तुम्ही देवासोबत चांगल्या भूमिकेत आहात का?
या प्रश्नाकडे पुष्कळ लोक अर्थविरहीत म्हणून पहातील. त्यांच्या दृष्टीकोनातून स्वतःसोबत चांगले असा हे महत्वाचे आहे. ‘स्वतः पुरते पहा’ हा या दिवसातील परिचीत सुविचार आहे. ‘दोषी वाटू देवू नका’ हा दुसरा.
हा दृष्टीकोन केवळ ज्यांना “मी–प्रथम” या जिवनाच्या तत्वज्ञानाने स्फुर्ती मिळाली त्या थोडक्या युवकांचाच नाही. उदाहणार्थ, फ्रान्स जेथे ८२ टक्के लोकसंख्या बाप्तीस्मा पावलेली कॅथोलीक आहे, तेथे १९८३ मध्ये केलेल्या तपासणीने केवळ ४ टक्के लोक पापाची कल्पना स्विकारतात हे प्रकट केले. युनायटेड स्टेट्स बद्दल पहाता पुष्कळ वर्षापूर्वी डॉ. कार्ल मॅनीनजर ज्यांना “अमेरिकन मानसशास्त्राचा पिता” असल्याचे म्हटले होते त्यांना झटकन व्हॉटएव्हर बिकेम ऑफ सीन? या विषयावरील पूर्ण पुस्तक लिहावेसे वाटले. त्यात ते लिहीतातः “राष्ट्र यानाते, आम्ही अधिकृतपणे ‘पाप करणे’ जवळ जवळ वीस वर्षापूर्वीच सोडून दिले.” पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणते: “‘पाप’ हा शब्द आमच्या बोलीतून जवळजवळ नाहीसा झाला आहे.”
खरोखर, पापाची सामान्य समजूत सध्याच्या पुष्कळ लोकातूनच काय पण ख्रिश्चन असल्याचा दावा करीतात त्यांच्यातून गायब झाली आहे, पाप खरच काय आहे हे त्यांना समजाविणे कठीण जाते.
आधुनिक दिवसातील शंका
पापाबद्दलच्या या अवमुल्यनाच्या ऐवजी, जगाच्या दृष्यावर आलेल्या नवनविन सुधारणांनी लोकांना विचारात मग्न केले आहे. त्यातील एक जगातील पुष्कळ विकसीत देशातील असंख्य गर्भपात आहेत. यातील काहींच्या मध्ये बहुसंख्याक “ख्रिश्चन” आहेत तरी त्यांचे गर्भपाताचे अगदीच सुलभ कायदे आहेत. या फाजीळ बळी घेण्याने अशा प्रतिक्रीयांना सामोरे आणले की जे पापाची सर्वसामान्य समजूत धिक्कारतात त्यांना स्पष्टीकरण करणे कठीण होऊन बसले.
उदारणार्थ, कांही स्त्रिया ज्यांचे जिवनाक्रमण त्यांना गर्भपात करण्याची मुभा देते त्यांना नंतर दोषी असल्याचे का वाटते, एवढेच काय पण मानसीक आजारी ही का बनतात? तरिही, “गर्भपात करून घेणाऱ्यावरील संशोधन दाखविते की त्यातील अधिक हिस्सा चुकीच्या व्यवस्थापनाचा आहे.” हेच कम्युनिस्ट युगोस्लाव्हीयात ही आहे. (द न्यू एन्सायक्लोपेडीया ब्रिटानिका) प्राध्यापक हेन्री बारूक, फ्रेंच ॲकॅडमी ऑफ मेडीसीनचे सदस्य ही अपूर्व गोष्ट “लोकांच्या अंतःकरणात लिहीलेल्या मुलभूत तत्वाचे” उल्लंघन असे स्पष्टीकरण करतात. लिहलेल्या पण, कोणा करवी?
अलीकडीलच आणखीन एका गोष्टीने मानवास पेचात टाकले आहे ती म्हणजे जगव्यापतेत फैलावणारे संसर्गजन्य आजार. एड्स् (ॲख़यर इम्यून डीफसन्सी सिन्ड्रम) त्याच्या उच्चांकीत मृत्यु घेण्याने, त्याने अप्रचलीत नितीबाह्यते पासून ज्यांना समलींग समागमाने मुक्ती दिली त्या पुष्कळ लोकांना यातना व संशयाच्या खाईत लोटले आहे. त्यांच्या लैंगिक “स्वात्यंत्र्या” साठी पुष्कळजण खर्चिक किंमत मोजतात ती त्यांच्यातील काहींना अचंबीत होण्यास लावते की त्यांना शिक्षा तर केली जात नाही का. शिक्षा पण कोणा करवी?
अशाप्रकारच्या आधुनिक आठवणीमुळे मानव शिक्षा होणार नाही म्हणून नैतिक तत्वे तुच्छ मानू शकत नाही, ती कांही लोकांना पापाबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन व देवास हिशेब देणे या बाबत पुनर्विचार करण्यास लावीत आहे.
चर्च व पाप
“या शतकातील पातक पापाची सर्व समज गमावणे हे आहे.” पोप पायस बारावे यांनी ही शक्तीशाली वाच्यता १९४६च्या सुरवातीस केली होती. स्पष्टपणे, त्यापासून परिस्थीती अति वाईट झाली आहे. पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांच्या अलीकडील काळातील पाप व कबुली यावरील लेख ज्यात “समेट व प्रायाश्चीत” म्हटले जाते यात त्यांचा पुर्वाधिकाऱ्यांचे शब्द संदर्भित केले व सध्याच्या धर्मातीत समाजातील पापाच्या सर्व साधारण कल्पनेस ग्रहण लागले असे अतिशय दुःखी होऊन म्हटले.
पोपने कॅथोलीक धर्मगुरुंना, सर्वसामान्य कॅथोलीक लोकांना स्मृती दिली की एकत्रीतपणे दिलेली पापाची कबुली व पाप विमोचन जे पुष्कळ कॅथोलीक चर्च मध्ये केले जाते ते तितकेसे चांगले नाही. त्यांनी म्हटले की व्यक्तीगत कबुली हा प्रायाश्चीताचे सॅक्रामेन्ट पाळण्याचा “सर्वसामान्य व सामान्य मार्ग” आहे. कॅथोलीक मतप्रणालीत प्रायाश्चीताचा मेळ चांगले कार्य व पाप्याचा देवासोबत समेट याजसोबत घातला आहे.
बहुतेक प्रॉटेस्टन्ट चर्चेस, धर्मगुरूपुढे खाजगीपणात कबुली देण्याच्या गरजेस धिक्कारतात. ते हे मानतात की पापाच्या क्षमेखातर देवाजवळची कबुली पुरेसी आहे, परंतु कांहीचा कल “प्रभूभोजन” वेळेस सर्वसाधारण कबुली व पापविमोचनाकडे आहे. देवापुढे निर्दोष ठरण्यास केवळ विश्वासच काय तो पुरेसा आहे असे पुष्कळ प्रॉटेस्टन्ट विश्वासतात.
ख्रिश्चन म्हटल्या जाणाऱ्या चर्चेसमधील कबुली, प्रायश्चित, समर्थन किंवा देवापुढे आपली भूमिका कशी शुद्ध राखावी या विषयाबाबतची अशाप्रकारची मतभिन्नता पुष्कळ लोकांना गोंधळात टाकते, त्यांच्याजवळ ते देवासोबतीत निकट येण्यास कांहीतरी करावे ही असंदिग्ध भावना आहे, परंतु ते कसे करावे हे त्यांना ज्ञात नाही.
पुढील लेख देवासोबत योग्यपणात येण्याची का जरूरी आहे याचे स्पष्टीकरण करील व “समर्थना” विषयी असणारे कॅथोलीक व प्रॉटेस्टन्ट दृष्टीकोनाचे परिक्षण करील.