प्रकटीकरणाचे घोडेस्वार—त्यांची दौड तुम्हावर कशी परिणाम करते
सोमवार १ एप्रिल १९८५ हा दिवस टोरॅन्टो कॅनडा मधील दररोज प्रवास करणाऱ्या पुष्कळांसाठी इतर दिवसासारखा दिवस नव्हता. बॉम्बर्सनी भुयारी मार्ग उडवून टाकण्याची धमकी दिली होती. का? त्यांच्या मते, एका वर्षापूर्वी तुर्क मधील आर्मेनियम लोकांना ठार मारण्याचा जो प्रयत्न झाला होता ते आठवून देण्यासाठी. तथापि, तुर्की सरकारने या गोष्टीचा वारंवार इन्कार केला होता.
निसंशयपणे, या प्रवासी लोकातील बहुतेकांना त्या एका वर्षापूर्वीच्या प्रकरणाविषयी थोडे अगर काहीच माहीत नव्हते. तरीही त्यांना कांही त्रास वा चिंता सोसावी लागली. बहुदा आम्हालाही, आम्हास थोडीच माहिती असलेल्या गोष्टीचा परिणाम भोगावा लागतो.
२०व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात पवित्रशास्त्रातील अपूर्व भविष्यवाद जो प्रकटीकरण (किंवा अपोक्लीप्स) ६:१–८ मध्ये आढळतो त्याच्या पूर्णतेतील उल्लेखनीय घटना घडण्यास सुरुवात झाली. ख्रिश्चन प्रेषित योहान यास प्रकट केल्याप्रमाणे घोडेस्वारांना शेवटच्या दिवसात पुढे चाल करीत राहायचे होते. लाखो लोकांना याविषयी माहिती नाही तरी त्या प्रकटीकरणाच्या घोडेस्वारांची दौड पृथ्वीवरील प्रत्येकावर परिणाम करीत आहे. पण कशी? आम्ही प्रत्येक घोडेस्वाराची चर्चा करून तसे पाहू.
अग्निवर्ण घोडा
योहानाने पाहिलेला एक घोडा “अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतत हरण करणाचे व लोकांडून एकमेकांचा वध करण्याच काम सोपविले होते, त्या मोठी तरवार देण्यात आली होती.”—प्रकटीकरण ६:४.
या घोडेस्वाराची “मोठी तरवार” युद्धाचे सूचक आहे. त्याप्रमाणे १९१४ पासून अदमासे ६ कोटी ९० लाख लोक दोन महायुद्धात मारले गेले. केवढा हा वध! खरोखरी विधवा व अनाथांचा महासमुदाय त्या अग्निवर्ण घोडेस्वाराची साक्ष आहे जो आंतरराष्ट्रीय युद्धे चित्रीत करतो. त्याने सरळपणे त्यांच्या जीवनावर परिणाम केला.
याहून अधिक, युद्ध व युद्धाच्या धमकावण्याचा गंभीर परिणाम युवक पिढीवर झाला. ज्या देशात ज्वलन्त भडका उडतो तेथे किशोरवयीन बहुतेक मारहाण करतात. युद्धाचा या तरूण लोकांवर होणारा परिणाम या प्रश्नात येतो जो एका मानवी हक्क एजन्सीच्या अध्यक्षांनी विचारला: “ते शहाणे व समजुतदार युवक म्हणून कसे वाढू शकतील?”
पुष्कळ देशातील युवकावर युद्धाने सरळ परिणाम केला आहे की ते समयाची मोजदाद वर्षे व महिने यात करण्याऐवजी दिवस व तासात करण्यास शिकले. ते विचारतात: “उद्याची काळजी कोण करतो? मी रात्री झोपल्यानंतर माझ्या खोलीत तोफेचा गोळा येणार नाही याची खात्री तुम्ही द्याल का?”
शांतीमय देशात जीवन कंठणाऱ्या लेकरांच्या बाबतीत काय? त्यांना या युद्धाच्या घोडेस्वाराचा परिणाम जाणवतो काय? होय, अण्वस्त्र युद्धाच्या भयानक भीतीने त्यांच्यावर खोलवर मानसिक परिणाम झाला आहे. तिच्या विद्यार्थ्याने व्यक्त केलेल्या निराशेबाबत बोलताना एक शिक्षिका उद्गारली: “पुन्हा पुन्हा मला हे अभिप्राय ऐकावयाला मिळतात, मला अविश्वासाच्या भावनेने जणू व्यापून टाकले होते. या लहान लेकरांना वाटणारी निराशेची व्यथा मी मला स्वतःला वाटू देत नाही.” क्युबेक, कॅनडाचे डॉ. रिचर्ड लोगान भर टाकतात: “ असहाय्यता व असमर्थता ही मानसिक नैराश्याची व्याख्या आहे. हेच काम ते आम्ही पुष्कळ किशोर वयीनात पहात आहोत.”
तुम्ही युद्ध भडकलेल्या देशात राहात नसाल अगर तुम्हास भावनात्मक समस्येने ग्रासलेले नाही असे वाटत असेल तर काय? तरीही अग्निवर्ण घोड्याची दौड तुमच्या जीवनावर परिणाम करते. प्रत्येक मिनिटास १.३ दशलक्ष डॉलर्स लष्करी उद्देशास्तव खर्चिले जात आहेत—सुमारे ६६० दश कोटी जगभर एका वर्षात खर्चिले जातात! हा सर्व खर्च कोण करतो? तुम्हीच. तुम्ही कोठेही राहात असाल तरी तुम्हावर अग्निवर्ण घोड्याच्या दौडीचा परिणाम झालेला आहे.
काळा घोडा
आणखी एका अर्थभरित सांकेतिक घोड्याचे वर्णन याहोन या शब्दात करतो: “मग मी पाहिले तो काळा घोडा व त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी: ‘रूपयाला शेरभर गहू, व रूपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची खराबी करू नको.”—प्रकटीकरण ६:५, ६.
तुम्ही भुकेले आहात का? लाखो आहेत. ते या काळ्या घोड्याच्या दौडीने, जो दुष्काळाचे वर्णन करतो त्याने परिणामित झालेले आहेत. प्रत्येक मिनिटास ३० लेकरे अपुरे अन्न व औषधामुळे मरतात—म्हणजेच एका वर्षात १ कोटी ५० लक्षाहून अधिक! हजारो लोक शोचनीय परिस्थितीत जीवन कंठतात. जागतिक बँकेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मॅकनामारानुसार, ते “मर्यादीत सुशिक्षीत, अर्धपोटी, रोगी, बाल्यावस्थेत मरणाऱ्यांचा उच्चांक व अपुऱ्या जीवन अपेक्षेने जणू काय ज्या उद्देशाने जन्मतात त्या संभवतेस वंचित करणे होय.”
अलिकडील महीन्यात भुकेल्या आफ्रिकन पुरुष, स्त्री व बालकांची चित्रे पाहणे सर्वसाधारण बनले आहे. अशाप्रकारच्या दु:ख त्रासांच्या स्थितीचे चित्रण, युनोचे सर्वसाधारण सचिव जाविर पेरेझ डी क्यूलर नी इशारा दिला: “उपसहारा अफ्रिकेत दुसऱ्या महायुद्धा दरम्यान मृत्युमुखी पडल्यापेक्षा अधिक मानवजात मरेल. जे बचावतील ते उरलेल्या जीवनात शारिरिक किंवा मानसिकतेत दुर्बल राहतील.” हे सावज बनलेले काळ्या घोडयाची थेट झळ पोहोंचलेले आहेत.
तुम्ही भुकेले नसाल परंतु खात्रीने तुम्हावर दुष्काळाच्या दुःखद चित्राने परिणाम केलेला असणार. न्यूयॉर्क टाईम्स चे २०मे १९८५ च्या संपादकीय नुसार, कोट्यावधी डॉलर्सपेक्षा अधिक देणगी दुष्काळग्रस्ताना मदत करण्यास दिली. तुम्ही स्वतःहून देणगी दिली नसेल पण काही सरकारी यंत्रणांनी करातील पैशाचा उपयोग करून मोठ्या देणग्या उपलब्ध केल्या आहेत. होय, काळ्या घोड्याच्या दौडीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सर्व लोकावर परिणाम केले आहेत.
फिकट घोडा
योहानाने पाहिलेला दृष्टांत आणखीन एक घोडा व त्याचा स्वार याच्या वर्णनाने पुढे म्हणतो: “मग मी पाहिले तो फिकट रंगाचा घोडा व त्याच्यावर बसलेल्याचे नाव मृत्यू होते. अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरणाने व पृथ्वीवरील श्वापदाकडून माणसांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला.”—प्रकटीकरण ६:८.
फिकट घोड्यास मृत्यू हाकतो, व “प्राणघातक पिडा” ही केवळ या घोडेस्वाराच्या दौडी दरम्यान जिवंताचे उच्चाटन करणाऱ्या पुष्कळातील एक आहे. आधुनिक वैद्यकीय प्रगती आहे तरी जग हे नवनवीन रोगांना चोहोकडून तोंड देत आहे. आता आम्ही पहिल्या महायुद्धानंतर स्पॅनिश फ्लू म्हटलेल्या साथीस तोंड देत नसलो तरी कर्करोग, हृदयविकार व इतर पुष्कळ आजारांनी घेतलेला बळी डोके चक्रावतो. उदाहरणार्थ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अंदाज केला की ५.९ दशलक्ष कर्करोगाचे नविन रूग्ण जगभरात प्रत्येक आढळतात, अंधत्व, सौम्य ज्वर, पटकी व अगोदरच असलेल्या रोगांनी चालू पिडात अजून भर टाकली.
तथापि तुम्ही वितर्क कराल, ‘मला यामधील कोणताच रोग नाही.’ ते खरे असेल परंतु फिकट घोड्याच्या दौडीचा तुम्हावरही परिणाम होतो. रूग्णालय व औषधोपचार खर्च अवाढव्य आहे. हे एकाद्यास सुरक्षित असण्यास कोणत्या तरी प्रकारचा आरोग्य विमा भरण्याकडे निरविते. पुष्कळ राष्ट्र मोफत औषध पुरवठा करामधून करतात. या कामासाठी खर्च केलेल्या वेळेच्या भव्य किंमतीचा विचार करा जो सरतेशेवटी भाववाढीने तुम्हाकडून वसूल केला जातो. होय, फिकट घोड्याची दौड तुम्हावर परिणाम करते.
पांढरा घोडा काय आणतो
पुढे सरसावणारे घोडेस्वार व त्यांच्या घातक परिणामाचा विचार केल्यानंतर योहान जे कांही पांढरा घोडा व त्याचा स्वार जो इतरांच्या पुढे जातो त्या विषयी म्हणतो ते लक्षात घेणे उत्साहवर्धक आहे. प्रेषित म्हणाला: “मी पाहिले तो एक पांढरा घोडा व त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुगुट देण्यात आला, तो विजयावर विजय मिळवित निघून गेला.”—प्रकटीकरण ६:२.
येशू ख्रिस्त पांढऱ्या घोड्याचा स्वार आहे. (प्रकटीकरण १९:११) त्याचे स्वर्गिय राज्य १९१४ मध्ये खळबळजनक घटनांनी सुरु झाले. स्वर्गातील युद्धाचा परिणाम सैतान व त्याचे दुरात्मे यांना पृथ्वीवर टाकण्यात झाला. त्यानंतर स्वर्गातील वाणीने घोषित केले: “पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढावला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे, हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” हे घोडेस्वाराच्या दौडीचा आरंभ चिन्हांकीत करते.—प्रकटीकरण १२:७, १२.
परंतु येशू ख्रिस्ताची दौड तुम्हावर कशी परिणाम करते? त्याच्या राजवटीच्या संबधाने येशूने भाकीत केले: “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात साक्ष म्हणून गाजवितील तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) सध्या २०० पेक्षा अधिक राष्ट्र व समुद्र बेटावर यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ताच्या स्थापित झालेल्या राज्याची सुवार्ता गाजवीत आहेत. त्यांनी तुमच्या घरी भेट दिली आहे काय? तर मग तुम्हावर या घोडेस्वाराच्या दौडीचा परिणाम झाला आहे.
लोकावर त्याच्या राज्याचा परिणाम कसा होईल हे पूर्व सूचित करताना येशूने भाकीत केले: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व दिव्यदूतासह येईल तेव्हा तो वैभवशाली राजसनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे
जमविली जातील व जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील, मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील.”—मत्तय २५:३१–३३.
पांढऱ्या घोड्यावरील येशूच्या स्वारी दरम्यान हे वेगळे करण्याचे कामाच्या परिणामात सर्व मानवजात “शेरडे” अगर “मेंढरे” आहेत हे ओळखले जाईल. निष्पत्ती लक्षात घ्या. “शेरडे” “सार्वकालिक दंड भोगण्यास तर धार्मिक जन [मेंढरे] सार्वकालिक जीवनात जातील.” (मत्तय २५:४६) अशाप्रकारे, तुम्ही राज्य संदेशाच्या प्रचारकार्यास कसा प्रतिसाद देता यावर त्याचा अर्थ तुम्हास जीवन किंवा मरण आहे.
तुम्ही पूर्वी प्रकटीकरणाचे घोडेस्वाराचा तुम्हावर कसा परिणाम होतो याचा विचार केला नसला तरी आम्ही तुम्हास सुवार्तेस प्रतिसाद दाखविण्याचे आर्जवितो कारण त्यांची दौड लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यानंतर पांढऱ्या घोड्यावरील स्वार म्हणजे येशूच्या राजवटीत ही पृथ्वी पुष्कळ आशीर्वादांचा आनंद लुटणार. पवित्रशास्त्र त्यातील कांहीचे वर्णन भविष्यवादीतरित्या असे करते: ‘त्याच्या काळी धार्मिक उत्कर्ष पावतील; आणि [अग्निवर्ण घोडेस्वार निघून गेल्यामुळे] चंद्र नाहीसा होईतोपर्यंत विपुल शांती असेल. [काळया घोड्याची अनुपस्थिती पाहता] भूमीवर पर्वताच्या शिखारापर्यंत भरपूर पीक येईल.”—स्तोत्रसंहिता ७२:७, १६.
येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा, त्याने देवाने दिलेल्या शक्तीचे प्रदर्शन किळसवाणे आजार व मृत्युवरही दाखविले. तो अशाप्रकारचे सामर्थ्य अधिक प्रमाणात त्याच्या राज्यात राजा यानाते दाखवील आणि पृथ्वीला पिडा, दुष्काळ व युद्धे या पासून मुक्त करील. अशाप्रकारे पांढऱ्या घोड्याचा स्वार प्रकटीकरणाच्या इतर नाशकारक घोडेस्वारांची दौड संपुष्टात आणील.
[३ पानावरील चौकट]
घोडेस्वारांची ओळख
जानेवारीच्या टेहळणी बुरुज अंकाने प्रकटीकरणाच्या घोडेस्वारांच्या दौडीची पूर्णत होण्यास कशी सुरूवात झाली हे दाखविले.
पांढरा घोडाः स्वर्गात नवीन राजा म्हणून मुकुटमंडीत केलेला येशू ख्रिस्त पांढऱ्या घोड्यावर स्वार आहे. तो, १९१४ मध्ये सिंहासनारूढ झाल्यापासून पुढे जाणारा धार्मिक विजेता असे चित्रीत केले आहे.
अग्निवर्ण घोडा: या घोड्याचा स्वार युद्धास सूचित करतो. पृथ्वीवरील शांती हिरावून घेतली आहे व जागतिक युद्धाच्या भडक्यास चिन्हांकीत करतो.
काळा घोडा: या घोड्याचा स्वार अन्नटंचाई व दुष्काळास सूचित करतो. लाखो क्षुधित आहेत तर इतरांना इच्छीत अन्न घेणे शक्य आहे.
फिकट घोडा: मृत्यु फिकट घोड्यावर स्वार आहे. अकाली मृत्यु सूचित करतो. तो मरीने किंवा इतर कारणाने येतो.