वाचकांचे प्रश्न
◼ यशया ४३:१० मध्ये यहोवा म्हणतो: “माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही,” तर मग, ज्याची स्वतः यहोवाने निर्मिती केली तो येशू “एक देव” कसा होऊ शकेल?
यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्रातून जे शिकवितात की येशू हा देवाचा निर्मित पुत्र आहे व त्याचा दर्जा पित्याच्या खालोखाल आहे व सर्व परिचित आहे. (योहान १४:२८; १करिंथकर ११:३) तरीही, देवाचा प्रवक्ता वा लोगस असे सामर्थ्ययुक्त पद असल्यामुळे त्याला “एक देव” अशी पदवी उचितपणे मिळू शकते. योहान १:१ मध्ये कित्येक पवित्रशास्त्र आवृत्या लोगस हा “एक देव” होता असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर्गन बेकर यांचे दास एवेंजेलियम नॅच जोहान्स (१९७९) भाषांतर म्हणते: “लोगस हा देवाबरोबर होता आणि लोगस हा एक देव होता.”a
प्रश्नकर्त्याने विचारले त्यानुरूप ही गोष्ट, यशया ४३:१०, ११ च्या दृष्टीने पाहू जाता मोठी विचित्र वाटेल. ते वचन म्हणते: “तुम्ही मला ओळखावे व मजवर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस. मीच यहोवा आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.”
या शास्त्रवचनातील मागचा–पुढचा संदर्भ काळजीपूर्वक तपासल्यास प्रांजळ पवित्रशास्त्र विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळते. येथे यहोवा देव, इस्त्राएलांच्या सभोवार असलेल्या राष्ट्रातील मानव निर्मित मूर्त्यांपासून केवढा वेगळा आहे ते प्रदर्शित करीत होता. यहोवा विचारतो: “तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल?” धातुच्या कारागिराने ओतलेली किंवा झाडाच्या लाकडापासून कोरलेली कोणतीही प्रतिमा त्याच्याशी कदापि सदृश्य ठरू शकणार नाही. (यशया ४०:१८–२०; ४१:७) असे हे “देव” वा“दैवते” यांनी यहोवाने केले त्याप्रमाणे ‘आकाश . . . तंबू ताणितात तसे ताणिले’ नाही. (यशया ४०:२१–२६) त्याचप्रमाणे यहोवा भविष्याचे भाकीत करू शकतो. याप्रकारे राष्ट्राच्या मूर्त्यांना ‘ज्याकरवी ते देव आहेत असे आम्ही समजू शकू असे पुढे काय होईल ते कळविता येत’ नाही.(यशया ४१:२३) हेच विचार यशया ४३:९ मध्ये पुनरावृत्तिने सांगण्यात आले, जेथे यहोवा म्हणतो: “सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत. अशा गोष्टी त्यातला कोणी सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हास ऐकवाव्या; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावे.” याकारणास्तव, सर्वसमर्थ देव अगदी उचितपणे म्हणतो: “मी यहोवा आहे, हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्यांस देऊ देणार नाही. मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही.”—यशया ४२:८.
अशाप्रकारे संदर्भ हे दाखवितो की, सर्वसमर्थ देव राष्ट्रातील नामधारी देवांपुढे आव्हान प्रस्तुत करीत आहे. इश्वरी शक्तीचा लवलेश नसणाऱ्या त्या निव्वळ मूर्त्या आहेत त्यामुळे देव अशी त्यांची उपासना होऊच शकत नाही. ते सर्व निरर्थक आहे. यहोवा पुढे म्हणतो: “मजवेगळा कोणी देव आहे काय? नाही, मजवेगळा कोणी दुर्ग नाही. मला कोणी ठाऊक नाही. कोरीव मूर्ति घडणारे सर्व शून्यवत आहेत. त्यांच्या रमणीय वस्तु [धातुच्या वा लाकडाच्या कोरीव वस्तु] काही कामाच्या नाहीत.” (यशया ४४:८–१७) तद्वत, यशया ४३:१० चा संदर्भ स्पष्ट करतो की, येथे येशूविषयीचा विचार केला जात नाही; ज्या “देवांचा” येथे विचार होत होता ते राष्ट्रांच्या दुर्बळ मूर्त्या होत्या.
“देव” हा शब्द सर्वसाधारणपणे श्रध्दाविषयक अतिमानवी गोष्टींच्या अनुषंगाने उपयोगात आणला जातो. त्यामुळे बहुतेकांच्या विचारात “देव” याचा अर्थ एकतर (१) सर्वोच्च नियंता वा सर्वसमर्थ, किंवा (२) खोटा देव जसे की एखादी मूर्ति असा असतो. तरीपण पवित्रशास्त्र या संज्ञेचा विविध वापर योजून आहे. आपल्याला स्तोत्रसंहिता ८२:१, २ पासून दिसेल की, देव (यहोवा देव) हा स्तोत्रकर्ता ज्यांना “देव” ही संज्ञा वापरतो त्या मानवी शास्त्यांपेक्षा केवढा वेगळा आहे. या शास्त्रवचनांचा संदर्भ येशूने स्वतः नंतर घेतला. यहोवा देव आपला पिता आहे असे म्हटल्यामुळे काही यहुदी त्याला दगडमार करण्यासाठी पुढे सरसावले. तो ‘स्वतः ला देव बनवीत आहे’ या त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना येशूने म्हटले: “‘तुम्ही देव आहा असे मी म्हणालो’ हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? . . . त्याने [त्या मानवी शास्त्यांना] देव म्हटले . . . तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठविले त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून,‘ तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?”—योहान १०:३१–३६.
अशाप्रकारे, केवळ एकच सर्वसमर्थ देव आहे हे निर्विवाद सत्य आहे. प्रेषित पौलाने सुद्धा तेच लिहिले: “कारण ज्यांना ‘देव’ म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले, आणि असे बरेच ‘देव’ व बरेच ‘प्रभु’ आहेत. तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले . . . आणि आपला एकच प्रभु येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत.” (१ करिंथकर ८:५, ६) प्रभु येशू ख्रिस्त हा खोटा देव, दुरात्मिक देव आणि निव्वळ मूर्ती ही नाही. तो ‘यहोवा देवाच्या गौरवाचे तेज’ आहे. (इब्रीयांस १:३) या कारणास्तव, येशू हा ‘एक देव’ आहे व “देव सद्दश्य” (जोहान्स स्केन्डर) आहे असे योहान १:१ ने म्हणणे उचित आहे.
[तळटीपा]
a “हो.थिऑस (देव) ही जी संज्ञा पित्याच्या व्यक्तिगत खरेपणास अनुलक्षून वापरली जाते ती न [वा] क [रार] मध्ये येशूला स्वतःला अनुलक्षून वापण्यात आलेली नाही. येशू हा देवाचा पुत्र (हो थिऑस चा) आहे . . . योहान १:१ चे अगदी कडक असे भाषांतर होण्यास हवे की, ‘शब्द हा देवा [=पित्या] बरोबर होता, आणि शब्द हा इश्वरी प्रकृतिचा होता.’”—डिक्शनरी ऑफ दी बायबल (१९६५), जॉन एल मॅकॅन्झी, एस. जे. तर्फे.