वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ९/१ पृ. २८-३०
  • स्तोत्रकर्ता यहोवाची स्तुति गातो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्तोत्रकर्ता यहोवाची स्तुति गातो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या उद्देशांच्या अधीन होणे
  • अतुलनीय देव
  • यहोवाचे महासामर्थ्य
  • “यहोवा धन्यवादित असो”
  • स्तोत्रसंहितेच्या पहिल्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “यहोवाचा धन्यवाद”—का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • सांत्वन व बोध करणारी देवप्रेरित गीते
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ९/१ पृ. २८-३०

पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे स्तोत्रसंहिता १ ते ४१

स्तोत्रकर्ता यहोवाची स्तुति गातो

“स्तुति.” स्तोत्रसंहितेचे पुस्तक याकरता जो इब्री शब्द आहे त्याचा असा अर्थ आहे, व तो केवढा उचित आहे! मुळात सबंध पुस्तक यहोवाच्या स्तुतीचा दीर्घ स्वर काढते. स्तोत्रसंहितेत यहोवाचे गुण व अद्‌र्भित कृत्ये यांचे स्मरण आहे. त्यात भविष्यवाद आहेत व ते प्रेरित लेखकांची छळ, विश्‍वासघात, नैराश्‍य तसेच दूषित विवेकामध्ये असणारी भावना कळवितात. अशाच स्वरूपाचा त्रास सहन करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी स्तोत्रातील शब्दांपासून बळ प्राप्त केले.

स्तोत्रसंहितेच्या पुस्तकाचे पाच विभागात विभाजन सापडते. सध्या आपण पहिला विभाग म्हणजे स्तोत्रसंहिता १ ते ४१ याचा विचार करू या.

यहोवाच्या उद्देशांच्या अधीन होणे

स्तोत्रसंहिता १ ते १४ अध्याय कृपया वाचणे. स्तोत्रांचा हा संच स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातील काही प्रधान विषयाची प्रस्तावना करून देतो: नियमशास्त्र, भावी मशीहा राजाविषयीचे भविष्यवाद, आणि कडक छळामध्ये मदतीसाठी प्रार्थना याविषयीचे महत्व. याशिवाय आणखी आपण शिकतो की दुष्टांचे तात्कालिक उत्थान होत असले तरी धार्मिकांना आशीर्वाद मिळणारच.

◆ २:१—राष्ट्रे कोणती “व्यर्थ योजना” “बडबडत” आहेत?

यहोवाच्या अभिषिक्‍ताचा स्विकार करण्याऐवजी राष्ट्रे आपल्या अधिकाराच्या चिरस्थायीपणा बद्दल “बडबडत” [किंवा “मनन करीत”] राहिली आहेत. या शब्दांचा अवलंब पहिल्या शतकात रोमी व यहुदी अधिकाऱ्‍यांनी यहोवाचा अभिषिक्‍त राजा येशू ख्रिस्त याला ठार करण्याच्या योजनेत संगनमत दाखविले त्यावेळी झाला. (प्रे. कृत्ये ४:२६–२८) तरीपण, मोठी पूर्णता १९१४ पासून जेव्हा सर्व राष्ट्रांनी देवाच्या सिंहासनाधिष्ठ राजाचा धिक्कार केला आणि आपले सार्वभौमत्व वाढविण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून होत आहे.

◆ २:१२—‘पुत्राचे चुंबन घ्या’ अशी आज्ञा का?

पवित्र शास्त्रीय काळी चुंबन हे मित्रत्वाचे लक्षण होते आणि एखाद्याच्या घरी पाहुणचारासाठी पाहुण्यांच्या स्वागतार्थ त्याचा वापर होई. या वचनात यहोवा राष्ट्रांना त्याच्या पुत्राचे अभिषिक्‍त राजा या नात्याने स्वागत करायला वा चुंबन घ्यायला सांगतो.—स्तोत्रसंहिता २:२, ६–८.

◆ ९:१२—यहोवा ‘रक्‍तपाताची आठवण’ का करतो?

न्यायदानासाठी बसलेल्या न्यायधीशाप्रमाणे, यहोवा, ज्यांनी अजाण लोकांचा रक्‍तपात घडवून आणला आहे त्या रक्‍तदोषींचा शोध घेतो. (उत्पत्ती ९:५, ६; लूक ११:४९, ५०) दोष्यांना तो शिक्षा करतो. पण त्याच्या शिक्षेत भेदाभेद नाही. स्तोत्रकर्ता दावीद खात्री देतो: “तो दीनांचा आक्रोश विसरला नाही.”—पडताळा २ पेत्र २:९.

◆ ११:३—हे कोणते “आधारस्तंभ” ढासळले?

ज्या आधारस्तंभावर समाज उभा आहे तो न्याय, कायदा व सुव्यवस्था हे ते पाये आहेत. जेव्हा सामाजिक व्यवस्था बिघडते, न्यायाची शक्यता दिसत नाही तेव्हा देवभिरू व्यक्‍तिने काय करावे? यहोवावर भरवसा ठेवावा. तो त्याच्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहे आणि घडत असलेले सर्व काही पाहत आहे त्यामुळे तो आम्हाबाबतीत अपयशी ठरणार नाही.

आमच्यासाठी धडा: स्तोत्रसंहिता ४:५ देवभिरू लोकांना “नीतीमत्वपूर्वक यज्ञ कर”ण्याचे आर्जविते. दावीदाच्या काळी इस्त्राएलांना यहोवाच्या वेदीवर अर्पणे वाहवी लागत. पण हे करताना योग्य मनोदय व अस्सल पश्‍चातापाची गरज होती. (यशया १:११–१७) ख्रिश्‍चन आपले आध्यात्मिक यज्ञार्पण वाहताना त्यांनी योग्य मनोदय राखला पाहिजे व यहोवाच्या उच्च दर्जाप्रमाणे राहिले पाहिजे.—इब्रीयांस १३:४, ५, १५, १६; १ पेत्र २:१, ५.

अतुलनीय देव

स्तोत्रसंहिता १५ ते २४ वाचा. स्तोत्राच्या या संचात यहोवा देवाच्या स्तुतीचे पुष्कळ वक्‍तव्य आहे. तो आपल्या लोकांचा रक्षणकर्ता (१८), निर्माता व नियमदाता (१९), तारणकर्ता (२०), निवडलेल्या राजाच्या रक्षक (२१), सर्वोच्च मेंढपाळ (२३) आणि वैभवी राजा (२४) आहे.

◆ १६:१०—येथे उल्लेखिलेला “निष्ठावंत” कोण आहे?

काही पवित्र शास्त्र प्रामाण्य हे वचन सर्वसाधारण विश्‍वासू जनांच्या बाबतीत लागू करतात. त्यांचे म्हणणे आहे की काही इब्री प्रतींमध्ये “निष्ठावंत” हा शब्द अनेक वचनी आहे. तरीपण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात याचे जे अवतरण घेण्यात आले तेथे मात्र हा शब्द “निष्ठावंत” असा एकवचनी दिसतो. तर मग हा कोण आहे? प्रथम पूर्णतेत दावीद स्वतः. तथापि भविष्यवादितरित्या पेत्र व पौलाने हे वचन येशूला लागू केले आहे.—प्रे. कृत्ये २:२५–३२; १३:३५–३७.

◆ २१:३—“शुद्ध सुवर्णाचा मुकुट” काय होता?

कदाचित हा खरोखरचा मुकुट असावा; की जो मिलकोम मूर्तीवरून काढून टाकला होता. (पडताळा २ शमुवेल १२:२९, ३०) किंवा कदाचित हा मुकुट लाक्षणिक असावा जो दावीदाच्या विजयामुळे त्याच्या वैभवी राज्यपदास कसा सुशोभितपणा आला त्याची सूचकता होता. तथापि, भविष्यवादितरित्या हे स्तोत्र, यहोवाने येशूला १९१४ मध्ये राज्यसत्तेचा मुकुट कसा घातला ते दर्शविते. “शुद्ध सुवर्णाचा मुकुट,” त्याची राजवट केवढया उच्च प्रतीची असेल याची सूचकता दर्शवितो.

◆ २२:१—देवाने दावीदाचा त्याग केला होता का?

नाही. पण जेव्हा दावीद आपल्या शत्रूंच्या प्रखर दबावाखाली होता त्यावेळी जणू तसे भासले होते. तथापि, आपल्या भयंकर विपत्तीत दावीदाने व्यक्‍त केलेली मानवी प्रतिक्रिया त्याचा अविश्‍वास प्रवर्तित करीत नाही; कारण तो मोठ्या आत्मविश्‍वासपूर्वक मुक्‍ततेसाठी प्रार्थना करतो. (वचने १६–१९) येशूने मरण्याआधी वधस्तंभावर या स्तोत्राचे अवतरण घेतले ही मनोरंजक गोष्ट आहे. “का?” अशी विचारणा करण्याद्वारे येशूने आपणावर बेतलेल्या अत्यंत कठीण दबावाचे वक्‍तव्य केले पण याचवेळी ज्या खोट्या दोषारोपामुळे त्याला ही शिक्षा मिळाली त्याविषयीची आपली अजाणता व्यक्‍त केली.

आमच्यासाठी धडा: प्रेषित पौल स्तोत्रसंहिता २२:२२ चे अवतरण घेऊन ते येशू ख्रिस्त आपल्या अभिषिक्‍त बांधवांमध्ये यहोवाचे नाम घोषित करण्यात जो पुढाकार घेतो त्याला लागू करतो. (इब्रीयांस २:११, १२) स्तोत्रसंहिता २२:२७ जेव्हा सर्व “राष्ट्रकुले” यहोवाच्या लोकांबरोबर मिसळून त्याची स्तुति गातील त्या काळचा निर्देश करते. आज एक प्रचंड आंतरराष्ट्रीय जमाव येशूच्या बांधवांसोबत मिळून देवाची स्तुति गात आहे. (प्रकटीकरण ७:९) या इश्‍वरी संघटित व्यवस्थेशी आपण निगडीत राहिले पाहिजे.

यहोवाचे महासामर्थ्य

स्तोत्रसंहिता २५ ते ३४ वाचा. स्तोत्रसंहिता २५ व २६ मध्ये दावीद सचोटीने चालण्याच्या त्याच्या इच्छेची घोषणा करतो. यानंतर यहोवावरील धैर्यवान भरवशाचे वक्‍तव्य करणारे लिखाण आहे आणि ३३व्या स्तोत्रात यहोवाच्या सामर्थ्याचे वैभवी वर्णन आहे.

◆ २८:८—यहोवाचा “अभिषिक्‍त” कोण आहे?

या वचनातील “अभिषिक्‍त” यहोवाचे निवडलेले लोक आहेत हे या वचनाच्या पूर्वार्धावरून लक्षात येते, जेथे म्हटले आहे की, “यहोवा आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे.” या शब्दात हबक्कुक ३:१३ सारखीच भविष्यवादित अर्थसूचकता आहे. ते, यहोवा आर्मगिदोनातील युद्धात आपल्या अभिषिक्‍त शेषांचा बचाव करणार याकडे निर्देश करतात.

◆ २९:५, ६—यहोवाचा ध्वनि देवादारू कसा मोडतो?

या स्तोत्रात यहोवाचे सामर्थ्य, त्याच्या वाणीस वादळाच्या गर्जने सारखी उपमा देऊन वर्णनात्मक पद्धतीने रेखाटले आहे. हे वादळ उत्तरेच्या लबानोनापासून ते दक्षिणेच्या वाळवंटमय प्रदेशाकडे जाते व जाताना मोठी भयप्रेरणा निर्माण करते. (वचन ९ब) त्याचा वारा लबानोनास खवळवितो व त्यास जणू “वासरांप्रमाणे उसळावयास लावितो.” त्याची विद्युल्लता काही झाडे मोडते, ‘चक्काचूर करते.’ याप्रमाणे वादळाचा वारा “वन कंपित करतो.” (वचन ८) तो वाळवंटातील वाळू उधळून लावतो की ज्याकरवी कंपायमानता भासते.

◆ ३३:६—यहोवाच्या ‘मुखातील श्‍वास’ काय आहे?

येथे उल्लेखिलेला श्‍वास वा आत्मा यहोवाचा पवित्र आत्मा वा त्याची कार्यकारी शक्‍ती आहे. आमच्या तोंडातून शब्द व श्‍वास जसे एका मागोमाग येत असतात त्याप्रमाणे यहोवाचे वचन वा आज्ञा त्याचा श्‍वास वा आत्मा यासोबत येतात. यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याचा वापर भौतिक स्वर्गातील सूर्य, चंद्र व तारे या लाक्षणिक सैन्याची निर्मिती करताना केला.—पडताळा उत्पत्ती १:१, २.

आमच्यासाठी धडा: स्तोत्रसंहिता २६:५ मध्ये दावीद म्हणतो की त्याने दुर्जनांच्या सभेचा द्वेष केला. यहोवाचे साक्षीदार आज याचप्रकारे अधर्मी लोकांचा सहवास टाळतात. (१ करिंथकर १५:३३) दावीदाने देवाच्या मंदिराबाबत उत्कट आस्या प्रदर्शित केली त्याप्रमाणेच खऱ्‍या ख्रिश्‍चनांना यहोवाच्या संस्थेत एकमेकांच्या सहवासाचा आनंद लाभतो.—स्तोत्रसंहिता २६:६–८; १२२:१.

“यहोवा धन्यवादित असो”

स्तोत्रसंहिता ३५ ते ४१ वाचा. या संचामध्ये, यहोवा हा जीवनाचा झरा आहे याची ओळख देणारे ३६ वे स्तोत्र आणि शिक्षणप्राप्ती करणाऱ्‍यांना ज्या प्रतिफळाची हमी आहे ते सांगणारे ३७वे स्तोत्र उल्लेखनीय आहे. शिवाय ४०वे स्तोत्रसुद्धा लक्षवेधी आहे ज्यात येशू ख्रिस्ताविषयीचे भविष्यकथन आहे.

◆ ३५:१९—दावीदाचे शत्रू ‘डोळे का मिचकावणार’ होते?

इब्री शास्त्रपद यांना अक्षरशः “माझे लबाड शत्रू” असे संबोधिते. याचा अर्थ त्यांचा द्वेष अयोग्य हेतुपासून निष्पण्ण झाला होता. त्यांचे वैर लाभावे असे काही कृत्य दावीदाने केले नव्हते; त्याने प्रार्थना केली की यांना खोडसाळपणे आनंद मिळू नये. (वचन १९अ) यानंतर त्याने म्हटले की त्याच्या लबाड शत्रूंना ‘डोळे मिचकावण्यास’ वाव मिळू नये कारण तशी कृति त्यांच्या वाईट योजनांना लाभलेल्या यशाची सूचकता ठरणार होती. (नीतीसूत्रे १०:१०; १६:२९, ३०) येशने या वचनाचे अवतरण घेऊन त्याचा द्वेष करणाऱ्‍यांना ते लागू केले.—योहान १५:२४, २५.

◆ ३६:३—या दुष्टांना सुबुद्धी होती का?

याकरवी हे सूचित होते की अशा व्यक्‍तिच्या वागणूकीत बदल झाला होता व त्यामुळे तो आधी होता तसा राहिला नाही. कदाचित आधी त्याने सूज्ञान दाखविले व चांगली कृत्ये केली असावी. पण हे सर्व त्याने मागे सोडले, व तो धर्मत्यागी झाला. शौल राजाने सूज्ञानाचा मार्ग झिडकारून दावीदाविषयी द्वेष प्रदर्शित केला. (१ शमुवेल अध्याय १८) दावीदाने शौलाला मनात गृहीत धरून या संदर्भानेच ३६व्या स्तोत्राचे लिखाण केले असावे असे काही प्रामाण्यांचे मत आहे.

◆ ४०:६—“तू माझे कान उघडिले आहेस” या शब्दांचा काय अर्थ होतो?

याचा अर्थ हा होऊ शकतो की यहोवाने दाविदाच्या कानांना देवाच्या मार्गदर्शनासाठी सुसंगत होण्यासाठी वळविले; किंवा यहोवाने दावीदाच्या कानांना अशा रितीने निर्मिले की त्याकरवी देवाच्या आज्ञा तो ऐकू शकला. सेप्टयुजंट आवृत्तीत हे शब्द “तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहेस” या पद्धतीने आढळतात हे मनोरंजक वाटते. या भाषांतराचा स्रोत कोठलाहि असला तरी त्यात इब्री भाषेसारखाच गर्भितार्थ आहे. तो अर्थ म्हणजे आज्ञा धारकपणाची गरज. (पडताळा १ शमुवेल १५:२२; होशेय ६:६.) पौलाने हे वचन येशू ख्रिस्ताला लागू केले. (इब्रीयांस १०:५–१०) ज्या अर्थी पौलाने सेप्टयुजंट आवृत्तिचा वापर केला त्या अर्थी “तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहेस” हे शब्द आता “सर्व शास्त्रवचने” यांचा भाग बनले जी, “इश्‍वरप्रेरित” आहेत.—२ तिमथ्यी ३:१६.

आमच्या साठी धडा: ३७ वे स्तोत्र आमच्यासाठी, आम्ही या दुष्ट पिढीच्या मध्ये राहात असताना, पुष्कळसे धडे राखून आहे. दुर्जन वाढले तरी आम्ही मत्सरी बनून त्यांचे अनुकरण करू नये. उलटपक्षी, आम्ही “यहोवाच्या अधीन होऊन स्वस्थ राहा”वे, चुका शोधत राहू नये तर तो आपल्या नियुक्‍त समयी आमचा कैवार घेईल अशी भिस्त त्याच्यासंबंधाने ठेवावी.—स्तोत्रसंहिता ३७:५, ७.

होय, स्तोत्रसंहितेत पुष्कळ प्रेरणात्मक व सांत्वनदायक शब्द आहेत. या पहिल्या ४१ स्तोत्रांनी दाखविले की आमची परिस्थिती कितीही अडचणीची झाली तरी यहोवा आमचा त्याग करणार नाही. यांचे वाचन केल्यावर आमच्या मुखातून अगदी तेच उद्‌गार बाहेर पडावेत, जे ४१व्या स्तोत्राच्या समाप्तीस लिखित आहेत. ते म्हणतात: “इस्राएलाचा देव यहोवा युगानुयुग धन्यवादित असो. आमेन, आमेन.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा