स्वतःच्या व इतरांच्या रागावर नियंत्रण ठेवणे
आम्ही रागाची प्रवृत्ती असणाऱ्या समाजात जीवन कंठीत आहोत. रहदारीची अडखळणे, तंटा व आर्थिक अवमूल्यन, गैरसमज, अन्याय किंवा दैनंदिन जीवनातील इतर नैराश्य बराच दबाव आणते. दबाव वाढणारा आहे व बहुधा प्रत्येकाजवळ त्याचा स्फोट होण्याची सीमा आहे. यास्तव आम्ही शिथिल होण्याचे शिकले पाहिजे. आम्ही प्रत्येक दिवसात धीर, सहनशीलता व चांगली मनोवृत्ती दाखविण्याच्या निश्चयाने सुरुवात केली पाहिजे. आम्हातील बहुतापाशी आम्हावर प्रेम करणारे कुटुंब आहे. ख्रिश्चनांजवळ मंडळीत निष्ठावंत सोबतीदार ख्रिश्चन व त्याहून अधिक त्यांच्यासाठी प्रेमळ मेंढपाळ यहोवा देव आहे. याकारणास्तव, रागाचे सर्वसामान्य कारण—एकटे असणे व टाकून दिल्याची भावना सतावणे याचे भय असण्याची गरज नाही.—स्तोत्रसंहिता २३:१-६; इब्रीयांस १३:५, ६.
तथापि, आम्हास राग येतो किंवा इतरांच्या रागापुढे जातो तरी आमचा सौख्यानंद व स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योग्यरित्या तोंड दिले पाहिजे. ते कसे? पवित्रशास्त्र आम्हास सांगते: “ज्याला लवकर राग येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय, आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय.” (नीतिसूत्रे १६:३२) ताबडतोब राग व्यक्त करण्याचे निश्चित करण्याऐवजी आम्ही आमच्या कृतीच्या परिणामांचा विचार केला पाहिजे. दहा पर्यंत आकडे मोजणे ही गोष्ट, आमच्या हातून नंतर ज्याचा पस्तावा वाटू लागेल ती गोष्ट करण्याला बांध घालण्यास मदत देईल.—नीतिसूत्रे १४:१७.
आम्ही कशासाठी रागावलो हे माहीत नसते अशा प्रकरणात आम्ही नम्रपणे व प्रामाणिकपणे मदतीची मागणी करावी. इतरापुढे, खासरित्या आम्हावर प्रेम करणाऱ्यापाशी, कबुल करणे हे आमचे भय किंवा मदतीची गरज ही दुर्बलता नाही तर सुज्ञतेचा व धैर्याचा मार्ग आहे. मगच आम्ही समस्येच्या मूळ कारणाजवळ जाऊ शकतो. पवित्रशास्त्र म्हणते: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात, मसलत देणारे पुष्कळ असले म्हणजे बेत सिद्धीस जातात.”—नीतिसूत्रे १५:२२.
दुसरे त्यामार्गी का वागले याची कारणे समजावून घेण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट आमच्या भावनात्मक प्रतिक्रियेस नियंत्रणात ठेवण्यास मदत करील. यासोबत, आम्ही रागात असणाऱ्या व्यक्तिला “मला माहीत आहे तू का रागावलास,—” असे म्हटले तर तो तत्काळ शांत होईल. पवित्रशास्त्र सूचना देते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.”—नीतिसूत्रे १९:११.
आम्ही कोणास अजाणपणे इजा पोहचविली तर आम्ही त्याची क्षमा मागावी. उदाहरणार्थ कोणी तुमच्या अंगठ्यावर पाय ठेवला तर तुम्ही रागावाल. परंतु तो जेव्हा माफ करा असे म्हणतो तेव्हा तुमचा राग पार गायब होतो. तुम्हास वेदना होत असतील पण तुमचा सन्मान राखला जातो. त्याचप्रमाणे, आम्ही सामान्य सभ्यता व सद्प्रवृत्तीने दाखविलेले चांगले शिष्ठाचार रागाला शमवतील व आमचे पती पत्नीचे, लेकरे, मित्र व ख्रिस्ती मंडळीचे सदस्य यांच्या सोबतचे नातेसंबध आदरयुक्त राहतील.—नीतिसूत्रे १६:२४; कलसैकर ४:६; १ पेत्र ३:८.
आम्हास राग आणणाऱ्या परिस्थीतीला तोंड देताना इतरावर हल्ला न करता आमच्या रागाविषयी कसे बोलावे हे शिकणे मदत करील. (“अरे मुर्खा!” किंवा “नाकावर एकच ठोसा देईन!”) शाब्दिक हल्यात आणि (“मी फार निराश आहे” किंवा “मला दुःख वाटते”) रागाची माहिती कळविणे यात किती लक्षणीय भेद आहे. शाब्दिक हल्ला दुसऱ्यास सूड घेण्यास चिथावतो, म्हणून बहुधा अपयशी ठरतो. त्याचवेळी तुम्हास काय वाटते हे सांगणे हल्ला करण्यापासून मागे ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीस सुधारणा करण्यास प्रवृत्त करते. पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे: “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. तापट मनुष्य तंटा उपस्थित करितो; मंदक्रोध झगडा शमवितो.”—नीतिसुत्रे १५:१, १८.
नीतिमान राग
वेळोवेळी आम्हातील बहुतेकांना राग येणे स्वाभाविक आहे. पवित्र शास्त्र अहवाल देते की यहोवासही राग येतो. (सफन्या २:२, ३; ३:८) मग मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा असल्यामुळे त्याला ही तसे वाटावे हे नवलाईचे नाही. (उत्पत्ती १:२६) या कारणास्तव, राग येणे हे कांही पाप नाही.
तथापि यहोवा रागावतो तेव्हा ते नेहमी योग्य कारणास्तव असते: त्यावेळी नीतिमान कायदे धिक्कारले गेलेले असतात. त्याची प्रतिक्रिया नेहमी अगदी बरोबर व पूर्ण नियंत्रित असते. परंतु अपुर्ण मानवासोबत ते वेगळे आहे. आम्ही बहुधा आमचा स्वाभिमान दुखावला किंवा कांही इतर मानवी कमतरतेमुळे रागावतो. याकारणास्तव आम्ही आमचा राग कसा हाताळतो याविषयी काळजी घेण्याची गरज आहे. प्रेषित पौलाने म्हटल्या प्रमाणे: “रागावा परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिसकर ४:२६, २७) होय, सैतान आमच्या अनियंत्रित रागाचा फायदा घेऊ शकतो. वस्तुतः “राग” हा “देहाच्या कर्मात” मोडतो व तो एकाद्या व्यक्तीस देवराज्याचे वतन मिळण्यापासून दूर ठेवतो.—गलतीकर ५:१९-२१.
यामुळेच शिष्य याकोबाने सूचना दिली: “माझ्या बंधूंनो तुम्हास हे कळते, मनुष्य . . . रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वतेचे कार्य घडत नाही.” (याकोब १:१९, २०) आमचा राग न्यायी कारणास्तव असेल पण आमचे अपूर्णत्व आम्हास अनियंत्रित, चुकीच्या मार्गाने प्रतिक्रिया दाखविण्याकडे निरवील. यास्तव आम्ही नेहमी या तत्वाने मार्गदर्शित केलेले असावे: “प्रीय जनहो सूड उगवू नका, देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असे लिहिले आहे की: ‘सूड घेणे माझ्याकडे आहे मी फेड करीन,’ असे यहोवा म्हणतो.” (रोमकर १२:१९) हे लक्षात ठेवा की अपूर्ण मानव या नाते आम्ही चूक करू शकू. यास्तव नीतिमान चिडेच्या नावाखाली इतरांचा झटकन न्याय करणे घातक आहे.—याकोब २:१३; ४:११, १२ ५:९.
शास्त्रवचनानुसार आम्ही शेवटच्या काळात जगत आहोत. या शेवटच्या दिवसात “रा क्रोधाविष्ठ” देवराज्याच्या विरोधात झाली आहेत व दियाबल “त्याचा काळ थोडा आहे हे ओळखून संतप्त झाला आहे” (प्रकटीकरण ११:१७, १८; १२:१०-१२) तद्वत, देव वचनानुसार आमचे जीवन कंठणे आम्हास खरोखरचे संरक्षण आहे. (स्तोत्रसंहिता ११९:१०५) लवकरच देव राष्ट्रांचा न्याय करील व पृथ्वी सर्व दुष्कृत्यापासून स्वच्छ केली जाईल. (यशया ३५:१०; ६५:२३; मीखा ४:३, ४) मध्यंतरात आम्ही या रागिष्ट जगाचे अनुकरण न करण्यात खात्रीपूर्ण असावे. सुयोग्य नियंत्रित राग आम्हास वैवाहिक प्रेम, ख्रिस्ती ऐक्य, व व्यक्तिगत सौख्य व शांती टिकविण्यास मदत करील. अधिक महत्वाचे म्हणजे यहोवाची कृपापसंती व आशीर्वादांचा आनंद लुटण्यास मदत करील.—स्तोत्रसंहिता ११९:१६५.