तुम्ही नाताळ साजरा करावा का?
पौर्वात्य व पाश्चिमात्यातील नाताळ साजरा करण्याच्या पद्धतीतील साम्य व तफावती स्पष्ट करण्यास येथे सादर केलेली माहिती, जपानी लेखक व त्याचा इग्लंड मधील मित्र यांच्या पत्रांच्या मसुद्यात आहे. ही माहिती तुम्हास या प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत करील की: मी नाताळ साजरा करावा का?
प्रिय डेव्हीड,
ते येथे पुन्हा आहेत, व्यापारी, लोकांचे नेतृत्व जणू काय धार्मिक उपाध्यायाप्रमाणे करीत आहेत. सान्ता क्लॉज हे या उत्सवाचे मुख्य लक्ष्य आहे. ख्रिसमस ट्रीज उत्सवाचे प्रतिक आहेत. नाताळचे केक्स व खेळणी बक्षिस म्हणून सादर केली जात आहेत. व्यापारी लोक ख्रिसमस धर्माचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या धंद्याने गत तीन चार दशकात फारच यशस्वीता गाठली आहे. भरपूर जपानी या “धर्मात” गेले आहेत—कमीत कमी, वर्षातील दोन दिवसासाठी!
या गोष्टींनी माझी जिज्ञासा चेतविली आहे. मला आश्चर्य वाटते की पुष्कळ जपानी जे बहुतेक ख्रिस्तेत्तर असूनही “ख्रिस्ती” सण का पाळीत आहेत. केव्हापासून एवढ्या उत्साहाने जपानी लोकांनी नाताळ पाळण्यास सुरुवात केली होती? या सर्वामागे काय दडले आहे?
जपानी नाताळ, याच्या मूलभूततेकडे पाहताना मला ही चित्तवेधक गोष्ट मिळाली. सोसेकी नॅटसूम, (१८६८–१९१२) मेयजी युगातील सुप्रसिद्ध लेखकाने, १९००च्या समाप्तीस लंडन मधील नाताळचे दृश्य रेखाटणारे नाताळचे पोस्टकार्ड इंग्लंडहून शिकी मासाओका या सुप्रसिद्ध कवींना पाठविले होते. शिकींनी त्यावर जपान मधील नाताळ दिवसाचे लहान ख्रिस्ती धार्मिक मंदीरावरील हायकू संक्षिप्त काव्य रचले. स्पष्टपणे, नाताळ हा तोपर्यंत जपानमध्ये विलक्षण होता. यास्तव अक्षरशः जपानी लोकांनी त्यांचा पहिला नाताळ केव्हा पाळला होता?
तुला हे जाणण्यात रस वाटेल की कांही अधिकारी दावा करतात की नाताळ गिन्झा मधील मलींच्या शाळेत मेयजीच्या आठव्या वर्षीच्या सुरवातीस (१८७५) पाळला होता. तथापि “नाताळ पाळण्याच्या प्रथेचा जपान मध्ये १९४५ पर्यंत एवढा प्रादूर्भाव झाला नव्हता” असे द ख्रिश्चन सेन्चुरी ने अवलोकीले. तेव्हांच जपानी लोकांनी अमेरिकन सैनिकांचे परिवार व मिश्नरी यांना नाताळ पाळताना पाहिले होते. दुसऱ्या महायुद्धात पराजीत झाल्यानंतर धार्मिक पोकळीत सोडल्याने, सर्व साधारण जपानी लोकांना स्वतः हर्ष देणारे कांहीतरी हवे होते.
ख्रिसमस ने त्या गरजेची तृप्ती केली. तुला साधारण कल्पना आली असेलच की आपली वर्षाकाठची विक्री जोरात व्हावी या करता विक्रेत्यांनी नाताळच्या सजावटीचा वापर करण्यात वेळ वाया जाऊ दिला नाही. नाताळ सजावटींनी “ग्राहकांना ओढण्यात जणू जादूची कांडीच फिरविली” असे किम्पेई शिबा हे वृत्तपत्रात स्तंभलिखाण करणारे म्हणतात “कारण” ते पुढे म्हणतात, “दिखाव्याची शोभा मोठी आकर्षक होती व त्याने विलास निमार्ण केला.”
परंतु डेव्हीड तू इंग्लंड मध्ये राहतोस त्यामुळे तुला हे ठाऊक नसेल की जपानी लोक वर्ष समाप्तीची बक्षीसे नाताळ बक्षीसे येण्यापूर्वीपासून देत हाते. डिसेंबर हा किरकोळ व्यापाऱ्यांना अमुल्य देणगी ठरत आला. लोक त्यांच्या वर्षाअखेरीच्या बोनसने त्यांचे भरलेले पाकीट घेऊन धांगडधिंगा करण्यास जातात तथापि “हे [नाताळचे] वातावरण, लोकांना बेहोषपणात टाकते, इतर वेळेपेक्षा खर्चिक स्वभावात अधिक ओसाय–बी [वर्ष–समाप्तीच्या–भेटी] खरेदी करण्याकडे झुकविते, यास्तव नाताळची भपकेबाजीची प्रथा वापरणे चालू आहे,” असे महाशय शिबा स्पष्ट करतात.
आज डिपार्टमेन्ट स्टोअर्स व किरकोळ व्यापारी “नाताळाच्या धुंदीचा” फायदा उचलण्यासाठी बॅन्ड गाडीकडे वळले आहेत व ते व्यवहारी ठरलेले दिसते. खेळणी करणारे व बेकरीवाले या वातावरणाचा फायदा उचलण्यास अविश्रांतपणे झटत आहेत. डिसेंबर मध्ये किडी लॅन्ड जपान मधील सर्वात भव्य खेळणी—स्टोअर्स मधील व्यापार इतर कोणत्याही महिन्यापेक्षा चौपटीने अधिक आहे. अंदाज केला आहे की जपान मध्ये प्रत्येक वर्षभरात बनविल्या जाणाऱ्या केक मधील ५ ते १० टक्के केक “ख्रिसमस केक” या नावाने प्रसिद्ध आहेत.
मला हे आढळले आहे की कांही लोक जपान मधील नाताळच्या वातावरणावर व्यापारी वृत्तीने आपला जम बसविला आहे म्हणून क्रुद्ध बनले आहेत. उदाहरणार्थ, द डेली योमीइरी जपान मध्ये बराच काळ वास्तव्य करणाऱ्या अमेरिकनास असे उद्धृत करते की: “जपानी लोकांनी नाताळच्या सर्व युक्त्या स्विकारल्या आहेत तरी सणाचा आत्मा येथे दिसत नाही.” तो नाताळच्या धार्मिक स्वरूपाबाबत येथे बोलत होता.
या गोष्टीने मला नाताळाची धार्मिक बाजू पडताळण्यास चेतविले. चर्चला जाणारे दावा करतात की नाताळ (डिसेंबर २५) ख्रिस्ताचा जन्म दिवस आहे. डिसेंबर २५ला येशू जन्मला होता हे सिद्ध करता येत नाही हे एन्सायक्लोपिडीया ऑफ जापनीझ रिलीजन्स मध्ये मिळणे हे मला केवढे अचंबित करणारे होते बरे! तो एन्सायक्लोपिडीया म्हणतो: “येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस अचूकपणे ज्ञात नाही, तरी डिसेंबर २५ला नाताळ पाळणे हे तिसऱ्या शतकाच्या सुमारास सुरु झाले . . . ही तारीख अंदाजे हिवाळ्यात सुर्याचे दक्षिणायनात येते व हिनेच ख्रिस्ती युगापूर्वीच्या सूर्याच्या पुनर्जन्माच्या सणाची जागा घेतली.” सूर्याचा पुनर्जन्म? मी विचार केला होता की तो येशूचा जन्मदिवस असावा. बरेतर, प्रांजळ ख्रिस्ती व्यक्तीने हिवाळ्यातील सूर्याच्या दक्षिणायनाचा हा मुलभूत सण कसा पाळावा? हा येशूचा नव्हे तर सूर्याच्या पुनर्जन्माचा सण होता. तर मग, चर्चला जाणारे पाश्चिमात्य, जपानी लोकांना “ख्रिस्ती” सुट्टी पाळण्याविषयी अतात्वीक म्हणून कशी टीका करू शकतात जेव्हा की ते स्वतःच तत्वतः त्या प्रकारचा सण पाळतात?
यास्तव डेव्हीड, तू या प्रश्नांची उत्तरे माझ्यासाठी पाठवावीत असे मला मनापासून वाटते; कारण हे प्रश्न मला सध्यातरी खूप विचलीत करीत आहेत.
तुझा मित्र,
आयचिरो
प्रिय आयचिरो,
तुझ्या देशातील नाताळ सणाचे वर्णन करणाऱ्या पत्राबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आम्हा पाश्चिमात्यांना पौर्वात्य लोक पाश्चिमात्य सण कसा साजरा करतात हे फारच चित्तवेधक वाटते.
नाताळ हा ख्रिस्तेत्तर सण आहे असे म्हणण्यात तू बरोबर आहेस याचा मी निर्देश करतो. बहुदा कोणतेही संदर्भ पुस्तक तुला हेच सांगेल की नाताळ सणाचे मूळ धान्य देवता (सॅटर्नलीया), रोमी लोक त्यांचे शेतकी दैवत सॅटर्न याचा सण पाळीत त्या मूर्तिपूजक सणात आहे.
होय, तुम्ही जपानी लोकांनी नाताळ हा बुद्धीस्ट व शिन्तोस्ट पार्श्वभूमित खेचला त्याप्रमाणे ख्रिस्ती राष्ट्र समुहाच्या चर्चनी त्यांच्या ख्रिस्ती प्रथांमध्ये ख्रिस्तेत्तर सण आंगिकारला. खरे पहाता हे अधिक दोषपात्र ठरेल कारण जपानी लोक प्रत्यक्षात परकीय सण म्हणून पाळतात पण चर्चला जाणारे धान्य दैवताचा ख्रिस्तेत्तर सण “ख्रिस्ती” नाताळ म्हणून पाळत असतात.
अक्षरशः येथे इग्लंड मध्ये एक असा समय होता की जेव्हा नाताळचे धार्मिक व प्रापंचिक पालन ख्रिस्तेत्तर म्हणून नियमबाह्य समजले गेले होते. हे इग्लंडवर प्युरिटन सत्ता करीत होते तेव्हा होते. आपल्या विश्वासामुळे ज्यांनी इंग्लंड सोडले त्यांची प्युरिटनांनी उत्तर अमेरिकेतील मॅसेच्युसेट बे कॉलनीत नाताळ पाळण्यावर बंदी घातली होती व जे या उत्सवात आनंदोत्सव करीत त्यावर दंड ही ठोठावला.
पण मला वाटते की, तू ख्रिस्तीयत्व ख्रिस्तेत्तर धर्मासोबत मिसळणे याबाबत पवित्रशास्त्राचा दृष्टीकोन काय आहे हे जाणून घ्यावे. “विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका.” हेच प्रेषित पौलाने २ करिंथकर ६:१४–१६ मध्ये आर्जविले. त्यानंतर १७व्या वचनात तो यशया (५२:११ तुझ्या संदर्भासाठी) पुस्तकातून संदर्भ घेतो: “‘त्यांच्यातून निघा व वेगळे व्हा’ असे यहोवा म्हणतो, ‘अमंगळ वस्तुला शिवू नका.’”
आम्ही स्वतःस, विश्वास न ठेवणाऱ्या पासून ख्रिस्तेत्तर सण पाळीत असता कसे वेगळा करू शकू? या प्रश्नाने पुष्कळ प्रांजळ ख्रिस्तीजनांना नाताळ पाळण्याच्या त्यांच्या रूढीचा त्याग करण्यास चालना दिली. (तुझे पवित्रशास्त्र मत्तय १५:३–६ मध्ये उघडून येशूचे तेथे उल्लेखित असणारे शब्द वाचणे हे तुझ्यासाठी चित्तवेधक शाबीत होईल) तथापि अशा सणापासून दूर होण्याची अजून भरपूर कारणे आहेत.
डिसेंबर २५ येशूचा जन्मदिवस नाही तर तो त्याचा जन्मदिवस म्हणून पाळणे लबाडी प्रमाणे आहे. तु तुझ्या पत्रात उल्लेखल्याप्रमाणे एकादा ख्रिस्ती सत्यवर प्रेम करतो व ज्यास प्रामाणिक असण्याची आज्ञा आहे तो खोट्या गोष्टींना कसे जोपासू शकतो? (इफिसकर ४:२५) तारखेपासून ते सान्ता क्लॉजच्या कहाणी पर्यंत नाताळ हा खोट्या गोष्टींनी माखला आहे. तथापि ख्रिस्तीजनांना प्रकटीकरण २२:१५ मध्ये सांगितले आहे की: “लबाडीची आवड धरणारे व करणारे” सार्वकालीक जीवनाच्या इश्वरी आशीर्वादाविना नष्ट होतील.
तर मग तू विचारशील की, ख्रिस्ती म्हणविणरे पाश्चिमात्य, नाताळ का पाळतात? याचे एक कारण व्यापारी वृत्ती, जी तुझ्या देशात आहे तीच आहे. मी युनायटेड स्टेटस मधील बॅप्टीस्ट उपाध्याविषयी वाचले ज्याने विलाप केला: “व्यापारी गोष्टी पुर्णतया दूर केल्या गेल्या तर बहुतेकांना त्यांनी नाताळ साजरा केल्याचे वाटणार नाही. परंतु धार्मिक ध्यान पुर्णपणे काढले जाऊ शकते व असंख्य लोकांच्या दृष्टीपथात ती तफावत दिसणार सुद्धा नाही.” हेच शब्द इग्लंड मध्ये ही लागू होतात.
चित्तेवधकपणे, पवित्रशास्त्र व्यापार व जिला ते “मोठी बाबेल” म्हणते त्याजमधील निकट संबंध दर्शविते. या “मोठ्या बाबेल”च्या पतनाचे वर्णन केल्यानंतर पवित्रशास्त्र (प्रकटीकरण १८:२, ११–१९) म्हणते: “पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही . . . तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे व्यापारी रडत व शोक करीत तिच्या पिडेच्या भयामुळे दूर उभे राहातील.”
तू “मोठ्या बाबेल”ला ओळखू शकतोस का? बरे, “पृथ्वीवरील व्यापाऱ्यांना” येथे इग्लंड व जपान मध्ये नाताळचे खोटे शिक्षण पसरवून कोणी अमर्याद फायदा करून दिला? तो ख्रिस्ती राष्ट्रसमुहाचा धर्म नाही का? होय, माझ्या अभ्यासापासून मी हे शिकलो आहे की “मोठी बाबेल” ही जगव्याप्त खोट्या धर्माची जागतिक सत्ता आहे ज्यात ख्रिस्ती राष्ट्रसमुह समाविष्ट आहे.
तर आता आम्ही काय करावे असे तुला वाटते? “मोठी बाबेल”च्या पवित्रशास्त्र अहवालाने मी काय करावे ते करण्यास मला मदत केली. प्रकटीकरण १८:४ आर्जविते: “माझ्या लोकांनो, तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये व तिच्या पिडातील कोणतीही होऊ नये म्हणून तिच्यातून निघा.”
‘तिच्यातून निघणे’ म्हणजे खोटेपणास वाढविणाऱ्या धर्मांना सोडणे होय व याने मला निर्णायक कृती करण्यास लावले. नाताळ सोबत गुंफलेल्या सर्व पद्धती टाकणे हे कांही सोपे नव्हते. नाताळ हा येथे सामाजिक त्याचप्रमाणे धार्मिक सण आहे. इतरापासून वेगळे होण्यात मला धैर्य एकवटावे लागले होते. मला आढळलेले नीतिसूत्रे २९:२५चे शब्द सहाय्यक शाबीत झाले: “मनुष्याचे भय पाशरूप ठरते पण यहोवावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.”
मला हे सर्व मुद्दे यहोवाच्या साक्षिदारांच्या मदतीने आढळले. इग्लंड मधील हजारो लोकांनी ‘मोठी बाबेल मधून बाहेर निघण्याचे’ तिच्या सर्व खोट्या पद्धती ज्यात नाताळ साजरा करणे आहे त्यातून बाहेर पडण्याचे पाऊल उचलले. परंतु याचा अर्थ आम्ही येशू ख्रिस्ताचा सन्मान करीत नाही असा होत नाही. आम्ही त्याचा सन्मान “नाताळचा आत्मा” वर्षातून एकदाच दाखवून करीत नाही तर वर्षभरात नेहमी ख्रिस्तासारखी प्रवृती दाखवून करतो.
तुझा प्रांजळ मित्र,
डेव्हीड
(इफिसकर ४:२०–२४; फिलिपैकर २:१–६; कलसैकर ३:१–१४ ते उत्पादीत करीत असलेल्या ख्रिस्तासारख्या मनोवृतीसाठी पहा—प्रकाशक)
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
व्यापारी मुख्य धर्मगूरूप्रमाणे आहेत. सान्ताक्लॉज हा विधीचा म्होरक्या आहे.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
व्यापारी नाताळचा उपयोग त्यांच्या वर्ष समाप्तीच्या विक्रीसाठी करतात
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
याने मला नाताळच्या धार्मिक बाजूकडे पाहण्यास भाग पाडले
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
“यास्तव अमंगळ वस्तुला शिवू नका . . . तिच्या मधून निघा”
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
“पृथ्वीवरील व्यापारी तिजसाठी रडतात व विलाप करतात”
[७ पानांवरील संक्षिप्त आशय]
“मनुष्याचे भय पाशरूप ठरते पण यहोवावर भाव ठेवणाऱ्यांचे संरक्षण होते.”