येशूचे जीवन व उपाध्यपण
यशयाचा भविष्यवाद पूर्ण करणे
परुशी व हेरोदाचे अनुयायी आपल्याला ठार मारण्याचा बेत करीत आहेत हे समजल्यावर येशू व त्याचे शिष्य गालील समुद्राकडे निघून जातात. येथे पॅलेस्टाईन व त्याच्या चोहीकडून लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येतात. तो पुष्कळांना बरे करतो. याचा परिणाम असा होतो की भयंकर आजार असणारे त्याच्याकडे येऊन त्याला धक्का देऊन शिवण्याचा प्रयत्न करतात.
जमाव मोठा असल्यामुळे तो आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवायला सांगतो. किनाऱ्यापासून आत गेल्यामुळे जमावास त्याच्याकडे येऊन धक्काबुक्की करण्यास प्रतिबंध होतो. यामुळे एकतर त्याला होडीतून
लोकांना उपदेश करता येतो आणि किनाऱ्यावरील दुसऱ्या गावी असणाऱ्या लोकांना मदत देण्यासाठी जाता येते.
शिष्य मत्तय हे सांगतो की, येशूने केलेल्या कार्यामुळे “यशया संदेष्ट्याकरवी जे सांगण्यात आले” ते पूर्ण होते. यानंतर मत्तय, येशूने पूर्ण केलेला भविष्यवाद अवतरीत करतो, जो असा आहेः
“पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडिले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही व ओरडणार नाही व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरु तो मोडणार नाही व मिणमिणती वात तो विझविणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”
येशू हा अर्थातच असा सेवक आहे ज्याविषयी देव आपली मान्यता दाखवून आहे. याशिवाय, येशू स्वतः, खोट्या धर्म संप्रदायाकरवी वंचित ठेवलेला खरा न्याय काय आहे ते स्पष्ट करतो. देवाच्या वचनाचा अवलंब अगदी विपरीतपणे केल्यामुळे परुशी तर शब्बाथ दिवशी कोणा आजाऱ्याची देखील मदत करण्यास पुढे येत नव्हते! अशाप्रकारे देवाच्या न्यायत्वास स्पष्ट करुन येशू लोकांना सांप्रदायाच्या क्रुर बंधनापासून मुक्त करतो, व याचसाठी धार्मिक पुढारी त्याला ठार मारण्याची संधि हेरुन आहेत.
पण याचा अर्थ काय की, तो ‘भांडणार नाही व ओरडणार नाही व रस्त्यावर त्याची वाणी ऐकू येणार नाही’? लोकांना बरे करताना येशू त्यांना ही ताकीद देतो की त्यांनी ‘त्याच्याविषयीचा गवगवा सर्वत्र करु नये.’ मोठ्या भाषणाने व आरडाओरडीच्या जाहिरातीद्वारे रस्त्यामध्ये आपली ख्याति व्हावी किंवा एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी आपल्याविषयीचा प्रक्षोभक अहवाल जाऊन नंतर त्याचा विपर्यास व्हावा असे तो इच्छित नाही.
याचप्रमाणे येशू आपला संदेश, वाकलेल्या व पायदळी तुडविण्यात आलेल्या चेपलेल्या बोरुप्रमाणे ज्यांची स्थिती झाली आहे अशा लोकांकडेही नेतो. या लोकांची स्थिती जिचे जीवन आता संपण्याच्या बेतात आले आहे अशा मिणमिणत्या वातीसारखी झालेली आहे. तरीपण अशा या लीनजणांना येशू मोठ्या ममतेने व प्रेमाने उभे करतो. खरेच येशू हा असा आहे ज्यावर राष्ट्रें आपली आशा ठेवू शकतात! मत्तय १२:१५-२१; मार्क ३:७-१२; यशया ४२:१-४.
◆ भांडखोरपणा न करता तसेच रस्त्यात आपला आवाज न उंचावता येशू कसा न्याय कळवितो?
◆ कोण चेपलेल्या बोरुसारखे व मिणमिणत्या वातीसारखे आहेत व येशू त्यांना कसे वागवितो?