येशूचे जीवन व उपाध्यपण
कफर्णहूम येथे आणखीन काही चमत्कार
येशूने आपल्या पहिल्या चार शिष्यांस म्हणजे—पेत्र, अंद्रिया, याकोब आणि योहान यांना पाचारण केल्यानंतर शब्बाथाच्या दिवशी ते सर्वजण कफर्णहूम येथील स्थानिक सभास्थानात जातात. येशू तेथे लोकांस शिकवण देण्यास प्रारंभ करतो. त्याच्या शिकवणीवरून लोक फार थक्क होतात कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवित होता हे त्यांना दिसते.
याच शब्बाथाच्या वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य असतो. काही वेळाने मोठ्याने ओरडून तो म्हणतो: “हे येशू नासरेथकरा, तूं आमच्या मध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूंच.”
त्या मनुष्यावर ताबा राखणारा अशुद्ध आत्मा वा दुरात्मा सैतानाच्या दुतांपैकी एक आहे. येशू त्याला धमकावून म्हणतो: “उगा राहा व ह्याच्यातून नीघ!”
मग तो दुरात्मा त्या मनुष्यास पिळून मोठ्याने ओरडतो व काही इजा न करता त्याच्यातून निघुन जातो. तेव्हा सर्व थक्क होतात. “हे आहे तरी काय?” असे ते एकमेकांस विचारू लागतात. “केवढी ही अधिकारयुक्त वाणी! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करितो व ती त्याचे ऐकतात.” ही गोष्ट लागलीच चहुकडल्या सर्व प्रातांत पसरते.
सभास्थानातून निघुन येशू व त्याचे शिष्य शिमोन किंवा पेत्र याच्या घरी जातात. तेथे पेत्राची सासू तापाने खुप आजारी असते. “कृपया तिला मदत करा” असे ते येशूला म्हणतात. तेव्हा येशू जवळ जाऊन तिच्या हाताला धरून उठवतो. तेव्हा ती लागलीच बरी होते व उठून त्यांची सेवा करू लागते!
त्यानंतर, संध्याकाळी म्हणजे सुर्यास्त झाल्यावर लोक सर्व दुखणाइतांस घेवून पेत्राच्या घरी गर्दी करतात. थोड्या वेळात संबंध शहर दाराशी लोटते! तेव्हा येशू सर्व प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या माणसांना बरे करतो. तो अनेक भुतग्रस्तांना देखिल बरे करतो. “तु देवाचा पुत्र आहेस.” असे ओरडुन ती भुते माणसांतून निघतात. परंतु तो त्यांस धमकावितो व बोलु देत नाही. कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक असते. मार्क १:२१–३४; लूक ४:३१–४१; मत्तय ८:१४–१७.
◆ येशूने त्याच्या चौघा शिष्यांस पाचारण केल्यानंतरच्या शब्बाथ दिवशी सभास्थानात काय घडते?
◆ सभास्थानातून निघुन येशू कोठे जातो आणि तेथे तो कोणता चमत्कार करतो?
◆ त्याच संध्याकाळी नंतर काय घडते?