वाचकांचे प्रश्न
◼ एखादा ख्रिश्चन ज्याला पृथ्वीवरील आशा आहे, पण अद्याप तो “मोठ्या संकटा”तून बचावलेला नाही या वस्तुस्थितीच्या दृष्टीकोणातून पाहता तो “मोठ्या लोकसमुदाया”चा आत्ताच भाग आहे असे म्हटले जाऊ शकते का?—प्रकटीकरण ७:९, १४.
होय. संभाव्य भवितव्याच्या दृष्टीकोणातून त्याच्या किंवा तिच्या बाबतीत ते योग्य आहे.
प्रकटीकरण ७वा अध्याय दोन गट निवेदित करतो. पहिला १,४४,००० चा “इस्राएल लोकांच्या सर्व वंशापैकी ज्यांच्यावर शिक्का मारलेला आहे,” तो आहे. (प्रकटी. ७:४) प्रकटीकरण १४:१–५ पडताळून पाहिल्यास ते हे दाखवून ते की १,४४,००० “देवासाठी प्रथमफळ असे या पृथ्वीतून विकत घेतलेले” आहेत. अशा प्रकारे ते ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणारे आहेत. (गलतीकर ६:१६; २ तिमथ्यी ४:१८) दुसरा गट मोठ्या लोकसमुदायाचा आहे जो कोणासही मोजता येऊ शकत नव्हता व तो “मोठ्या संकटा”तून बचावलेला आहे.
प्रकटीकरण ७:७–१७ त्याच्या मांडणीत येणाऱ्या संकटातून पृथ्वीतील बचावलेल्यांचे वर्णन करते. त्यामुळेच एखाद्याची अशी धारणा बनेल की “मोठा लोकसमुदाय” ही संज्ञा जे वास्तविकरित्या त्या संकटातून वाचतील केवळ अशांनाच लागू होणारी आहे. पण इतके काटेकोर असणे जरूरीचे आहे का? आम्हाला तसे वाटत नाही. हे स्पष्टच आहे की जे बचावणार आहेत अशांना त्या “मोठ्या संकटा”पूर्वीच एकत्र करण्यास सुरुवात करावी लागेल की जेणेकरून ते बचावास लायक ठरू शकतील. याच कारणामळे “मोठा लोकसमुदाय” ही संज्ञा आम्ही त्या निष्ठावंत ख्रिश्चनांना लागू केली आहे जे सध्या बचावाचे भवितव्यानिशी यहोवाची सेवा करतात व ज्यांना पृथ्वीवर जीवनी पाण्याच्या झऱ्याकडे निरविले जात आहे. (प्रकटी. ७:१७) या “मोठ्या लोकसमुदाया”तील एखादा जर “मोठे संकट” येण्यापूर्वीच वारला तर त्याच्या किंवा तिच्या पृथ्वीवरील जीवनाकरता पुनरुत्थानाची आशा बाळगली जाऊ शकते.
अशाच प्रकारचा मुद्दा “दुसरी मेंढरे” या संज्ञेबाबत लागू केला जाऊ शकतो. योहान १०:७–१६ यात येशू प्रथम आपल्या “मेंढरां”विषयी बोलला, ज्यांच्याविषयी आम्ही अशी समज बाळगून आहोत की तो स्वर्गीय जीवनाची आशा असलेला लहान कळप आहे. येशूने पुढे म्हटले: “माझी दुसरी मेंढरे आहेत जी या [स्वर्गीय] कळपातील नाहीत, त्यांना सुद्धा मी एकत्र आणले पाहिजे. ते माझी वाणी ऐकतील मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल.” “दुसरी मेंढरे” यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे अशी ओळख देण्यात आम्ही अनेकदा शास्त्रवचनीय पुरावा प्रस्तुत केला आहे.—लूक १२:३२. केलेले
कोणी कदाचित असा वाद करील की येशू भविष्यातील “दुसरी मेंढरे” यांना एकत्र करण्याकडे अंगुली दर्शवीत होता आणि म्हणून “दूसरी मेंढरे” ही संज्ञा केवळ त्यांनाच लागू होते जे येशूच्या वक्तव्यानंतर या पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची पवित्र शास्त्रीय आशा स्विकारतील. परंतु अशा प्रकारे ती संज्ञा, येशू त्या गोष्टीची व्याख्या, जणू काय काल गणनेनुसार किंवा अनुक्रमे करीत होता या अर्थी सिमित करणे अनावश्यक वाटते. एकत्रित केल्या गेलेल्या मेंढरांचा तो मेंढपाळ या अर्थी येथे तो जोर देऊन बोलत होता असा विश्वास आम्ही बाळगतो. स्वर्गात जाण्याकरता मेंढरांसारख्या काही व्यक्ति या कळपात येतात. या कळपात “दुसरी मेंढरे” सुद्धा आहे, ते त्याचा मेंढपाळ म्हणून स्विकार करतील व हे ज्यांच्या विषयी प्रथम सांगितले गेले त्यांच्यासोबत ऐक्यतेत असतील. या दृष्टीकोणातून पाहता “दुसरी मेंढरे” या संज्ञेत त्या विश्वासू लोकांचा सुद्धा समावेश होतो जे येशूने स्वगीर्य मार्ग खुला करण्यापूर्वी मेले, जसे की नोहा, अब्राहाम, इयोब, दावीद आणि बाप्तिस्मा करणारा योहान. (मत्तय ११:११; प्रे. कृत्ये २:२९; इब्रीयांस १०:१९, २०) नवीन व्यवस्थीकरणात यांचे पुनरूत्थान होईल तेव्हा ते या उत्तम मेंढपाळाचा स्विकार करू शकतील व येशूच्या “दुसरी मेंढरे” याजसोबत पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाचे भवितव्य प्राप्त करू शकतील.