खरे मित्र तुम्हास कसे संपादता येतील
“एकसारखे असणे हा मित्र असण्याचा एकमेव मार्ग आहे,” असे अमेरिकन कवी इमर्सनने लिहिले. मित्रत्व हे दुतर्फा वाहतूकीप्रमाणे आहे ज्यात दातृत्वाचा आत्मा समाविष्ठ असतो. स्वहित पाहणारे व स्वार्थ प्रवृत्तीचे, त्यांना खरे मित्र मिळविणे कठीण जाते. तरीसुध्दा त्यांना यश मिळू शकते, कसे ते आम्ही पाहणार आहोत.
खरे मित्रत्व प्रेमाने वाढते कारण प्रेम लोकांना जवळ आणते. तथापि, काहींना मित्रत्व संपादणे कठीण जाते. अशी व्यक्ती यावर कशी मात करु शकते?
“चांगले ऐकणारे असा. इतरांना स्वतःविषयी बोलण्यास उत्तेजन द्या,” असा सल्ला डाले कारनेजी यांनी दिला. सामाजिक मेळाव्यात अनोळखी भेटतात तेव्हा कोण असे आहेत जे मित्र मिळवतात? वाचाळता करणारे नव्हेत तर इतरामध्ये अस्सल आस्था घेणारे, त्यांचे मनोगत काढून त्यांचे लक्षपूर्वक ऐकणारे. नवीन परिचितांचे नाव व चित्तवेधक गोष्टी आठविणे हे मित्रत्व वाढविण्यास मदत करु शकते.
फन्डामेंटल ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन यात कीम गिफीन व बॉबी आर. पॅटन यांनी स्वतःची माहिती देणे व अस्सलता याची शिफारस केली आहे. “तुम्हासाठी कोणीतरी महत्वाचे असण्यासाठी,” ते म्हणतात, “त्याच्या/तिच्याविषयी तुम्हास काहीतरी माहीत असलेले महत्वपूर्ण वाटले पाहिजे. . . . सर्ववेळी मनमोकळे व उघड [असा], . . . इतर व्यक्तीबाबतचा तुमचा प्रतिसाद प्रांजळ असावा.”
खरे मित्र केवळ प्रामाणिक नव्हेत तर इतरांविषयीची चिंता करणारे असतात, ते आपली मते लादणारे किंवा हव्यासी नसतात. ते एकमेकांना समजून घेणारे, एखाद्या गोष्टीविषयी इतरांची तमा बाळगणारे व अशाप्रकारे समभाव दाखविणारे असतात. नातेसंबंध वाढतात तसे ते एक दुसऱ्यापुढे अंतःकरण उघडे करतात आणि केवळ खरे मित्रच नव्हे तर घनिष्ट मित्रही बनतात. तथापि, सर्वच खरे मित्र घनिष्ट मित्र नसतात. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर कोणीही नव्हता इतका सर्वश्रेष्ठ असा मैत्रीपूर्ण व्यक्ती होता. त्याने पुष्कळ मित्र जोडले पण थोडकेच खरोखरी घनिष्ट राहिले.—मार्क ९:१-१०; लूक ८:५१.
खऱ्या मित्रत्वाचे पुस्तक
पवित्र शास्त्र मित्रत्व या विषयावरचे सर्वोत्तम पुस्तक आहे. ते म्हणतेः “खरा मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतीसूत्रे १७:१७) खरे मित्र सांत्वनदायी व समस्या निर्माण होतात तेव्हा मदत पुरविण्यास तयार असतात. याचे उत्तम उदाहरण आहे. ती पुरातन इस्त्राएलामधील गोष्ट आहे.
दुष्काळामुळे एक यहुदी पुरुष आपली बायको नामी हिच्यासोबत मवाब येथे राहण्यास गेला. कालांतराने तो वारला. नंतर त्याचे दोन पुत्र मवाबी मुली रुथ व अर्पा यांच्याशी विवाह करतात. काही काळाने हे दोघेही पुत्र मरतात व त्यामुळे तीन विधवा एकट्या उरतात. त्यातील आई नामी यहुदास परतण्याचा निश्चय करते तेव्हा तिच्या दोन सुनाही तिजसोबत निघतात. वाटेवर नामी त्या तरुण स्त्रियांना मागे आपल्या देशात परत जाऊन त्यांच्या लोकातील विवाह स्थळ शोधण्याचे आर्जविते. त्याप्रमाणे अर्पा जाते, पण रुथ नामीसोबत जाण्याचा अट्टाहास धरते. का बरे? कारण ती आपल्या सासुला सुनेपेक्षा अधिक होती—ती खरी मैत्रिण होती. रुथ दयाळू स्वभावाची असल्यामुळे ती, परिवाराच्या मृत्युमुळे विरक्त झालेल्या वृध्द विधवेला—आपल्या सासूला—एकटे परत जाऊ द्यावे असे इच्छित नाही.—रुथ १:१-१७.
रुथने खरा जिव्हाळा, दया, निष्ठा व प्रेम दाखविले. हे गुण खऱ्या मित्रत्वाचा भक्कम आधार पुरवितात. तथापि, नामी सोबतच्या रुथच्या नातेसंबंधात अजूनही एक गोष्ट समाविष्ठ आहे.
उच्च स्तरावरील मित्रत्व
नामीने रुथला परत जाण्यास आर्जविले तेव्हा रुथ म्हणतेः “तुम्हाला सोडून जाण्याचा आग्रह मला करु नका, . . . तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. . . . तुमचे लोक ते माझे लोक व तुमचा देव तो माझा देव.” (रुथ १:१६) पूर्वी खोट्या दैवताची उपासक असणाऱ्या रुथला नामीने खरा देव यहोवा याला जाणण्यास व त्याच्यावर प्रीती करण्यास मदत केली होती. त्यांचा आपसातील हा खरा विश्वास त्या दोन स्त्रियांना खरे मित्र म्हणून एकवटण्यात शक्तीशाली असा आध्यात्मिक बंध ठरला. यहोवाने त्यांना नवीन कौटुंबिक वातावरणात आशीर्वादित केले. काही काळातच रुथ हिचा यहुदातील समृध्द शेतकरी बवाज याच्याबरोबर विवाह झाला व तिला ओबेद नावाचा पुत्र झाला, जो दावीद राजाचा आजोबा बनला.—रुथ ४:१३-२२; मत्तय १:५, ६.
या आध्यात्मिक गोष्टीने मित्रत्वास उच्च स्तरावर ठेवले. ते कसे? रुथ व नामी या दोघींनीही यहोवा, जो “दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” याची भक्ती केली. (निर्गम ३४:६) “देवी प्रीती आहे”, व आम्ही प्रांजळपणे त्याची भक्ती आत्म्याने व खरेपणाने करु तर आम्ही खात्रीने त्याच्या व सोबतीच्या प्राणिमात्राविषयीच्या प्रेमात वाढू. (१ योहान ४:८; योहान ४:२४) याकरवी आम्हात बदल घडतो. आम्ही इतराबाबत व खासपणे लीन, सर्व वंशाच्या त्रासात असणाऱ्या लोकांबाबत मैत्रीपूर्ण आस्था वाढवू लागतो. त्यामुळे स्वहित पाहणारे कमी स्व-केंद्रित बनतात व स्वार्थी लोक इतरांविषयीची चिंता जोपासू लागतात. आम्ही देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती—“प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व इंद्रियदमन” दाखविण्यास सुरु करतो.—गलतीकर ५:२२, २३.
हे गुण आम्हास इतरांच्या कमतरता व चूका यांची, येशूने म्हटल्याप्रमाणे, “सात वेळाच” नव्हे तर, “साताच्या सत्तर वेळा” क्षमा करण्याची महत्वपूर्ण गुणवत्ता वाढविण्यास मदत करतात. (मत्तय १८:२१, २२) पुष्कळांचे मित्रत्व याच मुद्यावर ढासळते. परंतु, येशू ख्रिस्ताने या तत्वाचा प्रचारही केला व अनुकरणही केले. त्याने त्याच्या अपूर्ण, पापाच्या चूकीस पात्र असणाऱ्या शिष्यांची कितीतरी वेळा क्षमा केली. शिवाय पेत्राने प्रभुचा लज्जास्पद रितीने नकार केला तरी त्याची सुध्दा त्याने क्षमा केली!—मत्तय २६:६९-७५.
या सर्व आध्यात्मिक प्रगतीच्या परिणामामुळे आमचा मित्र परिवार वाढीस लागतो. सरतेशेवटी आम्हास आढळते की आम्ही एका विशाल गोलार्धव्याप्त मित्र परिवाराचेच आहोत! आम्हास हे सुध्दा आढळते की आमच्या मित्रांची सर्वसाधारण पातळी उच्च दर्जाची आहे. उदाहरणार्थ, ब्रायान हा अलिकडेच बनलेला यहोवाचा उपासक आठवितो की त्याच्या पूर्वीच्या मित्रांनी त्याला पिणे यात खेचले होते व त्याद्वारे त्याची बायको व मुले याजकडे त्याचे दुर्लक्ष होत गेले. परंतु आता तो फारच कुटुंबनिष्ठ आहे. यहोवावर विश्वास राखणाऱ्या त्याच्या नव्या मित्रांसंबंधी तो म्हणतोः “मला काही समस्या असेल तर मला ठाऊक आहे की फोन उचलून त्यांच्यातील कोणाही एकास बोलवावे व ते मदत देण्यात आनंदी असतात.”
ॲलनला देखील काही मित्र होते जे नेहमी मोटार व पोरी यांच्याबद्दल संभाषण करीत असत. परंतु त्याने यहोवावर प्रेम करणारे सोबतीचे पुष्कळ मित्र केले तेव्हा ते विषय त्याला “निरस व निरर्थक” वाटले. त्यांनी ॲलनला “स्वयंस्फुर्त, अस्सल प्रेमळ आस्थेने” जिंकले.
आमचे सर्वोत्तम मित्र
हे सर्व व जगभरातील अजून लाखोजण राजकारण विरहित असणारा तसेच राष्ट्रीय, वंश, सामाजिक बंधने यांच्या पलिकडे असणारा व मानवजातीचे खरे बंधुत्व जोपासणारा मित्रपरिवार याचे सदस्य झाले आहेत. ते आरंभीच्या ख्रिश्चनांप्रमाणेच आहेत. (३ योहान १४) रुथ व नामी यांना ज्याने एकत्र आणले तेच बंधन या परिवारास म्हणजे यहोवा देवाच्या शुध्द उपासकांना ऐक्यात आणते. ते सर्वजण नम्रपणे व कृतज्ञतेने जाणतात की यहोवा व येशू ख्रिस्त त्यांचे सर्वोत्तम मित्र आहेत.
‘सर्वसमर्थ देव व त्याचा पुत्र हे मित्र?’ असा तुम्ही कदाचित अचंबा कराल. ‘ते कसे शक्य आहे? ते उद्दामपणाचे वाटत नाही का?’ बरे तर, पवित्र शास्त्र म्हणतेः “अब्राहामाने यहोवावर विश्वास ठेवला, . . . त्याला यहोवाचा मित्र म्हणण्यात आले.” तो खरोखरी दयाळूपणा होता. तथापि, यहोवाचा शब्द म्हणतोः “देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण तो लीनांवर कृपा करतो.”—याकोब २:२३; ४:६.
काहींना कदाचित वाटेल की आम्ही या हक्कासाठी अगदीच अपात्र, पापी आहोत. परंतु याकोब पुढे म्हणतोः “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. पापी जनहो, हात शुध्द करा; अहो द्विबुध्दीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे पवित्र करा. यहोवाच्या नजरेत नम्र व्हा म्हणजे तो तुम्हास उंच करील.”—याकोब ४:८, १०.
येशूने म्हटलेः “मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.” तसेच त्याने सर्वात महान आज्ञा, ‘यहोवा देवावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने व स्वतःप्रमाणेच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर’ याकडे निर्देश केला. (योहान १५:१४; मत्तय २२:३७-४०) आम्ही हे करु तर आम्हास पुष्कळ खरे मित्र असतील. याहून अधिक आम्ही अशाप्रकारे आणखी एका उदात्त हक्कासाठी—देवराज्य वर्चस्वाखाली शुध्द पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन याकरता लायक होऊ. (मत्तय ६:९, १०) येशूने म्हटल्याप्रमाणेः “त्याच्या [यहोवाच्या] आज्ञा सार्वकालिक जीवन आहेत.”—योहान १२:५०.
तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करण्यासाठी मुभा द्याल का? अस्सल मैत्रीपूर्ण लोक या नात्याने ते तुमची भेट घेण्यास व हा महत्वपूर्ण विषय तुम्हासोबत मोफतपणे चर्चा करण्यास आनंदाने तयार आहेत. ते तुम्हास पुष्कळ खरे मित्र संपादित करण्यास मदत करु शकतात.
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
खऱ्या मित्रत्वासंबंधीच्या काही मार्गदर्शिका
तुम्ही ज्यांच्यासोबत संगत राखता त्यात निवडक असा.
इतरांमध्ये खरी आस्था घ्या व चांगले ऐकणारे असा.
एकत्र गोष्टी करणे—अनुभवांची सहभागी करणे मित्रत्वास दृढ करते.
सर्ववेळी मनमोकळे, खुल्या वृत्तीचे व प्रांजळ असा.
इतर त्रासात असतात तेव्हा दयाळू व समभाव राखणारे असा.
मित्र चूका करतात, तुम्हास अस्वस्थ करतात तेव्हा क्षमा करण्यास—“साताच्या सत्तर वेळा” क्षमा करण्यास तयार असा.—मत्तय १८:२२.
मित्रांची नालस्ती होते किंवा त्यांच्याविषयी अयोग्य टीका केली जाते तेव्हा निष्ठावान असा व त्यांचे समर्थन करा.
यहोवाच्या भक्तीची सहभागिता मित्रत्वास भरपूर बळकटी देते.
[७ पानांवरील चित्रं]
रुथ नामीस सोडणार नव्हती कारण त्यांच्या मैत्रीस भक्कम आध्यात्मिक आधार होता. तुम्हास असे खरे मित्र आहेत का?