“देवाच्या वचनावर विश्वास” या प्रांतीय अधिवेशनास तुमचे स्वागत!
जगभरातील हजारो ठिकाणी, लाखोंच्या संख्येने कित्येक लोक उपस्थित असतील. केवळ भारतातच, १६ अधिवेशने आयोजित करण्यात आली आहेत. ही अधिवेशने ऑक्टोबर १०-१२ला पहिले, तर जानेवारी २-४ला शेवटले, अशी असतील. संभवतः शुक्रवार ते रविवारपर्यंतच्या या तीन दिवसीय अधिवेशनाचे ठिकाण बहुधा तुमच्या घराजवळ असलेल्या एका शहरात असेल.
बायबलच्या विपुल व्यावहारिक मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ मिळेल. बहुतांश ठिकाणी, कार्यक्रम दररोज सकाळी, संगीताद्वारे ९:३० वाजता सुरू होईल. देवाच्या वचनावरील विश्वासाचा ज्यांच्या जीवनावर खोल प्रभाव पडला आहे त्यांच्या मुलाखती शुक्रवारी सकाळी २५ मिनिटांच्या कार्यक्रमात घेण्यात येतील. सकाळच्या कार्यक्रमाचा समारोप, “विश्वासाने चालणे, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नाही,” या मुख्य भाषणाने होईल.
ख्रिस्ती मंडळीतील युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका, याविषयी शुक्रवारी दुपारच्या पहिल्या भाषणात विचारविनिमय केला जाईल. नंतर लगेचच संभाषण, शिष्टाचार आणि व्यक्तिगत पेहरावाच्या ख्रिस्ती वर्तनाविषयीच्या बायबलमधील दर्जांची चर्चा, तीन-भागांच्या परिसंवादात होणार आहे. “अविश्वासापासून सावध रहा” आणि “देवाचे वचन सजीव आहे” ही नंतरची भाषणे, इब्री लोकांस अध्याय ३ व ४ मध्ये दिलेल्या उत्तम सल्ल्यांवर केंद्रित आहेत. “सर्व लोकांसाठी एक पुस्तक,” या भाषणाने शुक्रवारच्या कार्यक्रमाचा समारोप होईल.
“विश्वास क्रियांवाचून निर्जीव आहे,” हे शनिवार सकाळचे पहिले भाषण असेल. त्या दिवशी सकाळी, “सत्यात मुळावलेले व त्यामध्ये दृढ असे व्हा” या मुख्य भाषणात आध्यात्मिक प्रगती कशी साधली जाऊ शकते याचे वर्णन करण्यात येईल. “देवाच्या वचनावरील विश्वास बाप्तिस्म्याकडे नेतो” या ठरलेल्या भाषणाने अधिवेशनाचा सकाळचा कार्यक्रम समाप्त होईल; मग नवीन शिष्यांच्या बाप्तिस्म्याची तरतूद केली जाईल.
शनिवार दुपारी सुरवातीचे भाषण, “विश्वासाचे समर्थन करा,” हे बायबलमधील यहूदा या पुस्तकात आढळणाऱ्या सल्ल्याची चर्चा करेल. “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ,” हा एका तासाचा परिसंवाद ख्रिस्ती सभांच्या फायद्यांविषयी माहिती देईल. “तुमच्या विश्वासाचे परीक्षण आता केले जाते” या भाषणाने त्या दिवसाचा कार्यक्रम समाप्त होतो.
रविवार सकाळच्या कार्यक्रमात परिसंवाद सादर केला जाईल ज्यात बायबलचे पुस्तक योएल व आपल्या दिवसामध्ये त्याचे अवलंबन यांची चर्चा केली जाईल. त्यानंतर “तुमचे डोळे निर्दोष ठेवा,” या विषयावर आधारित एक बायबल नाटक दाखवले जाईल. “विश्वास आणि तुमचे भवितव्य,” या विषयावर दुपारी सादर केले जाणारे जाहीर भाषण अधिवेशनाचे मुख्य वैशिष्ट्य असेल.
तेथे उपस्थित राहून तुम्हाला निश्चितच आध्यात्मिकरित्या लाभ मिळेल. प्रत्येक कार्यक्रमास तुमचे मनःपूर्वक स्वागत केले जाईल. तेथे उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच तयारी करा. तुमच्या घराजवळच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक सभागृहाशी संपर्क साधा किंवा या नियकतकालिकाच्या प्रकाशकांना लिहा. सावध राहा! याच्या पुढील अंकामध्ये, भारतात होणाऱ्या अधिवेशनांच्या ठिकाणाचे पत्ते देखील तुम्हाला आढळतील.