“यहोवा वर भाव ठेवा” या १९८७च्या प्रांतिय अधिवेशनास उपस्थित राहा
“यहोवावर भाव ठेवा!” आमच्या १९८७च्या प्रांतिय अधिवेशनाचे हे किती उत्तम शिर्षक आहे बरे! यहोवावर भाव ठेवणे हे आम्हाला जगाच्या इतर सर्व भागापासून वेगळे ठेवते. ऐश्वर्य, सूज्ञान, सामर्थ्य, राजकारणी व धर्म पुढारी व नेते या लोकांच्या भरवसापात्र गोष्टी आहेत. तरीपण या लोकांच्या पदरी लवकरच मोठी निराशा पडणार.—स्तोत्रसंहिता १४६:३, ४.
कोणावर किंवा कशावरही आपला भाव ठेवणे याचा काय अर्थ होतो? कोशकारांच्या मते “भाव म्हणजे कोणावर अथवा कशावरही संपूर्णपणे व खात्रीशीररित्या विसंबून असणे” हा अर्थ आहे.a होय, आम्हालाही अगदी याच प्रकारे वाटते. आम्ही यहोवावर संपूर्णपणे व खात्रीशीररित्या आपला आत्मविश्वास विसंबून आहेत.
यहोवावर आपला भाव ठेवण्याचे महत्व देववचनात आम्हाला वारंवार लक्षात आणून देण्यात आले आहे. स्तोत्रकर्ते यहोवावर आपला भाव असल्याचे पुनःपुनः सांगतात: “माझा भाव तर यहोवावर आहे.” “हे यहोवा, मी तर तुझ्यावर भाव ठेविला आहे.” त्यांचे हे उद्गार आम्हाला आमच्या एका राज्य गीताचे शब्द लक्षात आणतात. “यहोवा आमचे आश्रयस्थान,/ भाव ठेवण्याजोगा आमचा देव . . . यहोवा हा आमचा दुर्ग,/ सर्व न्यायांसाठी आधार.”—स्तोत्रसंहिता ३१:६, १४.
पवित्र शास्त्रवचने देवावर भाव ठेवण्याविषयी आम्हाला वेळोवेळी आज्ञा देतात: “यहोवावर भाव ठेव व सदाचाराने वाग.” “तू आपल्या अगदी अंतःकरणापासून यहोवावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” (स्तोत्रसंहिता ३७:३; नीतीसूत्रे ३:५) मोठ्या विपत्ती काळात यहोवावर भाव ठेवल्यामुळे ज्यांना प्रतिफळ मिळाले अशा देवाच्या विश्वासू सेवकांविषयी देवाचे वचन आम्हाला सांगते. यामध्ये हिज्किया राजा, एबद–मलेख, तीन इब्री व दानीएल हे आहेत.—२ राजे १८:५; यिर्मया ३९:१८; दानीएल ३:२८; ६:२३.
आमचा यहोवावर भाव आहे हे आम्ही कसे दाखवतो? याचा एक मार्ग म्हणजे त्या विषयीचा परिचय करून घेणे व त्याचे वचन मान्य करणे हा होय. येशू ख्रिस्ताने या विषयीचा अगदी साधा सोपा नमुना याप्रकारे प्रस्तुत केला: “तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाचा प्रयत्न करा, म्हणजे याबरोबर हीही सर्व तुम्हास मिळतील.” होय, आम्ही आपल्या अंत:करणानिशी यहोवावर भाव राखला तर आमच्या जीवनात त्याच्या राज्य आस्थेला आम्ही प्रधान स्थानी ठेवू व सदाचाराचा मार्ग अनुसरू.—मत्तय ६:३३.
यहोवावरील आमचा भाव बळकट का असण्यास हवा? आम्हावर पदोपदी जे दबाव येत राहतात त्या कारणामुळे. काहींच्या बाबतीत हा दबाव थेट छळ असतो तर इतरांबाबतीत तो वाईट गोष्टी करण्यासाठी मोहाच्या रूपात येत असतो. याशिवाय काहींचा भाव सहनशीलतेच्या गरजांकरवी पारखला जातो. आमचे येत असलेले प्रांतिय अधिवेशन हे या शेवटल्या काळी यहोवाने ज्या मदती पुरविल्या आहेत त्या पैकीचे एक आहे.
या वर्षी हे अधिवेशन तीन पूर्ण दिवसांचे—शुक्रवार, शनिवार व रविवार—असेल. कार्यक्रम सत्राच्या लांबीत थोडा फेरबदल झाला असला तरी सबंध कार्यक्रमात मागील वर्षी जितके साहित्य हाताळले गेले तेवढेच असेल. कार्यक्रमातील विविध भागामागील उद्देश आमचा यहोवावरील व तो सध्याच्या काळी वापरीत असलेल्या त्याच्या दृश्य संस्थेवरील आपला भाव दृढ करणे हा आहे याची आम्हास खात्री लाभेल.
याकरताच यहोवाच्या प्रत्येक ख्रिस्ती साक्षीदाराने निदान एका तरी अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा निर्धार राखावा. आपली मुले आपल्याबरोबर आणावीत. शुक्रवारी सकाळी आरंभाचे गीत व प्रार्थना याला उपस्थित राहून रविवार दुपारचे समारोपाचे गायन व प्रार्थनेच्या सर्व कार्यक्रमाला हजर रहावे. आपले पवित्र शास्त्र, गीतपुस्तक, वही व पेन्सिल याच्या तयारीनिशी या. सादर होणारी भाषणे, गायन व प्रार्थना यांच्या आत्म्याशी समरूप व्हा. व्यासपीठावरून जे सांगितले जाते ते लक्षपूर्वक ऐका. शिवाय याचीही खात्री राहू द्या की आमची केशभूषा व आमची वागणूक याबद्दल निंद्य असे काहीही घडत नाही.
‘सढळ हाताने पेरणी करा’ व ‘सढळ हाताने कापणी करा’ हे तत्व “यहोवावर भाव ठेवा” या प्रांतिय अधिवेशनाच्या आमच्या उपस्थिती संबंधाने लागू होणारे आहे. जितक्या तन्मयतेने आम्ही अधिवेशनाचा कार्यक्रम आपल्या लक्षात घेऊ तितक्या अधिक आशीर्वादित स्थितीत भारावलेले असे अधिवेशनातून आपल्या घरी परतू आणि इतरांसाठी मोठा आशीर्वाद असे होऊ.—२ करिंथकर ९:६.
अधिवेशनाच्या तारखा व ठिकाणे यासाठी कृपया यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीतून माहिती करून घ्या किंवा या मासिकाच्या प्रकाशकांसोबत पत्रव्यवहार करावा.
[तळटीपा]
a वेब्स्टर्स न्यू डिक्शनरी ऑफ सिनोनिम्स्.