वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १/१ पृ. ३-४
  • प्रकटीकरणाचे रहस्यमय घोडेस्वार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रकटीकरणाचे रहस्यमय घोडेस्वार
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • घोडेस्वारांचे रहस्य उलगडणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • प्रकटीकरणाचे घोडेस्वार—त्यांची दौड तुम्हावर कशी परिणाम करते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • चार घोडेस्वारांची भरधाव दौड!
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • तुम्हाला आठवते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १/१ पृ. ३-४

प्रकटीकरणाचे रहस्यमय घोडेस्वार

आयाळ असलेले शेपूट उंचावत नाकपुड्या फुरफुरत घोडे खडकाळ उतारावरून खाली दौड करीत आहेत हे भव्य दृष्य तुम्हा पहात आहात. विक्राळ स्वार जणू या दौडीचा भाग असल्यामुळे घोड्याच्या त्वचा कंपनामुळे खोगीरास चिकटून बसला आहे.

ऑस्ट्रेलियातील जग प्रसिद्ध पशू ठाण्यास किंवा अर्ध्या जगाहून ही पुढे जाऊन अमेरिकेतील कुरण पठारास भेट दिली तरी, ज्याला त्याच्या घोड्यावरील बैठकीची चांगली जाणीव आहे त्या घोडे स्वारांच्या दौडीचे दृश्‍य नजरेत खरोखर भरते. त्याचप्रमाणे उत्तम तालीम पावलेले घोडे व स्वार यांची कवायत ही नेत्रदिपक असते.

अशाप्रकारचे घोडेस्वार व त्यांचे घोडे आम्हावर छाप पाडून जातात. तथापि प्रकटीकरण (अपोक्लीप्स) पुस्तक लिहीणाऱ्‍याने पाहिलेले घोडे व स्वार हे सुद्धा अवलोकण्यास चित्तथरारक आहेत! ते रहस्यमय तसेच भितीदायक आहेत. हे स्वार प्रकटीकरणाचे घोडेस्वार म्हणून सर्व परिचित आहेत.

चार कुशल असे स्वार त्यातील एक तलवारीचे पाते लखलखीत तुम्हाकडे येत आहे अशी कल्पना करा! त्याच्या घोड्याच्या रंगाची दखल घ्या. प्रत्येकात भिन्‍नता आहे. एक पांढरा, एक अग्निवर्ण, एक काळा व एक फिकट आहे. ते खरोखरी विचित्र व रहस्यमय आहेत.

पवित्रशास्त्रातील लेखक प्रेषित योहान याने काय पाहिले तो धावता वृत्तांत पहा. तो लिहितो: “मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, त्याला मुगुट देण्यात आला; व तो विजय मिळवित वजय मिळविण्यास पुढे निघून गेला . . . दुसरा घोडा पुढे आला तो अग्निवर्ण होता व त्याच्यावर बसलेल्या स्वारास पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करण्यास लावण्याचा अधिकार दिला होता. त्याला मोठी तरवार देण्यात आली होती . . . मग मी पाहिले तो एक काळा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; मी वाणी ऐकली ती अशी . . . [दिवसाच्या मजूरीस] शेरभर गहू व [दिवसाच्या मजूरीस] तीन शेर जव . . . मग मी पाहिले तो राखेच्या रंगाचा घोडा व त्याच्यावर बसलेल्या स्वाराचे नाव मृत्यु होते व हेडीस त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना ‘तरवारीने, दुष्काळाने, मरणाने व पृथ्वीवरील श्‍वापदांकडून पृथ्वीवरील एक चतुर्थांश लोक मारण्याचा अधिकार देण्यात आला होता.”—प्रकटीकरण ६:२-८, ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन.

हे दृश्‍य प्रथमत: लिहिले होते तेव्हा पासून याच्या अर्थाने असंख्य वाचकांना गोंधळात टाकले होते. हे रहस्यमय घोडे व त्यांचे स्वार कशाचे प्रतिनिधीत्व करतात? त्यांची घोडदौड केव्हा सुरू झाली? त्याच्या घोडेदौडीचा परिणाम आमच्या जिवनामानावर होतो काय? ते घोडे व त्याचे स्वार कशाचे प्रतिनिधीत्व करतात व खरोखरी त्यांची घोडेदौड केव्हा सुरू होते यावरील विविध स्पष्टीकरणे सादर केली गेली आहेत.

पांढरा घोडा व त्याचा स्वार यावरील स्पष्टीकरणात तीव्र मतभेद आढळतात. उदाहरणार्थ, न्यू कॅथोलीक एन्सायक्लोपिडीया पांढरा घोडा हा ‘शुभवर्तमानाचा विजय व साम्राज्यशाही’ याचे प्रतिनिधीत्व करतो असे स्पष्टीकरण करते.

उरिया स्मिथ डॅनिएल ॲन्ड द रिव्हीलीशन या पुस्तकात हे स्पष्टीकरण देतात: “पांढरा घोडा . . . हा पहिल्या शतकातील शुभवर्तमानाच्या विजयाचे अचूक द्योतक आहे . . . घोड्याचे पांढरेपण त्या युगातील विश्‍वासाच्या शुद्धतेचे वर्णन करतो.”

द एक्यपोझीटर बायबल म्हणते: “पहिला स्वार हा ख्रिस्ताचे व्यक्‍तीत्वा ऐवजी कारण आम्हास सादर करतो, त्याच्या सुरवातीच्या विजयी दौडीमध्ये व भवितव्यातील विजयाच्या अभिवचनाचे तो कारण देतो . . . आम्हास हे शिकावयास मिळते की हे कारण जगात आहे, तो राजा आम्हामध्ये आहे व जे कोणी त्यास विरोध करतील त्यास पराजयाने फेकून दिले जाईल.” तथापि वूडरोब क्रॉल यहुदी ख्रिस्तीजनाचा अधारस्तंभ यांना असे वाटते की पांढऱ्‍या घोड्यावरील स्वार ख्रिस्तविरोधी आहे.

काहींनी प्रतिपादले की चार नव्हे तर पाच घोडे व स्वार आहेत. मग आम्हास या पुष्कळातील कोणते स्पष्टीकरण बरोबर हे कसे जाणता येईल बरे? एखादी बिनचूक समज आहे याबद्दल आम्ही कसे खात्रीदायक असू शकतो? प्रकटीकरणातील हे रहस्यमय घोडेस्वार कोण आहेत व त्यांची दौड केव्हा सुरू झाली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा