त्यांच्या उपाध्यपणात कशा प्रकारच्या लोकांना व परिस्थितीला तोंड द्यावे लागते बरे? अलिकडेच मी कलकत्त्याला भेट दिली व एका पायनियरसोबत किंवा पूर्ण वेळेच्या प्रचारकाबरोबर एक दिवस घालविला. मी अनुभविलेल्या अनुभवात तुम्हाला थोडेसे डोकावून पहावेसे वाटेल का?
विस्तारित व बहुविध क्षेत्र
घरोघरच्या प्रचाराच्या त्या कार्यमग्न व अभुतपूर्व दिवसाच्या कामाच्या समाप्तीनंतर मी व माझा मित्र घरी जाऊ लागलो. आम्ही बस येण्याची प्रतीक्षा करीत होतो त्या दरम्यान आम्ही या प्रचंड शहरात माझा मित्र व त्याच्या पायनियर सोबत्यांना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्याची चर्चा आरंभिली.
“येथे पूर्ण वेळेचे कार्य करणाऱ्या कोणालाही विचारून पहा,” असे माझा मित्र उत्तरला, “की त्याला एखाद्या सोप्या नेमणूकीत जाण्याचे आवडेल का. त्याबद्दल तो आपली मर्जी दाखवील असे मला वाटत नाही.”
माझ्या मित्राचे म्हणणे बरोबर होते. कारण कलकत्त्यातील पायनियर्सना त्यांचे काम जगातील कामापेक्षा उच्च प्रतीचे ध्येय वाटते. विविधता असणाऱ्या या शहरात त्यांना विस्तारित व बहुविध क्षेत्र आहे.
या शहरात हिंदु धर्माचे प्राबल्य आहे तरी चर्च व मशिदी सुद्धा मुबलक आहेत. तसेच थोडीफार बुद्ध मंदिरे अधुनमधून दिसतात. शहराच्या काही भागात प्रचंड वास्तुतून श्रीमंतांचा निवास आढळतो. पण येथून जवळच घराच्या भिंतीला लागून बांधलेल्या पुष्कळ खोल्या दिसतात. येथे थोडे दिवस काम करून मग स्थलांतरित होणाऱ्या लोकांची वस्ती आढळते. यांना दरमहा साधारण १५० रूपयांची [सुमारे १२ यु.एस. डॉलर्स] प्राप्ती होते. आपल्या धर्म व राहणीमानानुसार या लोकांच्या प्रथा, भाषा व एकंदर स्वरूप भिन्न दिसते.
या सर्वात साधारण १०० राज्याचे घोषक असणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांची एक मंडळी बहरत आहे. तिच्यापुढे असणारे आव्हान कठीण दिसत असले तरी साक्षीदारांना लोकांच्या गरजांना प्रतिसाद देण्यास संयुक्तिक बनण्यामध्ये मोठा आनंद व समाधान वाटते.
याच वेळी ४५ नंबरची बस आली व ती आम्हापुढे येऊन उभी राहिली. ती इतकी भरली होती की, “आपल्याला आत जाता येऊ शकणार नाही” असे उद्गार चटकन माझ्या तोंडून बाहेर पडले. तेवढ्यात मागून एक सुखद धक्का मला बसला व त्याबरोबर मी व माझा मित्र, लोकांचे हात व शरीरे यांच्या लाटेने लोटून दोघेही बसमध्ये जाऊन धडकलो. आम्ही गेल्यावर आमच्या मागून आणखीन दहा तरी माणसे आत शिरली. हे लोक बसच्या पायऱ्यावर उभे राहिले. ते जणू पोळाभोवती घोंघावणाऱ्या मधमाशांप्रमाणे एकमेकांना बिलगले होते. बस ४६ जणांसाठी होती पण मी लोकांची डोकी मोजून पाहिली तो मला शंभरपेक्षा अधिक आढळली. मी आणखी मोजणी करणार होतो पण तेवढ्यात माझ्या मित्रासोबतचे माझे संभाषण पुन्हा आरंभले गेले.
“तुमच्या येथे बसची अशी नेहमीच स्थिती दिसते का?”
“बसमध्ये थोडीफार गर्दी ही असतेच.” त्याने म्हटले. “पण त्या खूपच किफायती आहेत. त्यामुळेच आम्हाला शहराच्या ६ ते ९ मैल (१० ते १५ कि.मी.) अंतरावर असलेल्या दूरच्या भागात सहजगत्या जाऊन येता येते.”
“पण मग घराजवळच्या वसाहतींमध्ये काम करणे अधिक चांगले ठरणार नाही का?”
“ते चांगलेच ठरेल. पण आम्हापैकी पूर्ण वेळेच्या कार्यकर्त्यांपैकी काहींनी हे ठरवले आहे की इतर वसाहतीतील लोकांना भेटी द्याव्यात. आमच्याकडील अहवाल दाखवितो की गेल्या ५० वर्षांत कलकत्त्याच्या जवळपासच्या वसाहतीतील पुष्कळांना भेटी दिल्या गेल्या नाहीत!”
तरीपण लोकांची इतकी दाट वस्ती आढळते की एखाद्या वसाहतीत प्रत्येकाची भेट घेणे मोठे दुर्लभ होते. एकदा कलकत्त्यातील लोकवस्तीच्या दाटपणाचा अंदाज काढण्यात आला तो ते न्यूयॉर्क शहराच्या तिप्पट भरला. हा लोकवस्तीचा दाटपणा अलिकडे आणखी वाढला आहे.
कलकत्त्यातील लोकांचा एक तृतीयांश भाग बस्ती या अर्थी ओळखल्या जाणाऱ्या गर्दीच्या झोपडपट्टीत राहतो. काही नमुनेदार बस्ती झोपड्यांच्या छोट्या रांगा आहेत व त्यातील दोन झोपड्यातील अंतर एका हाताएवढे असेल. प्रत्येक झोपडीत जमीन मातीची असते तिच्या भिंती चिखल व माती लाकडाच्या चौकटीवर थोपलेल्या स्वरूपात आहेत आणि छप्पर सुद्धा मातीचेच आहे. प्रत्येक झोपडीत निदान सात आठ माणसे तरी झोपतात, तिला हवा खेळत राहण्यासाठी छोटी खिडकी असते तर काहींना तीही नसते. या बस्तीत साधारण १५० लोकांसाठी एक पाण्याचा नळ आढळतो व थोडीफार सार्वजनिक स्वच्छतागृहे दिसतात.
ज्या वेळेला या बस्तींमध्ये प्रचार कार्य सुरु होते तेव्हा उत्सुक व कुतुहूल बाळगणारा जमाव जमतो व तो मागे येऊ लागतो हे साधारणपणे घडते. यात मुलांची मोठी भाऊगर्दी होते. एक साक्षीदार मागे येत असलेल्या एका युवकाविषयी खूप खवळला. कारण प्रत्येक घरात हा त्याच्यामागे होता. शेवटी चिडून त्याने त्याला म्हटले की आता पुढच्या घरात तो बोलणार का. या आमंत्रणाचा स्विकार त्या युवकाने सहर्ष केला. त्याने बंधुच्या हातातील एक हस्तपत्रिका काढून घेतली व सादरतेचे अक्षर न अक्षर बोलून दाखविले आणि वॉचटावर व अवेक! ही मासिके सुद्धा सादर केली!
विविध धार्मिक पार्श्वभूमींची हाताळणी करणे
शहराच्या बस्तीतील अर्धा भाग इस्लामच्या अनुयायांनी व्यापलेला आहे. शहरात सहिष्णुतेचे वातावरण असल्यामुळेच घरोघरी जाऊन प्रचारकार्य करणे शक्य होत आहे. असा हा हक्क इतर देशातील मोठमोठ्या मुस्लीम वसाहतीत अनुभवण्यास मिळत नाही. या पार्श्वभूमीच्या लोकांविषयी कलकत्त्यातील पायनियर्स काही खास पवित्रा घेतात का अशी मी विचारणा केली.
“काही जण स्थानिक समस्यांचा आधार घेऊन मानव आपला अनर्थ सोडविण्यास केवढा असमर्थ आहे ते ठळकपणे सामोरे आणतात,” असे माझा मित्र म्हणाला, “तर इतर काही सर्वसामान्य मुद्यांचा आधार जसे की एका देवावरील विश्वास (त्रेकत्व नव्हे) तसेच मुळचे पवित्र शास्त्र देवाकडील प्रेरित आहे हे सांगून धार्मिक अहंमन्यतेवर मात मिळवितात.”
“पण याचा एकंदरीत कोणता परिणाम मिळतो?” मी अचंबा केला.
“नाहीपेक्षा खूपच थोडे लोक पवित्र शास्त्राभ्यास घेण्यासाठी उत्सुकता दाखवितात. वस्तुतः या लोकांच्या मनात उदरनिर्वाह करावा व जीवनातील आपला दर्जा सुधरवावा हीच गोष्ट असल्याची दिसते. यासोबत लोकांनी घेतले असल्यास त्यांचे अल्प शिक्षण अन्यथा तेसुद्धा नाही ही गोष्ट त्यांना सुवार्तेचा स्विकार करण्यास मोठे कठीण बनविते.”
शहरामध्ये सर्वसाधारणपणे हिंदू विचारांचा संपर्क येतो. खासपणे बंगाली लोकांना, १९व्या शतकाच्या मध्यात जगलेल्या व प्रचार केलेल्या रामकृष्णांच्या एक ब्रीदाबद्दल मोठी आवड असल्याचे दिसून आले. “जोतो मोथ, तोतो पोथ,” हे ते ब्रीद आहे, ज्याचा अर्थ, वेगवेगळे धर्म एकाच ध्येयाकडे नेणारे विविध मार्ग होय असा होतो.
“या दृष्टीकोणावर मात करणे तुम्हाला कठीण जाते का?” मी विचारले.
“लोकांनी विवाद करण्यासाठी आपली मने खुली केली तर ते कठीण वाटत नाही. आम्हाला चातुर्याने उघड असा फरक, जसे की, आमच्या पवित्र शास्त्र आधारीत आशेचा म्हणजे पृथ्वीवर मानवी पूर्णतेत सदासर्वदा जगता येणे शक्य आहे याचे विवेचन करू शकतो. याशिवाय विरूद्ध दृष्टीकोण एकाच वेळी खरे ठरू शकत नाही हेही आम्हाला दर्शविता येते, जसे की, अमर असा जीव असू शकतो किंवा तो तसा असू शकत नाही.”
“ही गोष्ट पटण्यासारखी वाटते.”
“होय, परंतु बहुधा लोक या गोष्टीचा गंभीरपणे विचार करीत नाही असे आम्हाला दिसून आले. आमचा काय विश्वास आहे ते त्यांना ठाऊक आहे असे ते म्हणतात व तेही तसाच विश्वास ठेवून आहेत असेही प्रतिपादन करतात. यामुळे उभारणी घेत असलेल्या चर्चेला गालबोट लागते. या कारणास्तव आम्ही त्यांना आमची प्रकाशने देऊन त्यांना वाचण्याचा आग्रह करतो व मग पुढच्या घरी भेट देतो.”
“तुम्हाला कोणी हिंदु वसाहतीतला आढळला का की ज्याला देव व त्याच्या उद्देशाविषयीच्या खोल ज्ञानाच्या प्राप्तीची आस्था जडली?”
“होय, पायनियरांना एक युवक असा आढळला की ज्याला रामकृष्णांच्या अनुयायांच्या सहवासामध्ये भ्रमनिराशता मिळाली होती,” माझ्या मित्राने सांगितले. “त्याने मासिकांचा स्विकार केला व त्याची दोन दिवसांनी पुनर्भेट घेतली गेली तेव्हा त्याने ती वाचली होती असे दिसले. पुष्कळ चर्चेनंतर त्याने मुक्तिकडे नेणारा इश्वरी सत्याचा मार्ग या पुस्तिकेद्वारे अभ्यास सुरू केला. पुस्तिकेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व विवेचने तो वेगळ्या वहीत लिहीत असे. पाच महिन्याच्या कालावधीत या युवकाचा बाप्तिस्मा झाला व त्याने सहाय्यक पायनियरींग कार्यसुद्धा सुरु केले. याकरवी तो आता त्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाची सहभागिता इतरांमध्ये करीत आहे.”
“हा तर खूप चांगला अनुभव आहे. पण याबद्दल त्याच्या कुटुंबाची प्रतिक्रिया कोणती होती?”
“तो आपली विधवा आई व आजी यांच्यासोबत राहतो व या दोघी हिंदु आहेत. यांनीही पवित्र शास्त्राभ्यासाबद्दल रस दाखवून तो स्विकारला. लवकरण शेजाऱ्यांनी या स्त्रियांतील चांगला बदल हेरला व त्यामुळे इतर तिघेजण आस्थेवाईक झाले. आईचा आता बाप्तिस्मा झाला आहे व आजी आता ७०रीच्या ही पुढे गेली आहे ती सुद्धा लवकरच बाप्तिस्मा घेण्याची इच्छा धरून आहे.”
ही कहाणी सांगत असताना माझ्या मित्राला जो उत्साह वाटत होता त्यावरून मला कळू शकले की असे हे अनुभव पायनियरांना केवढा उत्साह भरविणारे आहेत. कधी कधी खूपच कमी प्रगति झाल्याचे दिसते पण मग कोणी तरी विलक्षण प्रकाराने आस्था दाखवितो. यामुळे पायनियरांना आपल्या शोधकार्यात, आणखी कोणी आस्थेवाईक मिळतो का ते पहाण्यासाठी कसून पुढे जात राहण्याचे उत्तेजन मिळते.
भाषांच्या अडखळणांची हाताळणी करणे
बसमधील गर्दी थोडी तुरळक झाल्याचे दिसले व मग मला कोणीतरी इंग्रजी बोलल्याचे कानावर पडले. “टिकेट, आपनार टिकेट,” असे साध्या कपड्यातील एक खुजा माणूस ओरडत होता. त्याच्या उजव्या हातात रंगीबेरंगी नोटा होत्या व कमरेवर एक कातडी पिशवी होती ज्यात सुटी नाणी होती. तो बसचा चालक होता. मी तिकीटाचे पैसे देऊ केले पण अतिथीसत्कारप्रिय माझ्या मित्राला ते बरे वाटले नाही. त्याने आपली पिशवी माझ्या हातात दिली व आपल्या शर्टच्या खिशातून सुटे पैसे काढून त्या चालकाला दिले.
“तुमच्या या पिशवीत काय भरले आहे?” मी उद्गारलो. “याचे वजन निदान एक टन तरी असेल!”
“भारतीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या आवृत्त्या आकाराने लठ्ठ आहेत. कलकत्त्यात जर पूर्ण रूपाने सज्ज रहायचे आहे तर आपल्याला तीन भाषांतील पवित्र शास्त्र—बंगाली, हिन्दी व इंग्रजी—आणि सोबत, अर्थातच, पवित्र शास्त्र आधारीत प्रकाशने बाळगली पाहिजेत.”
“पण तुम्हाला नुसते इंग्रजी पवित्रशास्त्र सोबत घेऊन त्याचे भाषांतर करून सांगता येणार नाही का?”
“मला वाटते की आम्हाला ते जमण्यासारखे आहे. तरीपण ज्या लोकांना केवळ बंगाली किंवा हिन्दी येते त्यापैकी कित्येकांनी स्वतःच्या भाषेत संपूर्ण पवित्र शास्त्र कधीच पाहिलेले नाही. अशा लोकांना त्यांच्या भाषेतील पवित्रशास्त्राची प्रत दाखवून त्यातून त्यांना वाचन करून दाखविणे आम्हाला मोठ्या आनंदाचे वाटते व याकरताच आम्ही वजन वाढले तरी ती आपणासोबत बाळगण्याचे श्रम घेतो.”
वेगवेगळ्या भाषेच्या गटासोबत जुळवून घेण्याच्या प्रयत्नामुळे पायनियरांना येथे खूप कार्यमग्न असल्याचे वाटते. साक्षीकार्य करता यावे यासाठी बहुतेकजण शालेय जीवनातून तीन भाषा शिकून घेतात. काहींनी तर अगदी परिश्रमाने पाच ते सहा भाषा शिकून घेतल्या आहेत. वसाहतीतील लोकांना कोणी त्यांच्याकडे येऊन त्यांच्या भाषेत बोललेले खूप आवडते व ते त्यांच्या गोष्टी कान देऊन ऐकतात. हा एखाद्या भाषेचा श्रमपूर्वक केलेल्या अभ्यासाचा परिणाम आहे.
आव्हानात्मक क्षेत्रात आनंदाची प्राप्ती करणे
यावेळी एकाएकी बसचा ब्रेक दाबला गेला व मी गर्दीत धक्काबुक्कीत बाहेर पडलो.
“आपण येथे कोठे आलो?” मी विचारले. “तुम्ही तर येथे राहत नाहीत.”
“नाही. हा पंजाबी लोकांचा विभाग आहे. हे लोक फारच उत्तम चहा बनवितात. मला वाटते तुम्ही एखादा कप घेऊन पहावा. तो तुम्हाला आवडेल.”
चहा खरोखरीच उत्तम होता.
“ही जागा तुम्हाला कशी माहीत आहे?” मी प्रश्न केला.
“प्रत्येक विभागात काम केल्यामुळे आम्हा पायनियरांना त्या विभागातील खास वैशिष्ट्य काय आहे ते ठाऊक होते, शिवाय चांगल्या व स्वस्त दराच्या वस्तु कोठे मिळतात हे देखील माहीत होते. जर तुमची इच्छा झाली तर आज सायंकाळी आपण चांगले जेवण नमुन्यादाखल करू.”
मी माझ्या काही जाणकार मित्रांचा सल्ला आठवला व हे निमंत्रण नाकारले. पण चहा मात्र मला आवडला. मला याद्वारे कळले की पायनियर्स समतोल आहेत व परिस्थितीचा उत्तम उपयोग करण्यास शिकले आहेत. प्रथम दर्शनी अडखळण वाटणाऱ्या गोष्टींवर सुद्धा मात करता येते व त्यात आनंद मिळवता येतो.
“मला सांगा की तुमच्या कार्यात असे काही आहे का की ज्याचा अनुभव तुम्हाला सुखद वाटत नाही?” मी शेवटी विचारले.
माझ्या मित्राने या प्रश्नाचा थोडा वेळ विचार केला व म्हटले: “मला वाटते की उन्हाळा व पावसाळा हे ऋतुमान आम्हाला थोडेसे जड जातात. आपण पायनियर असा वा नसा तुम्हाला याच्या समस्यांचा सामना करावा लागतोच. येथील उष्णता इतकी वाढते की तुम्ही पवित्र शास्त्राचे वाचन करून दाखवत असता घाम तुमच्या नाकाच्या शेंड्यावरून खाली ठिबकू लागतो. तरीपण आम्ही या परिस्थितीत तग धरून राहण्याचा प्रयत्न करतो. कारण मे हा महिना आमच्या येथे अत्यंत उष्णतेचा महिना असला तरी आम्हासोबत प्रचार कार्यात याच महिन्यात सहाय्यक पायनियरांचा उच्चांक असतो.”
त्या दिवसाकडे व माझ्या पायनियर मित्रासोबत झालेल्या संभाषणाकडे दृष्टीक्षेप टाकल्यावर, कलकत्त्यातील पायनियर्स सुवार्ता पोंचविण्यासाठी विविध परिस्थितीत व लोकांसोबत कसे जुळवून घेतात ते बघून मला सद्गदल्यासारखे झाले. अर्थात, हीच गोष्ट पायनियर्स जगात सर्वत्र करीत आहेत हे मी जाणतो. याच कारणास्तव “सर्व प्रकारच्या लोकांसाठी सर्व काही होण्यासाठी” ते खरोखरी आनंदी आहेत.—दानार्थ.
[२८ पानावरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
कलकत्ता
भारत