पवित्रशास्त्रीय ठळक मुद्दे स्तोत्रसंहिता ७३ ते १०६
“यहोवाचा धन्यवाद”—का?
यहोवाने आम्हासाठी जे कांही केले; करीत आहे व अजून करणार आहे त्या सर्वाविषयी आम्ही विचार करू तेव्हा आम्हातील कोणी कृतज्ञ असू शकेल काय? खरंच, आमच्या अंतःकरणाने आमच्या देवाचा धन्यवाद करण्यास चेतविले पाहीजे. स्तोत्रसंहिताचे तिसरे व चौथे पुस्तक आम्हापाशी यहोवाचा धन्यवाद करण्यास पुष्कळ कारणे आहेत हे दाखविते, ज्यावर त्यात जोरदार प्रतिपादन केले आहे. आम्ही स्तोत्रसंहिता ७३ ते १०६ चा विचार करू तसे स्वतःस विचारा, ‘मजजवळ यहोवाचा धन्यवाद करण्यासाठी व्यक्तीगत कोणती कारणे आहेत?’
दुष्टाचा मत्सर करू नका
कृपया स्तोत्रसंहिता ७३ ते ७७ वाचा. स्वाभाविकच ही आसाफ व त्याच्या पुत्रांना समाविष्ट करून आहेत. आसाफाने, कळले नाही तोवर दुष्टांचा हेवा केल्याचे कबुल केले. (स्तोत्रसंहिता ७३) त्यानंतर यरूशलेमच्या नाशावरचा विलाप आहे. (स्तोत्रसंहिता ७४) त्यापुढे “भयप्रद” देवाबद्दलच्या कृतज्ञतेचे बोल, त्याच्या पिडीत लोकांची आठवण करण्यास “थोर देवा”स केलेली प्रार्थना आढळते.—स्तोत्रसंहिता ७५–७७.
◆ ७३:२४—यहोवा कोठपर्यंत स्तोत्रकर्त्याचे “गौरव” करतो?
स्तोत्रकर्त्यास ‘देवासमीप जाणे त्याजसाठी चांगले आहे’ याची आवड जाणे पर्यंत त्यास दुष्ट हे धार्मिकापेक्षा बरे असे वाटले. (स्तोत्रसंहिता ७३:२–१२, २८) देवाच्या “सुचने”ला त्याला मार्गदर्शन करण्यास वाव देण्याचा परिणाम “गौरव” प्राप्त करण्यात म्हणजेच यहोवा सोबतची कृपापसंती, त्याजसोबत धन्यवादीत नातेसंबधात झाला.
◆ ७६:६—“रथ” व “घोडे” यांना ‘गाढ निद्रा’ कशी लागली?
इस्राएलांना रथ व घोड्या ऐवजी यहोवावर भाव ठेवण्यास शिकविले होते. (स्तोत्रसंहिता २०:७; नीतीसूत्रे २१:३१) त्यांना त्यांचे शत्रूंचे घोडे व हत्यारबंद रथ यांना घाबरून जाण्याचे कारणच नव्हते कारण यहोवा त्यांचे सैन्य बलहीन, त्यांना ‘गाढ निद्रे’ प्रमाणे बनवू शकतो. येथे असणारा संदर्भ “चिरकाल निद्रा”—मृत्यूचा आहे. (यिर्मया ५१:३९) सध्याच्या काळात हे शस्त्रास्त्रावर भाव ठेवणाऱ्या नेत्यांना इशाऱ्या समान आहे.—स्तोत्रसंहिता ७६:१२.
आम्हासाठी धडा: स्तोत्रसंहिता ७५ “तुम्ही आपले शिंग उंच करू नका” असे म्हणताना गर्वाविरूद्ध इशारा देते. (वचन ५) शिंग हे बल व सामर्थ्याचे द्योतक होते. (अनुवाद ३३:१७) एकाद्याने आपले शिंग उंचावणे म्हणजे हट्टाने वर्तन करणे होय. येथे स्तोत्रकर्ता दुष्टांना त्यांच्या सुरक्षित सत्तेचे स्थान वाटण्यावर हट्टवादीपणाने रहाण्याविरुद्ध इशारा देतो कारण यहोवा ‘दुष्टांची शिंगे मोडून काढील’ (स्तोत्रसंहिता ७५:१०) दुष्टांची भरभराट झालेली वाटत असली तरी हे जाणणे देवाच्या सेवकांना त्यास विश्वासू राहाण्याचे उत्तेजन देते.—स्तोत्रसंहिता १४४:११–१५अ ची तुलना करा.
“सर्वसमर्थास” आज्ञाधारक रहा
स्तोत्रसंहिता ७८ ते ८३ वाचा. आसाफाची स्तोत्रे सूरू राहातात. इस्राएलांच्या इतिहासाचा धडा पुन्हा कथिला आहे. (स्तोत्रसंहिता ७८) मंदिराच्या नाशावर विलाप आहे त्यानंतर इस्राएलांच्या पुनर्वसनासाठी प्रार्थना येते. (स्तोत्रसंहिता ७९, ८०) त्यानंतरचे गीत देवाकडूनची मुक्ती यावर पुर्नदृष्टी टाकते व त्याच्या लोकांना त्यास आज्ञाधारक राहण्यास बोध करते, तेथे भ्रष्ट न्यायाधीशावर व इस्राएलाच्या शत्रूवर न्यायदंड बजावण्याची याचीका आहे.—स्तोत्रसंहिता ८१–८३.
◆ ८२:१—देव “देवामध्ये” कसा न्याय करतो?
स्पष्टपणे हे “देव” इस्राएलांचे न्यायाधीश होते. ते न्यायदेण्याच्या स्थानावर प्रबल होते म्हणून त्यांना देव म्हटले गेले होते. यहोवास, सर न्यायाधीश म्हणून या न्यायाधीशामध्ये हस्तक्षेप करून, त्याच्या कायद्यानरुप न्याय करण्यात अपयशी झाल्यामुळे त्यांना वाग्दंड देण्याचा इश्वरी हक्क होता.—यशया ३३:२२; स्तोत्रसंहिता ८२:२–४
◆ ८३:९–१५—स्तोत्रकर्त्याचा हेतुसूड घेण्याचा होता का?
कधीच नाही. तो देवास प्रार्थना करीत होता की यहोवाचा “द्वेष” करणाऱ्यावर न्यायदंड बजावला जावा. (वचन २) अशाप्रकारे इतर राष्ट्रे देव ज्याचे नांव यहोवा असून “सर्व पृथ्वीवर परात्पर आहे” हे शिकतील. (वचन १८) या सामर्थ्याच्या प्रदर्शनाचा परिणाम देवाचे नाव यहोवा सर्व पृथ्वीभर प्रसिद्ध करण्यात होईल.
आम्हासाठी धडा: जे त्यास आज्ञाधारक राहातात त्यांना यहोवा समृद्धपणे आशीर्वादीत करतो हे “गव्हाचे सत्व” याच्या संदर्भाने प्रदर्शित केले आहे. (स्तोत्रसंहिता ८१:१६) येथे सत्व हा शब्द सांकेतीक भाषेत सर्वोत्तमत्वा सोबत आहे. (स्तोत्रसंहिता ६३:५ची तुलना करा.) इस्राएलांनी ‘यहोवाचा शब्द ऐकला’ असता तर त्याने त्यांना “गव्हाचे सत्व”—चांगले, अतिउत्तम गोष्टीने आशिर्वादीत केले असते. (स्तोत्रसंहिता ८१:११; अनुवाद ३२:१३, १४) त्याप्रमाणे आम्ही ‘यहोवाचा शब्द ऐकू’ तर तो आम्हास विपुल आशीर्वादीत करील.—नीतिसूत्रे १०:२२.
देवासमीप जाणे
स्तोत्रसंहिता ८४–८९ वाचा. स्तोत्रकर्ता यहोवाच्या निवास स्थानाविषयीची उत्कंठा व्यक्त करतो. (स्तोत्रसंहिता ८४) त्यानंतर बंदीवानातून मुक्ती व देवाचा कोप काढून घेण्यास विनवितो. (स्तोत्रसंहिता ८५) दाविद मार्गदर्शन व संरक्षणासाठी यहोवा त्याचे उत्तर देईल अशा आत्मविश्वासाने प्रार्थना करतो. (स्तोत्रसंहिता ८६) जे ‘सीयोनात जन्मले’ त्यांच्याविषयीच्या स्तुतीनंतर पिडीताबद्दल कळकळीची विनंती आहे. (स्तोत्रसंहिता ८७, ८८) त्यानंतर यहोवाने दाविदाच्या करारावर दाखविलेल्या दयाळूपणावर जोर देते.—स्तोत्रसंहिता ८९.
◆ ८४:३—पक्षी का म्हटले आहे?
स्तोत्रकर्ता, कोरह लेवीचा वंशज व यहोवाच्या “भव्य मंडपात” असण्यास उत्सूक होता. (वचन १, २) परंतु तेथे हजारो लेवी होते. केवळ सहा महिन्यात मंडपात सप्ताहाच्या आधारावर सेवा करण्यास लेव्यांचे भाग होते. याच्या भिन्नतेत चिमुकल्या पक्ष्यांना सुद्धा राहाण्यास त्या मंदीरात त्यांनी घरटे केले त्यास अधिक कायमचे घर होते. त्याचप्रमाणे स्तोत्रकर्ता यहोवाच्या मंदिरात कायमचे वास्तव्य करून यहोवाची स्तुती करण्यात केवढा आनंदी असता बरे!
◆ ८९:४९—ती “दयाकृत्ये” काय होती?
“दयाकृत्ये” हा शब्दप्रयोग राज्य कराराच्या त्याच्या सर्व स्वरूपास संदर्भित करतो. संकटसमयी त्या राज्यकरारावर संशय व्यक्त करण्यास नव्हे तर त्या आधारावर देवास अर्जविण्याच्या मार्गी या अभिवचनाच्या गोष्टी यहोवाच्या सामोऱ्या आणणे इस्राएलास साजेसे होते.
आम्हासाठी धडा: स्तोत्रसंहिता ८५ देवाच्या नविन व्यवस्थीकरणासाठी कोणत्या गोष्टीमुळे उत्कंठीत असावे यावर जोर देते. भौतिक आशीर्वादाचा केवळ संक्षिप्त उल्लेख केलेला आहे. (वचन १२) मुख्य जोर आध्यात्मिक आशिर्वादावर दिली आहे: दयाळूपणा, सत्यता, नीतीमत्व व शांती. (वचन १०–१३) यहोवा भौतिक गोष्टीसाठी अर्जवित नाही तर नविन व्यवस्थीकरणातील आत्मिक आशीर्वाद दाखवितो जे आमच्या प्रबळ इच्छेचा स्रोत असण्यास हवे.
‘यहोवा राजा बनला आहे!’
स्तोत्रसंहिता ९०–१०० वाचा. मोशे देवाच्या सनातनपणाची मानवाच्या क्षणभंगुर जिवनाची भिन्नता दाखवितो, त्यानंतर आमच्या संरक्षणाचा उगम यहोवा आहे यावर जोर देतो. (स्तोत्रसंहिता ९०, ९१) यहोवाच्या सर्वोत्तम गुणांची स्तुती केली आहे व त्यानंतरची स्तोत्र देवाचे सामर्थ, दयाळूपण, नितिमत्व तसेच राज्य याविषयावर जोर देतात.—स्तोत्रसंहिता ९२–१००.
◆ ९०:१०—मोशे ८० वर्षापेक्षा जास्त जगला नव्हता का?
मोशे १२० वर्षे जगला होता. तो त्या दिवसातील सर्व साधारण लोकांचे प्रतिक नव्हता. जी अविश्वासू इस्राएल प्रजा मिसरातून बाहेर आली. ज्यात “वीस वर्षाहून मोठे” त्यांची नोंद झाली त्यांना ४० वर्षात मरणे होते हेच मोशाने संदर्भित केले. (गणना १४:२९–३४) मोशेच्या मृत्युसमयीचे वर्णन म्हणते “त्याची दृष्टी मंद व त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती.” ही गोष्ट त्यास देवाची जतन शक्ती लाभली होती हे प्रदर्शित करते.—अनुवाद ३४:७.
◆ ९५:३—यहोवा “इतर सर्व देवावर राजा” कसा आहे?
विश्वाचा सार्वभौम यानाते यहोवा सर्व दैवतावर सर्वोच्च राजा आहे व यात तो त्यांच्याहून बराच वरचढ आहे. येथे यहोवा देव कोणताही दिव्यदूत अगर कांही जण ज्याची उपासना करतात ज्यास अस्तीत्व नाही अशी खोटी दैवते याच्यासोबत तुल्य नाही.
आम्हासाठी धडा: स्तोत्रसंहिता ९१ आम्ही यहोवाचा धन्यवाद करण्याचे आणखीन एक कारण—“सर्वसमर्थाचे गुप्तस्थल” देते. (वचन १) जे या स्तोत्रात वर्णिलेल्या गरजांची पुर्णता करतात त्यांच्यासाठी आध्यात्मिक इजेपासून संरक्षण करण्याचे आत्मिक स्थान आहे. ते “गुप्त” म्हणजे या जगाचे लोक ज्यांना आत्मिक दृष्टीची कमतरता आहे यांना अज्ञात आहे. वस्तुस्थिती ही आहे की हे गुप्तस्थल “सर्व समर्थाचे” आहे जे हे प्रदर्शित करते की आम्ही सार्वभौमत्वाच्या वादात यहोवाच्या बाजूस राहू तर आम्हास तेथे संरक्षण मिळेल.
“लोकहो तुम्ही यहोवाचे स्तवन करा!”
स्तोत्रसंहिता १०१–१०६ वाचा. दाविद येथे त्याची राज्य कारभाराच्या व्यवस्थापनाची रीत वर्णितो. (स्तोत्रसंहिता १०१) पिडीत जन यहोवास “सीयोन उभारण्याची” प्रार्थना करतात. (स्तोत्रसंहिता १०२) “यहोवाचे स्तवन” करण्याची त्यानंतरच्या स्तोत्रातील हाक देवाची दया, वैभवता व उत्पत्ती कार्याची स्मृती करून देते. येथे सुद्धा “लोकहो यहोवाचे स्तवन करा” हा वाक्य प्रयोग स्तोत्रात २० वेळेस प्रथमतः आढळतो. (स्तोत्रसंहिता १०३, १०४) अखेरीस दोन ऐतीहासिक स्तोत्रे त्याच्या लोकाच्या वतीने यहोवाने केलेल्या कृत्यास्तव धन्यवाद देतात.—स्तोत्रसंहिता १०५, १०६.
◆ १०२:२५—कोणी “पृथ्वीचा पाया घातला”?
स्तोत्रकर्ता देवाबाबत बोलतो तर प्रेषित पौल हे शब्द येशू ख्रिस्तास लागू करतो. (इब्रीकर १:१०, ११) जसे की हे शब्द येशू ख्रिस्तास लागू होतात कारण तो विश्व निर्मितित देवाचा प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. (कलस्सैकर १:१५, १६) यास्तव येशूस सुद्धा “पृथ्वीचा पाया घालणारा” म्हटले जाऊ शकते.
◆ १०३:१४—येथे “प्रकृती” कशास सूचित करते?
येथे उल्लेखलेला शब्द “प्रकृती” हा उत्पत्ती २:७ मधील “घडीला” या क्रियापदासोबत, व “कुंभार” जो मातीची भांडी बनवितो त्या नामा संबंधी असा उपयोगात आणला आहे. (यशया २९:१६; यिर्मया १८:२–६) यास्तव स्तोत्रकर्ता आम्हास आठवण देतो यहोवा थोर कुंभार आहे जो आम्ही नाजूक आहोत असे जाणत असल्याने कोमलपणे हाताळतो.—२ करिंथकर ४:७ सोबत तुलना करा.
◆ १०४:४—यहोवा “त्याचे आत्मिक दूत” कसे बनवितो?
दिव्यदूत हे आत्मिक प्राणी असल्यामुळे हे त्यांच्या आत्मिक शरिरास लागू होऊ शकत नाही. “आत्मिक” ह्या शब्दाचा अर्थ “वारा” किंवा “कार्यकारी शक्ती” असा सुद्धा होतो. अशाप्रकारे देव त्याच्या दूतांचा त्याची इच्छा पूर्ण करण्यास प्रबलतेने उपयोग करू शकतो. त्याना नाश बजावणारे कामकरी—“भस्म करणारा अग्नी” म्हणून उपयोगात अणले जाऊ शकते. अशाप्रकारच्या शक्तीशाली दिव्यदूताचा त्यांच्या प्रचारकार्यास पाठींबा आहे हे जाणणे ख्रिश्चनांना खात्रीदाय वाटते.—प्रकटीकरण १४:६, ७ तुलना करा.
आम्हासाठी धडा: स्तोत्रसंहिता १०६ आम्हास बंडखोर कोरह, दाथान, अबीराम ज्यांनी देवाच्या राष्ट्राचा व्यवस्थापक म्हणून असणारे मोशेचे स्थान बळकावण्याच्या प्रयत्न केला त्याविषयीची आवड बाळगण्यास मदत करते. (स्तोत्रसंहिता १०६:१६; गणना १६:२–११) शेवटास बंडखोरास “अग्नीने पछाडले” तेव्हा त्या बंडास चिरडले गेले. (स्तोत्रसंहिता १०६:१८) खात्रीने गर्व व होवा याचा धोका येथे प्रकट केला आहे. सध्याच्या यहोवाच्या नियुक्त सेवकाविरुद्ध बोलणे हे सुद्धा त्याप्रमाणेच त्याची नाराजी आणू शकते.—इब्रीकर १३:१७; यहुदा ४, ८, ११.
खरोखर, यहोवाने त्याचे कृतज्ञ असण्यास आम्हास बरेच कांही देऊ केले आहे. आम्हावर वर्षाव केलेल्या अशीर्वादाचा आम्ही विचार करू तर स्तोत्रकर्त्याने “हे माझ्या जीवा, यहोवाचा धन्यवाद कर” त्यास अर्जविले तेच करणार नाही का?—स्तोत्रसंहिता १०३:१.