घोडेस्वारांचे रहस्य उलगडणे
प्रकटीकरणातील घोडेस्वाराचे रहस्य कोण उलगडू शकतो? पवित्रशास्त्रात दानिएल २:४७ मध्ये यहोवा देवास “रहस्य प्रगट करणारा” असे संबोधले आहे. त्यानेच पवित्रशास्त्रास, ज्यात घोडेस्वाराचा दृष्टांत समाविष्ट आहे त्यास प्रेरणा दिली. हे पहाता तोच आम्हास आवश्यक असणारे उत्तर पुरवू शकतो. यास्तव माहिती साठी त्याच्या वचनाचा शोध करणे आम्हास रंगीत घोडे व त्याचे स्वार यांचा अर्थ उलगडण्यास समर्थ करील.—आमोस ३:७; २ तिमथ्यी ३:१६; २ पेत्र १:२१.
प्रकटीकरणाची किंवा अपोक्लीप्सची पहिली तीन वचने हे रहस्य खोलण्यास सहाय्य पुरवीतात. ती हे दाखवितात की या दृष्टांताची मालिका भवितव्याच्या घटनाची होती म्हणजेच प्रेषित योहानाने इ.स. ९६ मध्ये या गोष्टी पाहून लिहिल्या त्याच्या नंतरच्या होत्या. हे त्याचे प्रकटीकरण १:१० मधील व्यक्तव्यासोबत साम्य दर्शक आहे की या दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी ‘प्रभूच्या दिवसा” नंतर घडण्यास सुरू होतील.—१ करिंथकर १:८; ५:५ पडताळा.
आम्ही हे लक्षात ठेवून घोडे व त्यांचे स्वार यांचे परिक्षण करू या. प्रारंभास पांढरा घोडा व त्याचा स्वार याची अचूक समज करून घेणे महत्वपूर्ण आहे. त्यानंतरच इतर घोडे स्वारांची अनूरूप इत्यंभूत महिती मिळेल.
स्पष्टीकरण परिक्षणे
या अगोदरील लेखात, पांढरा घोडा व त्याचा स्वार हा ‘शुभवर्तमानाचा विजय किंवा साम्राज्यशाही’चे प्रतिनिधीत्व करतो हे उल्लेखलेले होते. तथापि ख्रिस्ताचे शुभवर्तमान (सुवार्ता) व देवाचा त्यामधील उद्देश यात जगाचे धर्मांतर झाले नाही आणि साम्राज्यशाहीने सुद्धा विजयी दौड केलेली नाही याच्या ऐवजात तिची या शतकात मोडकळीस, छकले उडत गेली आहेत.
तर आता, पांढरा घोडा म्हणजे पहिल्या शतकातील विश्वासाची शुद्धता व शुभवर्तमानाच्या विजयाचे प्रतिनिधीत्व करतो या स्पष्टीकरणाबाबत काय? ही गोष्ट हा दृष्टांत भविष्यात होणाऱ्या गोष्टी होत्या या वस्तुस्थीतीकडे दुर्लक्ष करते. योहानाने हा दृष्टांत पात्म बेटावर बंदीवासात असता इ.स. ९६ मध्ये लिहीला हे पहाता तो पहिल्या शतकातील कशाचे तरी प्रतिनिधीत्व राखून असणे शक्य नाही.
दुसरे एक स्पष्टीकरण असे की पांढरा घोडा हा ख्रिस्तांच्या व्यक्तित्वा ऐवजी कारणाचा तसेच त्याचे राज्य ‘आम्हामध्ये’ म्हणजे आमच्या अंतःकरणात असण्याचा प्रस्ताव मांडतो. परंतु येशू ख्रिस्ताविषयीचे कारण व ख्रिश्चनत्व त्याचवेळी म्हणजे प्रकटीकरणाच्या लिखाणानंतर कांही काळाने सुरु झाले नव्हते. याऐवजी या गोष्टी पहील्या शतकातील ख्रिश्चनात योहानाने लिहीण्यापूर्वी आधीच अस्तित्वात होत्या याचा खूप पुरावा आहे.
तसेच येशूने “देवाचे राज्य तुम्हा मध्ये आहे” असे म्हटले तेव्हा तो दांभिक परूशांनी त्यांनी उठविला होता त्या प्रश्नास उत्तर देताना बोलत होता. येशू त्याच्या विश्वासू अनुयायासोबत बोलत नव्हता की राज्य त्यांच्यामध्ये होते म्हणजे त्यांच्या अंतःकरणात होते, या अर्थी सांगत नव्हता. याच्या ऐवजात तो अविश्वासू परूशांना सांगत होता की तो, येशू भवितव्यातील देवाचे राज्य याचा प्रतिनिधी त्या प्रसंगी त्यांच्यामध्ये उपस्थीत होता.—लूक १७:२१ द जेरूसलेम बायबल, व द न्यू इंग्लीश बायबल सुद्धा पहा.
बरे, पांढऱ्या घोडयावरील स्वार ख्रिस्तविरोधी आहे या विचाराबाबत काय? पवित्रशास्त्रात ख्रिस्तविरोधी अशी स्वारी करील की ज्यांकरवी “तो विजयावर विजय मिळवीत पुढे गेला” असे जे पांढऱ्या घोडयावरील स्वाराबाबत म्हटले आहे तसे त्याच्याबाबत म्हणता येवू शकेल, असे कोठेही म्हटलेले नाही. (प्रकटीकरण ६:२) हे सुस्पष्ट आहे की जो कोणी पांढऱ्या घोडयावर बसलेला आहे तो संपूर्ण विजय प्राप्त करीत पुढे जाईल. त्याचा विजय अपयशी ठरणार नाही. त्याचे सर्व शत्रू नष्ट केले जातील.
पवित्रशास्त्रीय संकेत ओळखण्यात मदत देतात
पांढऱ्या घोडयावरील स्वाराची अचूक ओळख “रहस्य उलगडणाऱ्या”ने त्याच दृष्टांताच्या मालीकेत पुढे दिली आहे. प्रकटीकरण १९:११–१६ मध्ये पांढरा घोडा यावेळेस मात्र स्वाराच्या स्पष्ट ओळखीने पुन्हा दिसला आहे.
या भविष्यवादी दृष्टांतात पांढरा घोडा दोन वेळेस दिसला ही वस्तुस्थीती दाखविते की तो तोच घोडा आहे व स्वाराच्या विविध जबाबदाऱ्या किंवा हालचाली वर्णन केल्या आहेत. ह्या नंतरच्या दृष्यात स्वाराचे नांव देण्यात आले. त्यास “विश्वासू व खरा” “देवाचा शब्द” व “राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू” असे संबोधीले आहे.
ही वर्णने पांढऱ्या घोड्यावरील स्वारास ओळखण्यास कोणताही संदेह सोडत नाहीत. तो प्रभू येशू ख्रिस्त याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नाहीच! (प्रकटीकरण १७:१४ पडताळा.) परंतु त्याच्या जीवनाच्या कोणत्या समयात? हे प्रकटीकरणाचा दृष्टांत देण्यात आला त्या पहील्या शतकाच्या समाप्ती नंतरच्या काही काळानंतर असले पाहिजे. त्यास आता राजेशाहीचा मुगूट दिला आहे याची सुद्धा दखल घ्या. याचा अर्थ भवितव्यात येशू ख्रिस्तास राजा किंवा अधिपतीची खास भुमिका सुरु करणे होते. त्या भूमिकेत त्यास “विजयावर विजय मिळवीत जाणारा” धनुष्यधारी सुसज्ज योद्धा वर्णिले आहे.
पुढील वास्तविकता लक्षात घेता ही घटना भविष्यकालीन होती हे स्पष्ट कळते: प्रकटीकरणाच्या दृष्टांतापावेतो, येशूने पृथ्वीवरील जीवन संपवून ६० वर्षे निघून गेली होती, त्याला मृतातून पुनरूत्थित केले गेले होते व तो स्वर्गास चढून गेला होता. तो स्वर्गास परत गेला तेव्हा त्याने भवितव्यात त्याचे शत्रू ‘त्याच्या पायाचे आसन” करीपर्यंत देवाच्या उजव्या हातास थांबून राहाण्यास येशूस सांगितले होते.—इब्रीकर १०:१२, १३.
दौड सुरू होते
यास्तव येशूस देवराज्याचा स्वर्गिय राजा म्हणून सिहांसनाधीष्ट केल्यानंतर भवितव्यात कांही काळानंतर पांढरा घोडा आपली दौड सुरु करणार होता. त्यावेळेस देव त्यास: “तू आपल्या शत्रूवर प्रभूत्व कर” ही आज्ञा देऊन पूढे पाठविल. (स्तोत्रसंहिता ११०:२) परंतु हे केंव्हा घडते?
स्वर्गीय राजा यानाते येशू ख्रिस्तास मुकूट घालण्याचे विजयशाली वर्णन स्तोत्रसंहिता ४५:३–७ मध्ये केले आहे. नंतर इब्रीकर १:८, ९ मध्ये प्रेषित पौल स्तोत्रसंहिताचे अवतरण घेऊन वचन ६ व ७ देवाचा पुत्र, येशू ख्रिस्तास लागू करतो. तपशीलवार माहीती व शास्त्रवचनीय पुरावे यहोवाचे साक्षीदारानी प्रसिद्ध केले आहेत जे दाखवितात की स्वर्गात येशू ख्रिस्ताचा राज्याभिषेक विदेशाच्या काळाच्या समाप्तीस, “परराष्ट्रीयांची सद्दी” १९१४ या वर्षी झाला.—लूक २१:२४.a
याकारणास्वत कोणतेही स्पष्टीकरण घोडेस्वाराची दौड १९१४ या वर्षापूर्वी सूरू झाली अशी करतात ते अचूक होवू शकत नाही. तसेच, पांढऱ्या घोडयाचा स्वार नेतृत्व करणारा आहे व इतर घोडे व स्वार त्यास अनुसरतात हे पाहता ते त्याज सोबत किंवा त्याची दौड सुरु झाल्यानंतर लगेच घडणाऱ्या घटनांचे प्रतिनिधीत्व करतात. या कारणास्तव या चार घोडेस्वारांची दौड, १९१४ मधील “शेवटला काळ” याच्या सुरवातीनंतर व पासून घडली पाहिजे. त्यावेळेपासून “शेवटचे दिवस” सामोरे दिसले.—दानीएल १२:४; २ तिमथ्यी ३:१–५, १३.
इतर घोडे व स्वार
दुसरा घोडा “भडक लाल” किंवा “अग्निवर्ण” आहे. (प्रकटीकरण ६:३, ४, ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन) त्याच्या स्वारास “पृथ्वीवरील शांतता हरण करावी ज्यामुळे ते एक दुसऱ्यांचा वध करतील” असा अधिकार दिला होता. त्यास “मोठी तरवार” दिली होती. १९१४ मध्ये मानवी इतिहासातील भयानक गोलार्धीक युद्ध सुरु झालेले पाहीले तेव्हा ते सत्य शाबीत ठरले. त्यावेळी त्यास मोठे युद्ध संबोधिले होते २१ वर्षानंतर लागलेच दुसरे जागतिक महायुद्ध भडकले व ते पहील्या जागतिक युद्धापेक्षा अधिक नाशकारक होते. तेव्हापासून नेहमीच युद्ध होत आहेत. १९१४ पासून सर्व मिळून युद्धांनी शंभर दशलक्ष जीवांचा बळी घेतला.
तिसरा घोडा काळा आहे व त्याच्या स्वाराच्या हातात तराजू आहे. (प्रकटीकरण ६:५, ६) एक वाणी म्हणाली एका दिवसाची कमाई एक शेर गहू व तीन शेर स्वस्त असणाऱ्या जवास खरेदी करण्यास पुरेशी आहे. हे उचितपणे पूर्वी कधीही नव्हते त्या अन्नटंचाईचे वर्णन करते. ती १९१४ पासून सत्य असल्याचे शाबित झाली. पहिल्या जागतिक युद्धाच्या भडक्या पासूनच धान्याचे दर चढले. लाखो उपासमारीने मृत्युमुखी पडले. त्यापासून पुढे अन्नटंचाई सातत्याने चालू आहे. असा अंदाज करण्यात आला की सध्या ४५० दशलक्ष लोक उपासमार येथवर भूकेले आहेत व एक दशकोटीना पुरेसे अन्न नाही. अलिकडील वर्षात वेळोवेळी इथोपीयाने अहवाल दिल्या प्रमाणे पुष्कळ जीव घेतले असे दुष्काळ उद्वीग्न चित्रावर जोर देतात.
चौथ्या घोडयाबाबत आम्ही पाहतो की तो फिकट व आजारी दिसतो. स्वाराचे नांव “मृत्यू” आहे. (प्रकटीकरण ६:७, ८) अनैसर्गिक कारणास्वत जसे की अन्नटंचाई, दुष्काळ, युद्ध व हिंसाचार, साथी व रोगाने १९१४ पासून मृत्युमूखी पडलेल्या असंख्य लोकांचे तो साजेसे प्रतिनिधीत्व करतो. स्पॅनिश एन्फ्लूएन्झा जो पहिल्या जागतिक युद्धाच्या समाप्तीस बोकाळला व २० दशलक्षांना फस्त करून गेला सध्या हृदयाविकार, कर्करोग व पुष्कळ इतर आजारांनी लाखोंचे अकाली बळी घेतले आहेत.
या घोड्यानी व स्वारानी चित्रीत केलेल्या घटना आमच्या समयाच्याबाबत येशूने केलेल्या भविष्यासोबत समतुल्य आहेत. तो म्हणाला “या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीस” ज्यात आम्ही जिवंत आहोत त्यात गोलार्धिक युद्ध जसे की ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’ असे असणार, त्याने भाकीत केले “अधर्माची वाढ” व “जागोजागी अन्नटंचाई व मऱ्या येतील.”—मत्तय २४:३–१२; लूक २१:१०, ११.
तेथे पाचवा घोडा होता का?
प्रकटीकरण ६:८ असे वाचतो: “मग मी पाहिले तो फिकट रंगाचा घोडा व त्यावर बसलेल्याचे नाव मृत्यु होते. हेडीज त्याच्या पाठोपाठ चालला होता.” याचा आधार घेऊन कांहीनी सुचविले की पहिली चार उल्लेखिलेली पात्रे घोडदौड करतात तर मग पाचवा देखील घोड्यावर स्वार असावा हे रास्त वाटत नाही का?
पवित्रशास्त्र तसे काही म्हणत नाही. ग्रीक शास्त्रात “घोडा” हा शब्द प्रकटीकरण ६:८ मध्ये हेडीजच्या संबधाने आढळत नाही. यास्तव बहुतेक पवित्रशास्त्र भाषांतरास पाचव्या पात्रासाठी “घोडा” हा शब्द समाविष्ठ करीत नाहीत, यास्तव हेडीज ही मानवाची सर्वसाधारण कबर आहे हे लक्षात घेण्यास पुरे आहे. ते पूर्वीचे तीन घोडे व स्वारांच्या मागोमाग त्यांच्या सर्व सावजांना फस्त करीत होते.
दृष्टांत तुम्हावर कसा परिणाम करतो
प्रकटीकरणाच्या चार घोडेस्वारांच्या स्वारीच्या दृष्टांताची नाट्यपूर्ण पूर्णता होत आहे अशा समयात जिवंत असणे चितथरारक अनुभवाचे आहे. तसेच हा समय अति गांभिर्याचा, स्वपरिक्षणाची हाक देणारा आहे. हे असे का आहे? कारण पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीवर या लाक्षणिक स्वारीचा प्रभाव होत आहे. होय, तुम्ही व तुमचे सर्व प्रियजन यात समाविष्ठ आहेत. कसे?
हा प्रश्न या प्रकरणाचे गंभिर स्वरूप सामोरे आणतो ज्याचे उत्तर टेहळणी बुरुजचा पुढील अंक देईल: “त्यांची दौड तुम्हावर कशी परिणाम करते.” उत्तर प्राप्त करण्यास चूकवू नका.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी न्यूयॉर्क यांनी प्रसिद्ध केलेले यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरेडाईज ऑन अर्थ् या पुस्तकाची पृष्ठे १३४–४१ पहा.
[५ पानांवरील चित्रं]
१९१४—“राजांचा राजा” आपल्या पांढऱ्या घोड्यावर दौड करतो
[७ पानांवरील चित्रं]
युद्ध, दुष्काळ व मऱ्या यांची सूचकता असणाऱ्या घोडेस्वारांकरवी हेडीस ने १९१४ पासून बळींचे मोठे पीक हस्तगत केले आहे