वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १/१ पृ. ८
  • येशूच्या परीक्षेपासून शिकणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूच्या परीक्षेपासून शिकणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • येशूच्या परिक्षांपासून बोध घेणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • सैतान येशूची परीक्षा घेतो
    बायबलमधून शिकू या!
  • सैतानाला विरोध करा आणि तो पळून जाईल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १/१ पृ. ८

येशूचे जीवन व उपाध्यपण

येशूच्या परीक्षेपासून शिकणे

बाप्तिस्मा झाल्यावर लागलेच, येशूला देवाचा आत्मा यहुदीयातील अरण्यात नेतो. त्याच्या बाप्तिस्म्याच्यावेळी “आकाश उघडले गेले’ तेव्हा त्याला स्वर्गातील गोष्टीं कळू शकल्या. त्यामुळे त्याला आता पुष्कळ विचार करावयाचा आहे. आता येशूला पुर्णपणे कळते की, तो देवाचा आत्मिक पुत्र या नात्याने स्वर्गात होता व देवाने त्याला पुष्कळ गोष्टी सांगितल्या होत्या. अशाप्रकारे त्याला मनन करण्याजोग्या खूप गोष्टीं आहेत!

येशू चाळीस दिवस व चाळीस रात्र अरण्यात काढतो. या दरम्यान तो काहीही सेवन करीत नाही. जेव्हा त्याला खूप भूक लागते तेव्हा सैतान त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या जवळ येऊन म्हणतो: “तू देवाचा पुत्र आहेत तर ह्‍या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.” पण व्यक्‍तिगत इच्छेसाठी अद्‌र्भित शक्‍तिचा उपयोग करणे चुकीचे आहे हे येशू जाणून आहे. यासाठी तो मोहित होण्याचे नाकारतो.

पण सैतान त्याला सोडत नाही. तो दुसरा मार्ग अवलंबितो. तो येशूला आव्हान करतो की मंदिराच्या शिरोभागातून खाली उडी घे म्हणजेदेवाचे दूत त्याचे रक्षण करतील. पण आशाप्रकारच्या भव्यतेचा दिखाऊपणा करण्याचा येशूला मोह होत नाही. शास्त्रवचनाच्या आधाराने तो दाखवितो की, अशाप्रकारे देवाची परीक्षा घेणे चुकीचे आहे.

तिसऱ्‍या परीक्षेच्या वेळी सैतान जगाची सर्व राज्ये येशूला अद्‌र्भितरितीने दाखवितो. व म्हणतो: “तू जर मला नमन करशील तर हे सर्व मी तुला देईन.” पण चुकीची वागणूक करून मोहाचा स्विकार करण्यास येशू स्पष्ट नकार देतो. याऐवजी देवाशी विश्‍वासू राहणेच तो पसंत करतो.

येशूला झालेल्या परीक्षेपासून आम्ही पुष्कळ शिकू शकतो. त्याद्वारे आपल्याला कळते की पुष्कळ लोक जसे म्हणतात त्याप्रमाणे सैतान हा काही वाईट गुण नव्हे; तर तो खरोखर एक अदृश्‍य व्यक्‍ति आहे. तसेच येशूच्या परीक्षेवरून हे दिसून येते की, सर्व जगीक सरकार सैतानाची मालमत्ता आहे. जर असे नसते तर येशूची परीक्षा घेताना त्याने हे कसे सादर केले असते?

शिवाय याचाही विचार करा: येशूच्या एका नमनाखातर जगाचे सर्व राज्य बक्षिस म्हणून देण्याची इच्छा सैतानाने प्रकट केली. तद्वत, सैतान आमची देखील अशाप्रकारे परीक्षा घेऊ शकतो. जगीक ऐश्‍वर्य, सामर्थ्य किंवा अधिकार मिळविण्याची खोटी भूल तो आमच्या समोर आणील. पण आमच्या समोर कोणतीही परीक्षा जरी आली तरी आम्ही येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून देवाशी विश्‍वासू राहणे हे केवढे सुज्ञतेचे ठरेल बरे! मत्तय ३:१६; ४:१–११; मार्क १:१२, १३; लूक ४:१–१३.

◆ येशूसाठी आकाश उघडले गेले याचा काय अर्थ होतो?

◆ सैतानाने येशूची परीक्षा कशाप्रकारे घेतली?

◆ येशूच्या परीक्षेपासून आम्ही काय शिकू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा