तुमचे भवितव्य कोण सांगू शकतो?
भविष्य सांगण्याचा प्रयत्न करणे सोपे आहे. परंतु ते अचूक वर्तविणे तेवढे सोपे नाही. भाकीत अंगलट येते तेव्हा ती केवळ निष्फळतेची कसरत बनते जसे की सोबतची उदाहरणे तेच स्पष्ट करतात.
प्राचीन काळापासूनच मानवाने भवितव्यात काय राखून आहे हे उमगून काढण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा आम्हातील बहुतेक जण उद्याचे जाणण्यास डोकावण्याची इच्छा करतात. येणाऱ्या घटना जाणण्याच्या ज्ञानाच्या पाठलागाने मानवास विविध प्रकारे प्रयत्न करण्याकडे निरविले. उदाहरणार्थ त्याचा सुगावा लागण्यासाठी, चेहऱ्यावरील वैशिष्ठे, मस्तकावरील आठ्या व तळहातावरील रेषा या मानवी शरिराचे परिक्षण केले गेले आहे. मनुष्यांनी पशुंचा अभ्यास केला—उंदराची किंवा सर्पाची हालचाल, पक्ष्यांचे उडणे, तसेच जमिनीवर विस्कटलेले गव्हाचे दाणे पाळीव कोंबडा कोणत्या पद्धतीने वेचतो. कांहीनी कांही गोष्टीचा जसे की काचेचा गोळा, पत्ते, फांसे, चहाची पाने अगर दळलेली कॉफी यांचा उपयोग केला. याच्या पद्धती लोक, रूढी, काळ यानुसार विविध आहेत पण सर्वांचे परिणाम एकच आहे: अपयश.
तथापि, भविष्य अचूकपणे सांगू शकणारा कोणी एक आहे. कोण? यहोवा देव. यहोवा अतुलनिय आहे कारण तो “आरंभीच शेवट कळविणारा” आहे. एकादी घटना नुकतीच सुरू झाली आहे तरी, देव तिची पराकोटी काय असणार ते वर्तवू शकतो. होय, देव मानवाच्या दृष्टीसमोर कांही दिवसाच्या आधी नव्हे तर त्याहीपेक्षा शतकांच्या अगोदरच भविष्य उलगडून दाखवू शकतो!—यशया ४६:१०.
यास्तव भवितव्य जाणण्याच्या ज्ञानाची तृष्णा निष्फळतेत संपुष्टात येऊ नये. देवाचे वचन पवित्रशास्त्र आमच्यासाठी महत्वपूर्ण स्वरूपाची रूपरेषा देते. ते मानवजातीसाठी काय राखून ठेवले असल्याचे दाखविते?
[३ पानांवरील चित्रं]
“हवेपेक्षा–अवजड–असे उड्डाण करणारे मशीन अशक्य आहे.”—लॉर्ड केल्व्हीन, ब्रिटीश गणितज्ञ, पदार्थविज्ञान तज्ज्ञ, व ब्रिटिश रॉयल सोसायटीचे अध्यक्ष सुमारे १८९५.a
[तळटीपा]
a ही अवतरणे द एक्स्पर्टस् स्पिक हे ख्रिस्तोफर कर्फ व व्हिक्टर नाव्हास्की यांच्या लिखित पुस्तकातून आहेत.
“आम्ही १९६० मध्ये जीवनमान कसे असेल हे जाणण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली तर आम्ही हे जाणलेच पाहिजे की अन्न, वस्त्र व निवारा हा हवेप्रमाणे स्वस्त असेल.”—जॉन लॅगडॉन–डेव्हीस, ब्रिटिश पत्रकार व रॉयल मानवशास्त्र संस्थेचे १९३६ मधील मान्यवर सदस्य.
“आम्ही कधीही केली नव्हती ती मूर्खपणाची गोष्ट केली . . . बॉम्ब कधीच संपुष्टात येणार नाही हे मी स्फोटक द्रव्यांचा तज्ज्ञ म्हणून सांगतो.”—ॲडमायरल विलयम लेही जे युनायटेड स्टेट्सz मधील ॲटोम बॉम्ब प्रकल्पाचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांचे १९४५ मधील सल्लागार.