वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ९/१ पृ. २७-३०
  • अंतःकरण आनंदी बनविणारे अनुदान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अंतःकरण आनंदी बनविणारे अनुदान
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी ते कसे केले
  • नियमितपणा हीच गुरुकिल्ली आहे
  • “सर्व चांगल्या देणगीचा” दाता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • यहोवा त्याच्या कार्याचा कसा उत्कर्ष करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • आम्हास यहोवाची परतफेड कशी करता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • “पैसा येतो तरी कोठून?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ९/१ पृ. २७-३०

अंतःकरण आनंदी बनविणारे अनुदान

खालील रकान्यात ख्रिस्तीधर्म जगतातील धर्मांनी निधि उभारण्यास पाठविलेली दोन नमुनेदार पत्रे दिली आहेत. अंतःकरण उबविणारी अशी ती तुम्हास दिसतात का? क्वचितच! तरीसुद्धा देव ज्या भक्‍तिस संमति देतो अशा भक्‍तिच्या उन्‍नतिच्या साहाय्यार्थ विविध मार्गे आज निधिची गरज आहे. तर मग देवाची इच्छा करण्यासाठी आवश्‍यक निधि एखादी ख्रिस्ती संघटना कसा प्राप्त करते?

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या प्रथा व तिचा स्थापक येशू ख्रिस्त याचे शब्द, यांचे परिक्षण केल्यास त्याचे उत्तर सापडू शकेल. “देण्याची सवय असू द्या आणि लोक तुम्हाला देतील,” असा लूक ६:३८ मध्ये येशू बोध करतो. “चांगले माप, दडपलेले व हालविलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही घालता त्याच मापाने तुम्हाला परत माप घातले जाईल.” येशूच्या श्रोत्यांना तेव्हां ते उदाहरण ऐकण्यास किती यथायोग्य वाटले! पूर्वेकडील लोक त्यांच्या पूर्वदेशीय झग्याला काही वस्तु वाहून नेण्यास वा ठेवण्यास एक अंगचाच कप्पा ठेवीत असत. एखाद्या सैल झग्यास कमरबंधाच्या वर घडीद्वारे जी पोकळी तयार होई त्या कप्यात विक्रेते विकत घेतलेली वस्तु मापून टाकत असत. त्या पोकळीस अनुलक्षून “पदरी” किवा अक्षरशः ग्रीक कोलपोस या शब्दांचा संदर्भ आहे.

किती व्यापारी आपल्या ग्राहकास शक्य तितक्या जास्त, एवढेच नव्हे तर त्याच्या वस्त्राच्या पोकळीत ओतप्रोत भरले जाईल इतके प्रथम दडपून व नंतर हालवून घालतील बरे? बहुधा फारच कमी. तरीपण ख्रिश्‍चनांनी ज्यांना गरज आहे अशांना मुक्‍त हस्ते दयेचे अनुदान दिले तर त्यांची सुद्धा विपूल दयेने परत फेड होणार होती. इतरांना वागणुकीचे जे माप आम्ही देतो मग ते औदार्यपूर्ण असो वा कंजूषीचे असो त्याच मापाद्वारे आमची परत फेड होईल व ती केवळ माणसांकडून नव्हे तर त्याहून महत्वपूर्ण अशा यहोवा देवाकडून सुद्धा.—पडताळा २ करिंथ ९:६; गलती ६:७.

येशू ख्रिस्ताने स्वतःचे व त्याच्या सर्व साधनांचे सढळ हस्ते अनुदान देवून या तत्वाच्या परिणामाचा अनुभव घेतला. तो स्वत: औदार्याचा मूर्तिमंत होता. त्याने गरीबांस देवराज्याच्या सुवार्तेचा प्रचार आवेशाने व निस्वार्थीपणाने केला. त्याच्या सेवेकरता ना त्याने कोणता खर्च घेतला ना की विशिष्ट वेतन त्याला दिले जाईल याची अपेक्षा बाळगली. तरी सुद्धा त्याला कशाची उणीव भासली नाही. लोकांनी त्याला औदार्याने स्वयंस्फूर्तिने त्याच्या सेवेत पाठींबा दिला.—लूक ७:२२; ८:१–३.

येशूच्या दातृत्वाने इतरांना शिमोन पेत्र, याकोब, योहान व १२ प्रेषितांपैकी इतरांना औदार्य दाखविण्यास ह्‍या सेवेकरीता सर्व गोष्टींचा त्याग करण्याची प्रेरणा मिळाली. (लूक ५:१०, ११; ९:१–६) त्या प्रकारचे अनुदान त्याच प्रकारचे फळ आजही उत्पादीत करते. यहोवाचे साक्षीदार देवराज्याची सुवार्ता इतरांना ऐकविण्यात त्यांचा वेळ, शक्‍ति व इतर गोष्टी देतात. प्रचार कार्याद्वारे ते जे औदार्य व्यक्‍त करतात, त्याच्या मोबदल्यात इतरही सुवार्ता प्रचार करण्यात त्यांच्यात सहभागी होवून औदार्य व्यक्‍त करण्यात त्यांना प्रेरणा मिळते.—नीति. ११:२५.

तरी परंतु प्रचार कार्याखेरीज आणखी असे काही आहे ज्याच्या अनुदानाने आमचे हृदय उबदार होते. योग्य हेतुने व उचित कारणासाठी निधि देणे, हा सुद्धा खऱ्‍या उपासनेचा एक भाग आहे. (२ करिंथ. ९:९–१४) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनाकरवी ते कसे करण्यात आले?

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी ते कसे केले

इ.स. ३३ मध्ये ख्रिस्ती मंडळीचा जन्म झाला त्या पहिल्याच दिवशी ३,००० नविन बाप्तिस्मा पावलेल्या धर्मपरिवर्तीत लोकांनी ‘एकमेकांसोबत सहभागीपणा, भाकर मोडणे, व प्रार्थना’ ह्‍या गोष्टी आचरणात आणल्या. ते कोणत्या चांगल्या कारणासाठी? प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर राहून त्यांच्या नविन विश्‍वासास आधार देण्यासाठी.—प्रे. कृत्ये २:४१, ४२.

पन्‍नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत थांबण्याच्या विचाराने यहूदी व धर्मपरिवर्तित यरूशलेमेत राहाण्यास आले होते. परंतु जे ख्रिस्ती बनले त्यांची, अधिक काळ राहून त्यांचा नवा विश्‍वास मजबूत करण्याची इच्छा झाली. ह्‍यामुळे अन्‍न व राहण्याची तातडीची समस्या निर्माण झाली. काही पाहुण्या मंडळीकडे पुरेसा पैसा नव्हता तर काहींकडे अधिक होता. म्हणून तात्पुरते भौतिक गोष्टींचे एकत्रीकरण केले गेले व ज्यांना आवश्‍यकता आहे अशांना त्यांचे वाटप करण्यात आले.—प्रे. कृत्ये २:४३–४७.

त्यांच्या आहाराची व राहाण्याची व्यवस्था कशी केली गेली? नियमन मंडळ या नाते कार्य करणाऱ्‍या प्रेषितांनी अनुदान देण्यात आलेल्या गोष्टीची जमवाजमव व वाटप करण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे ख्रिस्ती मंडळीची पहिली दृश्‍ये हे दाखवून देतात की तिचे सदस्य आपल्या भौतिक वस्तुस कधीही आपले मानत नव्हते तर मंडळीतील सर्वांच्या फायद्याकरिता तिचा उपयोग केला जावा असा दृष्टीकोन बाळगून होते. (प्रे. कृत्ये २:४४; ४:३२) याशिवाय त्यांच्यातील जितके जमिनीचे किंवा घराचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले. त्यानंतर जसजशी कोणाला गरज भासे तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत.—प्रे. कृत्ये ४:३४, ३५.

खरोखरच्या मालमत्तेची विक्री व सर्व गोष्टीचे समान वाटप हे केवळ स्वयं स्फूर्तीनेच होत असे. कोणालाही विक्री करण्यास व दान करण्यास भाग पाडले जात नव्हते, ना की दारिद्रयाची वाढ करावी असा त्यात हेतू होता. ह्‍या ठिकाणी जी कल्पना व्यक्‍त केली ती ही नव्हती की श्रीमंत सदस्यांनी सर्व मालमत्ता विकली व अशा प्रकारे दरिद्री झाले. परंतु त्या वेळेच्या परिस्थितितील समाविश्‍वासुंच्या दयेखातर त्यांनी मालमत्ता विकली व ते मोल राज्य आस्था वाढविण्यास ज्याची गरज होती ती भागविण्यास अनुदान दिले.—पडताळा २ करिंथ. ८:१२–१५.

त्याचप्रमाणे आजही अनेक वैयक्‍तिकांनी आपली मालमत्ता वॉचटॉवर संस्थेला दिली वा त्यांच्या मृत्युपत्रात या संस्थेच्या नावे ती केली जेणे करून ती यहोवाच्या साक्षीदारांच्या निधि नियमन मंडळाकडे सोपविण्यात आली या साठी की राज्य–गरज जेथे जास्त आहे तेथे ती उपयोगात आणली जावी. अशा प्रकारची मदत पेन्टेकॉस्टच्या दिवशी झाली त्याच प्रमाणे आध्यात्मिक प्रकाश पसरविण्यात साहाय्यक ठरते. यातील कोणतीही गोष्ट केव्हांही बळजबरीची अशी नाही.

नियमितपणा हीच गुरुकिल्ली आहे

इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्टच्या जवळ जवळ २० वर्षांनंतर प्रेषित पौल विशिष्ट अनुदानाच्या गरजे विषयी करिंथ येथील मंडळीला आठवण करतो. तो लिहीतो: “आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावयाची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा.” त्यानंतर तो त्यात थोड्या बोधाची भर घालतो: “आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणा जवळ घरी द्रव्य जमा करून ठेवावे, अशा हेतुने की मी येईन तेव्हां वर्गण्या होवू नयेत. मी येईन तेव्हां ज्या कोणास तुम्ही पत्रे देवून मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मदाय यरूशलमेस पोहंचविण्याकरीता मी पाठवीन.” किती द्यायचे या विषयीच्या निश्‍चयात सबंध कुटुंबाचा समावेश झालेला दिसतो मग ते गरीब असो वा श्रीमंत कारण ते त्यांच्या ‘स्वतःच्या घरी’ होणार होते.—१ करिंथ. १६:१–३.

अनुदानाच्या पद्धतीविषयी पौलाने केली प्रस्ताव आजही मंडळीतील सदस्यांस लागू होण्याजोगे आहेत. ते कसे बरे? नियमितपणा ही गुरुकिल्ली आहे. जर तुमच्या मंडळीस सभास्थान वा राज्यसभागृहाचे मासिक भाडे द्यायचे व त्याच्या डागडुजीकरीता जो खर्च येतो तो द्यायचा असेल तर “तुम्ही किती जास्त अनुदान देता हे महत्वाचे नाही तर राज्याच्या आस्थेकरीता प्रत्येक आठवडी किंवा महिन्यास काहीतरी नियमित बाजूस ठेवणे महत्वाचे आहे” असे पेरू येथील शाखा दप्तर लिहीते. ही कल्पना तुम्हास अपीलकारक वाटते का? नियमित अनुदान करणे हा भक्‍तिचा एक भाग आहे याची गुणग्राहकता बाळगण्यास मुलांना सुद्धा शिकविले जावू शकते.

यास्तव जेव्हां जेव्हां योग्य हेतूने व उचित कारणासाठी अनुदान दिले जाते तेव्हां ते देवाचे व माणसांचे अंतःकरण उबविते. २ करिंथ ९:७ निवेदीत करते की “प्रत्येकाने आपापल्या अंतःकरणात ठरविल्या प्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”

[२७ पानावरील चौकट]

ख्रिस्ती धर्मजगताने उपयोगात आणलेल्या पद्धती

“तुला हे पत्र लिहिण्यास प्रभु माझ्याशी बोलला . . . हे पत्र लिहीण्यास व तुला हे सांगण्यास की जर तू २० डॉलर माझ्या मदतीसाठी आता तातडीने पाठवशील तर तू पूर्वी केव्हांही आशिर्वादीत झाला नव्हता इतका आशिर्वाद तो तुला देईल. देव जर माझ्याशी बोलला नसता तर जगातील कोणत्याही गोष्टीसाठी मी असे पत्र तुला लिहीले नसते.”—कॅनडातील पाळकाने सही केलेल्या एका पत्रातून ज्याचा शेवटचा मायना “तुमचा धर्मपुढारी व सहकारी” असा होता.

“हे अभिषिक्‍ताचे तेल उघड (एकही थेंब वाया जावू देवू नको) या विश्‍वासाच्या तेलात येशू आहे. तुझ्या कपाळावर त्याने क्रूसाचे चिन्ह कर व विश्‍वासाने तू स्वतः तुझ्या एका खोलीत जा व तुझ्या जवळ जे काही पैसे आहेत ते बाहेर काढ व प्रत्येक रकमेवर क्रूसाची खुण कर यासाठी की देवाने तुझ्या पैशाच्या समस्या बऱ्‍या कराव्या व लूक ६:३८ प्रमाणे तुझा पैसा द्विगुणीत करावा . . . तुझ्या जवळ असलेल्या पैशास जेव्हां तू या अभिषेकाच्या तेलाने अभिषेक करशील तेव्हां तुझ्या जवळ असलेली प्रत्येक रक्कम अभिषिक्‍त कर, प्रत्येक रकमेवर क्रूसाचे चिन्ह कर, नंतर तुझ्या जवळ असलेली सर्वात मोठी रक्कम जर ती २०, १० किंवा ५ डॉलरची असो तिच्यावर अभिषेकाच्या तेलाने क्रूसाचे चिन्ह कर व देवाच्या कार्यासाठी ती पोष्टाने पाठवून दे.”—अमेरिकेतील एका “रेव्हरंड”नी सही केलेले पत्र, त्याच्या शेवटचा मायना ३० वर्षापासून असलेला “देवाचे संदेष्टा” असा आहे.

[२९ पानावरील चौकट]

राज्य कार्याकरिता काहीजण कसे अनुदान देतात

◆ बक्षिसा: आर्थिक दान प्रत्यक्ष वॉचटॉवर बायबल ॲण्ड ट्रक्ट सोसायटी ऑफ पेनसिलव्हेनिया, २५ कोलंबिया हाईटस्‌, ब्रुकलिन न्यूयार्क ११२०१ किंवा स्थानिक शाखा दप्तरात पाठविले जावू शकते. मालमत्ता सुद्धा दान दिली जावू शकते. अनुदानासोबत एक छोटेसे पत्र देखील असावे ज्यात हे विदीत करावे की हे स्वयंस्फूर्तीचे अनुदान आहे.

◆ सशर्त दानाची व्यवस्था: पैसा, भांडवल, रोखे व मालमत्ता विशिष्ट तरतुदी सह वॉच टॉवर संस्थेस दिले जावू शकते. ती तरतुद ही की वैयक्‍तिक गरज उद्‌भवल्यास तिचे उत्पन्‍न दान देणाऱ्‍यास दिले जावे. ह्‍या पद्धतीमुळे मृत्युपत्राचा खर्च व त्याची अनिश्‍चित शाबिती टाळली जाते व ही खात्री सुद्धा पुरविली जाते की दान देणाऱ्‍याचा मृत्यु झाल्यास ती मालमत्ता संस्थेस मिळते.

◆ विमा: जीवन विम्याचा करारनामा, फायदे धारक म्हणून वॉचटॉवर संस्थेच्या नावावर केला जावू शकतो. बँकेची बचत खाती सुद्धा संस्थेकरीता विश्‍वस्तांच्या हवाली केले जावू शकते. या दोन्ही प्रकरणात संस्थेला कळविले पाहिजे.

◆ मृत्युपत्र: मालमत्ता किंवा पैसा कायदेशीर मृत्यूपत्राद्वारे संस्थेच्या नावी केला जावू शकतो. त्याची एक प्रत संस्थेस पाठविली जावी.

अशा बाबतीत अधिक माहिती किंवा सल्ला वॉचटॉवर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेनसिलव्हेनिया, २५ कोलंबिया हाईटस्‌, ब्रुकलीन, न्यूयॉर्क ११२०१ किंवा संस्थेच्या स्थानिक शाखा दप्तरास लिहून प्राप्त केला जावू शकतो.

[३० पानांवरील चित्रं]

गेल्या दोन वर्षात राज्याच्या आस्थेची वाढ करण्यासाठी तुम्ही दिलेल्या अनुदानांचे वितरण यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने ज्या पद्धतीने केले ते मार्ग:

१२,७०० पेक्षा अधिक मिशनरी व खास पायनियरांना आर्थिक साहाय्य देणे

४० शाखा दप्तरांच्या सोयी बांधणे वा त्या विस्तारीत करणे

५,००० पेक्षा अधिक प्रवासी देखरेखे व त्यांच्या पत्नी यांना साहाय्य देणे

नव्या आठ गतिमान छपाई यंत्रांची खरेदी

८,४०० पेक्षा अधिक बेथेल निवासियांची तरतूद पुरविणे

आपत्तिग्रस्तांना मदत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा