खरे मौल्यवान काय आहे?
“त्यांच्यातील पुष्कळजण निरर्थक आयुष्य कंठतात, नोकरी टिकवू शकत नाहीत, चिरस्थाई नातेसंबध नसून व इकडे तिकडे वायफळ भ्रमण करतात—कोणी त्यांची काळजी करीत नाही. कारण: ते अत्यंत श्रीमंत आहेत.”—द न्यूयॉर्क टाईम्स, मे १५, १९८४.
पैसा हा अन्न, वस्त्र, निवारा, वाहतुक, औषधोपचार व जीवनावश्यक इतर गोष्टी प्राप्त करण्यासाठी जरूरीचा आहे हे तुम्हास चांगले ठाऊक आहे. वास्तविकपणे तुम्हास समजून चुकले असेल की आधुनिक समाजात पैश्याविना राहणे केवढे कठीण आहे म्हणूनच याबाबत पवित्रशास्त्र म्हणते, “पैशाने सर्व कांही साध्य होते.”—उपदेशक १०:१९.
तथापि, वर उल्लेखीत वृतपत्र लेख श्रीमंतांच्या भावनात्मक समस्येविषयी सांगतो. स्पष्टपणे, तुमचे जीवन पैसा व मालमत्ता मिळविणे याने गुंफलेले ठेवणे यात धोका असेल. तथापि पुष्कळ लोक तेच करतात. काही वेळेस लोभी आकांक्षा प्राणघातक ठरतात. आम्ही हे ऐकतो की लोभीष्ट माणसे त्यांच्या तीशीत किंवा चाळीशीतच हृदय झटक्याने मरतात. त्यांच्यातील काही शरिरप्रकृती, त्यांचे जीवनही, पैसा समाविष्ठ असणाऱ्या त्यांच्या आकांक्षा पुर्तिसाठी पणास लावतात. त्यांनी येशू ख्रिस्ताचे हे शब्द: “मनुष्याने सर्व जग मिळविले व आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार?” अंतःकरणी लावले असते तर बरे झाले असते. याजसोबत सहमत होण्यास आम्हास फारच धार्मिक असण्याची गरज नाही.—मत्तय १६:२६.
खरे मौल्यवान काय आहे?
तुम्हास निश्चीतपणे ठाऊक आहे की आम्ही प्राप्त करण्यास मोहीत करणाऱ्यास गोष्टींना अंतच नाही. व्हीडीओ टेप रेकॉर्डर, खाजगी घर, खर्चिक खेळाच्या वस्तु—कांही देशात या गोष्टी प्राप्त करणे मोठेपणाचे वाटते. इतरत्र ध्येय कमी किंमतीची असतील. एका देशातील एका यौवन स्त्रीने चांगल्या कपड्यासाठी पैसे प्राप्त करण्यास स्वतःस वेश्या व्यवसायास देऊ केले.
आम्ही हे जाणतो की जीवनात पूर्णपणे भौतिकवादी बनण्यासोबत धोके आहेत, मग आम्ही स्वतःस कसे सुरक्षित राखू शकतो? आम्ही समाजाकडे पाठ फिरवावी, काही करतात तसे एकान्तवासी किंवा बैरागी बनावे का? तसेच काय खरे मोलवान आहे हे विचार करताना आम्ही विचारले पाहिजे की कोणती गोष्ट मला खरा आनंद व दीर्घकाळचे समाधान देईल?
याचे मदतीसाठी म्हणून एका मनुष्याचे ज्यास शतकानुशतके आदराने व एक नमुना म्हणून मानले गेले त्याचे उदाहरण पाहू या. तो यहुदी धर्मगुरु परुशी व पहिल्या शतकातील “धनलोभी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यहुदी पंथाचा भाग होता. (लूक १६:१४) त्याचे नांव पौल होते, त्याच्याजवळ संपत्ती प्राप्त करण्याचे व समाजात बहुमान प्राप्त करण्यासारखे ज्ञान होते.
तथापि त्याने धक्कादायक अनुभवातून जीवनात अक्षरशः बहुमोल असे कांहीतरी वेगळेच असल्याचा भेद जाणला. तुम्ही सध्या कदाचित त्याच मनोवृत्तीत असाल किंवा नसाल तरी पौलाने जो निष्कर्ष काढला त्यावर विचार करणे मोलाचे आहे.
येशूचा शिष्य यानाते देवासोबतचे संमतीकारक स्थान ही जीवनातील प्राथमिक मोलाची गोष्ट होती हे त्याने ठरविले. हे इतके मोलवान होते की त्यासाठी पौल येशूचा एक प्रेषित यानाते समस्या व छळ सहन करू शकला. तो पुर्वीचा किर्तीमान मनुष्य मोशे ज्याने “ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे हे मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी गोष्ट समजली” होती त्याजसारखा होता.—इब्रीकर ११:२६; २ करिंथकर ११:२३–२७.
ख्रिश्चन बनण्यामुळे यहुदी समाजातील बहुमानाच्या हानी बद्दल पौलाला कधीही वाईट वाटले नाही हे तुम्हास माहीत असले पाहिजे. समर्पित ख्रिश्चन म्हणून २५ वर्षे आनंद लुटल्यानंतर तो लिहितो: “मला लाभाच्या गोष्टी होत्या त्या ख्रिस्तामुळे मी हानीच्या समजलो आहे, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व कांही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा व मी त्याच्या ठायी आढळावे.” (फिलिप्पैकर ३:७–९) पौलाला काहीतरी खरे मौल्यवान मिळाल्याची खात्री पटली होती यासोबत तुम्ही सहमत झाले पहिजे.
पौलाच्या निवडीचा अर्थ असा नव्हता की त्याजजवळ कांहीच भौतिक गोष्टी राहिल्या नव्हत्या. त्याच्या या शब्दावर नजर टाका: “सर्व गोष्टीत व सर्व परिस्थीतीत तृप्त व क्षुधित कसे रहावे, संपन्न व विपन्न कसे असावे याचे रहस्य मी शिकलो.”—फिलिप्पैकर ४:१२.
ख्रिस्तीयत्वाबाबत तुमची परिस्थीती कांहीही असो, तुम्ही पौलाला मिळालेली फलप्राप्ती केवढी उत्तम होती ती पाहू शकता. जे मोलवान त्याबाबत त्याच्या निवडीने त्यास अशी तृप्ती दिली जी जगाच्या श्रीमंत पुरुष व स्त्रियांना गवसली नाही. जीन पौल गेटी, करोडपती तेल व्यापारी यांनी कबुल केले की: “सौख्यानंदासोबत संपत्तीचा कांहीही संबध नाही. कदाचीत दुखाःसोबत असेल.”
तथापि, ख्रिश्चन असल्याचा दावा करणारी व्यक्ती अधिक मौल्यवान ते ओळखण्यात तोकडी असेल. हेच पहिल्या शतकात खरे होते, पौल त्याच्या एका सोबत्याविषयी म्हणाला: “देमास याने सद्य व्यवस्थीकरणाच्या गोष्टीवरील प्रेमामुळे मला सोडले.” (२ तिमथ्यी ४:१०) तो बंदीवान पौलाला मदत करू शकला असता पण तेव्हाच देमासने या सद्य व्यवस्थीकरणाने त्याला जे दिले त्यामुळे त्यागले.
भौतिकवादी दृष्टीकोन ख्रिश्चनास केवढ्या गोत्यात घालू शकतो त्यावर निर्देश करताना पौल म्हणतो: “जे धनवान होऊ पहातात ते परिक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत, . . . पुष्कळशा खेदांनी त्यांनी स्वतःस भोसकून घेतले आहे.”—१ तिमथ्यी ६:९, १०.
मग तुम्ही विचाराल, पैशाने अगर संपत्तीने माझ्या जीवनात कोणती भूमिका बजवावी? पुढे, जे खरे मौल्यवान त्याची तुम्ही कशी प्राप्ती करू शकता त्याचे आपण परिक्षण करू या.