समानतेचा पाठलाग
हीन अवस्थेत असणे कोणासही आवडत नाही. “मी इतरांसारखाच चांगला आहे” अशी सर्वसाधारण म्हण आहे. वर्चस्वाचे वातावरण आम्हास अप्रिय वाटत नाही काय? अर्थातच, इतरांशी समानतेत असण्याची भावना आशादायक वाटते. तथापि, पुष्कळांच्या अनुभवानुसार, समानता प्राप्त करण्याऐवजी तिजविषयी नुसता विचार व वाच्यता करीत राहणेच सोपे वाटते. या उदाहरणाचा विचार करा.
उत्तर अमेरिकेतील इंग्रज वसाहतीने इ.स. १७७६ मध्ये स्व–सरकारची निश्चीतार्थाने घोषणा केली. त्यांनी केलेल्या सुप्रसिद्ध जाहीर घोषणेतील “सत्यतेचा पुरावा” म्हणून त्यांनी म्हटले की, “सर्व मानव समानतेत निर्मिला गेला आहे.” पुढे त्यांनी अशीही घोषणा केली की सर्व रहिवाशांना “जीवन, स्वातंत्र्य, व सौख्याचा पाठलाग करण्याचा हक्क” होता.
त्या समयी १३ वसाहती ब्रिटनापासून मुक्त झाल्या, त्यांची लोकसंख्या तीस लाख होती. त्यापैकी पाच लाखाहून अधिक गुलाम होते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी सुमारे शंभर वर्षाचा कलावधी लागला. जाहीर घोषणेचा प्रमुख पुरस्कर्ता थॉमस जेफरसन मात्र त्याच्या सर्व हयातीत गुलामाचा धनी म्हणून राहिला. त्या घोषणेचा हेतु उदात्त होता, परंतु अशा प्रकारच्या मुलभूत समानतेचा कांही अंश मूर्त स्वरूपात येण्यास वेळेची गरज होती.
पृथ्वीसभोवती अद्यापही पुष्कळजण स्वातंत्र्यापासून वंचित आहेत, किंवा ते भेदभावाचा जाच सहन करीत आहेत. हे सर्व पाहता, निरनिराळ्या व्यक्ती सर्व प्रकारचे अन्याय व असमिषता निपटून काढण्यासाठी त्यांचे जिवन समर्पित करीत आहेत. अलीकडेच युनायटेड नेशन्सने स्वातंत्र्याच्या विषयासंबधाने प्रसिद्ध केलेल्या प्रकाशनात अनेक वेळा समानतेचा व समानतेच्या गरजेचा उल्लेख केला आहे. तरीसुद्धा ते ध्येय एका मृगजळासमान आहे. का?
समानतेचे अनेक पैलू आहेत ही ती समस्या आहे व त्याचे वर्णन करणे हे कांही सोपे नाही. पुष्कळजण त्यांच्या परिस्थीती वर विसंबून समानतेकडे निरनिराळ्या दृष्टीकोनातून पाहतात. तर मग, कोणत्या मर्यादेपर्यंत, आम्ही म्हणू शकतो की सर्व मानव समान आहेत? आमच्या सहमानवासोबतच्या समानतेविषयी, आता व भावी काळात, वाजवीपणे आम्ही कशाची अपेक्षा करावी?
समानता—आज कितपत सत्य आहे?
एक राजकुमार व एक दरिद्री एकाच दिवशी एकाच शहरात जन्मले असतील तरी सांपत्तिक वैभव व सुख सुविधांची कृपा एकावर येते व दुसऱ्यावर दारिद्र कोसळते. आज सर्व लोक समान जन्मलेले आहेत असे का म्हणता येत नाही त्याचा हा एक प्रकार आहे.
ज्या समाजात आपण राहतो त्यावर व त्याने कैकवर्षापासून प्राप्त केलेल्या समानतेच्या पातळीवर बरेचसे अवलंबून असते. एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका यासंबधीच्या सारांशाचे वर्णन उत्कृष्ठपणे करताना म्हणते:
“संपत्ती, अधिकार व इतर महत्वपूर्ण गोष्टींची सहभागिता करण्याच्या जरूरीची तरतूद सर्व समाजात केली जावी. वैयक्तीक व संघटीतरित्या या तरतुदीमध्ये समानतेचे व विषमतेच्या पातळीचे प्रदर्शन घडते”.
कोणत्याही समाजात प्रत्येक व्यक्तीजवळ देण्यासाठी असे कांहीतरी त्याच्या जवळ अमुल्य असते. पुष्कळांनी वैयक्तीक कुशलता व सर्वांच्या क्षमतेच्या द्वारे संपत्ती व उत्पादनाच्या साधनांचा न्यायाने वितरण करण्याचा प्रयत्ना केला. एक कम्युनिस्ट प्रचिलीत म्हण आहे: “प्रत्येकापासून त्याच्या क्षमतेनुसार ते त्याच्या गरजेनुसार.” तसेच: “प्रत्येकापासून त्याच्या क्षमतेनुसार ते त्याच्या श्रमानुसार” असे तत्वज्ञान अपीलकारक भासत असले तरी, विषमता सर्व मानवी सरकारांच्या युगात प्रकर्षाने जाणवतेच.
वस्तुस्थिती अशी आहे की, समानतेच्या धोरणांचा पाठलाग करण्याऐवजी कांही राजकीय व्यवस्थांनी जातीय विषमतेचा लाभ उठविण्याचा प्रयत्न केला आहे. “मास्टर रेस” या नाझीने जोर दिलेल्या गोष्टी स्मरण करा. तथापि कोणत्याही मास्टर रेसचे दिर्घकाळीन अस्तित्व नष्ट होत आले आहे. शारीरिक गुणवत्तेतील स्पष्ट निराळेपणा असतानाही “खरेपणाने अस्तित्वात असणाऱ्या जातीय वर्तणूकी व कौशल्याचा तफावती स्थापित करणे कठीण होऊन बसले आहे” असे एन्साएक्लोपेडीया ब्रिटानिका पुन्हा कथीत करते. अशाप्रकारचे जातीय साम्य हे मुलभूत आधार आहे.
शिक्षण व क्षमता
शिक्षण मोठ्या प्रमाणात त्यातील सर्व सुविधा तत्काल उपलब्ध केल्या गेल्या तर समानता प्रस्थापित करू शकेल, परंतु ते नेहमीच कांही तसे सफल होत नाही. अनेक देशात कठीण परिश्रमाचा पैसा केवळ शिक्षणाच्या प्राथमिक गरजा शिकविण्यासाठीच खर्ची होतो.
उदाहरणार्थ, दक्षिण गोलार्धाच्या एका देशांत फक्त २० टक्के लोकच सुशिक्षीत आहेत. कुटुंबातील वडील दोन मुले सर्वसाधारण चांगले शिकलेले असतात परंतु बाकीचे इतर मात्र कौटुंबिक खर्चाचे अंदाजपत्रक उणे पडल्यामुळे मुळीच शिकू शकत नाहीत ही कांही विशेष बाब नाही. इतर प्रगतशील देशसुद्धा याच समस्येस तोंड देत आहेत.
या प्रकारची परिस्थिती विषमतेची जोपासना करते कारण आमच्या आधुनिक समाजात शिक्षणास अनुलक्षूनच्या आर्थिक भाराआधारे प्रगतीचे मोजमाप केले जाते. शिवाय इतरांकडून प्रमाणपत्र घेण्याऐवजी युनिव्हर्सीटी मार्फतच ते घेण्याचा महत प्रयास केला जातो कारण ते एक प्रतिष्ठेचे चिन्ह मानले जाते. यास्तव आजच्या विषमतेच्या समस्येचा अंतिम निर्णय शिक्षण ठरूच शकत नाही.
मूलभूत अधिकार
मनुष्यात प्रत्येक बाबतीत साम्यता दर्शविली जाईल अशी कोणतीही शक्यता नसल्याचे अनुवंशिक वस्तुस्थिती दाखवून देते, परंतु कांही निश्चीतार्थाने मुलभूत साम्यता अस्तित्वात असलीच पाहिजे असे आपणास वाटत नाही का? याबाबतीत प्रगती केलीच तर मानवजात सुस्थितीत नसेल का?
जातीय समानता: एका जातीने किंवा वर्गाने दुसऱ्यावर लादलेल्या कलंकावर आपण कसे मात करू शकू? संताप खोलवर रूजल्यामुळे तो अनेक समस्या निर्माण करतो. त्यांच्या लायकतेनुसार त्यांना उच्चपद देऊन व्यक्तीगत समानतेच्या वागणुकीबद्दल कोणती खात्री पुरवू शकतो?
अन्न: उपासमारीने ग्रासलेल्या लेकरांचे चित्र पाहून व लाखो सकस आहाराअभावी अगर संबधीत रोगाने मृत्युमुखी पडलेले वाचून तुम्हास काय वाटते? हे अगदी सर्व ज्ञात आहे की जगाच्या लोकसंख्येस पुरले एवढे अन्न उपलब्ध आहे. असे असताना सुध्दा या त्रासापासून मुक्तता पुरविण्यासाठी समानतेत वितरण का केले जात नाही?
काम: बेकारीमुळे अंतःकरणास दुखीत करणाऱ्या यातना व औदासिन्य—इतकेच काय आत्महत्या सुद्धा धडवून आणली जाते. सर्वांनाच लाभदायक नोकऱ्या मिळण्याची शक्यता नाही का? सर्वानाच समान कार्य करण्यासाठी संधी मिळू शकणार नाही का?
शिक्षण: सर्वसाधारणपणे व्यक्तीशः प्रत्येकास मुलभूत शिक्षणाची गरज पुरी करण्याची सोय नसावी का, जेणेकरून निरक्षरतेचे निर्मूलन केले जाईल? वर्गा (श्रीमंत श्रीमंत होतात, गरीब गरीब होतात) वरील भेदभाव निर्माण करण्याऐवजी, शिक्षण सर्वांचीच परिस्थिती सुधारणार नाही का? विशेषतः शिक्षणामध्ये फक्त तांत्रिक विषयावर जोर देण्याऐवजी, नैतिकता, व मानवी नातेसंबधाच्या उचित तत्वांचा त्यात समावेश केला तर ही गोष्ट यशस्वी होईल.
निश्चीतपणे, आपण सहमत व्हाल की समानतेचा पाठलाग करण्यास बऱ्याच दीर्घ मुदतीची वाटचाल करावी लागणार.