तुम्ही “इश्वरी शांती” या अधिवेशनास का उपस्थित राहिले पाहिजे
दहशतवाद, क्रांत्या आणि युद्धे या गोष्टी आज दैनंदिनीच्या बनल्या असल्यामुळे “इश्वरी शांती” या यहोवाच्या साक्षीदारांच्या या वर्षीच्या प्रांतिय अधिवेशनास उपस्थित राहणे किती आनंदाचे वाटेल! या अधिवेशनात शांती जोपासण्याच्या नुसत्या व्यावहारिक सूचनाच ऐकायला मिळणार नाहीत तर प्रत्यक्षात या सूचनांचा अवलंब करणाऱ्या लोकांचा संपर्कसुद्धा अनुभवण्यास मिळेल.
गुरुवारी दुपारी दीड वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासूनच अधिवेशनात उपस्थित राहा. शांतीची घोषणा दीर्घकाळ करीत असलेल्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला बरेच काही ऐकायला मिळेल. याशिवाय सामाजिक मनोरंजनाच्या प्रकारात कोणते पाश दडलेले आहेत व त्यांना कसे टाळता येईल हे सुद्धा तुम्हाला शिकण्यास मिळेल. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला सुंदर पण इतरांची सेवा करण्यास उपयुक्त असे काही तर दिले जाईल.
शुक्रवार सकाळच्या कार्यक्रमात “यहोवाकरवी शिक्षण प्राप्त झालेल्यांना इश्वरी शांति” हे प्रमुख भाषण ऐकायला मिळेल. शिवाय “दुष्काळी परिस्थितीत जीवनाचे रक्षण करणे” या नाटकामुळे तुम्हाला खरेच भारावले जाईल. ते चुकवू नका.
शनिवारच्या कार्यक्रमात प्रात्यक्षिके, मुलाखती व उभारणीकारक भाषणांद्वारे कौटुंबिक वर्तुळात शांती राखण्याविषयीचे व्यावहारिक मार्गदर्शन मिळेल. या दिवसाचा कार्यक्रम “‘शांतीचा राजपुत्र’ याच्या वर्चस्वाखाली जागतिक निर्भयता” या महत्वपूर्ण भाषणाकरवी समाप्त होईल.
रविवारी सकाळी, आधुनिक काळावर आधारलेले एक उघड वक्तव्याचे हादरविणारे नाटक प्रस्तुत होईल. ते बचावाकरता देवाच्या नीतीमत्तेचा शोध घेत राहण्यासाठी किती गरज आहे याचे जोरदारपणे समर्थन करील. दुपारी होणारे जाहीर व्याख्यान, “देव बोलतो तेव्हा—सरतेशेवटी शांती!” अधिवेशनाचा कळस ठरेल.
भारतात ही अधिवेशने २० जागी आयोजित करण्यात आली आहेत. यापैकीचे एक तुम्ही राहता त्या वसाहतीला जवळ असेल. यासाठी यहोवाच्या साक्षीदारांमार्फत स्थानिकरित्या चौकशी करा आणि तुम्हास जवळ असणाऱ्या अधिवेशनाचे ठिकाण व वेळ माहीत करून घ्या.