वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ९/१ पृ. २७
  • जीवनात उद्देश शोधणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवनात उद्देश शोधणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलने बदललं जीवन
    टेहळणी बुरूज: बायबलने बदललं जीवन
  • काहींना उत्तरे कशी मिळालीत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • अर्थपूर्ण उद्देश शोधणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • बायबलने बदललं जीवन
    टेहळणी बुरूज: बायबलने बदललं जीवन
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ९/१ पृ. २७

राज्य घोषकांचा वृत्तांत

जीवनात उद्देश शोधणे

आजच्या या अधोगतीच्या व गोंधळाच्या जगात पुष्कळ लोक जीवनातील अर्थ व उद्देशाचा शोध घेत आहेत. ते विचारतात: ‘आम्ही येथे का आहोत? आम्ही कोठून आलो आहोत? भवितव्य आम्हासाठी काय राखून आहे?’ याच्या उत्तरासाठी पुष्कळजण देवाकडे वळत आहेत. देव अशांना निराश करीत नाही. (मत्तय ७:७, ८) असाच अनुभव ग्रीसमध्ये राहणाऱ्‍या एका स्त्रीला आला. ती म्हणते:

◻ “मी १४ वर्षाची होते तेव्हापासूनच मला मानव व त्याचा जीवनातील उद्देश याजविषयीचे मोठे आश्‍चर्य वाटू लागले. शाळेत मानवशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर मला वाटू लागले की वैद्यकिय शास्त्र मला याचे उत्तर देऊ शकेल. पण जेव्हा माणसाच्या उगमाविषयीचे मला समाधानकारक स्पष्टीकरण मिळू शकले नाही तेव्हा मी त्या शाखेकडे वळण्याचा विचार सोडून दिला.” ती पुढे म्हणते: “मग माझे विचार ज्योतिष शास्त्राकडे वळाले आणि मी पूर्वदेशीय धर्माचा जसे की इस्लाम व तिबेटी धर्म यांचा अभ्यास करू लागले. मी लामाचे शिक्षण व भूतविद्या माझ्या जीवनात आचरू लागले. मला आत्म्यांचा संपर्क घडला तेव्हा वाटले की मला सत्य आढळले आहे. पाश्‍चिमात्य धर्म आपला विश्‍वास पवित्र शास्त्रावर आधारलेला आहे असा दावा करतात. पण शाळेत असताना मला माझ्या प्रश्‍नांची उत्तरे माझ्या धर्म शिक्षकाकडून मिळू न शकल्यामुळे मी ज्योतिषप्रवास व मोहिनीविद्या हा भूतविद्येचा आचार चालू ठेवला.”

१९८२ मध्ये या स्त्रीचा यहोवाच्या साक्षीदारांसोबत संपर्क आला, पण ती म्हणते: “मी जे गुंतागुंतीचे शिक्षण घेतले होते त्यापेक्षा यांचे पवित्र शास्त्रावरील विवेचन फारच साधे वाटले. तरीपण पवित्र शास्त्राविषयी आणखी एकदा प्रयत्न करून पहावा असे काहीतरी मला राहून राहून वाटायला लागले. याकरताच मी मोठ्या अहंमन्यतेने त्यांच्याकडील पवित्र शास्त्राचा अभ्यास स्विकारला, यात हेतु असा की साक्षीदार आपल्या शिकवणीत चुकीचे होते हे सिद्ध करून दाखवावे.”

सुमारे वर्षभर यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास केल्यावर ती म्हणते: “मी आता यहोवाचे अंतःकरणापासून उपकार मानते ते अशासाठी की त्याने मला खरे सत्य शिकण्याची ही मदत देऊ केली. सरतेशेवटी मी आता सर्व खोटी तत्वे व अंधश्रद्धा यापासून मुक्‍त झाले. पवित्र शास्त्र या देववचनात आढळून येणारे सत्य किती साधे व सोपे आहे. माझ्या प्रश्‍नांची उत्तरे मला मिळाली. आता मला मानवाचा उगम व त्याचा जीवनातील उद्देश कळाला.”

◻ २७ वर्षे वयाच्या एका ग्रीक माणसालासुद्धा जीवनातील उद्देश प्राप्त झाला. तो आधी नास्तिकवादात गुंतला होता. त्याने जर्मनीत स्थापत्य शास्त्राचा अभ्यास केला व नंतर ग्रीसमध्ये परतल्यावर तो लष्करात भरती झाला. त्याला आलेल्या अनुभवावरून त्याची खात्री झाली की मानवाला त्याच्या समस्या सोडवून आपले जीवन सुखी करता येणार नाही. जर्मनीस जाण्याआधी शेजारी राहणाऱ्‍या एका साक्षीदाराने त्याच्यासोबत पवित्र शास्त्राविषयी केलेली बोलणी त्याला आठवली. तेव्हा लष्करातून निवृत्त होण्याच्या काही महिने आधीच त्याने आपल्या वरिष्ठांना कळविले: “मी स्वतःला सैनिक म्हणून समजत नाही.” त्याच्या कुटुबांला वाटले की हा आता वेडा झाला आहे याकरता त्यांनी त्याला मानसतज्ञाकडे औषधोपचार घेण्याची सक्‍ति केली. या तज्ञांनी त्याला विविध औषधांचे मोठमोठे प्रमाण दिले त्यामुळे त्याच्या शरीरावर व मानसिक प्रवृत्तीवर परिणाम होऊ लागला, इतका की शेवटी त्याला औषधे घेणेच बंद करावे लागले.

तो घरोघरच्या उपाध्यपणात दोन साक्षीदारांना आढळला व त्याने त्यांच्या सोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरू केला. आपले जीवन यहोवाच्या गरजांनुरूप आणल्यावर तो सुवार्तेचा क्रियाशील प्रचारक बनला. १९८४ मध्ये तो आपले दहा नातेवाईक सोबत घेऊन स्मारकविधि समारंभास उपस्थित राहिला.

होय, त्याला जीवनात उद्देश आढळून आला. आता त्याची खास पायनियर या नात्याने यहोवाची सेवा करण्याची इच्छा आहे. देवाच्या नव्या धार्मिक व्यवस्थेत चिरकालिक जीवनप्राप्ती मिळविण्याची त्याची आशा आहे.—यशया ६५:१७, १८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा