वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ८/१ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • मंडळीतील पर्यवेक्षक व सेवासेवक ईश्‍वरशासित पद्धतीने नियुक्‍त केले जातात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • आज नियमन मंडळ कशा प्रकारे कार्य करते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • “बराच मतभेद आणि वादावादी झाली”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ८/१ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

◼ वडीलांची नियुक्‍ति करण्यामध्ये पवित्र आत्मा आजच्या नियमन मंडळासोबत कसा कार्य करतो?

प्रेषित पौलाने इफिसमधील ख्रिस्ती वडीलांना असे म्हटले: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास देखरेखे करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी देवाची जी मंडळी त्याने आपल्या पुत्राच्या रक्‍ताने स्वतःकरिता मिळविली तिचे तुम्ही पालन करावे.”—प्रे. कृत्ये २०:२८.

अशा या नियुक्‍तिमध्ये पवित्र आत्मा कसा कार्यरत होता त्याचे विवेचन पौलाने सविस्तरपणे केले नाही. तरीपण पहिल्या शतकातील नियमन मंडळाने सुंतेविषयीचा प्रश्‍न विचारात घेतला त्यावेळी जे घडले त्यापासून आम्हाला अंतर्दृष्टि मिळू शकेल. आपल्या निर्णयाचा सारांश कळविताना त्यांनी लिहिले: “पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले.” (प्रे. कृत्ये १५:२८) तर मग त्या काळी जो निर्णय संमत झाला त्यामध्ये पवित्र आत्मा, देवाची अव्यक्‍तिक क्रियाशील शक्‍ती हिने आपला सहभाग कसा दिला?

प्रेषितांची कृत्ये याचा १५वा अध्याय दाखवितो की प्रथमतः पौल व बर्णबा यांनी तो प्रश्‍न सामोरा मांडला. त्यानंतर चर्चा झाली. प्रेषित पेत्राने बेसुंती कर्नेल्य व त्याच्या घराण्याचा कसा बाप्तिस्मा झाला ते विदीत केले. पेत्राने स्पष्ट केले की, ‘देवाने जसा आपणाला तसा त्यांनाहि पवित्र आत्मा देऊन साक्ष दिली.’ (प्रे. कृत्ये १५:७, ८; १०:९–४८) यानंतर पौल व बर्णबा यांनी “देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्‌र्भिते केली त्यांचे . . . वर्णन केले.” (प्रे. कृत्ये १५:१२) अशा प्रकारे पेत्र, कर्नेल्य, पौल व बर्णबा यांच्यावरील कार्यवहनामुळे पवित्र आत्म्याने सूचित करविले की विदेश्‍यांना सुंता करून घेण्याची गरज नाही.

तरीपण नियमन मंडळाकरवी हा जो निर्णय घेण्यात आला त्यामध्ये आत्म्याचे आणखीन कार्यवहन समाविष्ठ होते. त्यांच्या मसलतीमध्ये त्यांनी पवित्र आत्म्याच्या मदतीकरता याचना केली असावी हे आम्ही समजू शकतो. या मदतीद्वारेच शिष्य याकोबाला आमोस ९:११, १२ चे अवतरण घेण्यास व त्याचा अवलंब स्पष्ट करण्याची प्रेरणा मिळाली असावी. तो भविष्यवाद हा अर्थातच, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारेच लिहिण्यात आला होता. (प्रे. कृत्ये १५:१३–२०) याशिवाय, “यरूशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग” ज्यांचे मिळून हे नियमन मंडळ तयार झाले होते ते असे ख्रिस्ती होते ज्यांचा पवित्र आत्म्याने आभिषेक झाला होता व त्यांनी आत्म्याच्या फलप्राप्तीचे प्रदर्शन आपल्या स्वतःच्या जीवनात दर्शवून त्याच्या कार्यवहनाचा पुरावा दिला होता.—प्रे. कृत्ये १५:२; रोमकर ८:१४–१७; १ करिंथकर ७:४०; गलतीकर ५:२२, २३.

अशाप्रकारे या सुंतेच्या प्रश्‍नासंबंधाने स्वर्गाकडून मार्गदर्शक दृश्‍यरूपाने दिसला नाही, तरी नियमन मंडळाचे सदस्य, “पवित्र आत्म्याने” त्यांना तो निर्णय घेण्याप्रत निरविले असे अचूकरित्या म्हणू शकत होते.

आज मंडळीत ख्रिस्ती पुरुषांची वडील किंवा देखरेखे या पदासाठीची नियुक्‍ति अशाच पद्धतीने होते. वडीलांचा गट (ज्यात संस्थेच्या फिरत्या देखरेख्यांचा समावेश असतो) वेळोवेळी एकत्र बसून देखरेख्यांच्या नियुक्‍तिकरता कोणा बंधूची शिफारस करता येते त्या विषयीचा विचार करतो. या गटातील सर्वांची वडील म्हणून नियुक्‍ति झालेली असते व त्यांनी आपल्या जीवनात आपल्याला आत्मा आहे हे प्रदर्शित केलेले असते. त्यांच्या चर्चेचा आरंभ आत्म्याचे मार्गदर्शन मिळावे अशा प्रार्थनेने होतो. त्यानंतर या सभेत, ज्यांच्या शिफारशीचा विचार केला जात आहे तो प्रत्येक बंधू, पवित्र शास्त्रात वडीलांसाठी जी गुणवत्ता आखलेली आहे त्या पूर्ण करतो का याची छाननी होते. या गुणवत्ता पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाआधारेच लिहिल्या गेल्या आहेत. (१ तिमथ्यी ३:२–७; तीतास १:५–९) तो विशिष्ठ बंधू आपल्या जीवनमानात “पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण” असल्याचा पुरावा देतो का याचाहि विचार केला जातो. (प्रे. कृत्ये ६:३) तो याप्रकारातील आहे आणि आखून दिलेल्या गुणवत्ता पुरेश्‍या प्रमाणात पूर्ण करत आहे याबद्दल सर्वांची संमती असल्यास त्यांची ही शिफारस आत्म्याने नियुक्‍त झालेल्या नियम मंडळास वा त्याकरवीच्या निवडलेल्या प्रतिनिधींकडे पाठविली जाते. कालांतराने त्या बांधवाची नियुक्‍ति झाली आहे असे मंडळीस कळविण्यात येते.

नियुक्‍त करण्यात आलेला वडील अद्याप अपूर्ण असून त्याजठायी मर्यादा आहेत हे समजण्याजोगे आहे. पण प्रेषितसुद्धा, येशूने त्यांची निवड करण्याआधी तसेच ते नियमन मंडळात काम करू लागले तेव्हाही अपूर्णच होते. (लूक ९:४६, ५४; २२:५४–६२; गलतीकर २:११–१४) देवाचा आत्मा त्यांना लाभला व त्याच्या मार्गदर्शनाआधारे त्यांची नियुक्‍ति झाली तरी ते अपूर्णच होते. तद्वत, मंडळीतील बंधू भगिनींना याचा आत्माविश्‍वास राहू शकतो की, मंडळीची ‘राखण करण्यासाठी पवित्र आत्म्याने देखरेख्यांची नियुक्‍त केली आहे.’ (प्रे.कृत्ये २०:२८) अशाच पुरुषांसंबंधाने अशी सूचना करण्यात आलेली आहे: “जे तुमच्यामध्ये नेतृत्व करतात व ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणूकीचा परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा.”—इब्रीयांस १३:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा